जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • delete
  December 16, 02:43 PM
 • अमरावती- बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हसला गावात बकऱ्या चारण्याच्या वादातून ३२ वर्षीय युवकाचा गावातीलच एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वेळी त्या युवकाने थापड मारली. याच थापडेचा वचपा घेण्यासाठी पाच जणांनी युवकाला गावातच बेदम मारहाण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. शुद्धोधन माणिकराव वानखडे (३२, म्हसला) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी...
  December 16, 10:55 AM
 • आर्णी- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे शुक्रवारी दुपारी भररस्त्यावर भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेचे शनिवारी पहाटे उमटले. संतप्त जमावाने ग्रामीण रुग्णालयातील अॅम्बुलन्स पेटवली. या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. शहरासह ग्रामीण रुग्णालयात पोलिस बंदोबस्त आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी नीलेश हिम्मतराव मस्के याच्यासह त्याचा मित्र ओम गजानन बुटले याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यात...
  December 15, 04:47 PM
 • अमरावती- राजापेठ ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका एकोणतीस वर्षीय विवाहितेवर परिचित असलेल्या २६ वर्षीय युवकाने वारंवार अत्याचार केला. या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले किंवा बाहेर कुठे वाच्यता केल्यास, मुलांना ठार मारेल, अशी धमकी अत्याचार करणाऱ्या युवकाने दिल्याची तक्रार पीडितेने राजापेठ पोलिसात दिली आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी १३ डिसेंबरला युवकाविरुद्ध बलात्कार, विश्वासघात तसेच धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला. अल्पेश उत्तमराव खडसे (२६, रा. जेवडनगर) असे पोलिसांनी गुन्हा...
  December 15, 10:47 AM
 • नागपूर- बादशहा अकबराच्या काळात १० हजारांच्या घरात असलेला चित्ता नंतर संस्थानिक आणि राजे-रजवाड्यांच्या शिकारीच्या नादामुळे नामशेष झाला. भारतातील गवताळ प्रदेशातील वातावरण चित्त्यांसाठी पोषक असल्याने १८ चित्ते भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात खटला चालवण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ हवे. त्यासाठी समाजातील दानशूर तसेच वन्यजीवप्रेमींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड रुरल डेव्हलपमेंट संस्थेच्या अध्यक्षा आणि ख्यातनाम चित्ता...
  December 15, 07:35 AM
 • आर्णी - यवतमाळच्या आर्णीमधील ग्रामीण रुग्णालय परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास नीलेश मस्के यांच्यावर हा हल्ला झाला. हल्ला थांबवण्यासाठी गेलेले अमित बुटले यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला चढवला. यात नीलेश मस्के ठार झाला असून बुटले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. नीलेश मस्के हा पूर्वी शिवसेना कार्यकर्ता होता. युवासेनेच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यानंतर मस्के यांनी भाजपमध्ये...
  December 14, 03:55 PM
 • अमरावती - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय रावसाहेब बंड (५२) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई व दोन भाऊ असा परिवार आहे. बंड हे अमरावती जिल्ह्यातील वलगाव मतदारसंघातून तीन वेळा शिवसेनेतर्फे आमदार म्हणून निवडून आले होते. नव्वदच्या दशकात विद्यार्थी चळवळीतून बंड यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय विद्यार्थी सेनेतही त्यांनी काम केले. १९९६ मध्ये ते प्रथम अामदार म्हणून...
  December 14, 10:51 AM
 • वरुड- गावी. जाण्यासाठी येथील बसस्थानकात बसची वाट पाहात असलेल्या एका अल्पवयीन युवतीला घरी सोडून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवत एका शेतात नेत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली. याबाबत घाबरलेल्या पीडितेने गुरुवारी कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांनी त्वरित पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आराेपीला अटक केली. सलमान शहा कासम शहा (वय ३५, रा. वरुड) असे आरोपीचे नाव आहे. बसस्थानकात बसची वाट पाहत असलेल्या...
  December 14, 09:50 AM
 • नागपूर - नागपुरात कारमध्ये सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी रात्रीच्या वेळी वर्दळ नसलेल्या ठिकाणांवर संशयास्पद परिस्थितीत उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या तपासणीचे अभियान सुरू केले आहे. मागील तीन ते चार महिन्यांत नागपूरमध्ये पोलिसांनी व्यापक प्रमाणात छापे घालून सेक्स रॅकेटचे प्रकार उघडकीस आणले आहेत. नागपुरातील उच्चभ्रू वस्त्यांमधील इमारती, हॉटेल, लॉजेससह काही ब्यूटी पार्लर्समध्येही सेक्स रॅकेट सक्रिय असल्याचे आढळून आले होते. मात्र,...
  December 14, 08:58 AM
 • नागपूर- उच्चभ्रू वसाहती, फ्लॅट्स, हॉटेल्स आणि सलूनमध्ये पोलिसांचे धाडसत्र सुरु असल्याने आता सेक्स रॅकेट चालवणार्यांनी नवी शक्कल लढविल्याचे समोर आले आहे. कारमध्येच बेड तयार करून धावत्या कारमध्ये सेक्स रॅकेट चालविणार्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कारमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून पोलिसांनी दोन दलालांना अटक केली आहे. तसेच एका विद्यार्थिनीलाही ताब्यात घेतले आहे.योगेश शाहू (वय-23, रा. इंदिरा गांधी नगर) आणि राहुल अनिल गवतेल (वय-21, रा. ठक्करग्राम, पाचपावली) अशी अटक...
  December 13, 05:12 PM
 • वरुड- मागील १५ दिवसांपूर्वी शहरातील लक्ष्मीनगर येथे घरी कुणी नसल्याची संधी साधून पहाटेच्या सुमारास चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांपैकी एका शेजारील युवकाच्या समयसुचकतेमुळे पकडण्यात यश आले. मात्र अद्यापही त्याचे दोन सहकारी पोलिसांना गवसले नाही. असे असतानाच मंगळवारी (दि. ११) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी नगरपालिका कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने फोडत हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली....
  December 13, 11:05 AM
 • परतवाडा- रेशनच्या धान्याचा काळाबाजाराच्या संशयावरून संशयित रशीद टोपली याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल पोलिसांना सादर केल्यामुळे चिडलेल्या अज्ञात व्यक्तीने फोनवरून पुरवठा निरीक्षकाला पाहून घेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी अचलपूरचे पुरवठा निरीक्षक श्रीकांत मोयगे यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे पारदर्शी असलेल्या पॉस मशीन देऊनही रेशनच्या धान्याला पाय कसे फुटले, असा प्रश्न निर्माण झाला असून, कारवाया...
  December 13, 10:49 AM
 • अमरावती- जिल्ह्यातील तूर, सोयाबीन व कापसाची मागील पाच वर्षांतील उत्पादकता समाधानकारक आल्याचे दिसून येत असून,जिल्ह्याची पैसेवारी ५२ पैसे आली आहे. त्यामुळे यावर्षी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा लाभ मिळण्याची आशा धूसर झाली आहे. वैयक्तिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंडळातील सुमारे बारा गावांचे नुकसान होणे आवश्यक असल्याच्या भन्नाट अटीमुळे या वर्षीही विमा कंपन्या मालामाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी तूर, कपाशी, सोयाबीन ही...
  December 12, 10:43 AM
 • अमरावती- शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांनी कहर केला आहे. ग्रामीण आणि शहरात दरदिवशी सरासरी दोन दुचाकींची चोरी होत असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीवरून दिसून येत आहे. दरम्यान मंगळवारी (दि. ११) ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने परतवाड्यातून एका सोळा वर्षीय चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याला घरी कबुतर पाळण्याचा छंद आहे. तोच छंद जोपासण्यासाठी त्याने चोऱ्या केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे....
  December 12, 10:43 AM
 • नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. ट्रक आणि एका व्हॅनमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडे नऊच्या सुमारास घडला. कोरपना-वाणी रोडवरून एक व्हॅन जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, उपचार सुरू असताना आणखी एकाचा जीव गेला. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सात महिला, व्हॅन...
  December 9, 10:59 AM
 • नागपूर- देशभरात नव्याने दिल्या जाणाऱ्या ड्रायव्हिंग लायसन्सवर (अनुज्ञप्ती) आता अवयवदानाच्या प्रतिज्ञेची माहिती मिळणार आहे. तसेच इच्छुक व्यक्तीच्या अनुज्ञप्तीवर अवयवदाताअसा उल्लेख करण्यात येणार अाहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. माय मेडिकल मंत्रा या आरोग्यविषयक बातम्या देणाऱ्या वेब पोर्टलच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी अवयवदात्या कुटुंबीयांचा सत्कार केला. तसेच अवयवदानाच्या...
  December 9, 08:44 AM
 • नागपूर- पती-पत्नी और वोचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. परंतु एखादी महिला आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडते, तेव्हा त्याचे काय हाल होतात. अशीच एक घटना उपराजधानी नागपूर शहरात घडली आहे. भर रस्त्यावर पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला तिच्या मुलासोबत मार्केटमध्ये येते. तिला पतीसोबत त्याच्या गर्लफ्रेंड फिरत असताना दिसते. ती क्षणात पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर हल्ला चढविल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महिलेच्या पतीचे विवाहबाह्य...
  December 7, 02:36 PM
 • नागपूर -ब्रिटिशांनी फुलपाखरांना देऊन ठेवलेली व तेव्हापासून तीच ओळख बनलेली नावे आता बदलणार आहेत. महाराष्ट्रातील फुलपाखरांना आता मराठमोळी नावे दिली जाणार आहेत. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या सुमारे २५७ प्रजाती आहेत. राज्यातील फुलपाखरांना मराठी नावे मिळावीत यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने एक समिती स्थापन केल्याची माहिती मंडळाचे सदस्य जयंत वडतकर यांनी दिव्य मराठीला दिली. येत्या सोमवार, १० डिसेंबर रोजी समितीची पहिली बैठक पुणे येथे आयोजित करण्यात अाली आहे. राज्यात प्रत्येक...
  December 7, 08:59 AM
 • दर्यापूर, अमरावती - संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्षे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या...
  December 7, 08:41 AM
 • नागपूर - टी-१ ऊर्फ अवनी वाघिणीला स्वसंरक्षणार्थ गोळ्या घालून ठार मारण्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह लावताना या घटनेचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या समितीने वाघिणीला ठार मारणारा खासगी शूटर असगर अली खान आणि वन विभागाच्या पथकावर कायद्याचे पालन न केल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. वाघिणीला बेशुद्धीचे डार्ट मारल्यानंतर पथकाने औषधांचा प्रभाव होण्याची कुठलीही प्रतीक्षा न करता काही सेकंदातच तिला गोळ्या घातल्या. डार्टमधील औषध २४ तासांहून अधिक काळासाठी वापरले जात नाही....
  December 7, 08:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात