Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई - कमी पावसामुळे अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाची पिके वाया गेली. रब्बीची पेरणीही नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सांगून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला. दुष्काळसदृश नको, तर दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. गांधी भवनात चव्हाण म्हणाले, राज्यभरात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. पण...
  October 24, 08:21 AM
 • मुंबई -पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासह निश्चित केलेले उद्दिष्ट ठरवलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी सांगितले. मेहता म्हणाले, महामंडळामार्फत २०२२ पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थींसाठी पाच लाख परवडणाऱ्या...
  October 24, 08:14 AM
 • बीड/लातूर- यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान करत अयोध्येत राममंदिर तुम्ही बांधताय की आम्ही बांधू, असा सज्जड सवाल मोदी सरकारला केला होता. मात्र त्याच्या पाचच दिवसांत उद्धव यांनी आपली भूमिका चक्क बदलली. मंगळवारी बीड व लातुरातील शिवसेनेच्या गटप्रमुख, बुथप्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलताना राम मंदिरासाठी कायदा अस्तित्वात आणा अशी मागणी त्यांनी मोदी सरकारकडे केली. आपण येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येला जात असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी या...
  October 24, 07:57 AM
 • मुंबई - ट्रान्सजेंडर हा तसा लोकांच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नसणारा असा विषय आहे. पण गेल्यावर्षी फोटोग्राफर अनु पटनायक हिने ट्रान्सजेंडर माधुरी सारोडे आणि तिचा पती जय शर्मा यांच्या माध्यमातून ट्रान्सजेंडरचे जग कसे असते हे सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ट्रान्सजेंडरची लव्ह लाइफ कशी असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. यात त्यांच्या जीवनातील खास क्षणांना त्यांनी कॅमेर्यात टिपले होते. ट्रान्सजेंडर असल्याचे खुलेपणे जाहीर करणारे माधुरी आणि जय हे पहिले कपल आहे. त्यांचे...
  October 24, 12:00 AM
 • मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांचा आंग्रिया क्रुझवर काढलेल्या सेल्फीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अमृता यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर चहुबाजुने टीका झाली. या सेल्फीवादावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझी पत्नी बांधील नाही, तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अमृता यांच्या सेल्फीवर ट्रोल करणाऱ्या नेटीझन्सला सुनावले आहे. देवेद्र फडणवीस यांनी सांगितले की, सेल्फीची हौस कोणाला नाही....
  October 23, 09:37 PM
 • मुंबई- शिवसेनेचा देव म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिराऐवजी फक्त बाळासाहेबांच्या स्मारकावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना तुम्हाला जमत नसेल, तर राम मंदिर आम्ही बांधू असे आव्हान दिले होते. तोच धागा पकडून भुजबळांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला. मुंबईतील वांद्रे...
  October 23, 07:59 PM
 • किचनखाली बनविलेल्या तळघरात होत्या तरुणी देहविक्री सुरु असल्याचा पोलिसांना संशय मुंबई- नवघर परिसरातील प्राइम बारमध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत 12 तरुणींना ताब्यात घेतले आहे. किचनखाली बनविण्यात आलेल्या तळघरात तरुणींना लपविण्यात आले होते. पोलिसांना पाहाताच बार मालिक आणि मॅनेजर पसार झाले. बारच्या नावाखाली तरुणींकडून देहविक्री केली जात असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बारमध्ये पोलिसांचा छापा पडताच कर्मचार्यांनी तरुणींना...
  October 23, 07:09 PM
 • मुंबई- यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाची पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झाली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सांगून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला. तसेच दुष्काळसदृश नको, तर दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण...
  October 23, 07:01 PM
 • रक्त चरित्र, नायक सारख्या सिनेमांमध्ये दिसला होता एजाज एजाजने बिग बॉस-7 मध्येही घेतला होता सहभाग अॅक्ट्रेस निधी कश्यपसोबत रिलेशन..निधीने केले होते गंभीर आरोप मुंबई- बॉलिवूड अभिनेता एजाज खानला नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्ससोबत सोमवारी रात्री उशीरा अटक केली. त्याच्याकडे बंद घालण्यात आलेल्या ड्रग्जच्या (एक्सटेसी) 8 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ड्रग्जच्या नशेत त्याने हॉटेलवर काही मुलींना बोलावल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली गोळ्यांचे वजन 2.3...
  October 23, 03:30 PM
 • मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. याचा परिणाम तब्बल 300 उड्डाणांवर झाला आहे. एअरलाईन्स कंपन्यांनी अनेक फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. या संदर्भात 3 महिन्यांपूर्वीच माहिती देण्यात आली होती. मिळालेली माहिती अशी की, मुंबई विमानतळावरील 09/ 27 आणि 14/ 32 ही मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्ती-देखभालीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली आहे. यामे मंगळवारी विमानतळावरुन कोणतेही विमान उड्डाण...
  October 23, 12:48 PM
 • मुंबई - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला असून सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी सोमवारी केली. देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेने बनावट कागदपत्राद्धारे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत दूध भुकटी प्रकल्पासाठी २४ कोटी ८१ लाख अनुदान मंजूर करून घेतले आहेत. त्यातील ५ कोटी या संस्थेला मिळाले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली...
  October 23, 09:11 AM
 • मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात बांधायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सुधारित आराखडा तपासून न घेता व प्रमाणित न करताच स्मारकाच्या कामास बुधवारी (ता. २४ ) प्रारंभ होत आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय दर्जाच्या या प्रकल्पाची सुरक्षितता आणि आयुष्यमानासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच प्रकल्प घाईगडबडीत रेटला जात असल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्पाची मूळ किंमत ३ हजार ८२६ कोटी इतकी होती. ती २ हजार ५०० कोटींवर आणण्यात आली....
  October 23, 09:07 AM
 • मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाची तारीख ठरली आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 ला त्यांच्या लग्नाच्या विधी होणार आहेत. रणवीरपुर्वी दीपिकाचे नाव रणबीर कपूर, सिध्दार्थ माल्या, युवराज सिंह आणि निहार पांड्यासोबत जोडले गेले आहे. परंतु खुप कमी लोकांना माहिती असेल की, बिग बॉस 8 मध्ये कन्टेस्टेंट म्हणून दिसलेला मॉडल उपेन पटेलसोबतही दीपिकाचे नाव जोडले गेले होते. व्हायरल झाला होता उपेनसोबतचे बोल्ड फोटोशूट - 2014 मध्ये उपेन पटेल बिग बॉसच्या घरात कन्टेस्टेंट म्हणून दिसला होता. तेव्हा त्याचे आणि...
  October 22, 03:59 PM
 • मुंबई - मिसेस सीएम अमृता फडणवीस सध्या चर्चेत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे अंग्रिया नावाच्या क्रुझवर त्यांनी घेतलेला सेल्फी. या सेल्फीमुळे त्या सोशल मीडियावर चांग्ल्याच ट्रोल होत आहेत. पण मिसेस फडणवीस नुकत्याच एका प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवरही झळकल्या आहेत. हे कव्हर पेज आहे फेमिना मॅगझिनचे. फेमिना मॅगझिनच्या महाराष्ट्र स्पेशल एडिशनच्या ऑक्टोबर इश्यूच्या कव्हरपेजवर अमृता फडणवीस झळकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हे मॅगझिन प्रकाशित झाले आहे. पण सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा...
  October 22, 12:58 PM
 • मुंबई - राजकाणारासाठी सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरच एकमेकांवर भिडत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. विशेषतः काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर अनेक वाद होताना पाहायला मिळतात. अशाच एका वादाने मुंबईत एका काँग्रेस कार्यकर्त्याचा बळी घेतला आहे. मनोज दुबे असे या कार्यकर्त्याचे नाव असून भाजप कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना...
  October 22, 12:57 PM
 • मुंबई -इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन भारतात ई-कारचा वापर वाढावा अशी सरकारची याेजना अाहे. केंद्र व राज्य सरकार त्यासाठी अनुदान देते, रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कही माफ करते. अशा ई-कारना हिरवी नंबर प्लेट देण्याचा निर्णयही सरकारने घेतला अाहे. देशातील अशी हिरवी नंबर प्लेट असलेली पहिली ई-कार ठाण्यातील अविनाश निमोणकर यांनी घेतली आहे. निमोणकर यांनी सांगितले, पेट्रोल डिझेलमुळे प्रदुषण हाेते. पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा म्हणून केंद्र सरकारने २०३० पर्यंत...
  October 22, 12:27 PM
 • मुंबई - मुंबई-गोवा क्रुझवरील अमृता फडणवीस यांचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता. यानंतर चहुबाजूने अमृता फडणवीसांवर टिका केली जात होती. आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, मी एका क्रूझवर होते. मी ज्या जागी बसली होती ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते, असे त्यांनी म्हटले आहे. उपस्थित अधिकारी मला उद्घाटन सोहळ्याला येण्याची विनंती करत होते. मात्र, मी शुद्ध हवेचा अनुभव घेण्यासाठी...
  October 22, 09:21 AM
 • मुंबई - कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ध्येय गाठता येतेच. चित्रकार नितीन यादव यांचे आयुष्यही काहीसे असेच ध्येयवादी होते. पाेलिस अधिकारी होऊन त्यांना जनतेची सेवा करायची होती. पण झाले चित्रकार. मात्र, कोऱ्या कागदाच्या व पेन्सिलीच्या बळावर त्यांनी आजवर ४ हजारांहून जास्त गुन्हेगारांची चित्रे रेखाटली आणि त्यातून तब्बल ३५० आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठोकल्या. पोलिस अधिकारी होता आले नसले तरी त्यांचे कार्य नक्कीच वर्दीतल्या पोलिसांइतकेच गौरवशाली आहे. कुर्ला स्थानकाजवळील साबळे चाळीत...
  October 22, 08:57 AM
 • मुंबई -जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यवधींचा खर्च करूनही २५२ तालुक्यांतील १४ हजार गावांच्या भूजल पातळीत एक मीटरपेक्षाही अधिक झालेली घट चिंताजनक अाहे. यामुळे जलयुक्त शिवार योजनेतल्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला आहे. योजनेचे त्रयस्थ संस्थेकडून फेरऑडिट करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेत सहभागी संस्थेकडूनच योजनेचे आॅडिट करून घेणे म्हणजे भ्रष्टाचार लपवणे आहे. आपण मागच्या महिन्यात...
  October 22, 08:53 AM
 • मुंबई -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य सरकारच्या विभागांनी २ आॅक्टोबर २०१८ ते १ आॅक्टोबर २०१९ दरम्यान कालबद्ध कार्यक्रम आखून बापूंची जयंती लोकचळवळ बनवावी, असे आदेश दिले होते. मात्र, जयंती वर्ष सुरू होऊन पंधरवडा लोटला तरी २२ पैकी १४ विभागांनी कार्यक्रमाचा आराखडाच बनवलेला नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या समन्वयाची भूमिका पार पाडणाऱ्या ग्रामविकास विभागाने संबंधित विभागांना पत्र पाठवून तत्काळ आराखडा सादर करण्याची ताकीद दिली आहे. गांधींच्या जयंती...
  October 22, 08:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED