जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर- भाजपच्या अनुसुचित जाती आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रथमच नागपुरात एका मंचावर दिसणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत विदर्भातील भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. मागील साडेचार वर्षात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात कधीही एका मंचावर दिसलेले नाहीत. मात्र, आता भाजपच्या अनुसुचित जाती आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा जाहीर...
  January 8, 07:18 PM
 • नागपूर- भंडारा-गोंदियाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदार कुकडे चक्क सिम्बा सिनेमातील आंखे मारे या गाण्यावर भन्नाट डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे. #WATCH NCP MP from Bhandara-Gondiya Madhukar Kukade dances with students during a school function in Bhandara. #Maharashtra (5.1.19) pic.twitter.com/tCJJB9igxr ANI (@ANI) January 7, 2019 एका शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात खासदार कुकडे पोहोचले होते. नुकताच प्रदर्शित झालेला सिम्बा या सिनेमातील आंखे मारे या गाण्यावर विद्यार्थी डान्स करत होते. मुले डान्स करताना पाहून खासदार महाशयांना डान्सचा मोह...
  January 7, 01:02 PM
 • यवतमाळ- नुकत्याच विविध सिमकार्ड कंपन्यांकडून मोबाइलवर संदेश येत आहेत. दरमहा कमीत कमी रुपये ३५ रूपयांचा रिचार्ज मारणे अथवा मोबाइल क्रमांक बंद होईल, असा इशारा देण्यात आला. बहुतांश ग्राहकांचे मोबाइल आजपासून बंद पडायला सुरूवात झाली. ग्राहकाला पुरता नागवला जात असून, सर्व कंपन्यांनी रचलेला हा ग्राहकांच्या फसवणुकीच्या कटाचा भाग असल्याचा आरोप ग्राहक प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सिमकार्ड कंपन्यानी आता ग्राहकांनी आपल्या मोबाइलमध्ये ३५ रुपयांचा रिचार्ज केल्याशिवाय मोबाइल...
  January 7, 12:36 PM
 • यवतमाळ- शहरातील माईंदे चौक परिसरात असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून चोरट्यांना रोकडचा लॉकर खोलण्यात अपयश आल्याने रक्कम वाचली. मात्र, चोरट्यांनी एटीएम मशीनचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान केले आहे. या प्रकरणी अॅक्सिस बँकेचे उपशाखा प्रमुख संदीप देशमुख यांनी या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील माईंदे चौक परिसरात...
  January 7, 12:32 PM
 • धारणी- हिमालयाचे रक्षण करताना अरुणाचल प्रदेशात धारातीर्थी पडलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील मुन्ना पुनाजी सेलूकर या जवानावर अंंतिम संस्कार करण्यात आले. देशाच्या सिमेचे रक्षणाचे कर्तव्य बजाविताना हिमस्खलनात दबून वीरमरण आलेल्या सातपुडा पर्वतराजीच्या मेळघाटातील या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशितील जनसागर रविवारी चुरणी येथे उसळला होता. घरचा आधारवड गेल्याने सेलूकर कुटुंबियांचा आक्रोश तर देशभक्त पुत्र गमावल्याने चुरणी गावातील...
  January 7, 12:30 PM
 • यवतमाळ- आगामी साहित्य संमेलनासाठी उद््घाटक म्हणून निवडण्यात आलेल्या लेखिका आणि भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतणी नयनतारा सहगल यांना आता नकार कळवण्यात आला आहे. इंग्रजीमध्येच लेखन करणाऱ्या लेखकाच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली होती. या पार्श्वभूमीवर नयनतारा यांना उद््घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्याचे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीकडून कळवण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांना...
  January 7, 08:47 AM
 • नागपूर- सुरक्षेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुरू झालेला वापर व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सैनिकांचे युद्धभूमीवरील मृत्यू टाळणाऱ्या नॉन काँटॅक्ट वॉरफेअरमध्ये भारतीय लष्कराने पारंगत होणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने भारतीय लष्कर या आधुनिक युद्धतंत्रासाठी सुसज्ज होत आहे, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल विपिन रावत यांनी शनिवारी नागपुरात दिली. भोसला मिलिटरी स्कूलच्या २३ व्या वर्धापन दिनाचे पाहुणे म्हणून लष्करप्रमुख जनरल रावत नागपुरात होते. मुख्यमंत्री देवेंद्र...
  January 6, 11:10 AM
 • अमरावती- दुष्काळी भागातील परीक्षा शुल्क माफीचे, मोफत पास, वसतिगृह प्रवेशाचे सरकारने पत्र काढून देखील विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही. सरकारचे आदेश असताना अंमलबजावणी का होत नाही, असे ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याने महाराष्ट्राचे उच्च, तंत्र, शालेय शिक्षण, क्रीडा तथा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे चांगलेच गांगरले. शैक्षणिक क्षेत्रात असंख्य ज्वलंत समस्या असून राज्यातील भाजप सरकारच्या गतिमानतेचे विद्यार्थ्यांनी चांगलेच वाभाडे काढले. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित...
  January 5, 12:30 PM
 • अमरावती- शाळेत जाणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून तिचा प्रथम हात पकडला, या प्रकारामुळे युवती घाबरली व पुढे चालत होती. त्यावेळी युवकाने पुन्हा तिचा पाठलाग करून भररत्यात मुलीचे चंुबन घेतले, हा धक्कादायक प्रकार गुरूवारी (दि. ३) घडला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शेख साजिद शेख फारुख (२६ रा. सैय्यदपुरा, नांदगाव पेठ) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक पंधरा वर्षीय मुलगी शाळेत जाण्यासाठी गुरूवारी सकाळी...
  January 5, 12:25 PM
 • मोर्शी- तालुक्यात विविध कारणांमुळे सरत्या वर्षात ४४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, यात नऊ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अनियमित पाऊस, उत्पादनात घट, बाजारात शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव आदी विविध कारणांमुळे आलेला आर्थिक तणाव व कौंटुंबिक समस्यांना कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती संपलेली नसल्यामुळे ग्रामीण भागातील चित्र विदारक झाले आहे. त्यामुळे परिस्थितीसमोर हतबल होऊन मागील वर्षात तालुक्यात ४४...
  January 4, 12:51 PM
 • मुंबई/नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे गुरुवारी (ता.3) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी नागपुरात एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर आंबझरी स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील रायपूर शहरात झाला होता. नागपूर येथील महापालिकेच्या...
  January 3, 01:14 PM
 • शिरखेड- सततच्या नापिकीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. त्यातच अप्पर वर्धा धरण असलेल्या मोर्शी तालुक्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिक जगवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. अशातच शासनाने मोर्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शिरखेड परिसरात शेतकऱ्यांना अन्य पिकांसह संत्रा बागा जगविण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत असून, त्यांच्यापुढे संत्रा बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे....
  January 3, 12:47 PM
 • अमरावती- पंतप्रधान आवास योजनेतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साडेचार वर्षांत केवळ २६ टक्केच घरकुलांची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागात मंजूर २९ हजार २५० पैकी २१ हजार ९१३ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात कामे अपूर्ण असताना आवास साॅफ्ट आणि भौतिक दृष्ट्या कशाप्रकारे ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचा आभास निर्माण केल्या जात आहे. सर्वांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना हा महत्वकांक्षी योजना...
  January 3, 12:46 PM
 • नागपूर- माझा श्री रामावर पूर्णि विश्वास आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही रामाची इच्छा आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होईलच, अशी नि:संदिग्ध ग्वाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे दिली. सेवासदन शिक्षण संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महा मुलाखतीत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल, असे म्हटले...
  January 3, 08:59 AM
 • नागपूर- लाठीचा वापर हा गुन्हा असताना आणि त्याबाबत नागपुरात तक्रार दाखल केली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांवर अद्यापही गुन्हे दाखल होत नाहीत. याविरोधात आपण लोकशाही मार्गाने लढा देऊ आणि पोलिसांना कारवाईस भाग पाडू, असा इशारा माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला. खोपडे नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले, १८ ऑक्टोबर २०१८ रोजी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात स्वयंसेवकांनी लाठी हाती बाळगून मिरवणूक काढली. भादंविच्या कलम १५३ (अ) नुसार हा दखलपात्र गुन्हा आहे....
  January 3, 07:14 AM
 • नागपूर- विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी वनक्षेत्रात सलग दाेन दिवसांत दाेन वाघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने पशुप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त हाेत आहे. २०१८ या सरलेल्या वर्षात एकट्या महाराष्ट्रात तब्बल २० वाघ मारले गेले. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील कथित नरभक्षक अवनी वाघिणीच्या शिकारीचे प्रकरण तर देशभर गाजले. राज्यात वाघांची संख्या वाढल्याचे कागदोपत्री दावे वन विभागाकडून होत असले तरी वाघांचे संवर्धन करण्याची मोहीम सपशेल अपयशी ठरली असल्याचेच दिसून येते. राज्यात...
  January 2, 08:17 AM
 • नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात नववर्षाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांची ह त्या करण्यात आली आहे. यात एका गुंडाचा समावेश आहे. मिळालेली माहिती अशी की, पहिली घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरी घटनाइमामवाडा परिसरात घडली आहे. एमआयडीसीतील राजीव नगरातील कुख्यात गुंड रणजीत लडी याला आणि त्याच्या एका साथीदाराला परिसरातील लोकांनी बेदम मारहाण केली. यात रणजीत लडीचा मृत्यू झाला असून...
  January 1, 12:55 PM
 • धारणी- भररस्त्यावर आदिवासी महिलेचे बळजबरीने चुंबन घेऊन घटनेचे चित्रिकरण व्हायरल केल्याच्या घटनेने धारणी येथे तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी आरोपी मो. वसीम मो. आरिफ सौदागर (वय ३०, रा. धारणी)याच्यासह चित्रिकरण करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून पोलिस बंदोबस्त लावण्यात आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, आरोपीवर आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचाही गुन्हा दाखल आहे. पीडित ४५ वर्षीय महिला धुणीभांडीचे कामे करते. शुक्रवारी...
  December 30, 12:14 PM
 • तिवसा- तंत्रज्ञानाचा केला तर विधायक कामासाठी नाहीतर विध्वंसक कामासाठी वापर होऊ शकतो. तिवसा येथे समाजमाध्यमाचा विधायक कामासाठी वापर केल्याने महिलेचे दागिने नुकतेच परत मिळाले. परंतु तंत्रज्ञााचा वापर चोरीची युक्ती शिकण्यासाठी तरुणाने केला खरा पण अपयश आल्याने चोरीच्या प्रयत्नात गजाआड होऊन बसावे लागले. तिवसा येथील शिक्षक कॉलनीस्थित असलेल्या एटीएम फोडण्यासाठी शहरातली अलीम करीम शहा (वय २१, रा. वॉर्ड क्रमांक ३) याने अॅन्ड्रॉईड मोबाइलवर युट्यूबच्या माधम्यातून एटीएम फोडण्याचा अभ्यास...
  December 30, 12:10 PM
 • नागपूर- साहेबराव कधी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची शान हाेता. त्याच्या डरकाळीने सर्व जंगल थरथरत हाेते. परंतु अाज डरकाळीच्या जागी वेदनांनी त्याचा जीव पिळवटून निघत अाहे. नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ९ वर्षीय वाघाची भाषा समजणे मानवाच्या आवाक्यातील नाही. परंतु त्याच्या वेदना डाेळ्यांनी सहज पाहू शकताे. त्याला एक पंजा नाही. अाता सन २०१९ मध्ये त्याला कृत्रिम पंजा लावण्यात येणार अाहे. जगात प्रथमच वाघाला कृत्रिम पंजा लावला जाणार अाहे. साहेबराव व त्याचा भाऊ सन...
  December 30, 08:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात