जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई - प्रसिद्ध उद्योजक आणि गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज यांनी भारतात वाढत्या जातीभेद आणि असहिष्णुतेवर नाराजी व्यक्त केली. असहिष्णुता, घृणा आणि धर्म व जातीच्या आधारे होणाऱ्या हिंसाचारांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला फटका बसू शकतो. आदी गोदरेज यांनी शनिवारी एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात आपले मत मांडले आहे. गोदरेज यांनी कार्यक्रमात बोलताना, नव्या भारताच्या निर्माण आणि 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसाठी विशाल दृष्टीकोन ठेवणाऱ्या पीएम नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. परंतु,...
  July 13, 06:05 PM
 • मुंबई- येथील तुर्भे एमआयडीसीत असलेल्या भंगाराच्या गोदामात झोपेत असलेल्या तीन कामगारांची कामगारांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. बोनसरी गावात ही घटना घडली, यामुळे परिसरात खळबळ उडाली. आर्थिक व्यवहारातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाजवळ अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामात हा प्रकार घडला. मृतांमध्येइरशाद (20 ), नौशाद (14) आणि राजेश (28) हे आहेत. या ट्रिपल मर्डरमुळेपरिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांनी तिन्ही...
  July 13, 03:27 PM
 • मुंबई -राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या विविध मोर्चांदरम्यान नोंदवण्यात आलेले राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील खटले (गंभीर गुन्हे वगळून) फडणवीस सरकारने मागे घेतले आहेत. आरक्षणासाठीच्या मोर्चांदरम्यान सार्वजनिक मालमत्तेची झालेली नुकसान भरपाईसुद्धा माफ करण्यात आली आहे. राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१८ दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघालेहोते. त्यात काही ठिकाणी हिंसाचार उफाळला होता, तसेच पोलिसांवर हल्ले झाले हाेते. त्यासंदर्भात गुन्हे व चालू असलेले खटले मागे...
  July 13, 08:00 AM
 • मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत शिवसेना-भाजप युतीची पुढील आठवड्यात चर्चा सुरू होईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात ही चर्चा होणार असून या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणाऱ्या आयारामांवरही चर्चा केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या मते, मित्रपक्षांना १८ जागा सोडून शिवसेना भाजप १३५-१३५ जागा लढवण्याची शक्यता आहे. सध्या ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार जिंकलेला आहे त्या जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय...
  July 13, 07:42 AM
 • मुंबई - गोरेगावातील आंबेडकर नगरमध्ये बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास नाल्यात पडलेल्या दोव वर्षीय दिव्यांशचा तिसऱ्या दिवशीही शोध लागला नाही. मुलाच्या शोध घेण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. याअगोदर अग्निशमन दल, पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेची टीम दिव्यांशच्या शोधकार्यात जुडली होती.दरम्यान मुलाचे वडील सुरज सिंह यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, की या दुर्घटनेसाठी बीएमसी जबाबदार आहे. काही तासांत मला माझा मुलगा मिळाल नाही तर मी आत्महत्या करेन. तक्रार देऊनही...
  July 12, 02:31 PM
 • मुंबई -पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना त्वरित देण्याची गरज आहे. मात्र, काही कंपन्या पीक विमा देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे १७ जुलै रोजी मुंबईतील बीकेसीतील भारती एक्सा विमा कंपनीवर इशारा मोर्चा काढला जाईल. हा इशारा अन्य कंपन्यांसाठीही असेल. त्यानंतरही टाळाटाळ केली तर शिवसेना आपल्या भाषेत बोलेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. अन्य कंपन्यांवर शिष्टमंडळ जाईल, असेही ते म्हणाले. शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, शेतकरी कर्जमाफी व पंतप्रधान पीक वीमा...
  July 12, 09:30 AM
 • मुंबई/औरंगाबाद -राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग या महिन्याअखेेर रंगणार अशा बातम्या असताना या प्रयोगासाठी अद्याप केंद्र सरकारकडून आवश्यक परवाने मिळवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच कृत्रिम पाऊस कोठे पाडायचा याबाबत अद्याप ठरले नसल्याची माहिती राज्य आपत्कालीन विभागाने दिली. कृत्रिम पावसासाठी राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत माहिती देताना सांगितले, सध्या फक्त...
  July 12, 09:06 AM
 • मुंबई - एसईबीसी (मराठा) आरक्षणाला हायकाेर्टाची स्थगिती असताना राज्य सरकारने ९ जुलै ते १४ नाेव्हेंबर २०१४ या काळात तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी नाेकरभरती केली हाेती. ११ महिन्यांच्या या नियुक्त्यांना मागील ५ वर्षांत काेर्टाच्या आदेशानुसार वेळाेवेळी मुदतवाढही दिली जात हाेती. मात्र आता हायकाेर्टानेही मराठा आरक्षणावर शिक्कामाेर्तब केले आहे. त्यामुळे २०१४ मध्ये या कंत्राटी नाेकऱ्या देताना एसईबीसीसाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्त केलेल्या खुल्या गटातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या...
  July 12, 08:27 AM
 • मुंबई -राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचा सोशल मीडियावर प्रचार केला जात आहे. यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न शिवसेना करणार असून त्यासाठीच काढण्यात येणाऱ्या आपल्या जन आशीर्वाद यात्रेला आदित्य ठाकरे शुक्रवारपासून सुरुवात करणार आहेत. शुक्रवारी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुन्हा एकदा शिवशाही सरकार नावाने एक ऑगस्टपासून...
  July 11, 09:50 AM
 • मुंबई -कर्नाटकातील काँग्रेस व जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या मुंबईतील वास्तव्यात बुधवारी हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. बंडखोरांच्या मनधरणीसाठी बंगळुरूहून आलेल्या कर्नाटक सरकारमधील मंत्री डीके शिवकुमारांना भेटण्यास आमदारांनी नकार दिला. तर, शिवकुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संध्याकाळी माघारी पाठवले. या संपूर्ण परिस्थितीमुळे हॉटेलसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजीनामा देऊन काँग्रेस व जेडीएसचे आमदार काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. बीकेसी येथील हॉटेलमध्ये...
  July 11, 09:17 AM
 • मुंबई - कृषी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी भाग, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्ह्यांत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. दुष्काळग्रस्त १४९ तालुके, मराठवाडा व विदर्भातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या नक्षली जिल्ह्यातील २५१ तालुक्यांत ही याेजना राबवण्यात येईल....
  July 10, 09:25 AM
 • मुंबई -उस्मानाबाद येथील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी मुंबई येथील सीबीआय न्यायालयात मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष झाली. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर अण्णांनी गंभीर आरोप केले. पद्मसिंह यांना आपण ओळखत असल्याचे नमूद करून त्यांनीच काही शूटर्सना माझ्या हत्येची सुपारी दिली होती, असे अण्णा म्हणाले. पद्मसिंह यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप होते. तेव्हा मी उपोषण केले. तत्कालीन सरकारने याच्या चौकशीसाठी...
  July 10, 08:38 AM
 • मुंबई - पवन राजे निंबाळकर हत्या प्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी साक्षीदार म्हणून येथील कोर्टात उपस्थिती लावली. विशेष न्यायालयात मंगळवारी झालेल्या या सुनावणीत अण्णा हजारेंनी मुख्य आरोपी पद्म सिंह पाटील यांना लोकप्रतिनिधी म्हणून ओळखत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार पद्मसिंह पाटील हे या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. 2006 मध्ये पवन राजे निंबाळकर यांचा राजकीय वैमनस्यातून खून करण्यात आला असा आरोप आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सुनावणीनंतर...
  July 9, 03:11 PM
 • मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे वाडा-शहापूरचे मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार बरोरा उद्या(10 जुलै)ला मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार बरोरा हे राष्ट्रवादीची आमदारकी सोडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दाखल झालेत. शिवसेना विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आमदारपदाचा राजीनामा सादर केलाय. पांडुरंग बरोरांच्या शिवसेना...
  July 9, 02:47 PM
 • मुंबई - धारावीतील सोनेरी चाळीत राहणाऱ्या महिल्या आणि तिच्या मुलीला रविवारी सापाने दंश केला. महिला उपचारासाठी आपल्या मुलीला घेऊन तत्काळ सायन रुग्णालयात गेली. ज्या सापाने त्यांना चावा घेतला तोच साप घेऊन दोघी मायलेकी रूग्णालयात दाखल झाले. सदरील प्रकार पाहून तेथील डॉक्टर हैराण झाले. डॉक्टरांना विषरोधी इंजेक्शन मिळण्यास मदत मिळेल या अपेक्षेने मायलेकींनी असे केले. सुल्ताना खान (34 वर्ष) यांनी मुंबई मिररलासांगितल्यानुसार, रविवारी सकाळी 11 वाजेदरम्यान तहसीन (18 वर्षे) आणि घरातील इतर लोक नाश्ता...
  July 9, 02:24 PM
 • मुंबई/नवी दिल्ली/बंगळुरू -मुंबईत सोमवारी पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले. पाहता-पाहता रस्त्यांवर उभ्या कारमध्ये पाणी भरले. प्रचंड पावसामुळे रेल्वे, बस आणि विमानसेवा पुन्हा खंडित झाली. पावसामुळे सकाळी ९.३० वाजेपासून सुमारे अर्धा तास अंधार पडल्याने मुंबई विमानतळावरील उड्डाणे बंद राहिली. त्यामुळे तीन विमानांना दुसरीकडे वळवावे लागले. मुंबईत आतापर्यंत १०४३ मिमी म्हणजे एकूण पावसाच्या ४६% पाऊस झाला आहे. कोल्हापूरमध्ये २४ तासांत सर्वात जास्त १७ सेंमी पावसाची नोंद झाली....
  July 9, 10:22 AM
 • मुंबई- टिक टॉक अॅपवर मॉब लिचींगमध्ये मृत पावलेल्या तबरेजबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत व्हिडिओ अपलोड केला. व्हिडीओ अपलोड होताच काही वेळातच व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांमध्ये फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधन फारुकी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या तरुणांचा शोध घेत आहे....
  July 9, 09:53 AM
 • चिपळूण (रत्नागिरी) -तिवरे धरण फुटून मृत झालेल्यांच्या कुटुुंबीयांना राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. शिवाय, राज्य आणि केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला पवार यांनी सोमवारी भेट देत मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. ग्रामस्थांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, गावापासून दूर पुनर्वसन करण्याची...
  July 9, 08:51 AM
 • मुंबई- गोवा रस्त्याच्या दूरवस्थेमुळे उपअभियंत्याच्या अंगावर चिखल ओतून त्यांना बांधण्याचा प्रयत्न केल्यामुळे आमदार नितेश राणे सध्या पोलिस कोठडीत आहेत. नितेश राणे कोठडीत असल्यामुळे सोशल मीडियावर युवासेनेकडून अनेक मेसेज शेअर केले जात आहेत. युवासेनेच्या मेसेजमध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे चिखलात उतरुन घाण साफ करताना दिसत आहेत, त्याची तुलना नितेश राणेंनी अधिकाऱ्याला घातलेल्या चिखलाच्या आंघोळीशी केली जात आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर फोटो शेअर केले आहेत....
  July 8, 04:30 PM
 • मुंबई- लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, त्यानंतर एक-एक करत अनेक काँग्रेस नेत्यांनी आपले राजीनामे दिले. यातचा आता भर पडली ती म्हणजे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा. मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह मिलिंद देवरांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरा यांनी राजीनामा देताना त्यांनी आगामी विधासभा निवडणुकीपर्यंत...
  July 7, 04:45 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात