जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपुर - बहिणीच्या घरासमोर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेतल्याची घटना सोमवारी रात्री शहरातील श्याम विलास नगरमध्ये घडली. मृतकाचे नाव विलास वंजारी(वय ४०) असे आहे. सोमवारी विलास त्याच्या बहिणीच्या घरी विलासनगर मध्ये तीला भेटायला गेला होता. विलासने तेथे चहा-नाष्टा पण केला. परत निघताना विलासने आपले कपड्याची पिशवी तेथेच ठेवली आणि दोन तीन दिवसांनी पिशवी घेऊन जातो असे सांगून तेथून निघून गेला. १०-१५ मिनिटा नंतर विलासने तेथीलच एका रिकाम्या प्लॉटमध्ये स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेतले. विलासला...
  June 29, 02:07 PM
 • नागपुर - शहरातील गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या तीन सोनोग्राफी केंद्रांना महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने छापे टाकून सील केले. शहरातील प्रतिष्ठित सोनोग्राफी केंद्रावर छापे टाकून त्यांना सील केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सील केलेल्या सोनोग्राफी केंद्रांमध्ये वर्धा रोडवरील डॉ.रमेश प्रकाश, रामदासपेठ येथील कर्णिक दरे, रामदासपेठमधीलच नागपूर सिटी स्कॅन केंद्र या सोनोग्राफी केंद्रांचा समावेश आहे.स्त्री भ्रूणहत्याच्या वाढत्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. त्या रोखण्यासाठी...
  June 29, 01:39 PM
 • वाशीम - गेल्या तीन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदून गेले आहेत. मात्र, पेरणीसाठी पावसाने उघडीप द्यावी, अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत रिसोड व कारंजा तालुका वगळता उर्वरित चारही तालुक्यांमध्ये ६४.४ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ६०५.७ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी सुरू झालेल्या या पावसाच्या अधूनमधून जोराच्या सरी...
  June 29, 05:23 AM
 • अकोला - सोमवारपासून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुरुवात झाली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक पालकांनी मुलांच्या पाटी-पुस्तकाची तयारी केली. ज्या वस्तू शासनाकडून मिळणार त्या घेण्याचे बहुतेकांनी टाळले. शाळा सुरू झाल्यानंतर मोफत गणवेशाची विचारणा अनेकांनी शालेय प्रशासनाकडे केली खरी; परंतु त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे अद्याप धूळ खात पडल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकारने गणवेशासाठी केवळ ४५ रुपयांची तरतूद केल्याचे उजेडात आले आहे. जून महिना उजाडताच शालेय...
  June 29, 05:19 AM
 • गोंदिया - आश्रमशाळेतील एका चौदावर्षीय विद्यार्थ्याने एका चक्क आपल्या शिक्षकालाच ठार करण्याची सुपारी घेतल्याची व संबंधित शिक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी येथे उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धाबेपवनी येथील विवेकानंद आश्रम शाळेत कैलास खुणे हे नोकरीला आहेत. शाळेपासूनच जवळच ते राहतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका विद्यार्थ्याने खुणे यांचे दार ठोठावले. खुणे...
  June 29, 05:09 AM
 • नागपूर - गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली आहे. यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस होऊन ५० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील अनेक भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. विदर्भातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून पूर्व आणि पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे.
  June 28, 05:20 AM
 • गडचिरोली - येथील अहेरीजवळ दिना नदीत मेटॅडोर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांना जलसमाधी मिळाली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, यातील दहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दिना नदी तुडुंब भरून वाहत आहे. रविवारच्या बाजारासाठी एका मेटॅडोरमधून १५ जण चंद्रपूरहून अहेरीला जात होते. पुलावरून जाताना मेटॅडोरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मेटॅडोर थेट नदीत कोसळून वाहून गेला. वाचविला. अन्य पाच जण नदीत बुडाले. स्थानिक...
  June 28, 05:18 AM
 • अमरावती - घोरपडींची तस्करी करणाऱ्या चौघांना बडनेरा मार्गावरील सातुर्णा परिसरात सोमवारी पोलिसांनी अटक केली. शेल्या पवार, नंदूसिंग भोसले, दिलीप भोसले, राजकुमार पवार अशी आरोपींची नावे आहेत. वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत पीपल्स फॉर अॅनिमल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला. पंधरा दिवसांपूर्वी वनविभागाच्या शेड्यूल्ड वनामध्ये येणाऱ्या कासवांची तस्करी करणाऱ्यांनाही वन्यजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले होते. दरम्यान,...
  June 28, 05:16 AM
 • नागपूर - घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टेशन परिसरातील रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी बलात्कार केल्याची घटना सीताबर्डी परिसरात घडली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला.आईसोबत सतत भांडणे होत असल्याने कन्हान येथील १७ वर्षांची मुलगी मामाकडे राहण्यास गेली होती. मामाने तिच्या लग्नाची तयारी सुरू केल्याने ती १९ जूनला घरातून पळून गेली. आपला मित्र राजेशसोबत मुंबईला जाण्याचा तिचा विचार होता, राकेशने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकत नसल्याचे पाहून राकेशने तिला...
  June 28, 05:09 AM
 • गडचिरोली: जिल्ह्यातील उदगली येथील श्रीकांत अंताराम तेलंगे (वय ३२) यांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री जयसिंगटोला येथे घडली. पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरून श्रीकांत तेलंगे यांचे नक्षलवाद्यांनी चार दिवसांपूर्वीच त्यांच्या राहत्या घरून अपहरण केले होते. तसेच गावातील अन्य दोघांचेही अपहरण केले होते, मात्र त्यांची नंतर सुटका करण्यात आली. श्रीकांतला मात्र त्यांनी आपल्या सोबतच ठेवले होते. दरम्यान, शनिवारी श्रीकांत तेलंगे यांना ठार करून त्यांचा मृतदेह...
  June 27, 02:11 AM
 • नागपूर: अल्पवयीन मुलीला 30 हजार रुपयात विकण्याचा एकाचा डाव नागपूर पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल मेश्रामसह (रा. अमरावती) तीन जणांना अटक केली आहे. राहूलने एका अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून नागपूरात आणले. त्याने त्या मुलीला आपल्या नातेवाईकांकडे ठेवले होते. चंद्रपूर येथील दोन जणांसोबत त्यांने त्या मुलीचा 30 हजार रुपयांमध्ये सौदा केला होता. मात्र राहुलचे फोनवरचे संभाषण त्याच्या नातेवाईकांनी ऐकले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. त्यावरुन...
  June 27, 01:10 AM
 • कुरखेडा - धानोरा तालुक्यातील उगदली येथील रहिवासी श्रीकांत अंताराम तेलंगे(३२) या तरुणाची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. तो पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरुन त्याची हत्या करण्यात आली. चार दिवसांपूर्वी गावातील तीन तरुणांचे त्याच्या राहत्या घरातून नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्यातील दोघांना सोडून देण्यात आले, तर श्रीकांतची जयसिंगटोला येथे शनिवारी हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह जयसिंगटोला येथील रस्त्यावर टाकून देण्यात आला. त्याच्या खिशात नक्षलवाद्यांनी चिठ्ठी लिहून...
  June 26, 05:19 PM
 • चंद्रपूर - शहरात शनिवार रोजी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे रेशनवर विक्रीसाठी आलेला शेकडो पोती गहू पावसात भिजला. शुक्रवारी सायंकाळी 51 हजार पोती गहू येथील रेल्वेस्थानकावर पोचला. मात्र, त्यावेळी पाऊस नव्हता. शनिवार सकाळपासून शहरात रिमझिम पाऊसाने सुरुवात केली, याचा फटका रेल्वे सायडिंगवरील गव्हांच्या पोत्यांना बसला. पाऊस सुरू झाल्यानंतर घाईघाईने गहू गोडाऊनमध्ये हलविण्याची कारवाई सुरू झाली. मात्र, तोपर्यंत शेकडो पोती ओली झाली होती. रात्री उशिरापर्यंत गव्हाची पोती गोडाऊनमध्ये...
  June 26, 11:44 AM
 • गडचिरोली - अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथे अंगणातील विहीत चार वर्षीय मुलगा पडून त्याचा मृत्यू झाला आहे. मरपल्ली येथील आट्टोला यांच्या घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानक हिमेश जनार्दन आट्टोला हा चार वर्षीय मुलगा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजता घडली. अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथे जनार्दन आट्टोला यांचा चार वर्षीय मुलगा हिमेश अंगणात खेळत होता. कुणाचे लक्ष नसताना तो अचानक विहिरीत पडला. हिमेशचा आवाज ऐकल्यानंतर वडील जनार्दन यांनी त्याला बाहेर काढून त्याला...
  June 25, 06:28 PM
 • गडचिरोली - जिल्ह्यातील मुरूमगाव येथे नक्षलवाद्यांनी एका बांधकाम कंत्राटदाराची हत्या केली. आज शनिवार रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. रामचंद्र मलय्या बहिरवार (५८) असे मृताचे नाव आहे. रामचंद्र बहिरवार हे बांधकाम कंत्राटदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी गावातच वेल्डींगचे दुकान सुरू केले होते. शनिवार रोजी दुपारी दोन सशस्त्र नक्षलवाद्यी एका मोटारसायकलने त्यांच्या घरी आले. त्यांनी रामचंद्र बहिरवार यांच्याशी त्यांच्या घरा समोरच त्यांच्याशी बोलायला सुरूवात केली. या...
  June 25, 03:53 PM
 • अकोला -पश्चिम विदर्भातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या अकोला जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. येथील गैरसोयींकडे वारंवार लक्ष वेधूनही त्यात सुधारणा होत नसल्याने अखेर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकायांनी शुक्रवारी रुग्णाचा वेश परिधान करून मोर्चा काढला. हाताला प्लास्टर केलेले, व्हीलचेअर व स्ट्रेचरवर बसलेले कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.पश्चिम विदर्भातील यवतमाळनंतर सर्वात मोठे रुग्णालय म्हणून अकोला जिल्हा...
  June 25, 02:56 AM
 • बुलडाणा । पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या कारमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून सुमारे चाळीस हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे बीबी ग्राम पेट्रोलपंपावर घडली.माहूर तालुक्यातील शेकापूर गावाचे सरपंच सुनील बेदरे, ग्रामसेवक ए. जी लुटे, गजानन बेदरे हे पुणे येथील निर्मलग्राम पुरस्काराच्या कार्यक्रमास हजेरी लावून गावाकडे परतत होते. मंगळवारी पहाटे बुलडाण्यातील बीबी पंपावर ते कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा...
  June 24, 11:27 AM
 • नागपूर- वैद्यकीय अभ्यासक्रमातून फोरेन्सिक मेडिसिन (न्यायवैद्यकशास्त्र) हा विषय वगळण्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती पी.डी. कोदे यांनी केंद्र, राज्य सरकार तसेच मेडिकल कौन्सिलला नोटीस बजावली आहे.देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातून फोरेन्सिक मेडिसिन हा विषय काढून टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार आणि तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी ही...
  June 24, 02:49 AM
 • अकोला- सुमारे अडीच हजार कर्मचायांचे थकीत वेतन देण्यासाठी महापाकिलेने राज्य सरकारकडे गेल्या आठ महिन्यांपासून 16 कोटी रुपये कर्जाची मागणी केली होती. पालिकेत काँग्रेस आघाडीचे सरकार असूनही ही रक्कम मंजूर होत नव्हती. थकीत वेतनासाठी पालिका कर्मचारी गेल्या बारा दिवसांपासून संपावर असूनही सरकारने याविषयी कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र, बुधवारी पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचायाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करताच सरकार जागे झाले. रातोरात अर्थमंत्री अजित पवार यांनी या कर्जाच्या फाइलवर...
  June 24, 02:29 AM
 • गोंदिया । टाडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या तीन माओवाद्यांना तब्बल वीस वर्षांनंतर अटक करण्यात चिचगड पोलिसांना यश मिळाले आहे. मोहन बिरजू कुंभरे (वय ४७), माणिक दरसू ताराम (वय ४३) आणि तुकाराम धोंडू सलामे (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत. ३१ मे १९९१ रोजी रामलाल टेंभू सलामे यास तोतया नक्षली म्हणून काम करतोस आणि आमची बदनामी करतो, असा जाब विचारत या आरोपींनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सलामे याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सदर आरोपींना फरार घोषित केले होते. तसेच...
  June 23, 07:21 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात