Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबर्इ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. परंतु सरकारची त्या दृष्टीने हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत सरकारने आरक्षणाची वैधानिक कार्यवाही पूर्ण न केल्यास येत्या 25 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन पुकारण्यात येर्इल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. मुंबईत मराठी पत्रकार संघात पाटील म्हणाले, अारक्षणासाठी...
  October 26, 09:01 PM
 • मुंबई- रफाल डील आणि सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या आदेशाच्या विरोधात काँग्रेसने मुंबईसह देशभरात शुक्रवारी आंदोलन केले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात असलेल्या सीबीआयच्या कार्यालयाबाहेर निदर्शने दिली. काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान संजय निरुपम आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाचीही झाली. त्यानंतर पोलिसांनी निरुपम यांच्यासह अनेक...
  October 26, 03:41 PM
 • मुंबई- अक्षय कुमारचा सिनेमा हाऊसफूल-4च्या शूटिंगदरम्यान महिला डान्सरची छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. हाऊसफूल-4 ची शूटिंग चित्रकुट स्टूडिओमध्ये सुुरु आहे. स्टूडिओमध्ये अचानक काही लोक घुसले. त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिला टोळक्याने मागून मागून उचलले आणि चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला, असे पीडित महिला डान्सरने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. ही घटना घडली तेव्हा अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख आदी यावेळी स्टूडिओमध्ये उपस्थित होते....
  October 26, 03:24 PM
 • मुंबई - अर्धाअधिक महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना केंद्राच्या पथकाची वाट पाहण्याऐवजी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. भारनियमनामुळेही ग्रामीण भागातील जनतेला फटका बसत असल्याचे सांगत दुष्काळावर उपाययोजना करताना सरकार दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. अशा परिस्थितीत आपल्याला राजकारण करायचे नाही. दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला मदत करण्याची तयारी सरकारने दाखवली तर विरोधक असलो तरीही साहाय्य करू, असे स्पष्ट...
  October 26, 10:47 AM
 • मुंबई- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन यंदा दिवाळीनिमित्त एक अाठवडा अाधी म्हणजे एक नाेव्हेंबरलाच करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला अाहे. तसेच या पगारासाेबत वेतनवाढ अाणि थकबाकीच्या 48 हप्त्यांपैकी पाच हप्तेही देण्यात येतील. गेल्या वर्षी एेन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी संप केला हाेता. त्याचा महामंडळाच्या उत्पन्नावर व प्रवासी सेवेवर परिणाम झाला हाेता. यंदा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एसटी महामंडळाने गेल्याच अाठवड्यात कर्मचाऱ्यांना 25000 रुपये, अधिकाऱ्यांना...
  October 26, 07:46 AM
 • मुंबई- मुलुंड परिसरातील एक 23 वर्षीय विद्यार्थी मंगळवारपासून बेपत्ता आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिस इंटेलीजन्सच्या (आयएसआय) हनी ट्रॅपला तो बळी ठरल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथक (एटीस) या विद्यार्थ्याचा शोध घेत आहे. एग्झाम फॉर्म भरण्यासाठी निघाला होता घरातून... मुलुंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जगदीश परिहार असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तो मंगळवारी...
  October 25, 07:09 PM
 • मुंबई- मीरा रोडवरील घोडबंदर परिसरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाला तिघे भररस्त्यावर बेदम मारहाण करत असल्याचे त्यात दिसत आहे. तरुण हात तोडून त्यांना विनंती करत आहे. त्याने एका टेम्पो चालकाला दुसर्या रस्त्याने जाण्यास सांगितले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने हा मारहाणीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलने शूट केला होता. मात्र, ही घटना कधी घडली, हे समजू शकले नाही. परंतु काशीमीरा पोलिस या घटनाचा तपास करत आहेत.
  October 25, 05:59 PM
 • पुणे- पिंपरी-चिंचवडमधील दळवी नगर परिसरात सिलिंडरचा स्फोट होऊन पाच झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत तृतीयपंथीसह दोघांचा होरपळून मृत्यु झाला आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दळवीनगर झोपडपट्टीत सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, पाच झोपड्या जळून खाक झाल्या. आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या मदतीने आग विझविण्यात आली.
  October 25, 12:55 PM
 • मुंबई- गुजरात पाठोपाठ आता महाराष्ट्रातही उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुंबईतील प्रभा देवी परिसरात रस्त्यावर स्टॉल लावल्याने शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. विशाल पांडेय असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेली माहिती अशी की, प्रभादेवी परिसरात विशालने रस्त्यावर फूड स्टॉल लावले...
  October 25, 12:49 PM
 • मुंबई -नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेतील चार आराेपी व अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचा पुणे न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. या पाचही आरोपींवर भीमा कोरेगाव प्रकरणाला चिथावणी देण्याचा आरोप असून उच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे राज्य सरकारला झटका असल्याचे मानले जात आहे. न्या. मृदुला भाटकर यांनी पुणे न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवताना, आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची अतिरिक्त मुदत...
  October 25, 08:34 AM
 • मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाताना स्पीड बोटीला अपघात होऊन शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याचा बुडून मृत्यू झाला. बोटीतील २४ जणांना वाचवण्यात यश आले. बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजता नरिमन पाॅइंट येथून साडेतीन किमी अंतरावर समुद्रात हा थरार घडला. दरम्यान, बोटीचा चालक अत्यंत वेगाने बोट चालवत होता त्यामुळेच अपघात झाल्याचे बोटीतील लाेकांनी सांगितले. पायाभरणीसाठी २ स्पीड व २ पॅसेंजर अशा ४ बोटी गेटवेवरून...
  October 25, 07:51 AM
 • हैदराबाद- एका तरुणीला तिच्या प्रियकराने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष नगरमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. सलमान असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सलमान याने प्रेयसीच्या अंगावर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळले. काय आहे हे प्रकरण? पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायना असे पेटविण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती मुळची पंजाबची रहिवासी होती. सायना सलमानसोबत लिव्ह इनमध्ये राहात होती. नंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र,...
  October 24, 05:34 PM
 • मुंबई- अबू धाबीहून जकार्ताला जाणार्या एतिहाद एअरवेजच्या विमानात एक महिला प्रसूत झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर विमान मुंबई एअरपोर्टवर उतरविण्यात आले. एअरपोर्ट स्टॉफने तत्काळ महिला आणि नवजात शिशुला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाळ आणि बाळंतीनची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. एअरपोर्ट प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, विमानाने अबू धाबीहून उड्डाण घेतल्यानंतर एका महिला प्रवाशीला प्रसव वेदना सुरु झाल्या. काही वेळात तिने मुलाला जन्म दिला. या...
  October 24, 12:40 PM
 • मुंबई - येत्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर नसतील. आगामी लोकसभेत कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नसून राज्य व केंद्रात सत्तापरिवर्तन होईल, अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सध्याचे सरकार फक्त मोदी व शहा दोघेच चालवतात. मोदींच्या टीममध्ये असलेली मंडळी सरकार योग्य पद्धतीने चालवत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असे सांगत मोदी फक्त मन की बात करतात, असा तिरकस टोलाही पवार यांनी...
  October 24, 09:59 AM
 • मुंबई - राज्यातील १८० तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करून मंगळवारी दिलासा दिला आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच आर्थिक सवलती मिळू शकतील. दरम्यान, केंद्रीय समितीच्या पाहणीनंतर राज्याला केंद्र सरकारकडूनही मदत मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मराठवाड्यातील ४७ तालुक्यांत याचा लाभ होणार आहे. मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागांत कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने...
  October 24, 09:44 AM
 • मुंबई - नगदीच्या संकटाचा सामना करत असलेल्या जेट एअरवेजने बँकांना सध्याचे कर्ज फेडण्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर नवीन कर्ज मंजूर करण्याचीही विनंती केली आहे. या घटनाक्रमाशी संबंधित सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. ज्या हवाई मार्गावरील वाहतुकीतून नफा मिळत नाही, अशा मार्गावर चालणाऱ्या १२ विमानांना कंपनीने आधीच विमानतळावर उभे केले आहे. त्याव्यतिरिक्त नाॅन-कोअर क्षेत्रातील कर्मचारी कमी करण्याचाही विचार कंपनी करत आहे. देशातील सर्वात मोठी फुल-सर्व्हिस एअरलाइन मागील ११...
  October 24, 09:27 AM
 • मुंबई - कमी पावसामुळे अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाची पिके वाया गेली. रब्बीची पेरणीही नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सांगून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला. दुष्काळसदृश नको, तर दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. गांधी भवनात चव्हाण म्हणाले, राज्यभरात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. पण...
  October 24, 08:21 AM
 • मुंबई -पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासह निश्चित केलेले उद्दिष्ट ठरवलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी सांगितले. मेहता म्हणाले, महामंडळामार्फत २०२२ पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थींसाठी पाच लाख परवडणाऱ्या...
  October 24, 08:14 AM
 • बीड/लातूर- यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान करत अयोध्येत राममंदिर तुम्ही बांधताय की आम्ही बांधू, असा सज्जड सवाल मोदी सरकारला केला होता. मात्र त्याच्या पाचच दिवसांत उद्धव यांनी आपली भूमिका चक्क बदलली. मंगळवारी बीड व लातुरातील शिवसेनेच्या गटप्रमुख, बुथप्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलताना राम मंदिरासाठी कायदा अस्तित्वात आणा अशी मागणी त्यांनी मोदी सरकारकडे केली. आपण येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येला जात असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी या...
  October 24, 07:57 AM
 • मुंबई - ट्रान्सजेंडर हा तसा लोकांच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नसणारा असा विषय आहे. पण गेल्यावर्षी फोटोग्राफर अनु पटनायक हिने ट्रान्सजेंडर माधुरी सारोडे आणि तिचा पती जय शर्मा यांच्या माध्यमातून ट्रान्सजेंडरचे जग कसे असते हे सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ट्रान्सजेंडरची लव्ह लाइफ कशी असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. यात त्यांच्या जीवनातील खास क्षणांना त्यांनी कॅमेर्यात टिपले होते. ट्रान्सजेंडर असल्याचे खुलेपणे जाहीर करणारे माधुरी आणि जय हे पहिले कपल आहे. त्यांचे...
  October 24, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED