Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर - येथे झालेल्या उत्तर भारतीयांच्या अधिवेशनात संजय निरुपम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राला उत्तर भारतीय समाज चालवत असतो. आम्ही ठरवले तर मुंबई बंद पाडू शकतो, आम्हाला तसे करायला भाग पाडू नका असे निरुपम म्हणाले. काय म्हणाले संजय निरुपम.. संजय निरुपम नागपुरात बोलताना म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्राला आणि मुंबईला चालवणारे उत्तर भारतीय समाजाचे लोक आहेत. सकाळी पेपर, दूध पोहोचवण्यापासून ते भाजी विकणे स्वच्छता करणे अशी मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सर्व...
  October 7, 10:36 PM
 • नागपूर - काँग्रेसमध्ये दाखल होण्यासाठी आपण कुठलीही पूर्वअट ठेवलेली नसून आपल्याला राष्ट्रीय राजकारणातच जायचे असल्याने विधानसभा निवडणूक लढणार नाही, तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचा राजीनामा देणारे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या काँग्रेस प्रवेशाची अौपचारिकता नवरात्रात पूर्ण करणार असल्याचे संकेत देताना देशमुख यांनी काँग्रेस प्रवेशासाठी कुठलीही पूर्वअट ठेवणार नसल्याचे सांगितले. आपल्याला राज्याच्या राजकारणात रस नसून राष्ट्रीय...
  October 7, 12:13 PM
 • नागपूर- इंटरनेटवरील खासगी वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या अनसेन्सॉर्ड वेब सिरीजमधील भाषा, अश्लील, हिंसक व भडक दृश्यांवर पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश नोटीसीद्वारे नागपुर खंडपीठाने केंद्रीय माहिती व प्रसारण, विधी तसेच गृह मंत्रालयाला दिले आहेत. यासंदर्भात अॅड. दिव्या गोंटिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वेब सिरीजमधील विषय राजकीय, शारीरिक संबंध, गुन्हेगारी विश्व तसेच संवेदनशील विषयांशीच निगडित असतात. टीव्ही, वृत्तपत्रांतील...
  October 6, 07:28 AM
 • नागपूर- शहरीकरणाचा वेग वाढला असला तरी आजही प्रामुख्याने शेती हाच उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. अलीकडे शेतीकडे वळण्यास शेतकऱ्यांची मुलेही धजावत नाहीत, हे लक्षात घेता मुलांना शालेय जीवनापासूनच शेतीचे शिक्षण देण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कृषी विभागाला या अभ्यासक्रमाचे माॅडेल तयार करून देण्यासाठी सहकार्य मागितले आहे. यासंदर्भात राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. पूर्वी राज्यातील शाळांमध्ये मुलांना शेतीचे...
  October 5, 08:47 AM
 • नागपूर- गांधी जयंती आणि वर्धेतील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून आमदारकीचा राजीनामा देणारे भाजपचे आमदार आशिष देेशमुख यांना पाच वर्ष हात देण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत शहर काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला. देशमुख यांनी 2 ऑक्टोबरला ई-मेल व फॅक्सने राजीनामा मुंबईला पाठविला. बुधवार 3 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन राजीनामा सादर...
  October 4, 07:46 PM
 • नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चाचपणी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे १७ ऑक्टोबर नंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यात नागपूर सह काही जिल्ह्यामध्ये बैठका घेणार आहेत. किमान तीन दिवसांचा हा दौरा राहणार आहे. मनसे काही मतदार संघात उमेदवार देऊ शकेल काय? याचीही चाचपणी या निमित्ताने करणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसेला स्थान द्यायचे की नाही, यावर सध्या आघाडीत चर्चा सुरू आहे....
  October 4, 11:50 AM
 • यवतमाळ- नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेला हत्ती बिथरल्याने त्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात चहांदा येथे बुधवारी सकाळी घडली. या घटनेत आणखी एक वृद्ध व्यक्तीही जखमी झाला. अर्चना कुलसंगे (रा. चहांदा) असे मृताचे नाव आहे, तर नामदेव सवई ( रा. पोहणा, जि. वर्धा ) यात जखमी झाले. पांढरकवडा वन विभागाच्या परिसरात नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वन विभागाने सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला आहे. वाघिणीला पकडण्यासाठी त्यांनी ५ हत्तींना पाचारण...
  October 4, 06:59 AM
 • नंदुरबार - पाण्यावरून चौपाळा येथील ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात काल (मंगळवारी) चांगलीच धुमश्चक्री उडाली. ग्रामस्थांनी चौपाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली विहिर बुजवण्याचे आदेश नर्मदा पाटबंधारे विकास विभागाने दिल्याने गावकरी संतप्त झाले होते. त्यामुळे गावक-यांनी येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयात घुसून तोडफोड व जाळपोळ केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आज (बुधवारी) शासकीय कामात अडथळा आणणे, शायकीय मालमत्तेचे नुकसान करणे यांसह विविध कलमाखाली तब्बल 200...
  October 3, 03:28 PM
 • अमरावती- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेद्वारे (एमएए) येत्या १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विश्वातील पहिला धनुर्विद्या कार्निव्हल नागपूर महापौर चषक नावाने आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी एकाच वेळी एक प्रकार व वयोगटातील धनुर्धर १५० लक्ष्यांवर तीर चालवणार आहेत. हेच या स्पर्धेचे सर्वात माेठे अाकर्षण ठरणार असल्याचे दिसते. देशात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत धनुर्धर लक्ष्यभेद करण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे. या स्पर्धेत १७, १४ आणि ९ वर्षांखालील गटातील...
  October 3, 09:00 AM
 • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त मंगळवारी वर्धा येथील सेवाग्राममध्ये जगातील सर्वात माेठ्या चरख्याच्या शिल्पाचे अनावरण राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. येथील कम्युनिटी सभागृहाच्या दर्शनी भागासमाेर ३१ फूट लांब, १८.६ फूट उंच व तब्बल ५ टन वजनाचा हा चरखा उभारण्यात अाला अाहे. एमएसमध्ये तयार केलेला हा चरखा माेटारीने फिरत राहील, मात्र यातून सूतकताई हाेणार नाही. - या चरख्याला १६ पाती आहेत. प्रत्येक पात्यावर...
  October 3, 08:30 AM
 • वर्धा- देशात महात्मा गांधी यांच्या विचाराचे नव्हे तर गोडसेच्या विचाराचेे सरकार सत्तेवर असून या सरकारचे धोरण द्वेषाचे आणि हिंसाचाराचे आहे. त्यामुळे यापूर्वी गांधी विचाराच्या आधारे देशाने ज्याप्रमाणे ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त केला, त्याचप्रमाणे आता नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्वातंत्र्याचा दुसरा लढा दिला जाईल, असे आवाहन काँग्रेसच्या कार्यसमितीने मंगळवारी सेवाग्रामच्या गांधीभूमीतून कार्यकर्त्यांना आणि जनतेला केले आहे. वर्धा येथील सेवाग्रामच्या महादेव भवनात मंगळवारी...
  October 3, 08:21 AM
 • नागपूर- खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ विदर्भातील काटाेलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी वर्ध्यातील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. देशमुख यांनी ई-मेल व फॅक्सने राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. बुधवारी ते प्रत्यक्ष भेटून सादर करणार अाहेत. दरम्यान, राजीनामा देताच देशमुख यांनी थेट वर्धा गाठून राहुल गांधी यांच्यासमवेत काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावत अागामी राजकीय प्रवासाचे संकेतही दिले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष...
  October 3, 07:51 AM
 • नंदुरबार - पिण्याच्या पाण्यावरून ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये चौपाळे येथे चांगलीच धुमश्चक्री उडाली. जमावाला रोखण्याची पोलिसांना अश्रूधुराच्या 4 नळकोंड्या फोड्व्या लागल्या. यामुळे महिलांसह काही ग्रामस्थ जखमीही झाले. सध्या गावातील परिस्थिती तणावपुर्ण आहे. काय आहे प्रकरण चौपाळे ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत परिसरात एक विहिर बांधली आहे. मात्र नर्मदा पाटबंधारे विकास विभागाने ती विहिर बुजवण्याची नोटीस दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विहिर...
  October 2, 06:22 PM
 • नागपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रफाल खरेदीवरून हल्लाबोल केला आहे. अनिल अंबानी हे नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहे. त्यामुळेच तर मोदींनी 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या घशात घातले. कुठलाही अनुभव नसलाना रफालचा कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला का? असा सवाल राहुल यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी वर्धा येथीलसंकल्प सभेत संबोधित करताना म्हणाले, मोदी देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मोदींनी लाल किल्ल्यावरून...
  October 2, 04:42 PM
 • नागपूर - शहरातील गणेशपेठ परिसरात शनिवारी रात्री (30 सप्टेंबर) एक तरूणी आपल्या बाईकवरून घरी परतत होती. याचदरम्यान कारमध्ये तिचा पाठलाग करणा-या तिच्या माजी प्रियकराच्या भावांनी धावत्या गाडीतूनच तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी बाईकला जोरदार धडक दिली. यामुळे तरूणीचा जागीच मृत्यू झाला असून ही पुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मयूरी तरूण हिंगणेकर (22), असे मृत तरूणीचे नाव आहे. या घटनेत तिचा मित्र अक्षय किशोर नगरधने (22) गंभीररीत्या जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत...
  October 2, 03:35 PM
 • अमरावती - शहरात मागील काही दिवसांपासून खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुकान व घरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दरम्यान, या चोरीच्या घटनांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला होता. या चोरीप्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. ३०) चौघांना पकडले आहे. त्यापैकी एक अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी उर्वरित तिघांना अटक केली अाहे. या त्रिकुटाकडून पोलिसांनी सात गुन्हे उघड केले आहे. अमोल सुधाकर सोनोने (३४) भूषण बाबाराव नितनवरे (२३ दोघेही रा. खोलापूरी गेट, अमरावती) आणि...
  October 2, 12:17 PM
 • नागपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदयात्रा काढून स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती केली. यावेळी नागपूर जिल्ह्यातील सहा आमदार मुख्यमंत्र्यांबरोबर या पदयात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, जगाला अहिंसा आणि सत्याची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधल्या पोरबंदरमध्ये झाला. वकीलीचे शिक्षण घेतलेल्या...
  October 2, 11:40 AM
 • नागपूर -महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीदिनी मंगळवारी काँग्रेस वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममधून 2019 च्या निवडणुकीच्या संग्रामाचा बिगुल फुंकणार आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत सेवा ग्राम येथील महादेव भवनात होणाऱ्या कार्य समितीच्या बैठकीत काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर मंथन करणार आहे. कार्य समितीतील नेते मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपुरात दाखल होणार आहेत. तेथून लागलीच ते वर्ध्याकडे रवाना...
  October 2, 08:37 AM
 • नागपूर- महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीदिनी उद्या (मंगळवार) काँग्रेस वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून 2019 च्या निवडणुकीच्या संग्रामाचा बिगुल फुंकणार आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथील महादेव भवनात होणाऱ्या कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर मंथन करणार असून भाजपा चले जाव चा नारा देणार आहे. दीडशेव्या जयंतीदिनाच्या निमित्ताने सेवाग्राम येथे...
  October 1, 05:57 PM
 • नागपूर- एकतर्फी प्रेमाच्या प्रकरणातून युवकाने युवतीच्या अंगावर कार नेऊन तिला ठार मारल्याची घटना नागपुरात शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. पोलिसांनी अनिकेत साळवे नामक आरोपीस अटक केली. त्याचे तीन साथीदार फरार आहेत. अनिकेतचे त्याच्या घराजवळील मयूरी हिंगणेकर या तरुणीशी एकतर्फी प्रेमसंबंध होते. तो सारखा तिच्या मागे लागला होता. मयूरी सातत्याने त्याला नकार देत होती. त्यामुळे संतापलेल्या अनिकेतने तिचा काटा काढण्याचे ठरवले. शनिवारी मयूरी तिचा मित्र अक्षय नगरधनेच्या दुचाकीवर बसून बाहेर...
  October 1, 08:28 AM
 
जाहिरात

RECOMMENDED