जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- हातकणंगलेसह इतर ३ लोकसभा मतदारसंघांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीने योग्य तो प्रतिसाद न दिल्यास स्वबळावर लढू, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान, खासदार राजू शेट्टी राज्यात चौथी आघाडी उभारणार असल्याच्या २-३ दिवसांपासून चर्चा आहेत. मात्र, आम्ही राज्यात चौथी आघाडी उभारणार असल्याच्या बातमीत तथ्य नाहीअसेही तुपकरांनी दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले. तुपकर म्हणाले, मोदींचा पराभव हेच संघटनचे प्रमुख...
  February 1, 08:50 AM
 • मुंबई- लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही निवडणुकीच्या रणनीतीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभ्रमात असल्याचे चित्र आहे. निवडणूक लढवावी की नाही, लढवल्यास किती जागांवर उमेदवार उभे करावेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत एकतर्फी समझोता करावा का, यासारख्या मुद्द्यांवरून मनसेच्या नेत्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. गुरुवारी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीतून ही बाब समोर आली असून प्रचारात किमान अस्तित्व दिसण्यासाठी तरी काही जागा...
  February 1, 08:12 AM
 • मुंबई- देशाच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारे २५ लाखांचे अनुदान दुपटीने वाढवण्यात आले आहे, आता ही रक्कम ५० लाख असेल. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत लष्करात शौर्य गाजवणाऱ्या महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवा पदक विजेत्यांच्या अनुदानातही दुपटीने वाढ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. शहिदांच्या कुटुंबीयांना त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना...
  February 1, 07:24 AM
 • मुंबई- देशातील सर्वात मोठी बॅंक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हरला पासवर्डच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिणामी लाखो खातेदारांची गोपनिय माहिती लीक झाल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. अमेरिकेची टेक वेबसाईट टेकक्रंचने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील एका डेटा सेंटरमध्ये एसबीआयचे सर्व्हर आहे. बँकेच्या या सर्व्हरला पासवर्ड नाही. यामुळे लाखो खातेदारांची माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्राहकांचे बँक बॅलन्स, खाते क्रमांक लीक झाल्याचा संशय डेटा...
  January 31, 02:07 PM
 • मुंबई : टॅक्सी सुविधा देणारी उबर कंपनीने आता जल परिवहनमध्ये पाऊल टाकले आहे. जल परिवहनला प्रोत्साहन देण्यासाठी उबरने महाराष्ट्र मॅरीटाइम बोर्डसोबत भागीदारी करत उबर बोट लॉन्च केली. उबर 1 फेब्रुवारीपासून आपली बोट सुविधा सुरु करत आहे. देशातप्रथमच सुरु होत आहे अशी सेवा उबरची उबर बोट सुविधा भारतातील पहिली तर जगातील दुसरी सुविधा असणार आहे. याआधी उबरने 2017 मध्ये क्रोएशियातील सुरम्य येथे अशी सुविधा लॉन्च केली होती. याठिकाणी सुरु होणार उबर बोट पायलट परियोजना अंतर्गत सुरु होणारी ऑन-डिमांड...
  January 31, 12:47 PM
 • मुंबई- प्रसिद्ध मराठी सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी (वय- 53) याचे बुधवारी (ता.30) निधन झाले. मुंबईतील विले पार्ले स्टेशनला जाताना साळवी यांच्या छातीत दुखू लागले. ते खाली बसले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. दिनेश साळवी यांच्या आकस्मिक निधनाने सिने आणि नाट्यसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दिनेश साळवी यांची ओळख होती. ते मेन स्ट्रीममधील अभिनेते नव्हते. परंतु अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते. सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी...
  January 31, 12:21 PM
 • मुंबई- मुंबईतील लोखंडवाला परिसरातील एका फ्लॅटमध्ये टीव्ही अभिनेता राहुल दीक्षित याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना बुधवारी (ता.30) उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी शेजारी राहाणार्या नागरिकांची चौकशी केली. राहुलच्या फ्लॅटमधूनसोमवारी (ता.28) भांडणाचा मोठा आवाज येत होता, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे राहुलने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. सुसाइड नोट न सापडल्याने संशय बळावला... मुंबई पोलिसांनी सांगितले की, ओशिवारा पोलिस...
  January 31, 12:20 PM
 • मुंबई- १७ व्या लोकसभा निवडणुकांबरोबर महाराष्ट्रातील निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, अशी धास्ती काँग्रेसच्या नेत्यांना लागली आहे. त्यामुळे केंद्राच्या जाहीरनाम्यावर काम करत असतानाच राज्याचा स्वतंत्र जाहीरनामा बनवण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. केंद्राच्या धर्तीवरच राज्य जाहीरनाम्यासाठी जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसच्या जाहीरनामा मसुदा समितीची बैठक बुधवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अखिल भारतीय...
  January 31, 07:55 AM
 • मुंबई- आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना बँकेच्या संचालक मंडळाने नोकरीवरून एक प्रकारे बडतर्फ केले. संचालक मंडळाने पत्रक काढून या निर्णयाची माहिती दिली. यात म्हटले आहे की, चंदा कोचर यांना काढून टाकण्यास टर्मिनेशन ऑफ कॉज मानले जाईल. याचा अर्थ असा की, काही कारणांमुळे नोकरीवरून काढून टाकणे. या निर्णयामुळे कोचर यांना सध्या व आगामी काळात मिळणारे सर्व लाभ बंद होतील. मग तो बोनस असो, पगारवाढ असो, स्टॉक ऑप्शन असो की मेडिकल बेनिफिट असो. त्यांना एप्रिल २००९ ते मार्च २०१८ या काळात देण्यात...
  January 31, 07:30 AM
 • मुंबई/ अकोला- युतीसाठी तोंडी प्रस्ताव देऊनही अद्याप शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे चिंतेत असलेल्या भाजपने आता विभागनिहाय बैठका घेऊन स्वबळाचीही चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मराठवाडा व खान्देशचे खासदार व नेत्यांसमवेत मंथन करण्यात आले. खासदारांच्या कामाचा आढावा घेतानाच युती झाल्यास कोण व न झाल्यास आपला संभाव्य उमेदवार कोण असू शकेल, याबाबतही भाजपने चाचपणी केल्याची माहिती...
  January 31, 07:24 AM
 • मुंबई- प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या दोन भावांनी तरुणाला एवढे मारले की त्याने जागेवरच प्राण सोडला. मालाड परिसरात ही घटना घडली आहे. सैफ अली शराफत अली (25) असे मृत तरुणाचे नाव होते. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शराफत आणि आरोपींच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते. दोघे लवकरच विवाह करणार होते. परंतु तरुणीच्या नातेवाईकांचा या विवाहाला विरोध होता. शराफत मंगळवारी (ता.29) प्रेयसीला भेटायला घरी गेला होता. मात्र, तरुणीच्या भावांनी...
  January 30, 04:57 PM
 • मुंबई- पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून सेल्समन पतीने ऑफिसमध्ये घुसून चाकूने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीवर चाकूने तब्बल 26 वार केले. भाईंदर पश्चिम स्टेशन रोडवर असलेल्या व्यंकेटेश्वर इमारतीमध्ये मंगळवारी (ता.29) ही घटना घडली आहे.भायंदरमध्ये घडली. नंतर पतीने स्वत:ला पोलिसांच्या हवाले केले. सीएच्या ऑफिसमध्ये घडला थरार.. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वीणा भोईर (35) ही महिला एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या (सीए) ऑफिसमध्ये मागील आठ वर्षांपासून काम...
  January 30, 02:43 PM
 • मुंबई- शिवसेना नेत्याच्या पत्नीने मुंबईतील तुरुंगाच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता.28) सकाळी ही घटना घडली. वैशाली निमसे (वय-34) असे आत्महत्या केलेल्या महिला आरोपीची नाव होते. पतीची हत्या केल्याप्रकरणी वैशाली निमसे ही मागील काही दिवसांपासून तुरुंगात होती. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून केली होती पतीची हत्या.. शिवसेना नेता शैलेश निमसे यांची हत्या त्यांची पत्नी वैशाली निमसे हिने केली होती. शैलेशचे विवाहबाह्य संबंध असल्याचा वैशालीला संशय होता. त्यामुळे...
  January 30, 12:55 PM
 • मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन हा वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहे. एका विदेशी तरुणीसोबत अर्जुनचे नाव जोडले जात आहे. याआधी सचिनची कन्या सारा ही देखील चर्चात होती. अर्जुनचे नाव इंग्लंडची महिला क्रिकेट संघातील डेनियल व्याट हिच्याशी जोडले जात आहे. दोघे मागील काही दिवसांपासून डेट करत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अर्जुन आणि डेनियल दोघांमध्ये प्रेम जुळले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डेनियल ही तेंडुलकर कुटुंबाची सून होऊ शकते. अर्जुनने आपले लक्ष...
  January 30, 12:32 PM
 • मुंबई : हजारो वर्षांपासून भारत देश विविध वंश, भाषा व वेगवेगळ्या धर्माचा राहिलेला आहे. बहुविविधता भारतीय सभ्यतेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मात्र, हे सारे पुसून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देश हिंदुराष्ट्र होईल, असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातिच्या लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी दिला. भारतीय लोकांसाठी सध्याचा काळ मोठा कठीण आहे, असे स्पष्ट करत मोदी सरकारच्या काळात देशातील वाढत्या असहिष्णुतेवर सहगल यांनी पुन्हा थेट बोट ठेवले. दादरच्या शिवाजी मंदिरात मंगळवारी सायंकाळी...
  January 30, 10:23 AM
 • मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात होणाऱ्या पुरोगामी महाआघाडीसाठी काँग्रेससोबत बैठक झाली. वंचित आघाडी १२ जागांवर ठाम आहे. मात्र, काँग्रेसचा त्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याने या बैठकीत केवळ चर्चा झाली, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वेसण घालण्याच्या आमच्या मागणीच्या मुद्द्यावर काँग्रेसकडे ठोस प्रस्ताव नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व भारिप बहुजन पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या...
  January 30, 10:14 AM
 • मुंबई : राज्याच्या लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्रिपदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी मंजुरी दिली. यासोबतच लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम- १९७१ नुसार लोकायुक्त आणि उपलोकायुक्त ही पदे नेमण्यात आली आहेत. अशी पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार...
  January 30, 10:06 AM
 • मुंबई : बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता मुख्यमंत्री शिशू स्वागत किट देण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ मंगळवारी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात झाला. प्रजासत्ताक दिनापासून योजना अमलात आली असून शासकीय रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीवेळी हे किट नि:शुल्क दिले जाईल. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयात जन्मणाऱ्या सर्व घटकांमधील महिलेच्या पहिल्या प्रसूतीवेळी हे किट मोफत देण्यात येणार आहे. योजनेसाठी...
  January 30, 07:47 AM
 • delete
  January 30, 07:32 AM
 • मुंबई- बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या मातोश्री निर्मला पाटेकर (वय- 99) यांचे मंगळवारी (ता.29) निधन झाले. सायंकाळी ओशिवारा विद्युत दाहिणीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईने अखेरचा श्वास घेतला तेव्हा घरी नव्हते नाना.. आईने अखेरचा श्वास घेतला तेव्हा नाना पाटेकर घरी नव्हते. ते घरी पोहोचले तोपर्यंत निर्मला पाटेकर यांनी जगाचा निरोप घेतला होता. सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांला ओशिवारा येथील विद्युत दाहिणीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक आणि...
  January 29, 07:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात