Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर- शासनाच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६३ हजार ६९२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, या शेतकऱ्यांंचा सात बारा कोरा झाला आहे. जिल्ह्याच्या विकासाची जिल्हा नियोजन समिती राज्य सरकारने ६५० कोटींची करून या जिल्ह्याच्या विकासाला कायम एवढी रक्कम उपलब्ध करून दिली. गेल्या वर्षी नियोजन समितीला प्राप्त ५९५.८८ कोटींपैकी मार्च २०१८ अखेर ५९४ कोटी खर्च करून विकासाची ९९ रक्कम टक्के खर्च करणारी नागपूर ही दुसऱ्या क्रमांकाची नियोजन समिती ठरली...
  August 6, 12:41 PM
 • नागपूर- देशातील प्रमुख शहरांमधील वायुप्रदूषणाचा आढावा घेण्यात आल्यावर राजधानी दिल्लीसह पाटणा, रायपूर आणि महाराष्ट्रातील नाशिक या चार शहरांमध्ये वातावरणातील वायुप्रदूषण शोषून घेणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. ही यंत्रणा उभारल्यामुळे या शहरांमध्ये वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी होण्याची अथवा ते नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वतीने देशभरातील प्रमुख शहरांमध्ये वायूप्रदूषण नियंत्रणाचा प्रकल्प हाती...
  August 6, 11:05 AM
 • नागपूर- अागामी ९२ वे साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार हे आता स्पष्ट झाले आहे. संमेलनासाठी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याची निवड केली होती. मात्र वर्धेने ऐनवेळी माघार घेतली. रविवारी स्थळ निवड समितीने यवतमाळ येथील काही जागांची पाहणी केली. संमेलनासाठी िवदर्भ साहित्य संघा अनेक संस्थांनी निमंत्रणे दिली होती. त्यातील तीन संस्थांनी माघार घेतल्यामुळे उर्वरित सहामधून वर्धा आणि यवतमाळ निवडण्यात आले होते. राजकीय आणि आर्थिक पाठबळाअभावी विदर्भ साहित्य संघाच्या...
  August 6, 06:04 AM
 • अमरावती - खासदार अानंदराव अडसूळांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणाला रामराम ठोकत घरी बसेल, असे आमदार रवी राणा पत्रपरिषदेत शनिवार ,दि. ४ ऑगस्टला म्हणाले. पत्नी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरुन सुरू असलेल्या राजकीय द्वंदाबाबत राणा यांनी पत्रपरिषदेत खासदार अडसूळांवर पलटवार करीत खंडणी, धमकी तसेच १२३ वेळा केलेले कॉल डिटेल्स पोलिस आणि तपास यंत्रणांना देणार असल्याचे राणा यांनी सांगितले. खासदार अडसूळ यांच्या सांगण्यावरून जयंत वंजारी, सुनील भालेराव, कार्तिक शाह यांच्याकडून खंडणी...
  August 5, 01:07 PM
 • चांदूर रेल्वे - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा व्यापक रुप धारण करत आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वत्र मराठा बांधव रस्त्यावर उतरु लागला आहे. अमरावती जिल्ह्यातही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटू लागले आहेत. धामणगाव पाठोपाठ शनिवारी (दि. ४) शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान काही मोर्चेकऱ्यांनी गाडगे बाबा मार्केटमधील दूध डेअरीची तोडफोड केली. पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. संपूर्ण शहर १०० टक्के बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे...
  August 5, 01:05 PM
 • अमरावती - पावसाळाच्याचे प्रमुख दोन महिने उलटल्यानंतरही जिल्ह्यातील प्रमुख पाच धरणे निम्मेही न भरल्याने सध्या चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वर्धा, शहानूर, चंद्रभागा, पुर्णा व सापन प्रकल्पामध्ये सरासरी एकूण केवळ ४१.७० टक्केच जलसाठा निर्माण होऊ शकला आहे. उर्वरित ऑगस्ट व संप्टेबर मध्ये सातपुड्याच्या रांगामध्ये पाऊस न बरल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात वर्धा सर्वात मोठा प्रकल्प असून यातून अमरावती...
  August 5, 01:03 PM
 • अकोला - येथील आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहेमद व बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शफी कादरी या दोघांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. अकोला शहरात 30 जुलै रोजी हत्याकरून त्यांचे मृतदेह हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा लगतच्या पाथर्डी घाट परिसरात फेकून देण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची तंत्र मंत्रची लिंक असण्याचीही शक्यता समोर येत आहे. पैशाचा पाऊस पाडण्याचे आमीष पैशाचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा या संपूर्ण प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा...
  August 4, 10:05 PM
 • अमरावती- भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तेपासून रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसला ऑफर दिली असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीची संवाद यात्रा अमरावतीत पोहोचली असता स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे अॅड. आंबेडकर दि. ३ ऑगस्टला पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रात सत्तेत असलेला भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार देशाच्या संविधात बदल करण्याचे बोलल्या जात आहे. आगामी लोकसभा...
  August 4, 11:43 AM
 • नागपूर- येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील कृषी विस्तार विभागाचे प्रधान वैज्ञानिक डाॅ. एस. एम. वासनिक यांनी सुरू केलेल्या ई-कपास प्रकल्पाला निधी नसण्याचा फटका बसला आहे. टेक्नाॅलाॅजी मिशन आॅन काॅटनअंतर्गत पाच वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पाला टीएमसीअंतर्गत निधी मिळणे बंद झाल्याचा फटका बसला आहे. आधी या प्रकल्पातंर्गत ११ राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सल्ला दिल्या जात होता. आता केवळ तीन राज्यातील पावणेदोन लाख शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे. या संदर्भात डाॅ. एस....
  August 4, 11:05 AM
 • अमरावती- आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनित राणा यांनी बुधवारी (दि. १) मध्यरात्री राजापेठ पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी जयंत वंजारी, सुनील भालेराव तसेच कार्तिक शाह यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुध्द खंडणी मागणे, अश्लील शिवीगाळ करणे, बदनामी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, कट रचणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याचवेळी खासदार अडसूळ वगळता उर्वरित तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचेही कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, चारच दिवसांपूर्वी खासदार अडसूळ यांच्या तक्रारीवरून...
  August 3, 12:22 PM
 • अमरावती- सकल मराठा क्रांती मोर्चांतर्गत शहरातील मराठा समाज एकवटला असून, ९ आॅगस्टच्या राज्यव्यापी आंदोलनाचे अमरावती शहरात नेमके कसे स्वरूप राहणार याबाबत निर्णय गनिमी काव्यामुळे गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या स्वरुपाबाबत अंतिम निर्णय ७ आॅगस्ट रोजी घेतला जाणार आहे. दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वडाळी येथील रहिवासी ४० वर्षीय संजय महादेव कदम याने अंगावर राॅकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला तर आरक्षणाच्या...
  August 3, 12:19 PM
 • नागपूर- आज देशातील माेठ्या प्रमाणावर कापूस उत्पादक शेतकरी बीटी कापसाकडे वळल्यानंतर बीटी-१, बीटी-२ नंतर आता बीटी-३ वाण आले खरे, पंरतु अलीकडे गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परत एकदा देशी बीटी वाणाची गरज भासत आहे. त्यासाठी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पुढाकार घेतला अाहे. पुढील वर्षी राज्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांच्या शेतात देशी बीटीची प्रात्यक्षिके घेण्यात येतील, अशी माहिती सीसीआरआयचे संचालक विजय वाघमारे यांनी दिली. २००६-०७ पर्यंत देशी कापसाचे क्षेत्र जास्त होते....
  August 3, 10:54 AM
 • नागपूर- राज्यात यापुढे विहिरी आणि बोअरवेल खोदण्यावर बंधने घालण्यात आली असून दोन्हींच्या खोलीवर ६० मीटरचे म्हणजे २०० फूटांचे बंधन घालण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा तुघलकी निर्णय शेतकऱ्यांच्या मूळावर येणारा असून यापुढे शेतकऱ्यांनी विहिरींसाठी आत्महत्या करायची काय?, असा संतप्त सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला आहे. राज्य सरकारने बहुप्रतीक्षित भूजल कायद्याचा मसुदा जाहीर केला आहे. त्यावर येत्या ३१ आॅगस्टपर्यत हरकती आणि सूचना मागवल्या आहे. विहिरीतून...
  August 2, 11:46 AM
 • धामणगाव रेल्वे- मुंबईवरून नागपूर जिल्ह्यातील खापरीकडे हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याची घटना बुधवारी (दि. १) सकाळी साडे सहाच्या सुमारास देवगावजवळ घडली. सुदैवाने टँकरने पेट न घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दक्षता म्हणून वाहनांचा मार्ग बदलण्यात आला, तर सुरक्षेच्या दृष्टीने दोन किमीचा परिसर भल्या सकाळी खाली करण्यात आला. टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीचे परिणाम पाच किमीच्या परिसरात दिसून आले. नागपूर-औरंगाबाद हायवेवर रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात...
  August 2, 11:44 AM
 • नागपूर- राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील आरक्षणाचा उच्च न्यायालयापुढील विचाराधीन वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावर विशेष याचिका दाखल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी लागू असलेल्या १५ टक्के केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७ टक्के...
  August 2, 11:39 AM
 • नागपूर- सरकारी योजनांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीवर आता दोन सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या समितीची नजर राहणार आहे. अशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले आहेत. भ्रष्टाचाराची चौकशी करताना यंत्रणेवरील दबावामुळे दोषींवर कारवाई होऊ शकत नाही, असे यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे निदर्शनास आले. त्यामुळे सरकारी योजनांत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने तसेच चौकशी प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील...
  August 2, 07:31 AM
 • अमरावती- शहरातील कठोरा नाका भागात असलेल्या श्रम साफल्य कॉलनीतील हेमंत सहदेवराव भोरखडे (३२) या तरुणाने तीन महिन्यांपूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. हेमंत या परीक्षेत देशातून ४२४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. दरम्यान हेमंत यांना आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) मिळाली आहे. त्यामुळे आता ते भविष्यात जिल्हाधिकारी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेमंत भोरखडे हे आयएएस होणारे मागील तीन वर्षांतील शहरातील दुसरे व्यक्ती आहे. हेमंत भोरखडे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण...
  August 1, 01:04 PM
 • अमरावती- वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामुंजा शिवारात सोमवारी (दि. ३०) सायंकाळी कामुंजा येथील संतोष ऊर्फ बाबू गंगाधर सगणे (३०) यांचा मृतदेह आढळला होता. दरम्यान या खून प्रकरणात वलगाव पोलिसांनी मंगळवारी (दि. ३१) संतोषचा मित्र शेख यासीम शेख याकूब (३० रा. कामंुजा) याला अटक केली आहे. शेख यासीम, संतोष व अन्य काही जण रविवारी दुपारी जुगार खेळले. या वेळी जुगार खेळताना संतोष व शेख यासीम जुगारात काही रक्कम हरलेत. त्यानंतर या दोघांचे किरकोळ भांडण झाले. त्यावेळी ते दारु प्यायले होते. दरम्यान दारु जास्त...
  August 1, 01:00 PM
 • अमरावती- लंडनच्या रिक्स विद्यापीठाद्वारे आयोजित शहरांचे भविष्य व आव्हाने स्पर्धेत अमरावती येथील आर्किटेक्ट सायली राजू विरुळकरने शहरीकरणाच्या युगात भविष्यात शहरांना भासणारी संसाधनांची टंचाई यावर अाधारित शहरातील शेती हा महत्त्वपूर्ण प्रबंध सादर केला होता. त्याला जगभरातील ३ लाख ६५ हजार स्पर्धकांमधून १२ वे स्थान मिळाले. सर्वोत्कृष्ट १२ मध्ये स्थान पटकावणारी सायली ही दक्षिण आशिया विभागातील एकमेव विद्यार्थिनी अाहे. शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. तरीही या विकास व तंत्रज्ञानाच्या...
  August 1, 12:40 PM
 • अमरावती- शहरातील फ्रेजरपुरा परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २९) घडली. दरम्यान विवाहितेने मृत्यूपुर्व लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सोमवारी (दि. ३०) शवविच्छेदना पूर्वी मिळाली. पती मद्यप्राशन करुन मारहाण करायचा, याच वारंवारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. दरम्यान, विवाहितेच्या वडीलांनी पतीसह सासरच्या इतर मंडळींविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून...
  July 31, 01:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED