जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सर्वप्रथम सकाळी 10 वाजता ते नागपूरला पोहोचले. यानंतर त्यांनी महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. तसेच शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जणार नाही असे आश्वस्त केले. सोबतच, या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीभारतीय सैनिकांना खुली सूट देण्यात आली आहे असेही मोदींनी ठणकावले. जवानांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन जाहीर सभेला...
  February 16, 12:27 PM
 • यवतमाळ- व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला सर्वत्र प्रेमी युगुलांच्या प्रेमासाठी आणाभाका सुरू असताना पांढरकवडा येथे मात्र आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवशी प्रेमातील त्रिकोणाच्या दोन बाजूंत जबर जुंपली. अर्थात या आमदारांच्या दोन पत्नींत भररस्त्यात कडाक्याचे भांडण झाले. तोंडी पेटलेले भांडण हळूहळू धरपकडीवर आले आणि पहिल्या पत्नीने दुसरीला चपलेने फ्रीस्टाइल झोडपले. याचदरम्यान, दोघींपैकी एकीची बाजू घेत सुमारे ३५ ते ४० जणांचा जमाव सरसावला आणि या हल्ल्यात आमदारही...
  February 14, 08:10 AM
 • नागपूर- लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युती होणार की नाही, या चर्चेला पूर्णविराम मिळू शकतो. भाजपने लोकसभेच्या २५ व शिवसेनेने २३ जागा लढवाव्यात यावर उभय पक्षांत मतैक्य होण्याचे संकेत असून भाजपच्या कोअर ग्रुपमधील एका मंत्र्याने शंभर टक्के युती होणार असल्याचे संकेत दिले. मनसे राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजप नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेत बदल होण्याचे संकेत आहेत. शिवसेना नेतृत्व या मन:स्थितीत असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने...
  February 14, 08:03 AM
 • नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या घोडपेठ येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून आता घोडपेठ उदयास आले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ गावातील नागरिकांना सोमवारपासून टेलिमेडिसीन सेवा, विद्यार्थ्यांना संगणक...
  February 12, 08:48 AM
 • नागपूर- महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचा सामना करताना आजवर १९४ पोलिस धारातीर्थी पडले. या लढ्यातील शहीद पोलिसांची कामगिरी चिरंतन स्मरणात राहावी, यासाठी त्यांच्या कामगिरीची दखल अनोख्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न राज्य पोलिस दलाकडून सुरू आहे. या पोलिसांच्या कामगिरीची गाथा सांगणारी पुस्तिका नक्षलविरोधी अभियानाकडून तयार केली जात आहे. १९८०-९० च्या दशकात गडचिरोली आणि गोंदियासह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत नक्षलवादी चळवळीची...
  February 12, 08:17 AM
 • नागपूर- पेट्रोलचे भाव सध्या नियंत्रित आहेत, पण ते वाढले तरी किंवा तुमच्या दुचाकीतील पेट्रोल रस्त्यातच संपले तरी खूप चिंता करण्याचे कारण नाही. कारण पेट्रो हायब्रीड व्हेइकल या बॅटरीसारख्या उपकरणावर तुमची गाडी पेट्रोल संपल्यानंतरही किमान ७५ किलोमीटर धावेल. एक दुचाकी साधारणत: ६० ते ६५ किमी अॅव्हरेज देते. पेट्रो हायब्रीड व्हेइकल उपकरण लावल्यानंतर ती आणखी ७५ किमी चालेल. म्हणजे एकूण १३५ किमीपर्यंत धावू शकेल. पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्ही इंजिनांवर चालणारे हे उपकरण अभिजित खडखडी व शुभम कनिरे...
  February 11, 08:29 AM
 • नागपूर- वाशीम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील घनदाट जंगलात वसलेले रुई हे वनग्राम आहे. वाशीम जिल्ह्यात अंध-आदिवासी अधिक संख्येने आहेत. पण या पाड्यात गोंड आदिवासींची १२ घरे आहेत. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते अशा प्रकारच्या प्राथमिक सोयी-सुविधांपासूनच हे गाव आजवर वंचित होते. येण्याजाण्यासाठी रस्ताच नसल्याने शासकीय योजनाही रुईपासून कोसो दूर. जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांच्या प्रयत्नांमुळे रुईमध्ये हातपंप लावण्यात आले. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर...
  February 11, 08:21 AM
 • नागपूर- खिचडी आणि जळगावी वांग्याच्या भरितानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी दीड हजार किलो सेंद्रिय भाजी तयार केली. या मिश्र भाजीचे नंतर खवय्यांना नि:शुल्क वितरण करण्यात आले. विष्णूजी की रसोई येथे सकाळी ७ ते ११ या वेळेत ही भाजी तयार करण्यात आली. लोकांना सेंद्रिय भाज्यांचे महत्त्व कळावे म्हणून हा उपक्रम केल्याचे मनोहर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ही भाजी शेणाच्या गोवऱ्यांवर करण्यात आली. यासाठी पालक ५० किलो, मेथी २५ किलो, गाजर २२०, बटाटे १७५, कांदे १००, हिरवे लसूण व आले...
  February 11, 08:10 AM
 • सभेला गर्दी जमण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा म्हणजे प्रियंका चोप्रा नव्हे, मोदींनी काढला चिमटा शत्रुघ्न सिन्हा यांना पाटण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोदींचे आव्हान नागपूर- राहुल गांधी खोटारडे आहेत, शत्रुघ्न सिन्हा म्हणजे प्रियंका चोप्रा थोडीच आहेत गर्दी जमायला, आप पत्रकार हो की विपक्ष के कार्यकर्ता?, नोकरी के लिए बिहारी चाँद पर भी जायेंगे, बिहारीओं ने बाहर जाना बंद किया तो देश के कारखाने बंद हो जायेंगे, नहीं देना हमें आप के सवाल का जवाब, कुछ भी सवाल पुछते हो आप, ये सवाल थोडे ही है?, आप के...
  February 8, 06:23 PM
 • धारणी - भरधाव स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटून आंब्याच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक यासीन खान अय्यूब खान (वय २८) याचा मृत्यू झाला, तर चेतन मेश्राम (वय २५) व अरमान खान यासीन खान (वय ५) सर्व रा. बैरागड गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास कुटंगा ते हरदा मार्गावर घडली. अन्य तिघांवर बैरागड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक यासीन खान व चेतन मेश्राम हे दोघे मित्र आहेत. चेतन मेश्रामने नुकतीच स्कॉर्पिओ वाहन (क्रमांक एमएच २९ आर ७९७६) खरेदी केले होते. त्यामुळे यासीन...
  February 8, 12:20 PM
 • अमरावती - दुचाकीची विक्री करताना अधिकृत विक्रेत्याने दोन हेल्मेट ग्राहकांना देणे बंधनकारक असताना विक्रेत्यांकडून मात्र या नियमाला तिलांजली दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातच हेल्मेटसाठी रक्कम आकारली जात असून हेल्मेट नको असल्यास तसे घोषणा पत्रही लिहून घेतले जात असल्याचे प्रकार विक्रेत्यांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकी अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यातील बहुतांश मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने होत...
  February 8, 12:08 PM
 • नागपूर- येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये (वन्यप्राणी बचाव केंद्र) शिरत एका बिबट्याने 5 चितळ, 3 काळवीट व एक चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हा बिबट्या काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला इलेक्ट्रॉनिक तारेचे कुंपण आहे. ते ओलांडून बिबट्याने सुमारे 15 फूट पिंजऱ्यात शिरून काळविटासह चौसिंग्याला ठार केल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे....
  February 7, 12:22 PM
 • अमरावती- डिसेंबर महिन्यातच शेंदरी बोंडअळ्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आगामी हंगामातही बोंडअळीचे भूत कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकरी व जीन मालकांनी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्याचे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांना जबर फटका बसण्याचा इशारा केंद्राचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी दिला आहे. मागील वर्षी बोंड अळीने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. त्यानंतर चालू हंगामाच्या...
  February 7, 11:52 AM
 • नागपूर- कुंपनच शेत खात असल्याचा धक्कादायक प्रकार राज्याच्या उपराजधानी अर्थात नागपुरात समोर अाला आहे. मध्य भारतातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया आबू खान याला सहकार्य केल्याप्रकरणी नागपुरातील 4 उपनिरीक्षकासह 6 पोलिस अधिकार्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आबू खान याला दोन आठवड्यांपूर्वी क्राइम ब्रॅंचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्याकडे चौकशीत त्याला सहकार्य करणार्या चार पोलिस उपनिरीक्षकांसह 6 कर्मचार्यांना नागपूर पोलिस आयुक्तांनी निलंबित...
  February 6, 12:25 PM
 • अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून, शेतकऱ्यांचे दु:ख दूर सारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज योजनेत शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपये दिले. परंतु केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर, तसेच शेतकऱ्यांच्या आयुष्यात मेरे देशकी धरती सोना उगले वाली परिस्थिती आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असा निर्धार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण...
  February 6, 10:51 AM
 • नागपूर. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजप आणि शिवसेना युतीने पूर्व विदर्भात अभूतपूर्व विजयाचा षटकार ठोकला. नागपूर विभागात सहा लाेकसभा मतदारसंघ येतात. त्यात नागपूर, रामटेक, भंडारा- गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली- चिमूर व वर्धा या मतदारसंघांचा समावेश अाहे. या सहापैकी पाच मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपचे कमळ फुलले तर रामटेकमध्ये शिवसेनेने विजयाचा झेंडा रोवला. केंद्रात दाेन मंत्रिपदे व राज्याच्या मुख्यमंत्रिपदासह इतर महत्त्वाची पदे विदर्भाकडे असल्यामुळे या भागाला...
  February 6, 08:35 AM
 • दिग्रस - माजी क्रीडा राज्यमंत्री व भाजप नेते संजय देशमुख यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. संबंधित विभागाचे व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी अशा जवळपास वीस जणांचा यामध्ये समावेश आहे. हा छापा नेमका कोणत्या प्रकरणात किंवा कशासाठी टाकण्यात आला आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. जोपर्यंत पथकाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. पण या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय देशमुख हे काँग्रेस सरकारमध्ये असताना...
  February 5, 04:22 PM
 • अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चाकोरा गावातील एका २७ वर्षीय विवाहितेने रविवारी (दि. ३) सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सासू व ननंदेच्या त्रासामुळेच बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप करून भावाने दिलेल्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्योती मंगेश साखरकर (२७) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. ज्योती यांचा पाच वर्षांपूर्वी मंगेश साखरकर यांच्यासोबत विवाह झाला होता.दरम्यान, या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. रविवारी सायंकाळी घरातच ज्योती...
  February 5, 12:08 PM
 • अमरावती - गाडगेनगर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय मोबाइल चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत चोरीचे बारा मोबाइल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व मोबाइल त्याने सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास घरात जाऊन चोरी केले आहे. यावेळी बहुतांश घरातील व्यक्तींना ऑफीस किंवा कामावर जाण्याची घाई राहते. याच संधीचा फायदा हा चोरटा उचलतो आणि घरात जाऊन मोबाइल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वैभव नारायण आडोळे (१९, रा. येरला, मोर्शी) असे पोलिसांनी अटक केलेल्या...
  February 5, 12:06 PM
 • अकोला - चिमणी पाखरं या चित्रपटातील कथानकात चिमुकल्यांच्या वडिलांचे अपघातात निधन होते, नंतर आईला कॅन्सर होतो. तिचे मरण तिला दिसत असते. मात्र आपल्या पाखरांचे भविष्यासाठी तिचे डोळे द्रवत असतात. जिवंतपणी पोटच्या पाखरांना दत्तक देण्याचा तो प्रसंग रडवल्याशिवाय ठेवत नाही. मात्र त्या कथानकात लेकरांसाठीचा मायेचा ओलावा, जिव्हाळा कासावीस करून जाताे. पण अकोल्यातील घटना हृदय हेलावून टाकणारी व चिड आणणारी आहे. येथे तर आई-बापही जिवंत असताना पैशाच्या मोहापायी बाप व आजी दोन्ही मुली विकायला निघालेत....
  February 5, 11:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात