जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर- भाजपचा खासदार होऊन राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या अभिनेता सनी देओल याने बुधवारी नागपुरातील वास्तव्यात संघाच्या रेशीमबाग येथील स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली आणि संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार व गोळवलकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी त्यांच्या समवेत होते. यावेळी सनी देओल यांनी संघाच्या कामांची माहिती घेतली. सनी देओलचे मंगळवारी नागपुरात आगमन झाले. रात्री डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर ते थेट नितीन गडकरी निवासस्थानी...
  August 14, 06:17 PM
 • नागपूर -नागपुरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे मंगळवारी सकाळी विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. या विमानातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीला जातहोते. गडकरींसहसर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार इंडिगोच्या 6 ई 636 विमानात गंभीर बिघाड असल्याचे निदर्शनास आल्यावर वैमानिकाने ते रनवेवरून पुन्हा टॉक्सिवे वर आणले. या विमानात 100 पेक्षा अधिक प्रवासी होते.
  August 13, 12:31 PM
 • नागपूर - गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाचासकाळी संशायस्पदमृत्यू झाल्याची घटना घडली.संजीव रामय्या सेट्टीवार (वय३०वर्षे) असे या शिपायाचे नाव आहे. तो नरहसिंहपल्ली येथील रहिवासी होता. संजीव दोन वर्षांपासून सिरोंचा पोलिस ठाण्यात क्वीक रिस्पॉन्स पथकात कार्यरत होते. ते आपल्या कुटूंबासह सिआरपीएफ कँम्प परिसरात रहात होते. सकाळी घरातून गोळी झाडण्याचा आवाज आला.गंभीर जखमी अवस्थेत सिरोंचा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना वरंगल येथील खासगी...
  August 13, 11:38 AM
 • हेमलकसा (गडचिरोली) -ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील वन्यप्राणी अनाथालय (रेस्क्यू सेंटर) नव्या आणि सुरक्षित जागेत स्थानांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचा सविस्तर अाराखडा दीड वर्षापूर्वी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला (सेंट्रल झू अॅथॉरिटी) सादर होऊनही त्यावर कुठलाच निर्णय होत नसल्याने हा प्रकल्पच रखडला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गसंपन्न अशा भामरागडजवळ हेमलकसा येथे...
  August 13, 09:02 AM
 • नागपूर -येथील तयार कपड्यांच्या दुकानातील चेंजिंग रूममध्ये मोबाइल फोनद्वारे व्हिडिओ चित्रीकरण होत असल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. शालेय विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानमालक आणि नोकराला अटक केली आहे. दोन विद्यार्थिनी गणवेश खरेदी करण्यासाठी फ्रेंड्स कापड शोरूममध्ये गेल्या होत्या. गणवेश घालून पाहण्यासाठी मुलींना दुसऱ्या माळ्यावरील चेंजिंग रूममध्ये पाठवले गेले. मुलींना रूममध्ये लपवून ठेवलेला मोबाइल हँडसेट आढळून आला. हँडसेटची तपासणी केल्यावर त्यात व्हिडिओ...
  August 13, 07:45 AM
 • भामरागड (गडचिरोली) -पुराच्या थैमानाने अख्खे भामरागड दीड आठवडा ठप्प होते. संपूर्ण तालुक्याचे गाव पाण्याखाली आल्याने शेकडो नागरिकांनी मिळेल त्या सामानासह गावातील उंच ठिकाणांवर आश्रय घेतला. काहींना शेजारच्या लोकबिरादरी प्रकल्पात आश्रय घ्यावा लागला. किरकोळ कामासाठी घराबाहेर पडलेले अनेक जण ३-४ दिवसांनंतरच घरी परतले. तालुक्याला बाहेरच्या जगाशी जोडणाऱ्या पर्लकोटा पुलावरील पाणी अोसरले आणि दीड आठवड्यापासून पुराचा सामना करत असलेल्या भामरागड तालुक्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. सरकारी...
  August 12, 08:46 AM
 • गडचिरोली - तरुणांनो कष्ट करा अन् स्वतःचे पोट भरा नक्षलवादाच्या नादाला लागून आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका असे भावनिक आवाहान चकमकीत ठार झालेल्या मुलीचे वडील महारु नरोटे यांनी केले आहे. 20 जुलै 2019 रोजी पोलिस आणि नक्षल यांच्या चकमकीत रुपी नरोटे ही महिला ठार झाली होती. महारु पुढे बोलतांना म्हणाले की, रुपीला बालवयातच नक्षलवादी आपल्या सोबत बळजबरीने घेवून गेले. तिला नेताना नक्षलवाद्यांनी ना आम्हाला विचारले ना त्या विषयी काही माहिती दिली. आम्ही तिचे नाव रुपी ठेवले होते. नक्षलवद्यांनी रुपीला...
  August 9, 09:21 PM
 • चंद्रपूर- सध्या महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, यामुळे नदीवर असलेले अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशानाने अशा अनेक धोकादायक पुलावरुन न जाण्यास सांगितले आहे. चंद्रपूरातही मुसळधार पावसाने नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडलीये. चंद्रपुरमधील इरई नदीत एक तरुण कारसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज बिपटे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. सुरज बिपडे हा भटाळी येथील कोळसा खाणीत काम करत होता. आज(मंगळवार) सकाळी...
  August 6, 05:35 PM
 • नागपूर- धावत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना नागपूरजवळ घडली. रामेश्वर-मंडूवाडीह एक्सप्रेसने प्रवास करत असलेल्या एका महिलेला धावत्या ट्रेनमध्ये आई होण्याचे सुख म्हणाले. आज(रविवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. पुनमदेवी विश्वकर्मा असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे नरखेड रेल्वे स्थानकावर थांबा नसतानाही एक्सप्रेस थांबवण्यात आली आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सध्या बाळ व आईची प्रकृती स्थिर आहे. पुनमदेवी विश्वकर्मा ही तिच्या सासऱ्यांचा मृत्यू...
  August 4, 03:19 PM
 • गोंदिया -राज्यव्यापी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रेचा रथ गोंदियामधील नेहरू चौकात सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनच्या आंदोलकांनी अडवला. आरक्षण हटवण्याची मागणी त्यांनी केली. अखेरीस पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर रथ पुढे गेला. आपण सर्व समाजासाठी काम करीत असून खुल्या वर्गातील गरीब विद्यार्थ्यांसाठी ६०५ अभ्यासक्रमांचे शुल्क भरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण वंचित, आरक्षित, खुल्या अशा सर्व...
  August 4, 08:07 AM
 • वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे महाजनादेश रॅलीला संबोधित केले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने विरोधकांच्या ईव्हीएम रॅलीचा खरपूस समाचार घेतला. सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात 21 तारखेला रॅली काढण्याचे जाहीर केले. या विरोधी पक्षांची अवस्था वर्ल्डकपच्या हारलेल्या टीमसारखी आहे. अशी टीम ज्याने वर्ल्डकपमध्ये अतिशय वाईट प्रदर्शन केले. शेवटच्या क्रमांकावर आल्यानंतर त्या टीमचा कर्णधार म्हणतो, की अम्पायर आमच्या बाजूचा नव्हता, नाही तर वर्ल्ड कप...
  August 2, 03:11 PM
 • नागपूर - येथे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाने आपल्या चालकाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. पैशांच्या हेरा-फेरी प्रकरणी मालकाने चालकाचे कपडे काढून त्याला दोरीने पंख्याला बांधत बेदम मारहाण केली. यात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी ट्रान्सपोर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे राजकीय पक्षासोबत आहेत संबंध प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सदरील घटना शनिवारी वाडी पोलिस ठाणे परिसरात घडली. याप्रकरणी रेणुका फायटर्स कॅरिअरचे...
  July 29, 03:50 PM
 • गोंदिया - येथील दवा गावात मजुरांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. मजुरांनी भरलेले हे ट्रॅक्टर नाल्यात कोसळल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 13 मजूर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मजुरांनी भरलेला हा ट्रॅक्टर दवा गावातील एका शेतात काम करण्यासाठी निघाला होता. त्याच दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नाल्यात जाऊन कोसळले. गोंदिया-साकोली महामार्गावरील डव्वा येथे रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही...
  July 28, 12:28 PM
 • नागपूर - निवडणुकांसाठी आम्हाला कोणतीही यात्रा काढायची गरज नाही. आम्ही लोकसभेच्या वेळेसच जमिनीची मशागत करून ठेवली आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रवी भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा काढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता ते बोलत होते. यात्रेशिवाय आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असे ते म्हणाले. आयडियालॉजीचे...
  July 27, 09:20 AM
 • नागपूर - जुलै महिना संपत आला तरी मराठवाडा व विदर्भात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. चक्क उन्हाळ्यासारखे कडक ऊन जाणवते आहे. अनेक भागात पाणीटंचाईचे संकट असून दुबार पेरणीमुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. पर्यावरणाचा सीएनपी रेशो नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच ही परिस्थिती आेढवल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आता प्रदेशनिहाय एन्व्हायर्नमेंटल हेल्थ कार्ड तयार करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे, अशी माहिती राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचे (नीरी) मुख्य अभियंता तसेच क्लायमेट...
  July 26, 07:28 AM
 • नागपूर - सलूनचालकाने न विचारताच मिशा भादरल्याचे नागपूर जिल्ह्यातील प्रकरण शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट हे प्रकरण चिघळते आहे. या प्रकरणात ग्राहकाच्या तक्रारीवरून सलूनचालकावर गुन्हा दाखल झाल्याने संतापलेल्या नाभिक संघटनेने या वादात उडी घेत तक्रारकर्ता ग्राहक किरण ठाकूर याच्यावर बहिष्कार घालण्याचा, त्याच्या दाढी-मिशा न भादरण्याचा निर्णय जाहीर घेतला आहे. नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान येथे मागील आठवड्यात ही घटना घडली होती. दाढी करण्यासाठी कन्हान येथील फ्रेंड्स जेन्ट्स...
  July 22, 10:53 AM
 • नागपूर -आम्हाला आमचे आई-वडील अत्यंत प्रिय आहेत. त्यांना तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा हे विष देऊन आमच्यापासून हिरावू नका. कृपया हे विषारी पदार्थ विकणे बंद करा.. या आशयाचे पत्र घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील चिमुकली मुले शाळा सुटल्यावर पानठेल्यावर जातात.. पत्रासोबत एक गुलाबाचे फूल देऊन तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आवाहन ते करतात. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा मुक्तिपथ हा उपक्रम राबवला जात आहे. यात आता व्यसनमुक्तीसाठी शाळकरी मुलांची मदत...
  July 22, 08:58 AM
 • परतवाडा - शहरात विवेक अग्रवाल यांच्या घरावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच सातत्याने हाेणाऱ्या चोऱ्यांनी कळस गाठला आहे. दरम्यान गुरुवार, १८ जुलै राेजी येथील गुजरी बाजारात फोडलेल्या पाच दुकानांच्या घटनेतील एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त कैद झाला असून, चोरट्यांनी कारचा वापर केल्याचे समोर आले. एकाच रात्री झालेल्या पाच चोऱ्यांमुळे शहरातील पोलिसांच्या कार्य तत्परतेवर शहरवासीयांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी आपली सलामी...
  July 20, 11:01 AM
 • नागपूर -उपराजधानीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या ट्रीपल आयटीमधील (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी) वैदर्भीय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सिंचन यंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगशीलतेची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९मध्ये (हार्डवेअर एडिशन) नागपुरातील ट्रीपल आयटीच्या चमूने देशात अव्वल क्रमांक पटकावला, अशी माहिती द टेरिफाईंग नाईटमेयर्स ग्रुपचा लीडर सौरव गजभिये याने दिली. या सिंचन...
  July 19, 10:16 AM
 • वाशिम- आईने आपल्या दोन पोटच्या गोळ्यांसह स्वतःही आत्महत्या केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील तोंडगावात घडली. घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसलाय. जयश्री गजानन गवारे(28) असे महिलेचे नाव आहे तर गणेश गजानन गवारे(05) आणि मोहित गजानन गवारे(03) अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दरम्यान आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण कौटुंबीक वादातून ही आत्महत्या झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगावातील रहिवासी असलेल्या जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी येथील...
  July 18, 08:37 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात