Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नाशिकराेड / नागपूर- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये (महावितरण) पदवीधर व पदविका प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात अाली अाहे. उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात अाले अाहेत. पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी एकूण ६३ जागा तसेच पदविका प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या ३३८ जागा अाहेत. www..mahadiscom.in यावर भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज २८ ऑगस्टपासून १७ सप्टेंबरदरम्यान या संकेतस्थळावर उमेदवारांना भरता येतील....
  August 29, 10:49 AM
 • अमरावती- कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याप्रकरणी राशी, बायर व अंकुर या बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध सोमवारी अमरावतीमधील बेनोडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र बियाणे २००९ कलम १४ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे यांनी दिली. वाडेगाव (ता. वरूड) येथील संजय महादेव साबळे यांनी त्यांच्या शेतात बायर कंपनीच्या कपाशीच्या ५ बॅगांतील बियाणे लावले होते. तर, अन्य एका शेतकऱ्याने राशी व अंकुर सीड्स कंपनीचे बियाणे १२ जून रोजी शेतात लावले...
  August 29, 07:47 AM
 • नागपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी या नेत्यांना संघाकडून दिल्लीत व्याख्यानमालेचे निमंत्रण देणार असल्याची चर्चा आहे. मात्र, दुसऱ्यांचे विचार ऐकून किंवा समजून घेणाऱ्या लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही, त्यांना संघाच्या कार्यक्रमात बोलावण्यात काय अर्थ आहे? अशा शब्दांत संघाने या चर्चेच खंडन केले. संघाचे सरकार्यवाह मनमोहन वैद्य म्हणाले, संघाला निमंत्रणाची खानापूर्ती करावयाची नाही. देशात लोकशाही आहे. त्यात प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे....
  August 29, 06:57 AM
 • वर्धा- समुद्रपुर तालुक्यातील गव्हा कोल्ही येथे संतोष अंबादे या युवकाच्या हत्याप्रकरणी साथीदार आरोपीला समुद्रपूर पोलिसांकडून अटक केली आहे. हत्या-प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले असून, देवेंद्र उर्फ देवा मोहनलाल साहु वय ४६ वर्ष रा.लेबर कॉलणी हिंगणघाट याला अटक केली आहे.रविवारी १९ ऑगस्टला नरेद्र भगत यांच्या शेतातील विहिरित संतोष सुखदेव अंबादे यांचा मृतदेह आढळला होता. डोके, चेहऱ्यावरील मारावरून त्याची हत्या झाल्याचे निष्पर्ण झाले होते मात्र आरोपी फरार होते. गोपनिय माहिती नुसार...
  August 28, 11:29 AM
 • नागपूर- नगर परिषद व जिल्हा परिषदांच्या आरक्षण नियमावलीत येत्या तीन महिन्यात दुरूस्ती करण्यात यावी, असा महत्वाचा आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला व वाशिम जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला यथास्थितीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिलेत. अकोला व वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीत पन्नास टक्क्यांहून अधिक जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा भंग करणारी असल्याने असल्याने निवडणूक प्रक्रीयेवर स्थगिती द्यावी, अशी विनंती...
  August 28, 11:25 AM
 • अमरावती- ट्यूशन वर्गातून मैत्रीणीसोबत घरी पायी जात असलेल्या शिवानी सुनील वासनकर (२०, रा. तारखेडा,) या विद्यार्थीनीचा एकतर्फी प्रेमातून अक्षय पुरूषोत्तम कडू (२२) या तिच्या नातेवाईकानेच चाकूने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी खोलापुरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षयला अटक करण्यात आली आहे. शिवानी भारतीय महाविद्यालयात बी. काॅम. दुसऱ्या...
  August 28, 11:20 AM
 • नागपूर- विदर्भ व मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी वित्त आयोगाकडे ३० हजार कोटींचे पॅकेज मागितले असून ग्रामपंचायतींप्रमाणे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनाही थेट निधी मिळावा, अशीही मागणी केल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. मुनगंटीवार म्हणाले, घटनेच्या कलम ३७१ (२) अन्वये देशात पाच विभाग अविकसित म्हणून गणले गेले. त्यात विदर्भ, मराठवाड्यासह गुजरातमधील सौराष्ट्र, मध्य प्रदेशातील बुंदेलखंड आणि आणखी एका विभागाचा समावेश आहे. या सर्व विभागांना...
  August 28, 08:55 AM
 • यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रसुतीकरीता दाखल करण्यात आलेल्या महिलेने रविवारी दुपारी साडेबारा वाजता चार मुलींना जन्म दिला. महिलेसह चारही मुलींची प्रकृती चांगली असून, नवजात बाळांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात अाले अाहे. राणी प्रमोद राठोड असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव अाहे. दारव्हा तालुक्यातील चिखली येथील राणी या गर्भवती महिलेवर काही दिवस दारव्ह्यातच उपचार करण्यात आला. दरम्यान, पाचव्या महिन्यात त्यांना यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील...
  August 27, 11:52 AM
 • अमरावती- फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व एक्स्प्रेस हायवेला लागून असलेल्या न्यु कॉलनीमध्ये रविवारी (दि. २६) पहाटे तीन वाजताच्या दरम्यान चार जण संशयास्पद स्थितीत फिरताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता एक जण पसार झाला तर तिघे पोलिसांच्या हातात आले. हे तिघेही यवतमाळचे रहिवासी असून मध्यरात्री कशासाठी या भागात आले होते, याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडील दोन दुचाकीसुद्धा पोलिसांनी जप्त...
  August 27, 11:46 AM
 • नागपूर- रीतसर लग्न करून व त्याचे पुरावे देऊनही विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने वैतागलेल्या एका जोडप्याने चक्क ग्रामसभेतच पुन्हा लग्न केले. ही घटना नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा येथे घडली आहे. सुरेंद्र आणि अश्विनी निकोसे असे या दांपत्याचे नाव आहे. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तातडीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. सुरेंद्र व अश्विनी निकोसे यांचे यंदा जुलैत लग्न झाले. नोंदणीकृत संस्थेच्या कार्यालयात लग्न केल्यानंतर ग्रामपंचायतीत नोंदणी...
  August 27, 07:25 AM
 • नागपूर- प्रेमाचे प्रतीक असलेले सारस (क्राैंच) पक्षी शिकारीमुळे भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर होते. २००० मध्ये देशात या पक्ष्याच्या फक्त चार जोड्या शिल्लक होत्या. मात्र गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी (२०१६) डाॅ. विजय सूर्यवंशी व पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नातून अाता एकट्या गाेंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या १९ जोड्यांवर गेली. त्यानंतर निसर्गप्रेमी सावन बहेकर यांनी सारस पक्ष्याचे संवर्धन करण्यास सुरुवात केली, त्यांना शेतकऱ्यांचीही साथ मिळाली. परिणामी आज एकट्या...
  August 27, 06:58 AM
 • अमरावती - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका खासगी वाहिनीच्यावतीने आयोजित लोकसभा निवडणूक सर्वेक्षण कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाचे समाधान न झाल्याने संतप्त झालेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चेचा कार्यक्रम उधळून लावल्याची घटना शनिवारी (दि. २५) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. एका खासगी वाहिनीच्यावतीने शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे रात्री आठ वाजताच्या सुमारास लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या...
  August 26, 12:47 PM
 • अमरावती - वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही महावितरणला सहन करावे लागायचे या प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे बक्षीस मिळवा, असा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून होणाऱ्या वीजचोऱ्यांसह अन्य प्रकारच्या वीजचोऱ्यांबाबत माहिती असणाऱ्यांनी पुढाकार घेत माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवल्या जाईल, अशी माहिती महावितरणच्या नागपूर...
  August 26, 12:43 PM
 • अमरावती- शेतकऱ्यांना गाठून त्यांना कर्जावर ट्रॅक्टर विकत घेवून द्यायचा त्यानंतर परस्परच ट्रॅक्टर विक्री करून अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणारा ठकबाज प्रमोद गोवर्धन सरदार (३७, रा. व्यंकटेश कॉलनी, अमरावती) याला लोणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अमरावती जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील यवतमाळ व इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गंडा घातल्याची माहीती लोणी पोलिसांपुढे आली आहे. प्रमोद सरदार हा शेतकऱ्यांना गाठून त्यांना शेतीसोबतच जोड व्यवसाय करण्याचा सल्ला देतो. तसेच जोडव्यवसाय म्हणून तुम्ही...
  August 25, 11:45 AM
 • वर्धा- स्थानिक आनंद नगर येथील ४५ वर्षीय गांजा विक्रेता असलेल्या इसामाची धारधार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना २४ अाॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. प्राप्त माहिती नुसार मिलिंद सुभाष मेश्राम वय ४५ वर्ष रा आनंद नगर हा गांजाची विक्री करीत होता. मुलगी झोपेमधून पहाटेच्या सुमारास उठली असता, तिला तिचे वडील दिसेनासे झाल्यामुळे तिने घराच्या बाहेर पाहणी केली असता,तिला रक्ताचे डाग दिसून आले. मृतक मिलिंद मेश्राम यांचा मृतदेह घराजवळ असलेल्या शौचालय करिता बांधण्यात आलेल्या...
  August 25, 11:38 AM
 • नागपूर- एकेकाळी संपूर्ण ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दहशत असणारा देखणा, रूबाबदार आणि ऐटबाज साहेबराव हा आशियातील सर्वात मोठा वाघ आज गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये केविलवाणा होऊन दिवस काढतोय. या साहेबरावला शहरातील विख्यात अस्थिव्यंग तज्ज्ञ डाॅ. सुश्रुत बाभूळकर यांनी दत्तक घेतले आहे. तेच त्याला कृत्रिम पंजा लावणार आहे. त्यासाठी त्याची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. डाॅ. गौतम भोजने यांनी साहेबरावला बेशुद्ध केले. तर डाॅ. विनोद धूत आणि डाॅ. शिरीष उपाध्ये तपासण्या दरम्यान वाघाच्या प्रकृतीवर लक्ष...
  August 25, 11:22 AM
 • नागपूर- नागपूरचे माजी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने झुडपी जंगल प्रकरणी सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला असून या संबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत अंतरिम अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या महसूल आणि वनखात्याने विभागीय आयुक्तांना या संबंधी आवश्यक पावले उचलण्यासाठी सांगितले आहे. समितीने महसूल आणि वनखात्याला झुडपी जंगलाची जमीन विविध विकासकामांकरीता वळती करण्यासाठी सुलभ प्रक्रिया असलेला सुधारित मसुदा...
  August 25, 11:12 AM
 • नंदुरबार - नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. पुरग्रस्तांकडे पालकमंत्री रावल यांनी पाठ फिरवल्याचे वृत्त दिव्य मराठीत झळकल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे जणू खुलासाच करण्यात आला आहे. नुकताच रंगावली नदीला महापूर आला होता. या महापूरात विसरवाडीजवळील पाच नागरीकांचा मृत्यू झाला होता. तसेच 495 घरांसह शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान...
  August 24, 08:05 PM
 • नागपूर- पिस्तूल, चाकू अशा शस्त्रांसह बँक लुटण्यासाठी आलेल्या लुटारूंची चांगलीच फजिती झाल्याची घटना नागपुरात घडली. बँकेत छदामही न सापडल्यामुळे कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत लुटारू निघाले. मात्र, या फजितीचा वचपा म्हणून त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना आत कोंडून बाहेरून शटर लावून कोंडून टाकले. ही घटना नागपूर सहकारी बँकेच्या छोटा ताजबाग शाखेत गुरुवारी दुपारी घडली. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छोटा ताजबाग परिसरात असलेल्या या बँक शाखेत फारशी वर्दळ नसते....
  August 24, 08:35 AM
 • नागपूर- विदर्भातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्वच आरोपपत्रांची सुनावणी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विशेष न्यायालयास दिले आहेत. त्याचप्रमाणे नव्याने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आले. विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामातील घोटाळ्यावर दाखल याचिकांवर सुनावणी करताना न्या. भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठाने...
  August 24, 08:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED