जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करताच माजी विरोधी पक्षनेते आणि आताचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वड्डेटीवार यांच्या जागेवर जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून अभिनंदन केले. लोकसभा...
  June 24, 03:48 PM
 • मुंबई - आप-आपल्या पक्षांवर नाराज होऊन भाजपचा हात धरलेल्या आणि नुकतेच राज्य सरकारमध्ये मंत्री झालेल्या तीन नेत्यांना हायकोर्टाकडून दिला मिळाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकरांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. या तिन्ही नेत्यांनी पक्षांतर कायद्यांतर्गत पक्ष सोडून आपली आमदारकी गमावली. अशात त्यांना मंत्रिपद देणे घटनाविरोधी असल्याचे याचिकेत सांगण्यात आले आहे. दरम्यान हायकोर्टाने...
  June 24, 03:20 PM
 • मुंबई - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका करत पोलिसांच्या बढती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप यांनी केला आहे. अपात्र कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 5 लाख रूपये घेऊन त्यांची पोलिस उपनिरिक्षकपदावर बढती केल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. दरम्यान या बढती प्रक्रियेत 100 कोटींचा घोटाळा झाला असल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. अपात्र असलेल्या 636 हवादारांची पीएसआयपदी बढती करण्यात आली. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रूपयांची लाच घेण्यात आल्याचे आव्हाड...
  June 24, 03:13 PM
 • मुंबई-एका ऑटो ड्रायव्हरचे लाजिरवाणे कृत्य मुंबईतील पॉश परिसरातून समोर आले आहे. पवईच्या हीरानंदानी परिसरातील एका 19 वर्षीय तरुणीलापाहून ऑटो ड्रायव्हरने मास्टरबेशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी रात्री फिरण्यासाठी बाहेर आली होती, त्यावेळेस ही घटना घडली. नंतर तरुणीने ट्वीट करून मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली. तरुणीने सांगितले की, अंदाजे रात्री 12 वाजता मी हीरानंदानीमध्ये तलावाजवळ जॉगिंग करत होते. हायवेपर्यंत गेल्यानंतर मी परत फिरले. त्यावेळी मला...
  June 24, 02:53 PM
 • मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 7 लाख 44 हजार 981 रूपयांची पाणीपट्टी थकित आहे. यामुळे बीएमसीने मुख्यमंत्र्याच्या बंगल्याचा डिफॉल्टरांच्या यादीत समावेश केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या 18 मंत्र्यांनी पाणीपट्टी भरली नसल्याने त्यांचे नाव डिफॉल्टरांच्या यादीत आहे. एका माहितीच्या अधिकारात हा खुलासा झाला. 2001 पासून पाणीपट्टी थकीत बीएमसीने सांगितले की, मुंबईच्या मालाबार परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची पाणीपट्टी थकित आहे. तसेच डिफॉल्टरांच्या यादीत...
  June 24, 01:54 PM
 • मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीवेळी रविवारी कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. धक्काबुक्कीत सहभागी असलेले गट गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील मधुसूदन केंद्रे व राजेश विटेकर यांचे असल्याचे समजते. शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेत होते. परभणी जिल्ह्याचा आढावा सुरू असतानाच बाहेर बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत...
  June 24, 09:32 AM
 • मुंबई - मुंबईतील एका न्यायालयातील प्रकरणामुळे सर्वजण चकित झाले आहेत. येथे घटस्फोटाचा खटला लढवत असलेल्या 35 वर्षीय महिलेने वेगळ्या राहत असलेल्या पतीपासून दुसरे मुल व्हावे यासाठी महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. पतीने 2017 मध्ये पत्नीच्या कथित क्रुरतेला कंटाळून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला आहे. पतीने दर्शवला विरोध महिलेचे म्हणणे आहे की, तिची आई होण्याचे वय संपण्यापूर्वी ती वेगळ्या राहत पतीसोबत वैवाहिक संबंध ठेवून किंवा इनविट्रो फर्टिलायजेशनद्वारे गर्भ धारणा करण्याची परवानगी...
  June 23, 04:31 PM
 • मुंबई -आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुढे केले अाहे. देवेंद्र फडणवीस ऑगस्ट महिन्यात सर्व २८८ मतदारसंघांत विकास यात्रा काढणार असून याला फिर एक बार शिवशाही सरकार यात्रा असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी यात्रेत मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजपचे मंत्रीही सहभागी होणार आहेत. एकीकडे युती होणारच, असे म्हटले जात असले तरी भाजपकडून दगाफटका होऊ शकतो, अशी शंका शिवसेनेच्या नेत्यांना आहे....
  June 23, 11:11 AM
 • मुंबई- नौदलाची एक युद्धनौका, ज्याला बनवण्याचे काम सुरू होते, त्यात शुक्रवारी अचानक आग लागली. घटना महाराष्ट्रातील माझगाव शिपयार्डमध्ये घढली. फायर ब्रिगेड चीफ पीएस रहंगदले यांनी सांगितले की, संध्याकाळी 5.44 वाजता काम सुरू असलेली युद्धनौका आयएनएस विशाखापट्नममध्ये ही आग लागली. या आगीमुळे संपूर्ण नौकेत धुर पसरला आणि यात एका मजुराचा श्वास गुदमरून मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. चीफ रहंगदले यांनी पुढे सांगितले की, ही आग नौकेच्या तिसऱ्या फ्लोअरपर्यंत आग पसरली होती. फायर फायटर्सनी संध्याकाळी...
  June 22, 12:11 PM
 • मुंबई -राज्यातील मुस्लिम समाजाला धार्मिक निकषांवर आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले. त्यावर विरोधकांनी न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला विरोध केला नव्हता. मग तुम्ही का देत नाही, असा सवाल करत जोरदार गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सभापतींनी पाच मिनिटांसाठी तहकूब केले. आघाडी सरकारने राज्यातील सामाजिक, आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मराठा समाजासोबतच मुस्लिम समाजाला आरक्षण...
  June 22, 10:15 AM
 • मुंबई -जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यातील ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत आणि पुनवर्सन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला लेखी उत्तरात दिली आहे. तसेच २०१५ ते २०१८ या चार वर्षांत १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून १२ हजारपैकी ६८८८ प्रकरणे शेतकरी कर्जाच्या निकषात बसत असल्याने यापैकी ६८४५ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे, तर तीन महिन्यांत झालेल्या ६१० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी ९६...
  June 22, 10:14 AM
 • शिराढोण -अत्यंत संयमात आणि उद्रेकाच्या माध्यमातून लाखोंचे मोर्चे, आंदोलन केलेल्या मराठा समाजाच्या हाती अजूनही निराशा, हतबलता आणि अपयशच दिसून येत आहे. देवळाली(ता.कळंब) येथील १६ वर्षीय अक्षय देवकर याच्या आत्महत्येतून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दहावीला ९४.२० टक्के गुण घेतलेल्या अक्षयला गुरुवारी त्याच्या लातूरमधील काही मित्रांनी शाहू कॉलेजचे मेरिट ९८ टक्क्यांवर क्लोज होतेय, असे सांगितले. मात्र, आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याने हतबल होऊन गळफास घेत जीवनयात्रा...
  June 22, 09:24 AM
 • मुंबई -दहावीत ९४ टक्के गुण मिळवूनही चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश व दुष्काळी परिस्थितीमुळे कॉलेजचे शुल्क भरू शकत नसल्यामुळे उस्मानाबादच्या देवळाली गावातील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने व्यथित होत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा अशी मागणी केली आहे. आरक्षणामुळे मराठा समाजाची होत असलेली घुसमट पुन्हा एकदा समोर आल्याचे सोशल मीडियावर...
  June 22, 09:00 AM
 • मुंबई - प्रत्येक जिल्ह्यात काेट्यवधी रुपयांचा पीक विमा काढूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ हाेत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जाच्या डाेंगराखाली दबला जात असून यातूनच माेठ्या प्रमाणावर आत्महत्या वाढत आहेत. सरकारने तातडीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन पीक विमा कंपन्यांनाही वठणीवर आणावे, असा एकत्रित सूर शुक्रवारी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त केला. विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थाेरात, ज्येष्ठ नेते मधुकरराव...
  June 22, 08:48 AM
 • मुंबई- बिग बॉस मराठी-2 मधील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे अभिजीत बिचुकले. त्यांच्या रागीट स्वभावामुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. बिग बॉसच्या घरात रूपाली भोसलेला केलेल्या शिवीगाळीचे प्रकरण ताजे असताना आता नवे प्रकरण समोर आले आहे. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकलेवर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात सातारा न्यायलयाने वॉरंट जारी केले होते, याची अमलबजावणी करण्यसाठी सातारा पोलिसांनी कारवाई करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. बिग बॉसचा सेट...
  June 21, 02:52 PM
 • मुंबई - फडणवीस सरकारने गेल्या साडेचार वर्षात महाराष्ट्रातील जनतेला असंख्य आश्वासने दिली, मात्र त्यातील एकही पूर्ण हाेऊ शकले. नाही. मागेल त्याला शेततळे याेजनेचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने या याेजनेचे नाव जमेल त्याला शेततळे किंवा आमचा असेल त्यालाच शेततळे असेच करायला हवे. शिवस्मारक, समृद्धी महामार्ग, नाेकर भरती, धनगर आरक्षण हे विषयही कागदावरच आहेत. खरे तर फेकणे हा यांचा (भाजपला) स्थायीभाव आहे. फेकू हा यांचा ब्रॅन्ड बनला आहे. त्यामुळे या सरकारकडून फारशा अपेक्षा नाहीतच. मात्र कृपा करून...
  June 21, 08:59 AM
 • मुंबई -महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी (जि. उस्मानाबाद) देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. तुळजाभवनी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या दरोडा प्रकरणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केसरकर बोलत होते. केसरकर म्हणाले,...
  June 21, 08:54 AM
 • मुंबई -बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. उपलब्ध असलेल्या १ लाख १६ हजार ७७९ जागांपैकी ५० हजार ५०५ जागांवर आजपर्यंत प्रवेश झालेले आहेत. उर्वरित प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू असून राज्यात एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहाणार नाही, यासाठी आवश्यकता पडल्यास चौथी प्रवेश फेरी घेऊ असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी...
  June 21, 08:54 AM
 • मुंबई - गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चेचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यात आला, तेव्हा सत्ताधारी बाकांवर 10 व विराेधी बाकांवर दहा ते 12 आमदारांशिवाय कुणीही उपस्थित नव्हते. एकूण 288 पैकी अवघी 20 -22 डाेकीच सभागृहात दिसत हाेती. कृषिमंत्री अनिल बाेंडे हे विदर्भातील एकमेव मंत्री हजर हाेते. मराठवाड्यातील भाजप- शिवसेनेच्या एकाही आमदाराला या गंभीर विषयावरील चर्चेच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक वाटले नाही. सत्ताधारी असोत वा विरोधक, असे संवेदनशून्य लोकप्रतिनिधी असतील,...
  June 21, 08:40 AM
 • मुंबई -राज्यातील सीबीएससी आणि आयसीएसई या केंद्रीय मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषाविषय बंधनकारक व सक्तीचा राहील. याकरिता कायद्यात आवश्यक तो बदल करून कठोर कायदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था व साहित्यिक हे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि अरुणा ढेरे यांच्या नेतृत्वाखाली २४ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. हा औचित्याचा मुद्दा शिवसेना सदस्य डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी...
  June 21, 08:18 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात