Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना भर संसदेत मारलेली मिठी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असताना योगगुरू रामदेव बाबा यांनी राजकारणात विरोधासाठी विरोध नको तर विरोध हा मुद्द्यांवर आधारित असावा या शब्दात या गळाभेटीवर आपले भाष्य केले. पतंजलीच्या बैठकीसाठी रामदेवबाबा शनिवारी नागपुरात होते. विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलताना रामदेवबाबा यांनी केवळ मोदी आणि राहुल गांधी यांच्या गळाभेटीवरच भाष्य केले. राजकारणात विरोधासाठी विरोध असता कामा नये, असे...
  July 21, 08:27 PM
 • नागपूर- राज्यातील सर्वात मोठ्या अशा चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्रासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात पुरेसा जलसाठा निर्माण न झाल्याने वीज निर्मिती बंद करण्याचे संकट आले होते. मात्र, मागील काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसाने हे संकट टळल्याची माहिती माहिती महानिर्मितीच्या सूत्रांनी दिली. इरई धरणातून चंद्रपूरमधील वीज निर्मितीसाठी पाणी पुरवठा होतो. मात्र, या धरणातील पाणी चंद्रपूर शहराची तहान भागविण्यासाठीही वापरले जाते. विदर्भात अनेक जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला....
  July 21, 07:19 PM
 • यवतमाळ- वणी शहरातील एका युवतीवर किशोरवयापासून सतत लैंगिक अत्याचार केल्याची घटना युवतीने दिलेल्या तक्रारीवरून उजेडात आली आहे. याप्रकरणी भाजपच्या नराधम नगरसेवकाला आज, दि. २० जुलैला बलात्काराच्या गुन्ह्यात वणी पोलिसांनी अटक करीत विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. या घटनेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी शहरातील एका काँगेस कार्यकर्त्याने पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी त्या काँग्रेसी...
  July 21, 12:20 PM
 • अमरावती- कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या साॅफ्टबाॅल ज्युनिअर विश्वचषकात कॅचर म्हणून अग्रमानांकन मिळविणारा खेळाडू प्रतीक डुकरेचे दि.२० जुलैला शहरात आगमन झाल्यानंतर त्याचा विविध क्रीडा संघटना, क्रीडाप्रेमी, आरडीआयके महाविद्यालयाद्वारे सन्मान करण्यात आला. साॅफ्टबाॅलसारख्या खेळाच्या शहरात फारशा सुविधा नसतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर देखणी कामगिरी केल्याबद्दल प्रतीकवर फुले उधळली. आंतरराष्ट्रीय साॅफ्टबाॅलमध्ये प्रतीकने भारताला १० वे स्थान िमळवून िदले. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी...
  July 21, 12:12 PM
 • नागपूर- अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत पुन्हा विरोधकांनी शुक्रवारी सरकारला धारेवर धरले. सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा कमी उंचीचा पुतळा राज्य सरकार उभारत असून सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल आणि सर्व गटनेत्यांची बैठक आयोजित करून शिवस्मारकाचा आराखडा दाखवून चर्चा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
  July 21, 07:55 AM
 • नागपूर-अधिवेशनात संभाजी भिडे गुरुजी यांचे हमखास पुत्रप्राप्ती करून देणारे आंबे खूप गाजले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी भिडेंच्या वेशभूषेत विधानभवन परिसरात येऊन भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तेही खूप गाजले. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रामदेवबाबांच्या पतंजली हर्बलच्या पुत्रजीवक बीजाचा मुद्दा पुढे आला आणि आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी बाबा रामदेव पतंजली हर्बलचे उत्पादन असलेले पुत्रजीवक बीज औषधाचे पाकीट परिषदेत...
  July 21, 07:50 AM
 • नागपूर- पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत याकडे एक प्रकारचा मिनी अर्थसंकल्पच सादर करत मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासाठी २२ हजार १२२ कोटींच्या विविध योजना प्रस्तावित केल्या. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने केल्या या घोषणा सिंचन क्षेत्र : - १०० कोटींच्या निधीतून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानाच्या मर्यादेत सर्व घटकांना १५% वाढ. यासाठी निधी मिळणार. जलसंधारणासाठी ५०० कोटींचा निधी. -...
  July 21, 06:20 AM
 • नागपूर - नागपूर येथील पावसाळी अधिवेशनचा आज (शुक्रवारी) शेवटचा दिवस होता. आठवडाभर चालेलेल्या या अधिवेशनात कधी सत्ताधारी-विरोधकांच्या गोंधळामुळे, तर कधी जोरदार पावसामुळे सभागृहात पाणी साचल्यामुळे अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. याचा फटका अर्थात जनसामान्यांकडून भरण्यात आलेल्या सरकारी तिजोरीला बसलेला आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे 8 तास 19 मिनिटे कामकाज वाया गेले तर विधान परिषदेचे 8 तास 27 मनिटे वाया गेले. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी प्रत्येक मिनिटासाठी 70 हजार रुपये...
  July 20, 07:15 PM
 • नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती घटक मानण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश आबिटकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, कर्जमाफी योजनेंतर्गत 58 लाख खातेदार असून आतापर्यंत 15 हजार 882 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेंतर्गत...
  July 20, 02:55 PM
 • राष्ट्रवादीचा विधान परिषदेत गाैप्यस्फाेट; एसपींचे पत्रच धनंजय मुंडेंनी मांडले पत्र लिक झालेच कसे? शिवसेनेचा सवाल, दाेन्ही बाजूंनी गदाराेळ नागपूर- शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या केडगावातील हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस यंत्रणेवर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड दबाव टाकत अाहेत. याबाबतचे पत्र नगरच्या स्वत: पोलिस अधीक्षकांनी पोलिस महासंचालकांना दिल्याचा गाैप्यस्फाेट करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत हे पत्रच सादर केले. तर...
  July 20, 10:34 AM
 • नागपूर- रामदेवबाबांच्या पतंजली उद्योग समूहाला मिहानमध्ये २३० कोटी रुपये किमतीची जमीन दिली. त्यामुळे २०९ कोटींचे नुकसान झाले. रामदेवबाबा सरकारचे जावई आहेत काय, असा सवाल संजय दत्त यांनी प्रश्नोत्तरांच्या तासानंतर केला. त्यावर बाबा रामदेव जावई नाहीत. राॅबर्ट वढेरा मात्र जावई आहेत असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यावरून विरोधी बाकांवरील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी गोंधळानेच उत्तर दिले. यातच सभापतींनी स्थगन...
  July 20, 07:52 AM
 • नागपूर- उपराजधानीत सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अात्मदहनाचा प्रयत्न झाला. बुधवारी महापालिका कर्मचाऱ्याने प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टाेकाचे पाऊल उचलले हाेते, सुदैवाने पाेलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. त्यापाठाेपाठ गुरुवारीही एका दिव्यांग व्यक्तीने अंगावर राॅकेल अाेतून घेतले. पाेलिसांनी तत्परतेने अंगावर पाणी अाेतून त्याला ताब्यात घेतले. अाेसीडब्ल्यूच्या पाणीपुरवठा करणाऱ्या एका टॅँकरने अाशिष अामदरे या अपंग...
  July 20, 07:50 AM
 • नागपूर- देशाच्या आर्थिक विकास दराचा वेग वाढवण्यासाठी मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प गरजेचा अाहे. स्थानिकांशी चर्चा करून त्यातील अडथळे दूर करत तो वेगाने पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. या प्रकल्पात फक्त पिलर्ससाठीची जमीन संपादित करण्यात येणार आहे, तसेच पुलाखालील जमिनीवर शेतकरी शेती करू शकतील, असे स्पष्टीकरण देतानाच बुलेट ट्रेनमुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. काँग्रेसचे संजय दत्त,...
  July 20, 07:42 AM
 • नागपूर- राज्यातील कोणताही विषय असला तरी बीड जिल्हा बँकेचा विषय काढून राष्ट्रवादीला लक्ष्य करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गुरूवारी सभापतींचा निर्वाणीचा इशारा व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापटांनी केलेल्या कळकळीच्या विनंतीलाही न जुमानता अत्यंत असंसदीय शब्दांत धसकटगिरी सुरूच ठेवली होती. अखेरीस बापट, खोत या मंत्र्यांनी व भाई गिरकर, विनायक मेटेंसह तीन आमदारांना धस यांना धरुन जागेवर बसवावे लागले. संसदीय सभागृहात न शाेभणारा हा प्रकार गुरुवारी विधान परिषदेत पाहायला मिळाला. पावसाळी...
  July 20, 07:37 AM
 • नागपूर- दुधाच्या वाढीव दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनास यश आले. दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान जाहीर केले. २१ जुलैपासून प्रतिलिटर २५ रुपये दराने दूध खरेदी केली जाईल. दूध संघांनी हे ५ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असेल. तथापि, या निर्णयामुळे किरकोळ ग्राहकांना दरवाढ सोसावी लागणार नाही. दरम्यान, स्वािभमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अांदाेलन मागे घेण्याची घाेषणा केली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत...
  July 20, 07:08 AM
 • नागपूर- मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, असे गृहीत धरून आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने होणाऱ्या नोकऱ्यांच्या महाभरतीत १६ टक्के जागा या समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील. उच्च न्यायालयाचा आदेश होताच या जागा अनुशेष म्हणून भरून काढल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचे मुद्दे गुरुवारी विधानसभेत उपस्थित झाले. या चर्चेला सविस्तर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मराठा...
  July 20, 06:57 AM
 • नागपूर- विदर्भातील सिंचन घोटाळ्यांसंदर्भात दाखल आरोपपत्रांवर विशेष न्यायालयात ३ महिन्यांत सुनावणी पूर्ण करावी, त्यासाठी दैनंदिन सुनावणी घ्यावी, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एसीबीच्या प्रलंबित प्रस्तावांवर राज्य शासनाने आठवडाभरात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विशेष तपास पथकांच्या तपासातील मंदगतीवर पुन्हा तीव्र नापसंती व्यक्त केली. विदर्भातील ४३ प्रकल्पांच्या चौकशीत मोठ्या प्रमाणात दस्तएेवजांचा समावेश...
  July 20, 06:46 AM
 • नागपूर- शनिशिंगणापूर देवस्थानात येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असून त्यांना सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. परंतु देवस्थान समिती या सुविधा देत नसल्याने आणि मिळणाऱ्या देणगीचा गैरव्यवहार रोखण्यासाठी विश्वस्त व्यवस्था सरकारच्या ताब्यात असावी, यासाठी तयार करण्यात आलेले विधेयक बुधवारी रात्री सव्वाबारा वाजता मंजूर करण्यात आले. कोरम नसतानाही आणि शिवसेनेचा एकही सदस्य उपस्थित नसताना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (शिंगणापूर) विधेयक २००८ मंगळवारी...
  July 19, 08:27 PM
 • नागपूर - धुळे येथील भाऊसाहेब हिरे सरकारी रुग्णालयात रुग्ण महिलेवर उपचारासाठी तिची नातेवाईक असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली गेली, तर एका रुग्ण महिलेच्या पतीला साफसफाईचे काम करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी विधानसभेत केला. हा प्रकार अतिशय गंभीर असून शासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश विधानसभाध्यक्षांनी यावेळी दिले. आमदार गोटे यांनी बुधवारी पॉइंट अॉफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले. धुळ्यातील भाऊसाहेब...
  July 19, 08:49 AM
 • नागपूर - मानवी तस्करी हा गंभीर गुन्हा आहे. ही संघटितरीत्यासुद्धा करण्याचा संशय आहे. यापुढे मानवी तस्करीचा समावेश संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत केला जाईल आणि पावसाळी अधिवेशनातच या संबंधी विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. हुस्नबानू खलिफे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, हरवलेल्या व्यक्तींचा तपास करण्यासंदर्भात प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे. या कार्यपद्धतीचा मासिक...
  July 19, 07:33 AM
 
जाहिरात

RECOMMENDED