जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर - सलूनचालकाने न विचारताच मिशा भादरल्याचे नागपूर जिल्ह्यातील प्रकरण शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट हे प्रकरण चिघळते आहे. या प्रकरणात ग्राहकाच्या तक्रारीवरून सलूनचालकावर गुन्हा दाखल झाल्याने संतापलेल्या नाभिक संघटनेने या वादात उडी घेत तक्रारकर्ता ग्राहक किरण ठाकूर याच्यावर बहिष्कार घालण्याचा, त्याच्या दाढी-मिशा न भादरण्याचा निर्णय जाहीर घेतला आहे. नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान येथे मागील आठवड्यात ही घटना घडली होती. दाढी करण्यासाठी कन्हान येथील फ्रेंड्स जेन्ट्स...
  July 22, 10:53 AM
 • नागपूर -आम्हाला आमचे आई-वडील अत्यंत प्रिय आहेत. त्यांना तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा हे विष देऊन आमच्यापासून हिरावू नका. कृपया हे विषारी पदार्थ विकणे बंद करा.. या आशयाचे पत्र घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील चिमुकली मुले शाळा सुटल्यावर पानठेल्यावर जातात.. पत्रासोबत एक गुलाबाचे फूल देऊन तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आवाहन ते करतात. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा मुक्तिपथ हा उपक्रम राबवला जात आहे. यात आता व्यसनमुक्तीसाठी शाळकरी मुलांची मदत...
  July 22, 08:58 AM
 • परतवाडा - शहरात विवेक अग्रवाल यांच्या घरावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच सातत्याने हाेणाऱ्या चोऱ्यांनी कळस गाठला आहे. दरम्यान गुरुवार, १८ जुलै राेजी येथील गुजरी बाजारात फोडलेल्या पाच दुकानांच्या घटनेतील एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त कैद झाला असून, चोरट्यांनी कारचा वापर केल्याचे समोर आले. एकाच रात्री झालेल्या पाच चोऱ्यांमुळे शहरातील पोलिसांच्या कार्य तत्परतेवर शहरवासीयांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी आपली सलामी...
  July 20, 11:01 AM
 • नागपूर -उपराजधानीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या ट्रीपल आयटीमधील (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी) वैदर्भीय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सिंचन यंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगशीलतेची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९मध्ये (हार्डवेअर एडिशन) नागपुरातील ट्रीपल आयटीच्या चमूने देशात अव्वल क्रमांक पटकावला, अशी माहिती द टेरिफाईंग नाईटमेयर्स ग्रुपचा लीडर सौरव गजभिये याने दिली. या सिंचन...
  July 19, 10:16 AM
 • वाशिम- आईने आपल्या दोन पोटच्या गोळ्यांसह स्वतःही आत्महत्या केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील तोंडगावात घडली. घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसलाय. जयश्री गजानन गवारे(28) असे महिलेचे नाव आहे तर गणेश गजानन गवारे(05) आणि मोहित गजानन गवारे(03) अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दरम्यान आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण कौटुंबीक वादातून ही आत्महत्या झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगावातील रहिवासी असलेल्या जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी येथील...
  July 18, 08:37 PM
 • नागपूर -न्हाव्याने न विचारता मिशा कापल्या म्हणून ग्राहकाने त्याच्याविरुद्ध चक्क गुन्हाच दाखल केल्याची घटना समोर आली आहे. नागपूर ग्रामीणमधील कन्हान येथे मंगळवारी ही घटना घडली. मिशीवरून कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर यांनी फ्रेंड्स जेंट्स पार्लरचे चालक सुनील लक्षणे यांच्यातील हा वाद झाला. मात्र, सुनीलने आपल्याला धमकी दिल्याने म्हणत ठाकूर यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, ग्रामीण पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. काय घडले : किरण ठाकूर हे फ्रेंड्स जेंट्स...
  July 18, 10:56 AM
 • नागपूर -देशातील वाढती लोकसंख्या ही एकप्रकारे राष्ट्रीय आणीबाणीच आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे असून यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत केली. डॉ. महात्मे म्हणाले, लोकसंख्येचा विचार करताना दोन प्रकारच्या विचारधारा देशात आहेत. त्यात देशाजवळ सर्वात मोठे मनुष्यबळ असणे देशाच्या फायद्याचे असल्याचे सांगणारा एक विचार आहे, तर वाढती लोकसंख्या देशासाठी नुकसानकारक असल्याचे मानणाराही...
  July 18, 09:22 AM
 • बुलडाणा - बुलडाणा शहरातील गवळीपुरा भागात सोमवारी ३ बालकांच्या अपहरणाच्या चर्चेने खळबळ उडाली होती. सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. मात्र, ही तिन्ही बालके त्याच भागातील एका बंद कारमध्ये १२ तासांनंतर आढळून आली. परंतु, त्यापैकी दोन बालके मृतावस्थेत तर एक बालिका बेशुद्धावस्थेत होती. बालिकेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बालकांचा मृत्यू गुदमरून झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी बुलडाणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे....
  July 17, 10:11 AM
 • चंद्रपूर - येथील शेणगावच्या एका शेतात महिला आणि पुरुषाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. प्राथमिक तपासातूनच या दोघांनी आत्महत्या केल्याचा खुलासा झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. विशेष म्हणजे, आत्महत्या करणारी महिला आधीच विवाहित होती. तसचे तिला 6 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. तर आत्महत्या करणारा पुरुष त्या महिलेचा प्रियकर होता. गळ्यातील मंगळसूत्र आणि घटनास्थळी लावलेल्या बाइकने या दोघांची ओळख पटली. शेणगाव येथील शेतात एका...
  July 15, 03:44 PM
 • नागपूर - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या विरोधात महाआघाडी उभारण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असताना महाआघाडीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत वंचित बहुजन आघाडीने विदर्भात उमेदवारांचा शोध सुरूही केला आहे. रविवारी नागपुरात वंचित आघाडीच्या वतीने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवण्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न असून रविवारी आघाडीच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक...
  July 14, 12:02 PM
 • नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवण्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही योगदान नसल्याने त्यावर आधारित धडा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्ते जनार्दन मून यांनी याचिकेत केली आहे. विशेष म्हणजे मून...
  July 14, 09:14 AM
 • नागपूर - नागपूर जिल्ह्यात कन्हान येथील वेकोली कोळसा खाण परिसरातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे जमीन खचून ढिगाऱ्यावर बसलेले हे तीन मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कन्हैया रामकेवल हरीजन (वय २५), गंगाप्रसाद गल्हर (वय ४५) व शिवकुमार मनीहारी (वय ३५) ही मृतकांची नावे आहेत. हे तिघेही अवैध कोळसा उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांकडे मजूर म्हणून काम करीत होते, असे सांगण्यात येते. कन्हान भागात कोळसा खाणी आहेत. अनेक अनेक कोळसा खाणी अवैध...
  July 12, 05:20 PM
 • नागपूर - येथील राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवकाचा समावेश केला आहे. बॅचलर ऑफ आर्ट्सच्या द्वितीय वर्षात या विषयाचा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये राष्ट्रनिर्मितीसाठी आरएसएसने कसे योगदान दिले याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम इतिहास विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आला आहे. बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या टर्मच्या परीक्षेत यासंदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत. इतिहासातील नवीन प्रवाह म्हणून याचा उल्लेख करण्यात...
  July 9, 07:39 PM
 • गोंदिया - येथील गोंदिया तालुक्यात असलेल्या इर्री जिल्हा परिषद शाळेत दिवसा-ढवळ्या मुख्याध्यापिकेचा खून करण्यात आला आहे. हल्लेखोर त्या महिलेचा पती असून शाळा सुरू असतानाच त्याने हा हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. यातील आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. हा खून विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे, शाळा आणि गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. इर्री गावातील जिल्हा परिषदेची शाळा मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणेच भरली होती. त्याचवेळी अचानक एक हल्लेखोर...
  July 2, 04:01 PM
 • नागपूर -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेसुद्धा ट्विटरवर आले आहेत. भागवतांसह संघाच्या बड्या नेत्यांनीही संवादासाठी ट्विटरवर पदार्पण केले आहे. संवादासाठी आजवर फारशी उत्सुकता न दाखवणाऱ्या संघानेत्यांचे सोशल मीडियावर पदार्पण चर्चेचा विषय ठरत असून संघाच्या भूमिकेतील बदलाच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात आहे. सोशल मीडियावर संघ सक्रिय असला तरी संघाचे सरसंघचालक कधीच सोशल मीडियावर आलेले नव्हते. मात्र, भागवत यांच्यासह...
  July 2, 10:10 AM
 • नागपूर -संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झालेला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन बांधकामाधीन पूल तसेच रस्ते वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसानंतर बहुतांश वेळा धरणे ओसंडून वाहतात. अशा वेळी धरणातील पाणी सोडावे लागते. या सर्व गोष्टीची तत्काळ माहिती देता यावी यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने खोरेनिहाय व्हाॅट्सअॅप ग्रुप करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील पूर नियंत्रण कक्षाद्वारे हे ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग, झालेला पाऊस, पूर्ण...
  July 2, 10:04 AM
 • नागपूर -गळफास कसा घेतला जातो याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पाहून त्याचे घरात अनुकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय बालिकेला प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी नागपुरात उघडकीस आली. उत्तर प्रदेशातून नागपुरात स्थायिक झालेले राठोड कुटुंबीय केसापुरी परिसरात राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने विनोद राठोड शनिवारी बाहेर गेले होते. त्यांचा मोबाइल मुलगी शिखाजवळ होता. यूट्यूबवर ती सातत्याने दोन मुलींनी कसा गळफास घेतला ते पाहत होती. ती क्लिप तिने आपल्या आईलाही दाखवली होती. दरम्यान, आई व...
  July 1, 07:30 AM
 • खामगाव - गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहिरीजवळील माती खचल्याने चार विद्यार्थी दाबले गेले. मात्र, वेळीच गावकऱ्यांनी धाव घेतल्याने तिघांना बाहेर काढण्यात यश आले, तर एका विद्यार्थ्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी खामगाव तालुक्यातील पोरज येथे घडली. यशवंत प्रमोद हेरोडे(१२) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी दिवसभर नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने ही मोहीम अखेर यशस्वी झाली....
  June 30, 09:34 AM
 • अकोला - पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात शेतात पेरणी करताना वीज कोसळून चार शेतकऱ्यांसह पाच जण ठार झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील वरवट खंडेराव (ता. संग्रामपूर) येथील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. शनिवारी वरवट खंडेराव येथे श्रीकृष्ण कांशीराम ढभाळ (६९) शेतात पेरणी करत असताना वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, जस्तगाव येथील युवराज विश्वास गव्हांदे (वय ३५)...
  June 30, 08:59 AM
 • नागपूर- नागपूर विद्यापीठातून अजब प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील 3 प्राध्यपकांनी 2 दिवसांत 1.5 लाख रुपयांच्या चहा-नाश्ता केला. विद्यापीठीत बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीदरम्यान हे चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. बिलानुसार, दोन दिवसांत प्राध्यपकांनी नाश्त्याशिवाय 99 कप चहा आणि 25 कप कॉफी पिली. बैठकीचे हे बिल पास करण्यासाठी विद्यापीठाच्या अकाउंट विभागाकडे पाठवण्यात आले. विभागाने रक्कम पाहून बिल पास करण्यास नकार दिला. त्यानंतर बिलालाल व्हॉइस चांसलरकडे पाठवण्यात आले. त्यांनी बिल पाहून...
  June 28, 06:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात