Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अकोला - प्रशासकीय उदासीनता व राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या अधिका-यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे राज्यात एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेले 38 विशेष रुग्णालये शेवटच्या घटका मोजत असून कोणत्याही क्षणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हजारो एचआयव्ही बाधित रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. राज्य व केंद्र सरकारने तातडीने या रुग्णालयाला संजीवनी देण्याची गरज आहे.महाराष्टात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्यात युवकांची संख्या लक्षणीय...
  July 24, 05:00 AM
 • अमरावती । राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये असलेले अल्प मनुष्यबळ पाहता क आणि ड गटातील पदांवर भरती प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी मुंबईत १ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. मंत्रालयात होणाया या बैठकीला सेवा विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सर्वांत कमी मनुष्यबळ असणा-या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला किमान शंभर कर्मचायांची गरज आहे. अमरावती विद्यापीठासह मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, कोल्हापूरचे...
  July 24, 04:53 AM
 • नागपूर. येथील कुही तहसील कार्यालयाजवळील अकोली फाट्यावर प्रवासी जीप व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. प्रवाशांनी भरलेली जीप कुहीवरून नागपूरकडे जात होती. याच सुमारास नागपूरवरून कुहीकडे येत असलेल्या ट्रकची व जीपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जीपमधील ९ प्रवाशांचा मृत्यू झाला.
  July 23, 04:16 AM
 • नागपूर: येथून 45 किमी अंतरावर असलेल्या कुही गावाजवळ एका मॅक्सी कॅबवर कांद्याने भरलेला ट्रक उलटल्याने 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी घडली. कुही गावाजवळील वळण रस्त्यावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकच्या बाजूने जात असलेल्या एका मॅक्सी कॅबवर उलटला. कॅब मधील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे कळू शकली नाहीत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
  July 22, 05:30 PM
 • अमरावती: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसोबत आता तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही 'कॅरी ऑन' लागू केली जाणार आहे, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मोहन खेडकर यांनी दिली.अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रापर्यंत कॅरी ऑन लागू करण्याचा निर्णय या पूर्वीच विद्यापीठाने घेतला होता. मात्र चार वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील आठपैकी सातव्या सत्रापर्यंत कॅरी ऑन लागू व्हावा, या मागणीसाठी युवक कॉँग्रेसचे शहर...
  July 22, 12:23 PM
 • नागपूर : विकासाच्या मुद्द्यावर विदर्भ भलेही पिछाडीवर असेल, मात्र स्त्री जन्मदरात या विभागातील चार जिल्ह्यांनी आघाडी साध्य केली आहे. लोकसंख्येच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत स्त्री-पुरुष जन्मदरामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान प्राप्त केले आहे. दुसरीकडे मुलींच्या जन्मदरात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. राज्याचे जनगणना संचालक रणजितसिंह देओल यांनी सोमवारी ग्रामीण आणि शहरी विभागाची जिल्हानिहाय आकडेवारी...
  July 21, 12:50 AM
 • नागपूर - ग्रामीण भागात आता एका किलोमीटरला एक प्राथमिक शाळा सुरु होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना आता पायपीट करीत शाळेत जावे लागणार नाही. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा एक बृहत अराखडा तयार केला असून, पुढील वर्षी त्यानूसार शाळांना मंजूरी देण्यात येणार आहे. नागरीकांकडून सुचना मागविल्यासुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार शिक्षण विभागाने तयार केलेल्या बृहत अराखड्याला अजून अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही. यावर राज्यातील नागरीकांकडून सुचना...
  July 20, 05:56 PM
 • नागपूर. वाघांसाठी विदर्भ सर्वांत सुरक्षित स्थान असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेमध्ये विदर्भात १०६ वाघांची गणना झाली होती. मात्र, यावर्षी ती १६९ झाली आहे. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मध्य प्रदेशचा वाघ राज्याचा दर्जा महाराष्ट्राला लवकरच मिळेल, असे चित्र आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात २०१० मध्ये ३०० वाघ होते. २०११ मध्ये ही संख्या घटून २५७ झाली. १९९९ ते मार्च २०११ पर्यंत देशाच्या विविध अभयारण्यात जवळपास ४५० वाघांची शिकार...
  July 20, 02:53 AM
 • नागपूर. बौद्ध बांधवांचे तीर्थक्षेत्र म्हणून दीक्षाभूमीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामठी मार्गावरील नागलोक विहार परिसराला ब वर्गाचे पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आले. याबरोबर जिल्ह्यातील आरोग्य व सांस्कृतिक विषयांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कामठी तीर्थक्षेत्रानजीकच्या आठ महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी...
  July 20, 02:44 AM
 • गडचिरोली. पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री नवझेरी ग्रामपंचायतीचे सरपंच मोतीरा काटेंगे (वय ४२), सुधाकर कोरेटी (वय ४०) व पहाडसिंग कुमरे (वय ५२) यांची गळा चिरून हत्या केली. १३ जुलैच्या रात्री नक्षलवाद्यांनी या तिघांचे अपहरण केले होते. त्यानंतर रविवारी रात्री जांभळी-बेळगाव रस्त्यावर त्यांचे मृतदेह फेकून देण्यात आले. ही घटना बेळगाव पोलिस चौकीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडली असून सोमवारी दुपारपर्यंत मृतदेह रस्त्यावरच पडून होते.
  July 19, 04:26 AM
 • नागपूर. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांची चोरीला गेलेली पर्स शोधण्यात अखेर यश आले आहे. नागपूरच्या रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अमित तिवारी आणि त्यांच्या साथीदाराला सोमवारी मुद्देमालासह अटक केली. अटक करण्यात आलेले दोघेही मूळचे नगरचे रहिवासी आहेत. १० जुलैला सत्त्वशीला चव्हाण महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करत असताना त्यांची पर्स या दोघांनी चोरली होती. त्यात एक मोबाइल, चाळीस हजार रुपये आणि इतर काही मौल्यवान वस्तू होत्या. पोलिसांनी अत्याधुनिक...
  July 19, 04:23 AM
 • गडचिरोली - पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी सरपंचासह तिघांची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 13 जुलैच्या रात्री नक्षलवाद्यांनी तिघांचं अपहरण केलं होतं. त्यात दाबरी गावचे सरपंच मोतीराम कातेंगे, सुधाकर कातेंगे (४०) आणि पहाडसिंग कुमरे (५५) यांचा समावेश होता. नक्षलवाद्यांनी तिघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह गावाबाहेरील जंगलात टाकून दिले होते.
  July 18, 06:01 PM
 • अहेरी (गड़चिरोली) - अहेरी इस्टेटचे राजे सत्यवानराव महाराज यांचे 17 जुलै रोजी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. राजे सत्यवानराव महाराज यांचा जन्म 3 डिसेंबर 1951 साली झाला.त्यानंतर नागपूर विद्यापीठातून त्यांनी बी. एस्सी. अँग्रि. मधून पदवी प्राप्त केली. 27 मार्च 1997 रोजी त्यांचा राजतिलक करण्यात आला. वेगळय़ा विदर्भाचे ते कट्टर समर्थक होते. ते नाग विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष होते.
  July 18, 05:46 PM
 • नागपूर: रेल्वे गाड्या व स्थानकावरील वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने सायबर लॅब उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अनोख्या प्रयोगामुळे स्थानकावरून अश्लील एसएमएस पाठविणायांनाही पकडण्यात यश मिळेल, असा पोलिसांचा दावा आहे. रेल्वे पोलिसांतर्फे या लॅबसाठी १० लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर रेल्वे मुख्यालयातील संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये ही यंत्रणा तयार करण्यात येईल. तसेच लॅबमध्ये एक पोलिस निरीक्षक आणि...
  July 18, 02:55 AM
 • अमरावती: सततच्या नापिकीमुळे तसेच खासगी सावकार व सोसायट्यांच्या कर्जामुळे चिंताग्रस्त झालेल्या अचलपुरातील अब्बासपुरा येथील शेतकरी रमेश बाबाराव जुमळे (वय ५५) यांनी रविवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जुमळे यांची रासेगाव परिसरात अडीच एकर शेती आहे. त्यांनी बचतगटासह खासगी सावकाराकडून शेतीसाठी कर्ज घेतले होते. जुमळे यांनी यावर्षी दुबार पेरणी केली. मात्र अपेक्षित पाऊस नसल्याने ते चिंताग्रस्त होते. त्यातच त्यांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
  July 18, 02:43 AM
 • वर्धा: स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासन आणि सामाजिक स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. आयएमएच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. कडू आणि सचिव डॉ. जयेश लेले यांनी यासंदर्भात नुकतीच वर्ध्याला भेट दिली. आयएमए वर्धा शाखेच्या पदाधिकायांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरोधी मोहिमेची माहिती दिली. हा प्रकार टाळण्यासाठी जो व्यक्ती गर्भलिंग निदानाची माहिती देईल त्यास आयएमए २५ हजार रुपयांचे बक्षीस देणार आहे. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासन संघटनेने दिले आहे....
  July 17, 05:37 AM
 • नागपूर: गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका महिलेसह सहा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. बुचा मसा पुंगती (वय २३), मन्न बुचा पाडा (वय २२), मदी गंडा (वय ३०), मदी तुक्का पुगती (वय ३०) विनोद बुचा पाडा (वय ४०) आणि स्मिता कर्मू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी या नक्षलवाद्यांना पकडले. पीपली बुर्गी येथून पाच जणांना तर इटापल्ली येथून एका महिलेला ताब्यात घेतले असून या नक्षलवाद्यांकडे चार बंदूकही मिळाल्याची माहिती...
  July 17, 05:26 AM
 • नागपूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक इंद्रा रडारप्रणाली कार्यान्वित होत आहे. त्यामुळे हवामानाची अचूक माहिती व त्यातील बदल त्वरित समजणार असून त्याआधारे विमान उड्डाणाचे निर्णय घेणे सोपे जाणार आहे. ही प्रणाली कार्यान्वित होणारे हे देशातील पहिलेच विमानतळ ठरणार असून त्यावर २० कोटी रुपये खर्च आला आहे.नागपूर विमानतळाचे निदेशक व इंद्रा रडारप्रणालीचे प्रभारी अधिकारी अशोककुमार वर्मा यांनी दिव्य मराठीला सांगितले की, इंद्रा रडारप्रणाली देशातील ३८...
  July 16, 05:07 AM
 • अमरावती: मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर राज्यभर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री शहरातील इतवारा बाजार चौकात एक फियाट कार (एमएच २७-एच ४५००) बेवारस स्थितीत आढळल्याने पोलिसांची धावपळ उडाली. याबाबत परिसरातील व्यावसायिकांना विचारले असता, ही दुपारपासून ही कार उभी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक पथकाला या ठिकाणी पाचारण केले. कारची पाहणी केली असता त्यात दारूची बाटली सापडली. नगरसेवक शीतभाते यांची ही कार असल्याचे निष्पन्न झाले.
  July 16, 02:23 AM
 • भंडारा: अर्जुनी मानेगाव येथे जागेच्या वादावरून शेजा-याच्या मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. प्रकाश माधव ठमके (वय ७) असे मृताचे नाव आहे. माधव ठमके आणि चंदू शेंडे यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी चंदूने ठमके यांना धमकी दिली होती. मंगळवारी ठमके यांचा मुलगा प्रकाश शेजारीच नामकरण विधीच्या कार्यक्रमाला गेला असताना, चंदू याने त्याला गुटखा आणण्यास सांगितले. दरम्यान, चंदू हा देखील त्याच्या मागे गेला व त्याने प्रकाशचा दगडाने ठेचून खून केला. नदीकाठावर प्रकाशचा...
  July 15, 04:48 AM
 
जाहिरात

RECOMMENDED