जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अमरावती- शहरातील रतनगंजसारख्या गजबजलेल्या नागरीवस्तीत एकाने अवैध गॅस विक्री व अवैध रिफीलिंगसाठी घरातच मोठ्या प्रमाणात घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा साठा केला होता. या साठ्यावर गुन्हे शाखेने धाड टाकून भरलेले २३ आणि रिकामे ३४ असे एकूण ५७ सिलींडर जप्त केले आहेत. यावेळी पोलिसांनी अवैध विक्री करणाऱ्यासह त्याला पुरवठा करणाऱ्या एका ऑटोचालकालाही अटक केली आहे. ही कारवाई रविवारी झाली असून अटकेतील दोघांनाही सोमवारी न्ययायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. माहिती द्या,...
  January 22, 12:10 PM
 • राळेगाव- तालुक्यातील सावरखेडा जंगल परिसरात वरध येथील एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना रविवार, २० जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली असून आनंदराव खंडी वय ७५ रा. वरध ता. राळेगाव असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ही हत्या जादूटोण्यातून झाली असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, राळेगाव तालुक्यातील वरध येथील वृद्ध शेतकरी आनंदराव खंडी हे नेहमीप्रमाणे १९ जानेवारीला रात्री...
  January 22, 12:04 PM
 • धारणी- मेळघाट वन व व्याघ्र प्रकल्पाच्या अरण्यातून वाघांसह अन्य वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे, तर त्यांची हत्या करण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. याबाबत वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली असतानाच अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कुसुंबी वर्तुळात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दीड वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झाल्यावर बिबट्या काही...
  January 22, 12:01 PM
 • दारव्हा- वडिलोपार्जित असलेली शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून काकांनीच आपल्या १२ वर्षांच्या पुतण्याचे अपहरण केले. मात्र ही बाब लक्षात आलेल्या महिलांनी तातडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे अवघ्या काही तासांतच अपहरणकर्त्यांना मुंडळ गावाजवळ नागरिकांनी ताब्यात घेतले. एखाद्या थ्रिलर सिनेमाच्या कथानकाप्रमाणे वाटणारा हा थरारक प्रकार सोमवार, २१ जानेवारी रोजी सकाळी शहरातील महेश कॉलनी परिसरात घडला. वल्लभ अरविंद कदम आणि श्रीपाद अरविंद कदम दोघेही रा. आरंभी व करण कांबळे रा. पुणे अशी...
  January 22, 11:59 AM
 • अमरावती- सरकारी अनुदानासह मनपा फंडातून आधीच तब्बल ३० कोटी रुपये खर्च केल्या जात असताना शहराच्या स्वच्छतेसाठी आता नागरिकांकडून शुल्क वसूल केल्या जाणार आहे. प्रत्येेक घर ते प्रतिष्ठानांकडून ५० ते २५० रुपयांपर्यंत शुल्क तसेेच ओला व सुका कचरा वेगळा करुन न दिल्यास तब्बल ९ हजार रुपयांपर्यंत दंडाची आकारणी केली जाणार आहे. स्वच्छता व अारोग्य विभागाच्या घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम उपविधीला मनपाने मंजूरी दिली आहे. अस्वच्छतेचे झिंगाट करीत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने स्वच्छता...
  January 22, 11:57 AM
 • नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील खालच्या स्तरातील अनेकांना संघाविषयी पुरेसे ज्ञान नाही. हा स्तर अजूनही शाखेच्या कर्मकांडात अडकल्याने संघाची सांप्रदायिकतेकडे वाटचाल सुरू होते. आता संघाने हिंदुत्वाचा त्याग करीत हिंदुभावविश्वाचा स्वीकार करायला हवा, असे मत संघाचे माजी पदाधिकारी रामभाऊ तुपकरी यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले. आरएसएस रिव्हॅल्यूड या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पार्श्वभूमीवर तुपकरींशी साधलेला संवाद... प्रश्न : संप्रदाय होण्याकडे संघाचा प्रवास सुरू...
  January 22, 08:39 AM
 • नागपूर- बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने भावाने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही बहिणीच्या प्रियकराचा मृतदेह नाल्यात फेकला. ही घटना साकोली (जि.भंडारा) तालुक्यातील किही-एकोळी घडली अाहे. आरोपीने या कामात आई-वडिलांची मदत घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अनिकेत बडोले (वय 22 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. अनिकेतचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. 18 जानेवारी रोजी अनिकेत मुलीसह तिच्याच घरी आक्षेपार्ह अवस्थेत सापडला...
  January 21, 05:52 PM
 • नागपूर- जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पोलिस पथकातील शिपायाला वाहनाखाली चिरडून ठार केल्याची आणखी एक घटना रविवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यात खंबाडा गावाजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तस्करांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस शिपायाचे नाव प्रकाश मेश्राम असे होते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू असल्याने वाहनांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी पोलिस पथके तैनात केली जातात. मात्र, या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून...
  January 21, 05:35 PM
 • नागपूर :हनुमान हे दलित होते, अशी मुक्ताफळे उधळून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाद सुरू केल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हेसुद्धा त्यांच्याच वाटेवरून निघाले आहेत. रामायण व महाभारताचे रचनाकार महर्षी वाल्मीकी व व्यास हेही दलित समाजातूनच आले होते, असे वादग्रस्त वक्तव्य राजनाथ सिंह यांनी नागपुरात आयोजित भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या विजयी संकल्प सभेत केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनुसूचित जाती महामोर्चाचे...
  January 21, 12:38 PM
 • अमरावती - लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या अनुषंगाने काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यांना १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अमरावतीत आयाेजित सभेत दिली. सर्वच वंचित समाजाला १२ जागांमध्ये स्थान मिळणार असेल तरच काँग्रेससोबत आघाडी करू, असा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवाय ज्या मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाही, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे त्यांनी...
  January 21, 10:08 AM
 • नागपूर- शेतमालाला दीडपट भाव, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासह विदर्भातील उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शनिवारी नागपुरात कर्जमाफीची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात या नावाने आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियमवरून निघालेल्या मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते. शेतमालास दीडपट भाव मिळालाच पाहिजे, सातबारा कोरा करा, अशा घोषणा देत निघालेल्या हा मोर्चा...
  January 20, 10:06 AM
 • वणी : शहरात वास्तव्यास असलेल्या एका युवतीच्या विरोधात येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी तक्रार केली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून ती युवती कोण असा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतांना दिसत आहे. तर त्या युवतीने यापूर्वीसुद्धा नागपूर येथील एका पोलिस अधिकाऱ्याला ब्लॅक मेल केल्याचा प्रताप उघड होत आहे. ठाणेदारांनी तक्रार केलेली युवती शहरातील दत्त मंदिर परिसरात वास्तव्यास असून ती पूर्वी पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत होती. परंतु ती प्रशासनात दाखल होऊ शकली नाही....
  January 20, 10:04 AM
 • नागपूर- प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने साठ वर्षांत आणि आम्ही साडेचार वर्षांत काय केले? याचा एकदा हिशेब व्हायलाच हवा. आम्ही साडेचार वर्षांत राबवलेल्या योजनांचे सामाजिक-आर्थिक अंकेक्षण कोणीही करावे. त्यातून आम्ही काय केले, हे स्पष्टच होईल, असे खुले आव्हान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी विरोधी पक्षांना दिले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय महाधिवेशनाची सुरुवात उपराजधानी नागपुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समता परिसरात झाली. या महाअधिवेशनास...
  January 20, 10:03 AM
 • दर्यापूर : प्रेमास नकार दिल्याने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश उर्फ मयुर अरुण येवतकर (वय २१) रा. मलीयेपुरा याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरातील सतरा वर्षीय विद्यार्थीनी ट्युशनला जात असताना गणेश तिचा पाठलाग करीत होता. मागील दोन महिन्यांपासून गणेशचा हा उद्योग सुरू होता. दरम्यान, १२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थीनी ट्युशनला जात असताना गणेशने तिचा पाठलाग केला. दरम्यान ड्रीम सिनेमागृहानजीक मुलीला अडवून गणेशने...
  January 20, 09:50 AM
 • अमरावती : आष्टी येथील मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयाच्या परिसरातील जीर्ण भिंत कोसळून आठवीतील विद्यार्थी वैभव हरिदास गावंडे (वय १३, रा. देवरी) या मृत्यू झाला. या घटनेत सार्थक सतीश गावंडे (वय १३ रा. देवरी), प्रतिक विलास पायताळे (वय १३) रा. आष्टी व आदित्य महादेव बुध (वय १३ रा. अनकवाडी) हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर शिक्षक व व्यवस्थापनाच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाल्याने तणाव निर्माण झाला होता....
  January 19, 10:37 AM
 • प्रयागराज / नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन मोठ्या स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या मंचावरून देशाच्या प्रधानसेवकास संदेश दिला आहे. पहिला संदेश संघ मुख्यालय नागपूरहून, तर दुसरा कुंभनगरी प्रयागराजमधून देण्यात आला आहे. देशात कोणतेही युद्ध सुरू नसताना सीमेवर मात्र सैनिक शहीद होत आहेत. आपले काम नीटपणे होत नसल्याने हे घडू लागले आहे. आपल्याला ही गोष्ट सुधारावी लागणार आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्य नव्हते तेव्हा देशासाठी प्राणाची आहुती द्यावी लागे. पण आताही...
  January 19, 10:32 AM
 • नागपूर- विदर्भ आणि मराठवाड्यात गुंतवणूक आकर्षित करणे, निर्यात क्षमता वाढवण्यासाठी विदर्भ-मराठवाडा उद्योग व्यापार विकास परिषद या नावाने टास्क फोर्स स्थापन करून त्याच्याकडे प्रत्येक प्रशासकीय विभागात ८०० ते १००० नवे उद्योग सुरू करण्याचे १० वर्षांसाठीचे लक्ष्य देण्यात यावे, स्थानिक स्तरावर झटपट निर्णयांसाठी सहविकास आयुक्तांची पदे निर्माण करण्यात यावीत, उद्योगांसाठी सुलभ आणि सोप्या सवलतीच्या योजना लागू करण्यात याव्यात, यासह अनेक शिफारशी आंतरविभागीय समितीने राज्य सरकारला केल्या...
  January 19, 08:23 AM
 • यवतमाळ- सर्वाधिक सुपीक जमीन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात चार वर्षांत एक हजार १५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या एक वर्षांत जिल्ह्यात २५९ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे या आत्महत्येच्या बुडाशी आहेत. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहू जाता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...
  January 18, 12:38 PM
 • अमरावती- फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक चौदा वर्षीय मुलगा घरात कोणालाही न सांगता घराबाहेर पडला. त्यामुळे कुटूंबियांनी मित्राकडे व परिसरात त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नव्हता. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा ही नोंदवला होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी त्या मुलाने नागपुरातून कुटूंबियांना फोन केला व त्यानंतर तो सुखरुप घरी परतला. शहरात आजी आजाेबांकडे राहणारा हा मुलगा यंदा तो नवव्या वर्गात आहे. १४...
  January 18, 12:26 PM
 • अमरावती- मागील दोन महीन्यांपासून शहरात मोठ्या रकमेच्या पाच चाेरी व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र शहर पोलिसांना आतापर्यंत एकाही चोरीचा छडा लावण्यात यश आले नाही. पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. याऊलट चोरी व घरफोडीचे सत्र शहर व शहरालगत सातत्याने सुरूच आहे. दरम्यान, गुरूवारी (दि. १७) सकाळी वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी या मंदिरातील दोन दानपेट्या फोडून रोख तसेच सिंहासनाला असलेली सुमारे दोन किलो चांदी लंपास केली आहे....
  January 18, 12:24 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात