Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केली नाही. त्यामुळे यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे येण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण गृह विभागाने दिले आहे. विविध माध्यमांत यासंदर्भात प्रसारित होणारी बातमी दिशाभूल करणारी असल्याचेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. कोरेगाव भीमाप्रकरणी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समिती स्थापन करून त्यांनी...
  September 12, 07:20 AM
 • मुंबई- मराठा आंदोलनप्रकरणी जे अटकसत्र सुरू आहे त्यात निरपराध लाेकांची धरपकड सुरू आहे. महाराष्ट्र पेटवणारा शिवरायांचा मावळा नाही. पोलिसांकडे पुरावे असतील तर जरूर अटक करा. गुन्हे मागे घेण्याबाबत ज्या घाेषणा झाल्या त्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि ताबडतोब गुन्हे मागे घ्यावेत, सणासुदीच्या काळात त्यांच्यावर कायद्याचे खोटं विघ्न आणले आहे ते दूर करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. मराठा...
  September 12, 07:05 AM
 • मुंबई- ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेत राहून डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई का, असा सवाल करत डीजे व्यावसायिकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने सरकारला शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाला संस्थेने अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात...
  September 12, 06:42 AM
 • मुंबई- मागासवर्ग आयोगाद्वारे प्राप्त होणारा मराठा समाजाच्या मागासपणाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर होईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. अंतिम अहवाल येईपर्यंत आयोगाच्या अहवालाबाबतचा प्रगती अहवाल दर चार आठवड्यांनी सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका अाैरंगाबादचे विनोद पाटील यांनी दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा...
  September 12, 06:39 AM
 • नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी सलग २७ दिवशी १४ पैशांनी वाढले. यामुळे जनता हैराण आहे, तर राज्य सरकारचा आिर्थक फायदा वाढत आहे. एसबीआयच्या एका संशोधन अहवालानुसार, वाढलेल्या दरांमुळे १९ प्रमुख राज्यांना २०१८-१९ मध्ये २२,७०२ कोटी रुपयांची अिधक कमाई होईल. हा अंदाज वर्षभर कच्च्या तेलाचा दर सरासरी ७५ डॉलर प्रति बॅरल आणि डॉलरचे मूल्य ७२ रुपये राहील, असे मानून काढण्यात आला आहे. अहवालानुसार, राज्यात पेट्रोलचे दर सरासरी ३.२० रु. आणि डिझेल २.३० रुपयांनी कमी केले तरीही राज्यांचा महसूल...
  September 12, 06:18 AM
 • मुंबई- बॅंक कर्मचारी ग्राहकांना चांगली वर्तवणूक देत नाहीत, अशी तक्रार कायम केली जाते. अतिशय क्षुल्लक कामासाठी ग्राहकाला बॅंकेत सारख्या फेर्या माराव्या लागतात. तसेच काही बँका तर ग्राहकांकडून विनाकारण शुल्क वसूल करतात. तुम्हालाही ही समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे. बॅंकेकडून समाधानकारक सेवा मिळत नसेल तर तुम्ही थेट तक्रार करु शकतात. येथे करू शकतात तक्रार... आरबीआयनुसार, स्टेटमेंट चार्जेस, एटीएम ट्रान्झॅक्शन, क्रेडिट कार्डशी संबंधित समस्येसाठी तुम्ही बँकेच्या शाखा...
  September 11, 07:43 PM
 • मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला सोमवारी वेगळे वळण मिळाले. सीबीआयच्या कोर्टात फ्लॅट मालकाने धक्कादायक खुलासा केला.फ्लॅट मालिक डोमिनिक मचाडो यांनी कोर्टात सांगितले की, शीना आणि राहुल मुखर्जी त्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होते. दोघांनी खोटे बोलून फ्लॅट भाड्याने घेतला होता. शीना ही पत्नी असल्याचे राहुलने सांगितले होते. एवढेच नाही तर राहुलने फ्लॅट रिकामा केल्यानंतर थकलेले भाडे (70 हजार रुपये) परत करण्यात खूप विलंब केला होता. राहुल हा पीटर मुखर्जीचा मुलगा आहे. त्याने...
  September 11, 07:04 PM
 • रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इको कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका चिमुरड्याचा समावेश आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळच्या वाकेडघाटीत हा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणारी लक्झरी बस आणि गोव्याकडे जाणाऱ्या इको कारची...
  September 11, 02:55 PM
 • मुंबई- कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी अात्महत्या वाढत असल्याचे एेकून व्यथित असलेला बाॅलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी अाता बळीराजाला कर्जाच्या जाेखडातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला अाहे. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत वन टाइम सेटलमेंटसाठी पात्र असलेल्या राज्यातील सुमारे ३६० शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी बच्चन यांनी २.०३ काेटी रुपयांची मदत केली. यापैकी बहुतांश शेतकरी हे विदर्भ-मराठवाड्यातील अाहेत. तसेच राज्यातील ४४ शहिदांच्या कुटुंबीयाच्या ११२...
  September 11, 12:51 PM
 • मुंबई- अंधेरी (पूर्व) मधील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
  September 11, 12:28 PM
 • मुंबई- जागतिक व्यापारी युद्धाची शक्यता, विदेशी गुंतवणूकदारांकडून हाेणारी विक्री आणि निर्यातकांच्या वतीने डॉलरची मागणी यांचा विचार करता भारतीय चलनातील घसरण सुरूच आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७२ पैशांच्या घसरणीसह विक्रमी ७२.४५ वर बंद झाला. ही १३ आॅगस्टनंतर रुपयातली सर्वात मोठी घसरण आहे. त्या दिवशी रुपयात ११० पैशांची घसरण झाली होती. सोमवारी झालेल्या व्यवहारात हा १.३ टक्के म्हणजेच ९४ पैशांच्या घसरणीसह ७२.६७ पर्यंत पोहोचला होता. त्या वेळी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात डॉलरची विक्री...
  September 11, 09:20 AM
 • मुंबई- इंधनाचे दर सरकारच्या हातात नसतात, असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मारलेली थाप आहे. जर पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे सरकारच्या हातात नसेल तर भाजपावाले विरोधात असताना आंदोलन का करत होते, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी उपस्थित केला. मोदी सरकार थापा मारण्यात पटाईत आहे. नोटबंदी, जीएसटी फसल्यानंतर सरकारने आता थेट जनतेच्या खिशात हात घातल्याचाही आरोप राज यांनी यावेळी केला. काँग्रेस सत्तेत असतानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुनी...
  September 11, 08:47 AM
 • मुंबई- HDFC बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी हत्येचा गुंता सोडविल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अटक केलेला आरोपी सरफराज शेख यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने पैशासाठी संघवी यांची हत्या केल्याचे सांगितले आहे. EMI भरण्यासाठी सरफराजला 30-35 हजार रुपयांची गरज होती. सिद्धार्थ संघवी यांची कार रस्त्यात अडवून त्यांना लुबाडणे, हा त्याचा एकमेव उद्देश होता. मात्र, ओळख समोर येईल या भीतीमुळे त्याने सिद्धार्थ संघवी यांना चाकूने भोसकून त्यांची...
  September 11, 08:46 AM
 • मुंबई- भारतीय डाक विभागातर्फे माय स्टॅम्प या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. या तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार सदा सरवणकर, आमदार अनिल परब, कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांच्यासह सर्व विश्वस्त, खासदार राहुल शेवाळे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार,...
  September 11, 08:34 AM
 • मुंबई- इंधन दरवाढीविरोधात सोमवारी विरोधकांनी पुकारलेला भारत बंद हा कुणी पुकारला आहे, यापेक्षा त्यामागचा हेतू काय होता ही बाब आपल्या दृष्टीने महत्त्वाची होती, म्हणून मनसेने या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. केंद्राने केलेली नोटबंदी आणि जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा निर्णय फसल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात हे सरकार हात घालत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. तसेच इंधन दरवाढ हा आपल्या हातातला विषय नाही, असे आज सांगणारा...
  September 11, 08:18 AM
 • नवी दिल्ली/मुंबई- पेट्रोल आणि डिझेल दरवाढ तसेच महागाईविरोधात सोमवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २१ विरोधी पक्ष भारत बंद करत रस्त्यावर उतरले. तथापि, महाराष्ट्रासह देशभरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तोडफोडीच्या किरकोळ घटना वगळता बहुतांशी आंदोलन शांततेत पार पडले. तथापि, भारत बंदच्या दिवशीही पेट्रोल २३ पैसे, तर डिझेल २२ पैशांनी महाग झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकार व काही राज्ये व्हॅट घटवण्यास तयार नाहीत. भाजपने पत्रकार परिषद घेऊन बंदचा फज्जा उडाल्याचा दावा केला. या...
  September 11, 05:48 AM
 • मुंबई- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रासह देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसच्या भारत बंदला 21 पक्षाचा पाठिंबा दिला. ऐनवेळी भारत बंदमध्ये सहभागी न झालेल्या शिवसेनेचा खरा मुखवटा जनते समोर आला असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण यांनी मोदी सरकारसह शिवसेनेचाही यावेळी समाचार घेतला. भारत बंददरम्यान महाराष्ट्रात कुठेही हिंसक घटना घडली...
  September 10, 05:11 PM
 • औरंगाबाद- बॉलीवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी माझ्या कथा चोरुन चित्रपट बनवल्याचा दावा करीत औरंगाबाद येथील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांनी सुभाष घई, आमिर खान, राकेश मेहरा, रॉनी स्क्रूवाला यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे. 7 सप्टेंबर रोजी बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना अजामीन पात्र वॉरंट रद्द करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोर्टात हजर व्हावे लागले होते. या घटनेमुळे औरंगाबादमधील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांचे नाव बहुतांश लोकांना प्रथमच समजले. सिद्धीकी...
  September 10, 04:23 PM
 • नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या विरोधात काँग्रेससह विरोधकांनी भारत बंद पुकारला आहे. बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात या बंदचा परिणाम पाहायला मिळतोय. मुंबईत काँग्रेस नेते संजय निरुपम यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांबरोबर वाद घातल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्वपक्षीय बड्या नेत्यांसह रामलीला मैदानावर विरोध प्रदर्शन करत आहेत. राहुल गांधींबरोबरच राष्ट्रवादी...
  September 10, 02:23 PM
 • मुंबई - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. या बंदसाठी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. मुंबईत विविध ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्तेही बंदसाठी बाहेर पडल्याचे चित्र आहे. अंधेरीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने हे आंदोलन केले. दादरमध्ये मनसेच्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपात संजय निरुपम...
  September 10, 12:50 PM
 
जाहिरात

RECOMMENDED