Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अमरावती - शहरातील प्रवीणनगरमध्ये शनिवारी (दि. १८) सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास दोन गटात वाद झाला. यावेळी एका पंधरा वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गाडगेनगर ठाण्यावर धडक दिली होती. दरम्यान, शनिवारी रात्री पोलिसांनी दोघांना पकडले होते. मो. शोएब मो. इस्माईल (१५, रा. जमजमनगर, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात नीलेश चंद्रशेखर नकाते (२४, रा. महेंद्र कॉलनी) यासह...
  August 19, 12:33 PM
 • नवापूर (नंदूरबार) - तालुक्यात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे ४८३ घरांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुराचा तालुक्यातील ४० गावांना फटका बसला आहे. साधारण दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तालुक्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रंगावली नदीला पूर आला होता. पुरामुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात वंतीबाई बोकल्या गावित (५५ रा. खोकसा),...
  August 19, 08:41 AM
 • अमरावती- मुलाने गावातील मुलीसोबत पळून जावून लग्न केल्याने दलित महिलेच्या घराला एकाने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्याअंतर्गत कवाडगव्हान गावात ही घटना घडली आहे. आगीत दलित महिलेच्या घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या प्रकरणी तिवसा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी की, बेबी लक्ष्मण मेंढे (वय-49) असे दलित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी गणेश चपंत काळे (रा.कव्हाडव्हान)...
  August 18, 03:15 PM
 • शिरजगाव कसबा- जवळपास २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र असे असतानाच दुसरीकडे मुसळधार पावसाने शिरजगाव कसबा येथील डोबानपुरा भागात घराची भिंत कोसळल्याचे पाहून ६२ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली. अशोक श्यामराव शेकोकार असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मेघा नदीला पूर आला. पुराचे पाणी गावातील काही भागांमध्ये घुसल्याने घरांचे नुकसान झाले....
  August 18, 12:55 PM
 • अमरावती / धारणी- धारणी जिल्ह्यातील २ हजार लोकसंख्येचे गाव साद्रावाडी येथे शुक्रवार, दि. १७ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० च्या सुमारास भूकंपाचे काही क्षण पाच सौम्य धक्के जाणवल्याने गावातील आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. धारणी परिसरात याआधी एप्रिल २००५ मध्येही असेच भूकंपाचे सौंम्य धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवेले त्यावेळी गावात फारसे कोणीही नव्हते. बहुतेक गावकरी शेतावर कामाला गेले होते. तसेच आठवडी बाजाराचा दिवस असल्याने काही गावकरी तेथे गेले होते. दुपारी भूकंपाचे...
  August 18, 12:49 PM
 • नागपूर- ३०० मायक्रॉनवरील जाडीच्या कंटेनर्स, ट्रेचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक, विक्री आणि निर्यात इत्यादीसाठी संबंधितांवर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला दिले. त्यामुळे उत्पादक, विक्रेते व वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्देशाचा लाभ मिळवण्यासाठी संबंधितांना त्यांच्या बिल व पावतीवर, कंटेनर्स-ट्रे ३०० मायक्रॉनवर जाडीचे असून ग्राहकांची इच्छा असल्यास ते परत घेतले जातील, अशी सूचना...
  August 18, 07:28 AM
 • अमरावती- नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीवर परिसरातीलच एका तरुणाने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. पीडिती मुलगी आता सात महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून नागपूरी गेट पोलिसांनी गुरूवारी अल्पवयीन तरुणाविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देणे तसेच विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलीने तिच्या आई-वडिलांना आपबिती सांगितली. दरम्यान, तेव्हा उशीर झाला होता. त्यावेळी पीडिता दोन महिन्यांची गरोदर होती. पीडितेचे...
  August 17, 09:42 PM
 • आर्णी- संततधार सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढल्याने गुरूवारी आर्णी शहरात अरूणावती नदीचे पाणी शहरात घुसले आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले तर दुसरीकडे शहरातील व्यापारी वर्गाचे सुद्धा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशीरापर्यंत प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू होते. अरूणावती नदीच्या काठी असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असतांना नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना तहसील कार्यालयात आणून त्यांची जेवण्याची...
  August 17, 08:49 PM
 • अमरावती - मोबाइलच्या किरकोळ भांडणाने एकाचा जीव घेतल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील बोरदा येथे उघडकीस आली. बोरदा येथील श्यामलाल तोटा हा जीवतीचा सण असल्यामुळे रविवारी सायंकाळच्या सुमारास बाहेर गेले. दरम्यान तोटा यांची पत्नी मुंगनीबाई घरात स्वयंपाक करीत असताना तिला पतीच्या ओरडण्याचा आवाज एेकू आला. त्यामुळे मुंगनीबाई घराबाहेर आली असता पती श्यामलाल व गेंदालाल नंदलाल कास्देकर यांच्यात झटापट सुरू असल्याचे दिसून आले. श्यामलाल व गेंदालाल यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांच्या मोबाइलच्या...
  August 17, 12:25 PM
 • अमरावती - तिवसा तालुका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित होवून तालुक्यातील अनेक तरुण देशरक्षणासाठी सीमेवर तैनात होते व आजही आहेत. दरम्यान, तालुक्यातील पाच जवान भारतमातेच्या रक्षणार्थ शहीद झाले आहे. याच शहीद वीरांना स्मरण करण्यासाठी आणि शहिदांच्या माता पिता, भाऊ यांचे पाय धुवून शाहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लढा संघटनेने १५ ऑगस्टला शहीद नमन फेरीचे आयोजन केले होते. या फेरीत सहभागी युवकांनी तालुक्यातील पाचही...
  August 17, 12:23 PM
 • अमरावती - शहर तापाने फणफणत असल्याने महानगर पालिका प्रशासनाचे लक्तरे डासांनी वेशीवर टांगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, यावर फवारणी म्हणून प्रशासनाने धडक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला असून, आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांना सुमारे दीड लाखांचा दंड ठोठावला. कर्तव्यात कसूर केल्याने जनसामान्यांचा ताप वाढवणाऱ्या आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांनाच दंडाचे डास चावल्याने तापाचे रुग्ण कमी होतील का असा सवाल मात्र शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. शहर मागील काही दिवसांपासून...
  August 17, 12:21 PM
 • तिवसा - काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून स्वातंत्र्यदिनी, बुधवारी (दि. १५) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कवाडव्हाण येथील संशयित तरुणाच्या आईचे घर गावातीलच एका व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून घर जाळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कवाडव्हाण येथील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या मुलाचे गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते....
  August 17, 12:19 PM
 • नागपूर- नागपुरच्या नागरिकांनो, आज मी माझा खटला घेऊन तुमच्या न्यायालयात आलो आहे, आता बहुमताने निवडून द्या, असे साकडे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधान पदाचे तत्कालीन उमेदवार अटलबिहारी वाजपेयी यांनी कस्तुरचंद पार्क येथे जमलेल्या विराट जनसमुदायाला घातले होते. त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत जनता-जनार्दनाने त्यांना कौल दिला होता. तारीख होती गुरूवार, 12 फेब्रुवारी 1998. अटलजींनी घातलेली ही साद आजही लोक विसरलेले नाहीत. तुम्हाला खरोखरच मला पंतप्रधानपदी पाहण्याची ईच्छा...
  August 16, 07:51 PM
 • नागपूर-नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामातील क्रेनच्या चाकांखाली येऊन तीन महाविद्यालयीन मृत्यूमुखी पडल्याची घटना उपराजधानी नागपुरात घडली. या घटनेवर प्रचंड रोष व्यक्त होत असून काही संघटनांनी निदर्शनेही केलीत. उत्तर अंबाझरी मार्गावर मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. मृत्यूमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतींची नावे स्नेहा विजय अंबाडकर (वय १७) रा. हिलटॉप, ऋचिका विजय बोरीकर ( वय १८) रा. तांडापेठ आणि विश्रृती राजेश बनवारी (वय १८) रा. पांढराबोडी, अंबाझरी अशी आहेत. या तिघीही...
  August 15, 12:59 PM
 • नागपूर- गोवारी समाज हा आदिवासीच असून ही अनुसूचित जमातीतील स्वतंत्र जमात असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या या निकालामुळे गोवारींना अनुसूचित जमातीचे सर्व लाभ मिळण्याचा मार्ग अखेर अनेक दशकांच्या संघर्षानंतर मोकळा झाला. न्या. आर. के. देशपांडे आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्या खंडपीठाने मंगळवारी हा निकाल दिला. महाराष्ट्राशी संबंधित विशेष मागास वर्ग व केंद्राच्या इतर मागास वर्गांच्या संयुक्त यादीत...
  August 15, 10:46 AM
 • अकोला- ब्रिटिश जोखडातून देश स्वतंत्र झाल्याचा ७२ वा उत्सव आनंदात सुरू आहे. मात्र, भारतीय अशी ओळख असलेली शकुंतला रेल्वे आजही ब्रिटिश कंपनीच्या मालकीच्या जीर्ण ट्रॅकवरून धडधडत प्रवाशांना सेवा देत आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने एका कंपनीसोबत करार केला. नंतर दुसऱ्या कंपनीला देखभालीचे काम दिले. रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी ट्रॅक रॉयल्टीवर घेऊन गाडी सुरू केली. इतर रेल्वेचे राष्ट्रीयीकरण होत असताना झालेले दुर्लक्ष, अशा अडथळ्यांचा प्रवास ही रेल्वे आजही करत आहे. भारतीय रेल्वे आपल्याच...
  August 15, 07:11 AM
 • गडचिराेली जिल्ह्यातील आबुझमाडचे जंगल. या घनदाट जंगलातून २२ किमीची पायपीट, होडक्यातून नदीपार करत दिव्य मराठी प्रतिनिधी दीप्ती राऊत यांनी केलेला झेंडा न पाहिलेल्या कुवाकोडी गावाचा ग्राउंड रिपोर्ट... आबुझमाडच्या जंगलातल्या कुवाकोडी गावात कुणाला ना झेंडा माहीत आहे, ना स्वातंत्र्यदिन. आठ किमीवरच्या बिनागुंडाला भामरागडचे तहसीलदार एकदा गेले. पण त्यापलीकडच्या कुवाकोडी, तुरेमरका, धामनमरका, पुंगासूर आणि पेरमलभट्टी या गावांमध्ये मात्र भारतीय प्रशासन व्यवस्थेतली एकही व्यक्ती गेल्या ७१...
  August 15, 06:25 AM
 • नवापूर (नंदुरबार) - तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुध वाहतूक करणारी गाडी व बडोदा-अमळनेर बसची समोरासमोर धडक झाली. विसरवाडीजवळील अॅपल हॉटेल समोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यात दुधगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बस मधील 8 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. गोदावरी कपंनीची दुधाची गाडी कोपरगावरहुन येत असताना राष्ट्रीय महामार्गावर गाडीला एसटी बसची धडक बसली. यादरम्यान दुधगाडीचा चालक वाहनामध्येच...
  August 14, 02:53 PM
 • नागपूर- ऑनलाईन व्यवहारांना चालना मिळत असल्याने बँक खातीही मोबाईल क्रमांकाशी लिंक होत आहेत. मात्र, त्याचाच फायदा गुन्हेगार सध्या घेत असल्याचे पोलिस यंत्रणा हैराण झाली आहे. मोबाईलचे सीमकार्ड क्लोन (त्याच क्रमांकाचे दुसरे सीमकार्ड) करून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातील लाखोंची रक्कम परस्पर हडप करण्यात येत असल्याच्या तीन घटना मागील तीन महिन्यात उपराजधानी नागपुरात उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे आता बँक खात्यांच्या माहितीसह मोबाईलचे सीमकार्डही काळजीपूर्वक हाताळण्याचा सल्ला पोलिस...
  August 14, 12:44 PM
 • नागपूर - गोवारी समाजाच्या 23 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या समाजाला ST कोट्यातून आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून हा समाज आपल्या न्याय्य मागणी आणि हक्कांसाठी लढत होता. आपल्या हक्कासाठी या समाजाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, आपल्याला ओबीसी वर्गातून काढून एसटी शेड्युल ट्राइब्सचा दर्जा द्यावा आणि त्यातूनच आरक्षणाचा लाभ मिळावा अशी त्यांची मागणी होती. दरम्यान,...
  August 14, 12:37 PM
 
जाहिरात

RECOMMENDED