जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर - पगार मागितला म्हणून सुरक्षा रक्षकाचा एजन्सी मालकाने खुन केला आहे. संतोष विश्वकर्मा असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. दिपक केअर सर्विसमध्ये तो कामाला होता. संतोषचा ३६ दिवसांचा पगार बाकी होता. पगार मागण्यासाठी तो एजन्सी मालक दिपक पांडेकडे गुरुवारी दुपारी गेला होता. मात्र मालकाने पगार देण्यावरुन संतोषशी वाद केला. त्यातच एजन्सी मालक दिपकने सुरक्षा रक्षकाला इमारतीवरुन खाली फेकले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान संतोषचा...
  June 23, 05:45 PM
 • अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांच्यात सुरू असलेला वाद संपण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने आता जकातच्या मुद्द्यावर या दोन पक्षांत परत एकदा जुंपली आहे. आमदार रवी राणा यांनी महापौर ऍड. किशोर शेळके यांच्यावर जकातच्या कंत्राटात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्याला महापौरांनी बुधवारी उत्तर दिले आहे. राणांनीदेखील महापौरांवर पलटवार केला. ऍड. किशोर शेळके म्हणाले की, आमदार रवी राणा यांनी केलेले आरोप केवळ स्वस्तात प्रसिद्धी मिळण्यासाठी केले...
  June 23, 04:49 PM
 • भारतीय वायुसेनेच्या जवानांसाठी असलेले प्रवासी विमान एन-३२ आता २५ वर्षांंऐवजी ४० वर्षे सेवा देऊ शकणार आहे. वायुसेनेचे प्रवक्ता विंग कमांडर संदीप मेहता यांनी सांगितले की, कानपुरातील चाकेरी वायुसेना स्टेशनवर मंगळवारी एन-३२ च्या सेवेचा कालावधी वाढविण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे. वायुसेना अनुरक्षण कमान मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल पी. व्ही. आठवले यांनी या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखविला. एन-३२ चे आयुष्यमान वाढणार म्हणून सारेच त्यात हिरीरीने सहभागी झाले.गजराज विमानानंतर...
  June 23, 10:31 AM
 • चंद्रपूर: सरकार एकीकडे सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असताना सरकारी शाळांमधील शिक्षकांची कार्यक्षमता नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाने समोर आली आहे. अशा शिक्षकांवर कारवाई होणार असून, ज्या शाळांचे दहावीचे निकाल अत्यल्प लागले आहेत तेथील शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे.सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ४३० पेक्षा जास्त शाळा असून, यामध्ये ४४ सरकारी शाळांचा समावेश आहे. आताच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये सरकारी शाळांच्या निकालाची टक्केवारी 3०...
  June 23, 06:43 AM
 • अकोला: पाच महिन्यांपासून पगार नाही, आंदोलन करूनही तिढा सुटेना. घरातील चूल पेटण्याचे वांधे झाले असताना मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडणार कसे, या विवंचनेत असलेल्या अकोला महानगरपालिकेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अकोला महानगरपालिकेच्या कर्मचा-यांचे पगार गेल्या पाच महिन्यांपासून थकले आहेत. मागील 12 दिवसांपासून या कर्मचायांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनानंतरही थकीत वेतनाचा तिढा न सुटल्याने अनेक कर्मचा-यांची चूल पेटणेही अशक्य...
  June 23, 06:34 AM
 • नागपूर । बारावी परीक्षेचा निकाल लागल्यापासून डीटीएड प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट राज्य शिक्षण संशोधन परिषदेतर्फे २७ जूनपासून ही प्रवेश प्रकिया सुरू केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिषदेचे संचालक डॉ. श्रीधर साळुंके यांनी संबंधित अधिकारी व कर्मचायांची बैठक गुरुवारी बोलावली असून, त्यात प्रवेश अर्जांची छपाई व अधिकारी-कर्मचा-यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची अधिकृत तारीख...
  June 22, 06:20 PM
 • गडचिरोली - जिल्ह्यातील दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांकडे अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे दोन कोटी ३५ लाख रुपये पाण्यात गेल्याचे समोर आले आहे. स्वच्छता आणि आरोग्याच्या हेतूने शासनाने दलितवस्ती सुधार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत यंदा दोन कोटी 35 लाख रुपयांची कामे करण्यात आली. मात्र या कामावर अधिका-यांचे नियंत्रण नसल्याने अनेक गावांत काम होऊनही दलितवस्त्यांमधील बकालपणा कमी झालेला नाही. यासंदर्भात समाजकल्याण विभागाकडे चौकशी केली असता, 'आमच्या विभागामार्फत नियमीत कामाची पाहणी केली...
  June 22, 01:28 PM
 • नागपूर - विदर्भाचा दावा असलेले तंत्रज्ञान विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (आयआयआयटी) अनुक्रमे पुणे आणि औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून विदर्भाच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्यात येणार असल्याचे दिसते. पुढील महिन्यात होणाऱया मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात येईल. गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाचा निर्णय अद्याप अनिर्णित आहे. पुणे आणि औरंगाबादवर सरकार मेहेरबान सरकार आणि...
  June 21, 04:08 PM
 • अकोला - पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने अकोला महापालिकेतील कर्मचार्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे शहराला अक्षरश: गटाराचे स्वरूप आले आहे. शहराला निर्जळीलाही तोंड द्यावे लागत आहे. कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.1 ऑक्टोबर 2001 रोजी...
  June 20, 04:23 PM
 • नागपूर - महाराजबाग परिसरात रविवारी पोलिसांची दंडुकेशीही पहायला मिळाली. आपसात गप्पागोष्टी करणा-या युवक-युवतीला पोलिस कॉन्सेटबलने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुटकेसाठी ५ हजार रुपयांची लाच घेतली. मात्र जेव्हा पोलिस कॉन्स्टेबलला कळले की त्याने एका पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलीकडून लाच स्विकारली तेव्हा त्याने त्यांची माफी मागत पैसे परत केले. मात्र यासगळ्या प्रकारात त्या मुलीला स्टाफ सलेक्शच्या परीक्षेला मुकावे लागले. नेमके काय घडले यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एका प्रतिष्ठित...
  June 20, 01:51 PM
 • अकोला: सायकलस्वाराला दुचाकीची धडक बसल्याच्या कारणावरून अकोट येथे दोन गटांत रविवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली. या वेळी जमावाने एकमेकांच्या घरांवर दगडफेक करून आग लावली. त्यात सुमारे 20 घरे भस्मसात झाली. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाले. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच हवेत गोळीबार केला. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास तीन युवक मोटारसायकलवरून जात होते. याचवेळी अशोक प्रल्हाद ताडे व किशोर प्रल्हाद ताडे हे विरुद्ध दिशेने सायकलवरून...
  June 20, 01:42 AM
 • बुलडाणा -जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी सर्वांत मोठा सायबर क्राइमचा गुन्हा दाखल झाला असून, इंटरनेटच्या माध्यमातून आरोपीने काय काय गुन्हे केले आहेत याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.युवतीसोबत केलेल्या शारीरिक संबंधाची ब्लु फिल्म वेबसाइटवर अपलोड केल्याने सध्या पोलिस कोठडीत असलेल्या संतोष ऊर्फ सोन्या डोंगरदिवे याने कोणाकोणाला मेलद्वारे ही फिल्म पाठविली होती, त्याची माहिती पोलिसांनी मिळवणे सुरू केले आहे. पोलिसांनी मेल ऍड्रेस मिळवले असून त्या माध्यमातून सोन्याच्या मित्रांपर्यंत...
  June 19, 05:01 PM
 • नागपूर - मिहान प्रकल्पग्रसांना विकसित जमीन दिली जाणार असून तसा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवणार असल्याचे एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक युपीएस मदान यांनी सांगितले आहे. शनिवारी मदान यांनी दिवसभर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा केली. यावेळी बहुतेक जणांनी विकसित जमीन देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन एका महिन्यात या एकाच विषयावर तीनवेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. शनिवारची बैठक ही शेवटची बैठक होती, आता यानंतर आठ दिवसांत मंत्रीमंडळासमोर अहवाल...
  June 19, 04:13 PM
 • नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने विदर्भाच्या सीमेत प्रवेश केला आहे. हवामान खात्यानुसार येणाऱ्या दोन दिवसात विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान खात्यानुसार मंगळवारी (ता.१९) रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे, पुढे दोन दिवस हा पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियामध्ये या आधीच मान्सून आल्याची आधिकारिक घोषणा करण्यात आली आहे.
  June 19, 04:01 PM
 • गोंदिया - नक्षलग्रस्त भागात कर्मचा-यांची जाणवणारी कमतरता आणि त्यामुळे विकासाला बसणारी खीळ ही कोंडी लवकरच फोडण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातील मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातील रिक्तपदे भरण्याची कार्यवाही सुरु केली असून, येत्या दोन महिन्यात ही पदे भरली जाणार आहेत. असे चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित आढावा बैठकीत म्हटले आहे. चव्हाण पुढे म्हणाले की, गोंदिया...
  June 18, 05:29 PM
 • नागपूर - जिल्ह्यातील ७३ गावे धोकादायक आणि ७९ गावे रेड झोन घोषीत करण्यात आली आहेत. नागपूरमध्ये होणा-या पावसाने या गावांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे पुनर्वसनाची कामे सुरु आहे. मात्र सध्यातरी या गावक-यांना पाऊस आल्यानंतर आपले बि-हाड पाठीवर टाकून सुरक्षित स्थळ शोधण्याची कसरत करावी लागत आहे. नागपूरमध्ये नदी-नाल्यांच्या किना-यावर असणारी गावे मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात या गावांमध्ये पाणी घुसण्याचे आणि पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. जिल्हा...
  June 18, 11:09 AM
 • बुलडाणा: सोयीसुविधांच्या बाबतीत कायम मागास असलेल्या विदर्भातील समस्यांकडे राज्य शासनाचे फारसे गांभीर्याने लक्ष नसल्याचा आरोप होत असला तरी मिळालेला निधी विकासकामांवर खर्च करण्यात प्रशासनही अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचाह अनुभव आजवर विदर्भवासीयांना आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ३०२ रस्ते आणि १४९ पूल नादुरुस्त झाले असून, ते दुरुस्त करण्यासाठी अपेक्षित निधी मिळालेला नाही. जो निधी मिळाला तोही खर्च झाला नसल्याचे दिसून येते. बुलडाणा...
  June 18, 02:00 AM
 • नागपूर: येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जवळपास महिनाभर गाजलेल्या रॅगिंग प्रकरणात केवळ एका विद्यार्थ्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला तीन महिन्यांसाठी कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई करताना कॉलेज प्रशासनाने कमालीची गुप्तता बाळगली होती. दरम्यान, दंत महाविद्यालयातील अॅण्टी रॅगिंग कमिटीला अंधारात ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या महाविद्यालयातील चिराग भावसार या विद्यार्थ्याची पाच विद्यार्थ्यांनी...
  June 18, 01:52 AM
 • नागपूर - कुख्यात गुन्हेगार राहुल मेश्रामवर गुरवारी हिवरेनगर भागात सशस्त्र हल्ला करण्यात आला. राहुलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल मेश्रामवर या आधीही खून, चोरी, मारामारी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज हाडगेच्या मित्राच्या खुनामध्ये राहुल मेश्रामचे नाव समोर आले होते, असे सांगण्यात येत आहे कि मनोजनेच बदला घेण्यासाठी राहुल मेश्रामवर हल्ला केला असावा. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची चौकशी चालू आहे.
  June 17, 06:33 PM
 • नागपूर - शहर परिसरातील चौकांमध्ये लागलेले सिग्नल शो पीस झाले आहेत. काही सिग्नल तुटलेले आहेत तर काही बंद आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. महानगरपालिकेने सिग्नलच्या नुतनीकरणासाठी एका खाजगी कंपनीला ३ करोड रुपयांचे काम दिले आहे. पण अजून त्या कंपनीने काम सुरु केलेले नाही. सिग्नल खराब असल्यामुळे चौकांमध्ये अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. कोणी स्वतःला वाचवत आहे, तर कोणी बेधडक गाडी चालवत आहे. ज्या चौकात पोलीस नाहीत तेथे वाहन चालक भरधाव वेगात गाड्या चालून अपघातांना निमंत्रण देत आहेत.
  June 17, 06:32 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात