जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- मुंबई-पुणे मार्गावर धावणारी एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांपर्यंतची भरगोस कपात करण्यात आली आहे. याबाब परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली घोषणा केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे 8 जुलैपासून लागू होणार आहेत. गेली 15 वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची शिवनेरी ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व...
  July 3, 03:00 PM
 • मुंबई - येथील डोंबिवली लोकल स्टेशनवर एका गर्भवती महिलेची बुधवारी सुखरूप डिलिव्हरी करण्यात आली आहे. प्रसव वेदनेने त्रस्त 29 वर्षीय महिलेला कामा रुग्णालयात नेले जात होती. परंतु, पाऊस, पूर आणि गर्दीमुळे डोंबिवली प्लॅटफॉर्मवरच महिलेला कळ बसली. त्यातही सुदैवाने एक रुपया क्लिनिक नावाने प्रसिद्ध असलेले डॉक्टर आणि नर्स स्टेशनवरच उपस्थित होते. त्यांनी या महिलेची सुखरूप डिलिव्हरी केली आहे. या महिलेने एका मुलाला जन्म दिला. अगदी वेळेवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांनी आपल्या रुग्णाकडून फी म्हणून एक...
  July 3, 11:24 AM
 • मुंबई - विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली आहे. परंतु, अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यक्रमातच ईव्हीएमला दोष देऊ नका, असे सांगितले होते. २००४, २००९ ला ईव्हीएम होते आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या आहेत, हे जयंत पाटील यांनी लक्षात घ्यावे आणि जनतेने का नाकारले याचे सत्य स्वीकारावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विधानसभेत दिला. मतदार याद्यांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी त्याची आधारबरोबर जोडणी व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी...
  July 3, 09:46 AM
 • मुंबई - एमआयडीसीच्या जमीन प्रकरणात झालेल्या आरोपामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना माझ्यावर कसलेही पुरावे नसताना केलेल्या आरोपाने मंत्रिपद गेले. माझ्याकडे अनेकांची प्रकरणे पुराव्यांसहित आहेत. परंतु मी ती मांडणार नाही, कारण त्यांची स्थिती माझ्यासारखी होऊ नये. त्यांच्यावर डाग लागलेला आमदार असा कलंक लागू नये, असे त्यांनी सांगितले. भावनिक झालेले खडसे म्हणाले, गेल्या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही व...
  July 3, 09:44 AM
 • मुंबई - मालाड परिसरात वन विभागाने उभारलेली एक संरक्षक भिंत साेमवारी मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शी राजकुमार गाैड यांनी सांगितले, रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आम्ही आमच्या झाेपडीत झाेपायला जात हाेताे. त्याच वेळी अचानक वरील संरक्षक भिंत ढासळली व तिच्या मागे साचलेले पाणी आमच्या पत्र्याच्या शेडच्या घरात शिरले. वन विभागाने ही भिंत उभारली हाेती, मात्र पाणी जाण्यासाठी मार्गच ठेवला नव्हता. त्यामुळे पाण्याचा प्रचंड लाेंढा...
  July 3, 09:23 AM
 • मुंबई - मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या मान्सूनच्या पावसाने मुंबई चार दिवस अक्षरश: थबकून गेली. सोमवारी मध्यरात्री बेदरकार पाऊस बरसला. रात्री १ ते ३ दरम्यान बरसलेल्या पावसाने ४५ वर्षांतील विक्रम मोडीत काढले. त्याच्या धो..धो..कोसळण्याने पालिका प्रशासन हतबल ठरले असून धावती मुंबई पूर्ण कोलमडून गेली आहे. मागील सलग चार दिवस मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवल्यानंतर सोमवारी सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दुपारी ४ नंतर त्याने पुन्हा फेर धरला....
  July 3, 09:17 AM
 • मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मंगळवारी मुसळधार पावसाने प्रचंड दैना झाली. जागोजाग तुंबलेले रस्ते आणि जलमय झालेल्या रेल्वेमार्गामुळे जनजीवनच ठप्प झाले. अनेक रस्त्यांवर गुडघाभर, तर काही भागांंत यापेक्षा अधिक पाणी साठले आणि मुंबई पालिका प्रशासनाच्या आपत्ती निवारणासाठी केलेल्या नियोजनाचे पितळ पुरते उघडे पडले. या मुसळधार पावसात मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीखाली असलेल्या झोपडपट्टीतील २२ जणांना प्राण गमवावे लागले. कल्याणमध्ये मुसळधार पावसात नॅशनल उर्दू...
  July 3, 08:52 AM
 • मुंबई- सत्ता मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आणि सत्ताही मिळवली. पण सत्ता मिळूनही त्यापासून दूर राहण्याचं दुःख एकनाथ खडसे यांच्याशिवाय कोणी समजू शकत नाही. त्यांनी शेवटच्या अधिवेशनात आपल्या भावना बोलून दाखवल्या. माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली, त्यात काहीही तथ्य नव्हते, आता आरोप करणारावर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. मला या सभागृहातून आरोपांचा डाग घेऊन जाण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी फडणवीसांकडे केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना...
  July 2, 07:25 PM
 • मुंबई- देशाची औद्योगिक राजधानी मुंबई पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. मागील 3 ते 4 दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहर आणि सबअर्बन परिसरात अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी भरले आहे. सरकारनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी रात्री 10 वाजेपासून मंगळवारी सकाळी 7 पर्यंत एकूण 55 विमानाना डायव्हर्ट करण्यात आले आहे, तर 52 विमानाना रद्द करण्यात आले आहे. पावसाचा परिणाम लोकलवरही दिसला आहे. मलाडच्या दर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे मागील पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत...
  July 2, 04:42 PM
 • मुंबई - मुंबईत सलग पाचव्या दिवशी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच अत्यावश्यक काम असल्याशिवाय मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने मंगळवारी जारी केले आहेत. एवढेच नव्हे, तर मुंबई, ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा, महाविद्यालयांसह कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांतच मुंबईत तब्बल 21 इंच पाऊस पडला. अनेक ठिकाणी 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे एक...
  July 2, 03:22 PM
 • मुंबई - मुसळधार पावसामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या ट्रेन्समध्ये मोठे बदल केले आहेत. यात काही गाड्या पूर्णपणे दिवसभरासाठी रद्द करण्यात आल्या. तर काही ट्रेनचे मार्ग थेट बदलण्यात आले आहे. याचा फटका प्रामुख्याने सोलापूर आणि हैदराबादच्या प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे रुळांवर साचलेले पाणी आणि मंद वाहतुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनसवरून ही प्रेस नोट जारी केली आहे....
  July 2, 03:06 PM
 • मुंबई- मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. मुंबईतील झोपडपट्ट्यांवर कडक भूमिका घ्यावा लागतील. काही लोकांना त्रास होईल, पण दुर्घटना टाळण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिक्रमणे झालेल्या ठिकाणी, नदी नाल्याच्या बाजूची बांधकामे याबाबतही कडक भूमिका घेण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मालाड दुर्घटनेप्रकरणी जी एसआरएच्या चौकशीची...
  July 2, 01:58 PM
 • मुंबई - मागीलपाच दिवसापासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले. दरम्यान मुंबईतीलमालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत 20 फूट उंच भिंत पडून18 जणांचा मृत्यू झाला असून तर दुसऱ्या दुर्घटनेत 2 जणांच मृत्यू झाला आहे. त्यासोबतच कल्याणमध्येही शाळेची भिंत घरावर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका 3 वर्षांच्याचिमुकल्याचाही समावेश आहे. चार जणांना वाचवण्यात यश मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीवाडा परिसरात मुसळधार पावसामुळे भिंत...
  July 2, 12:46 PM
 • मुंबई- मागील पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतील मालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत 20 फूट उंच भिंत पडून 18 जणांचा मृत्यू झाला असून तर दुसऱ्या दुर्घटनेत 2 जणांच मृत्यू झाला आहे. त्यासोबतच कल्याणमध्येही शाळेची भिंत घरावर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या ठिसाळ कारभारामुळे परिसरातील अनेक भागांत पाणी तुंबल्याने मुंबईकर अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. आहे....
  July 2, 12:11 PM
 • मुंबई -पिण्याच्या पाण्याच्या उद्भवापासून ५०० मीटरच्या आत काही जण खासगी विहीर किंवा कूपनलिका खोदत आहेत. वास्तवात असे करण्यास बंदी आहे. तरीही असा प्रकार केलेल्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले. गणपतराव देशमुख यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात लोणीकर बोलत होते. अतिशोषित पाणलोट क्षेत्रांमध्ये २०० फुटांहून अधिक खोलीची कूपनलिका घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आला आहे....
  July 2, 10:21 AM
 • मुंबई - राज्यातील मराठा समाजाला (एसईबीसी) फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण हायकाेर्टात टिकले असले तरी आरक्षणाच्या टक्केवारीत कपात करण्याची वेळ सरकारवर आली आहे. सरकारने १६ टक्के आरक्षण मंजूर केले हाेते. मात्र, राज्य मागासवर्ग आयाेगाने शिक्षणात १२ व नाेकरीत १३ टक्केच आरक्षणाची शिफारस केली हाेती. हायकाेर्टानेही त्यावरच शिक्कामाेर्तब केले हाेते. त्यामुळे अखेर सरकारला आधीच्या १६ टक्के आरक्षणाच्या अध्यादेशात बदल करावा लागला. साेमवारी शिक्षण व नाेकरीत अनुक्रमे १२ व १३ टक्के आरक्षणाचा...
  July 2, 07:34 AM
 • मुंबई - हायकोर्टाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर आता राज्य सरकारने सुद्धा सुधारित अध्यादेश जारी केला आहे. एकमताने मंजूर झालेल्या नवीन अध्यादेशानुसार, मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. तर नोकरीत 13 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हायकोर्टाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिली तरीही 16 टक्के आरक्षण मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतरच राज्य शाससाने आता सुधारणा करून आरक्षणाची टक्केवारी दुरुस्त केली आहे. मोठ्या संघर्षानंतर 29 नोव्हेंबर 2018 ला दोन्ही...
  July 1, 05:48 PM
 • मुंबई- शहरात रविवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरले. सोमवारी ऑफीसचा दिवस असल्यामुळे नागरिकांना प्रंचड तसमस्यांना सामोरे जावे लागले. सध्या रस्त्यावरील पाण्याला मोटार पम्पच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहे. मुंबईतील या परिसरात पाणी पावसामुळे अंधेरी सब वे, कुर्ला सीएसटी रोडवर पाणी भरल्यानंतर याला बंद करण्यात आले. जागो-जागी बीएमसीचे कर्मचारी आणि पोलिस तैनात आहेत. सबवे आणि रस्त्यावरून पाणी काढण्यासाठी पम्पाची साहाय्यता...
  July 1, 12:27 PM
 • मुंबई / नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची जागा सुशील कुमार शिंदे घेणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी तर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षांतर्गत बैठकांमध्ये सांगितले. सोबतच, पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा त्यांचा आग्रह होता. यानंतर चर्चेत आलेल्या नावांपैकी महाराष्ट्राचे माजी...
  June 30, 03:25 PM
 • मुंबई- पबजी गेमची क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे, तसेच यामुळे अनेकजणांचे जीवही गेले आहेत. असेच एक प्रकरण मुंबईतील भिवंडीमध्ये घडली. आईच्या मोबाईलवर पब्जी गेम खेळण्यास नकार दिल्याने 15 वर्षीय अल्पवयीन भावाने आपल्या 19 वर्षीय मोठ्या भावाच्या पोटात कात्री भोसकून हत्या केली आहे. घटना शनिवार(29 जून)ला भिवंडीत घडली. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह(19) असे मृत युवकाचे नाव आहे. अल्पवयीन हत्या करणाऱ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या...
  June 30, 12:56 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात