जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई-राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखरबावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीजकर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के वेतनवाढ दिली जाणारआहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उर्जा-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आणली आहे. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या...
  September 5, 06:13 PM
 • मुंबई- आईने सुनेला माहेरी पाठवले, तीला परत घरात येऊ देत नाही म्हणून मुलानेच जन्मदातीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना कल्याणमद्ये घडली. अमन मुल्ला या आरोपीने रागाच्या भरात घरातील हातात येईल त्या वस्तुने आईवर हल्ला चढवला, यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अमनला अटक केली आह. परिसरातील गफूर पॅलेस नावाच्या इमारतीत अमन आपल्या कुटुंबासोबत राहतो. अमनची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. अमनच्या आईने तिला जबरदस्ती माहेरी पाठवले होते. बायकोला बोलवून घे अशी अमन...
  September 5, 04:53 PM
 • मुंबई - मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील एक 40 मजली इमारतीला धबधब्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. छतावर साचलेले पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली पडत होते. यामुळे हे दृश्य एखाद्या धबधब्यापेक्षा कमी नव्हते. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये इमारतीच्या छतावरुन पाणी खाली कोसळताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही 40 मजली इमारत मुंबईच्या कफ परेड भागात आहे. इमारतीवरून पडणारे पाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. Waterfalls in New Cuffe Parade! #MumbaiRains pic.twitter.com/eqPQhGf73V K Sudarshan (@SudarshanEMA) 4 September 2019...
  September 5, 10:58 AM
 • मुंबई- हवामान विभागाकडून पुढील 24 तासात मुबई,पालघर,रायगड,ठाणे,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक,सातारा,कोल्हापूर घाटपरिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये सकाळी 8:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 122.00 मी.मी.,सांताक्रुझ वेधशाळा येथे 118.3 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. सकाळी 8:30 ते 11:30 पर्यंत कुलाबा वेधशाळा येथे 30.00 मी.मी.,सांताक्रुझ वेधशाळा येथे 121.4 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. अशी माहिती मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने परत...
  September 4, 11:16 PM
 • मुंबई- शिवसेनेने ऑनलाइन स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर भारत आणि हिंदूंना बदनाम केल्याचा आरोप लावला आहे. शिवसेना आयटी सेलचे सदस्य रमेश सोळंकीने नेटफ्लिक्सविरोधात मुंबईच्या एलटी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. सोळंकीने आपल्या तक्रारीत नेटफ्लिक्सच्या सॅक्रेड गेम्स, लीला आणि घोलया सीरिजचे उदाहरण दिले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, तक्रारीची कॉपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस कमिशनर यांना पाठवली आहे. नेटफ्लिक्स एक अमेरिकन कंपनी आहे, ही कंपनी आपल्या...
  September 4, 04:11 PM
 • मुंबई - मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. यात मंगळवार आणि सलग बुधवारी सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आणि पालघर इत्यादी शहरांमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेने बुधवारी सर्वच शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.मुंबईतील कुर्ला परिसरात मीठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर त्या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक बचावासाठी रवाना...
  September 4, 02:52 PM
 • मुंबई : कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांनी मंगळवारी एकमताने निर्णय घेतला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत दोन्ही राज्यांतील पूर आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय...
  September 4, 09:54 AM
 • मुंबई- कोल्हापूर आणि सांगलीमधील पूर बाधित भागातील यावर्षी होणाऱ्या मुलींच्या लग्नात जमेल तेवढी मदत करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व मोठ्या दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केले. या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे. सांगली कोल्हापूरमध्ये गेल्या महिन्यात पावसाने...
  September 3, 09:50 PM
 • मुंबई- कृष्णा पाणीवाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला आता संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने घेतला आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही राज्यांतील पूर आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,...
  September 3, 08:12 PM
 • रायगड - जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्लँटमध्ये आज सकाळी सात वाजता मोठी आग लागली. या आगीमध्ये अग्निशमन दलातील 2 जवानांसह 5 जणांचाहोरपळून मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रणमिळवण्यासाठी जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 25 जणांना आगीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. नवी मुंबईचे पोलिस कमिश्नर संजय कुमार यांनी सांगितले की, वॉटर ड्रेनेज सिस्टममधून ही आग भडकली असून तिचे तिसरी लेव्हले...
  September 3, 12:56 PM
 • मुंबई -एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ आली तर सगळे त्याची साथ सोडतात, असा जगाचा अनुभव आहे, असे म्हटले जाते. चांगली वेळ आली तर जो तो त्याच्याशी नातेसंबंध जोडू पाहतो, असेही म्हटले जाते. मंुबईच्या जयकुमार वैद्य यास या अनुभवाचा प्रत्यय आला. २५ वर्षांचा हा तरुण अमेरिकेत शास्त्रज्ञ झाला आहे. आपला अनुभव सांगताना तो म्हणाला, माझे बालपण मुंबईच्या झोपडपट्टीत संघर्षातच गेले. वडिलांपासून विभक्त झालेली माझी आई माहेरी राहत होती. तेथेच माझा जन्म झाला. त्या काळात आईकडे उत्पन्नाचे काही साधन नव्हते. मामा व...
  September 3, 09:28 AM
 • मुंबई -काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अाणि माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अखेर सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडची जागा जिंकून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत असल्याचे सांगत एका प्रकारे सिल्लोडमधून तेच शिवसेनेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब केले. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या रथावर आरूढ झालेले सत्तार भाजपत प्रवेश करतील अशीच चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी सेना प्रवेश केल्याचे बोललेजात...
  September 3, 08:44 AM
 • मुंबई -महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर-एमएससी) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी तपास करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या मतांचा परिणाम होऊ देऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पाेलिसांना बजावल्याचे याचिकाकर्ते संचालकांचे वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांनी कोणतीही याचिका दाखल केली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. पाच दिवसांत गुन्हे नोंदवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले होते. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या...
  September 3, 07:09 AM
 • मुंबई - पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. राज्यातील घराघरांत तसेच मंडळांत गणेशाची स्थापना करण्यात येत आहे. राजकारणापासून ते चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या घरी गणेशाचे आगमन होत आहे. 13 सप्टेंबरपर्यंत हा गणेशोत्सव चालणार आहे. गणेशोत्सव अपडेट मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची आज सकाळी आरती करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, सोनू सूद आणि स्वप्निल जोशींच्या घरी...
  September 2, 12:24 PM
 • रायगड -मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ वडपाले येथे रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत ५७ प्रवाशांचा जीव वाचला. या वेळी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. ही बस गणेश भक्तांना घेऊन मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे चालली होती. बसला आग लागताच प्रवाशांची एकच धांदल उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बसबाहेर काढले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले, मात्र त्यांचे...
  September 2, 09:56 AM
 • मुंबई -आर्थिक विकासात झालेली मोठी घसरण हे भाजप सरकारच्या अनियोजनाचा परिपाक असून कोणतीही योजना आखताना त्याची व्यावहारिकता न पाहताच लाखो करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. आर्थिक नियोजन फसल्यामुळे सर्वच आघाड्यांवर देशाची अधोगती होत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले की,भारतीय अर्थव्यवस्था पाच वर्षात ५ ट्रिलीयन डॉलर करण्याचे लक्ष्य भाजप सरकारने ठेवले खरे परंतु, यासाठी आवश्यक उपाययोजना मात्र पूर्णपणे फसल्या...
  September 1, 05:37 PM
 • मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपतींनी रविवारी महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले. त्यामध्ये राजीव गांधी यांच्या कार्यकाळात शाहबानो प्रकरणी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देणारे आरिफ मोहम्मद खान यांना केरळचे राज्यपाल करण्यात आले आहे. तामिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या डॉ. तमिलिसाई सुंदरराजन (58) यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या सर्वात युवा...
  September 1, 01:48 PM
 • मुंबई- शरद पवार सहसा कधीच कोणावर चिडलेले पाहायला मिळत नाहीत. पत्रकारांनाही ते नेहमी त्यांच्या वेगळ्या शैलीत उत्तर देत असतात. पण शिर्डीत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार चांगलेच भडकले. या पत्रकाराला आता राष्ट्रवादीकडून ट्रोल केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या पत्रकारावर वैयक्तिक टीका केली आहे. यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्या पत्रकाराची पाठराखण करत ट्रोल करणे मूर्खपणाचे असल्याचे म्हटले. मी स्वत:...
  August 31, 11:08 PM
 • मुंबई-जालना जिल्ह्यातील युवतीवर मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडलेल्या अत्याचारानंतर झालेल्या मृत्यूघटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने यापूर्वीच स्वाधिकारे दखल घेतलेली आहे. तशी नोटीसही मुंबई पोलिसांना 29 ऑगस्ट रोजी बजावलेली आहे. या घटनेसंदर्भात आज(31ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे, त्यांचे अन्य नातेवाईक व सहकारी यांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा दिलासा दिला. त्या...
  August 31, 09:12 PM
 • मुंबई- लालबागच्या राजाचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यावर्षी लालबागच्या राजासाठी ब्रह्मांडाचा देखावा करण्यात आला आहे.भारताचं चंद्रयान 2 सध्या यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा देखावा करण्यात आला. पुढील स्लाईडवरपाहा...
  August 31, 05:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात