Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • भंडारा: अर्जुनी मानेगाव येथे जागेच्या वादावरून शेजा-याच्या मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. प्रकाश माधव ठमके (वय ७) असे मृताचे नाव आहे. माधव ठमके आणि चंदू शेंडे यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी चंदूने ठमके यांना धमकी दिली होती. मंगळवारी ठमके यांचा मुलगा प्रकाश शेजारीच नामकरण विधीच्या कार्यक्रमाला गेला असताना, चंदू याने त्याला गुटखा आणण्यास सांगितले. दरम्यान, चंदू हा देखील त्याच्या मागे गेला व त्याने प्रकाशचा दगडाने ठेचून खून केला. नदीकाठावर प्रकाशचा...
  July 15, 04:48 AM
 • नागपूर - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मोहम्मदअली सराय परीसरामधील मुस्तफा बाबांचा मृतदेह तीन दिवसांत बाहेर काढून अधिकृत दफनभूमीत दफन करण्याचे आदेश मनपा व तहसील पोलीस स्टेशनला दिले आहेत. प्रतिवादींना या आदेशाविरुद्ध अपील करता यावे यासाठी न्यायालयाने आदेशाच्या अंमलबजावणीला आठवडाभराची स्थगिती दिली आहे.मंगळवारी हायकोर्टाने दिलेल्या ५० पानांच्या निकालपत्रात असे नमूद केले आहे की मनपा व तहसील पोलिसांनी तीन दिवसाच्या आत मुस्तफा बाबांचा मृतदेह योग्य तो आदर राखून बाहेर...
  July 13, 03:55 PM
 • नागपूर: विमानाने कोलकात्याहून नागपूरला येताना जखमी झालेल्या प्रवाशाने इंडिगो एअरलाइन्सला नोटीस पाठवून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. महेंद्र जैन हे ५ जुलैला कोलकात्याहून नागपूरला येत होते. हवेत विमानाने हेलकावे खाल्ल्याने ते विमानाच्या बाथरूममधून बाहेर पडले. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाची तीन हाडे मोडली. विशेष म्हणजे विमानात प्रथमोपचारही उपलब्ध नव्हता. एअरहोस्टेसने उपचाराच्या नावाखाली केवळ वेदनाशामक गोळी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकारानंतर विमानातील...
  July 13, 06:48 AM
 • नागपूर - व्हीएनआयटीच्या विद्यार्थी पीयूष वीरेश गुप्ता याचा रविवारी मृतदेह सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फुटाळा तलावात आढळला. पीयूष वीरेश गुप्ता मूळचा अकोल्यातील खडकी गावचा राहणारा आहे. तो प्रथम वर्षांला शिकत होता. काल सकाळपासून तो बेपत्ता होता. दिवसभर मोबाईलवरही त्याचा संपर्क न झाल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घेतला. रात्री फुटाळा तलावाच्या काठावर त्याची मोटारसायकल व मोबाईल सापडला. त्याच्या मित्रांनी लगेचच अंबाझरी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. आज सकाळी पोलिसांनी शोध...
  July 12, 02:49 PM
 • गोंदियातील ६० टक्के घरांमध्ये गेल्या आठ दिवसापासून नळांमधून गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील पाईपलाईन खूप जुनी झाली असल्याने ठिकठिकाणी फुटलेली आहे. या फुटलेल्या पाईपमध्ये नाल्यांचे दरुगधीयुक्त पाणी शिरत असल्यामुळे तेच पाणी पिण्याची नामुष्की नागरिकांवर ओढावलेली आहे.नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील नाल्यांनासुद्धा पाईपलाईप छेदून गेली असून फुटलेल्या पाईपमध्ये नाल्यामधील...
  July 12, 01:03 PM
 • नागपूर - कटोल येथील एक खासगी प्रवासी जीप झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही खासगी प्रवासी जीप सावरगावमार्गे नरखेडला जात होती. डोंगरगावजवळील थांब्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे जीप झाडावर आदळली. या अपघातातील जखमींना काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
  July 12, 02:49 AM
 • काटोल (जि. नागपूर) - जीप झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जीप काटोलवरून सावरगाव मार्गे नरखेडला जात होती. डोंगरगावजवळील थांब्यावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप झाडावर आदळली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास चालु आहे.
  July 11, 04:02 PM
 • चंद्रपूर - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या सहचरिणी व ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या पार्थिवावर रविवारी आनंदवन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुटुंबीयांसह आनंदवन परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.आनंदवनात शनिवारी सायंकाळी साधनातार्इंची प्राणज्योत मालवली. कर्करोगावरील उपचारानंतर त्या सावरल्या होत्या. मात्र काही महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्या त्रस्त होत्या. प्रकृती खालावल्याने 29 एप्रिलला त्यांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही...
  July 11, 04:06 AM
 • यवतमाळ - जागतिक बाजारामध्ये कापसाची मागणी अधिक असून, सध्या १५० लाख गाठी कापूस उपलब्ध असताना केवळ ६० लाख गाठी निर्यात करण्याची परवानगी तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री दयानिधी मारन यांनी दिली आहे. दरम्यान, ९० लाख कापूस गाठींवर निर्यातबंदी केल्यामुळे राष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावामध्ये घट झाली आहे आणि त्यामुळे देशभरातील शेतकयांचे २० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. दक्षिण भारतातील कपडा कारखान्यांचे हित जोपासण्यासाठी दयानिधी मारन यांनी कापूस निर्यातबंदी केल्याचा आरोप विदर्भ...
  July 11, 02:49 AM
 • चंद्रपुर: ज्येष्ठ समाजसेविका आणि कर्मयोगी बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांच्या पार्थिवावर रविवारी आनंदवनामध्ये भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर बाबा आमटेंच्या समाधीशेजारीच दफन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यंवर आणि हजारो सामान्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. साधनाताई आमटे यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले होते. महिनाभरापूर्वी त्यांच्या किडनीवर सूज आल्याने त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात...
  July 10, 04:32 PM
 • अमरावती: मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 32 टक्के पेरण्या पार पडल्या आहेत. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी या भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, पेरण्या रखडल्या आहेत. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरणी करण्यास धजावले नाहीत. पावसाला दिवसेंदिवस होणार्या विलंबामुळे शेतकर्यांत चिंतेचे वातावरण आहे. थोड्याफार पावसाच्या जोरावर शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद पिकाच्या पेरणीस पहिले प्राधान्य दिले आहे. पाच जिल्ह्यांमध्ये...
  July 10, 01:49 PM
 • चंद्रपूर- येथील महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये आधीपासूनच कोळशाची टंचाई आहे, त्यातच पावसामुळे केंद्रातील कोळसा भिजला असल्याने वीज उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सीटीपीएसजवळील केंद्रात साठविण्याची सोय नसल्यामुळे कोळशाची कमतरता जाणवत असल्याचे सांगितले जाते. सध्या या औष्णिक केंद्रातून 1350 मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. वास्तविक या केंद्राची वीज निर्मिती क्षमता 2340 मेगावॅट एवढी आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला दरवर्षी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर्षी वीज...
  July 10, 04:43 AM
 • नागपूर- ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या पत्नी व ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. सेवाभावी कार्याचा आदर्श ठरलेल्या आनंदवन आश्रमात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी आनंदवनात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या महिनाभरापासून साधनाताई आजारी होत्या. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास व मेगॅसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश ही मुले, नातवंडे असा परिवार आहे. बाबांनी...
  July 10, 04:14 AM
 • नागपूर- नागपूर विमानतळ परिसरात शस्त्र सापडल्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी येथे बंदुकीची जिवंत गोळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळ दुपारी एका नागरिकाला ६० एमएमची बंदुकीची गोळी सापडली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. गोळी जप्त करण्यात आली आहे. नागपूर येथील खडकी दारुगोळा कारखान्यात ही गोळी तयार करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पक्षाच््या नेत्याला आणि वैमानिकाला विमानांत बसताना रिव्हॉल्व्हर...
  July 10, 02:38 AM
 • चंद्रपूर- ज्येष्ठ समाजसेविका व बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनमधील रुग्णालयात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्या ८५ वर्षीच्या होत्या. त्यांच्या मागे त्यांचे दोन पुत्र डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे, स्नुषा तसेच नातवंडे आहेत. त्यांच्यावर रविवारी आनंदवनमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे डॉ. विकास आमटे यांनी सांगितले.बाबा आमटे यांनी सामाजिक सेवेसाठी वाहून घेण्याचे ठरविल्यानंतर साधना यांनी १९४६ साली बाबा यांच्याशी विवाह...
  July 9, 05:41 PM
 • नागपूर: नागपूर विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळ शनिवारी दुपारी बंदुकीची जिंवत गोळी आढळून आल्याने मोविमानतळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकादा ऐरणीवर आला आहे.सूत्रांनूसार विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळ दुपारी सुमारास शेतक-यांना 60 एमएमची बंदुकीची गोळी आढळून आली. येथील खडकी दारुगोळा कारखान्यात ही गोळी तयार करण्यात आली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.विमानतळावर शस्त्र सापडण्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याला आणि एका वैमानिकाला विमानात...
  July 9, 05:20 PM
 • नागपूर: येथील कारागृह अधिका-याने एका कैद्याला ठार मारून दफन करण्याची धमकी दिल्याने गोंधळ उडाला आहे. चंद्रप्रकाश जयराम शर्मा, असे या कैद्याचे नाव आहे. त्याने अतिरिक्त वरिष्ठ अधिकारी वैभव आत्राम यांच्या विरोधात धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. शर्मा हा मुळचा जरीपटका भागातील आहे. 13 एप्रिल 1997 रोजी त्याला खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. गुन्हा सिध्द होऊन 20 ऑगस्ट 1998 रोजी त्याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला...
  July 9, 04:59 PM
 • गडचिरोली: सास-यानेच दारुड्या जावायाची हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील कुरखेडा येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. देवा रावजी मडावी (वय- 40) या प्रकरणी आरोपी अंतराम चुप्पी टेकाम (70) याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा खरकाडा येथील रहिवासी देवाजी मडावी हा गेल्या काही वर्षांपासून दादापूर येथे आपल्या कुटुंबांसह राहत होता. परंतु त्याचे त्याच्या सासरच्या मंडळींशी फारसे पटत नव्हते. त्यांच्याशी त्याचे नेहमीच वाद होत असत. गुरुवारी रात्री रावजीने दारुच्या नशेत...
  July 8, 06:53 PM
 • नागपूर: वरुणराजाने पाठ फिरविल्याने शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आपात्कालीन पीक नियोजन संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. शेतक-यांना आपात्कालीन पिके घ्यायची झाली तर ती जुलैच्या तिस-या आठवड्यात घेता येऊ शकतील, अशी माहिती जि.प.चे उपाध्यक्ष नितीन राठी, कृषी व पशु संवर्धन सभापती महेश बम्हनोटे तसेच कृषी विकास अधिकारी विलास कोलते यांनी दिली आहे. परंतु, पेरणी...
  July 8, 01:40 PM
 • गडचिरोली: पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी बुधवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील बुर्गा येथील दोघांची हत्या केली. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राकेश गोटा (20), दलसू पदा (38) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहे. माओवाद्यांनी जिल्हयात निषेध सप्ताहाचे आयोजन केले आहे. राकेश आणि दलसू हे पोलिसांना माओवाद्यांची गोपनिय माहिती पुरवतात, असा माओवाद्यांना संशय होता. बुधवारी रात्री 25-30 शस्त्रधारी माओवाद्यांनी बुर्गी गावात प्रवेश केला. त्यानंतर राकेश...
  July 7, 05:33 PM
 
जाहिरात

RECOMMENDED