जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर - विदर्भात उद्योगांचा विकास होण्यासाठी येथे येणा-या उद्योगांना विशेष सवलत देणार असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रात क्रमांक एकवर येण्यासाठी नवे औद्योगिक धोरण तयार केले जात असून ते येत्या अधिवेशनात सादर होणार असल्याचेही उद्योगमंत्री राणे यांनी सांगितले आहे. शनिवारी नागपूरात राणे यांनी राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणासंदर्भात उद्योजकांसोबत चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, विदर्भ,...
  June 12, 12:56 PM
 • नागपूर - विदर्भात मान्सून किमान चार दिवसांसाठी लांबला आहे. मुंबईत कमी दाबाच्या पट्टयामुळे विदर्भात मान्सूनचे आगमन लांबले आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, नाशिक मध्ये मान्सूने हजेरी लावली आहे. मान्सूनची रेषा नाशिकनंतर मराठवाडयात सरकते त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भात मान्सूनचे आगमन होणे आपेक्षित होते मात्र नाशिकनंतर मान्सून रेषा आंध्र प्रदेशकडे वळली आहे त्यामुळे विदर्भ अजूनही तहानलेलाच आहे. दरम्यान विदर्भातील तापमानात उष्मा कायम असून, शनिवारी सर्वाधिक 40.5 अंश सेल्सिअस...
  June 12, 12:19 PM
 • बुलडाणा- घरातील वडीलधा-या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी घरातील मोठा मुलगा किंवा मुलगा नसेल तर अन्य कोणी नातेवाईक अंत्यविधीचे कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र, मोताळा येथील निवृत्त प्राचार्य भाऊसाहेब इंगळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तीन विवाहीत मुलींनी आपल्या पित्याच्या देहाला अग्नी देऊन समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.भाऊसाहेब इंगळे हे मोताळाच्या स्व. बबनराव देशपांडे महाविद्यालयातून प्राचार्य पदावरुन निवृत्त झाले होते. इंगळे यांना एकही...
  June 11, 03:17 AM
 • अमरावती: येथील एकता इंटरप्राईझेसवर अमरावती कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. या कारवाईत खताच्या 411 गोण्या जप्त करण्यात आल्या. खत परराज्यातून आणण्यात आले होते. त्याची जादा दराने विक्री सुरु असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळे राज्यभरात कृषी विभागाकडून ठिकठिकाणी छापे टाकले जात असल्याने अवैध बियाणे आणि खते विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
  June 10, 01:42 PM
 • अकोला: शहरापासून जवळच असलेल्या शिवणी विमानतळाजवळ ट्रक आणि इंडिका कारच्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. ट्रक चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेली माहिती अशी की, अमरावतीकडून अकोल्याकडे येणारी इंडिका कार अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जाणा-या ट्रकला समोरुन धडकली. त्यात इंडिका चक्काचूर झाली. तीन मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. अविनाश काजे असे तीन मृतांपैकी एकाचे नाव आहे.
  June 10, 10:01 AM
 • नागपूर- पैशासाठी माणसे काय करतील काही सांगता येत नाही. १० लाख रुपये मिळावेत यासाठी पुसद (जि. यवतमाळ) तालुक्यातील ७५ वर्षांच्या आजोबांनी विजेच्या टॉवरवर चढून चक्क वीरूगिरी केली. पाच तासांच्या अंगमेहनतीनंतर त्याला टॉवरवरून खाली उतरविण्यास पोलिसांना अखेर यश आले. त्याला दहा लाख रुपये तर मिळाले नाहीत, पण फुकटचा तुरुंगवास मात्र घडला. पुसद तालुक्यातील काकडदाती गावात सीताराम भाकरे हे ७५ वर्षांचे गृहस्थ सकाळी आठच्या सुमारास गावाजवळील विजेच्या उंच टॉवरवर चढले. वर टोकाला जाऊन त्यांनी आरडाओरड...
  June 10, 03:40 AM
 • नागपूर: नागपूर- जबलपूर महामार्गावरील देवलापूर येथे बुधवारी रात्री झालेल्या ट्रकच्या विचित्र अपघाताच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रामराजे सलामे व त्यांची पत्नी वच्छलाबाई यांचा मृतामध्ये समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सलामे दाम्पत्य बाजार आटोपून सायकलवरून घरी जात असताना भरधाव वेगात येणाया एका ट्रकने सायकलीला जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. ट्रकमधील गणेश कुमरे, सतीश पेंदाम, नरेंद्र नराटी या तिघांचाही त्यात मृत्यू झाला.
  June 9, 11:30 AM
 • नागपूर- एनटीपीसी अंतर्गत पाच हजार सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करून नागपूरमध्ये ५०० मेगावॅट क्षमतेचे २ ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. ५,७०० कोटींचे ५०० मेगावॅट क्षमतेचे २ ऊर्जा प्रकल्प पहिल्या टप्प्यात मार्च २०१२ मध्ये आणि ८,५०० कोटींचे ६६०- मेगावॅट क्षमतेचे २ ऊर्जा प्रकल्प दुस-या टप्प्यात सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित होतील, असेही मोघे यांनी या वेळी सांगितले. मौडा ऊर्जा प्रकल्प २०१२...
  June 9, 02:18 AM
 • बुलडाणा- जिल्ह्यातील साखरखेडा येथे सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने आजूबाजूच्या शेततळयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यात डु्रंबण्याची हौस पूर्ण करण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलाचे प्राण वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे.शेख नवेद शेख गफार (वय 11), शेख अक्रम शेख तस्लिम (वय 12), शेख सलमान शेख अय्युब व शेख वसीम शेख कय्युम यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सोमवारी रात्री बुलडाणा जिल्ह्यात...
  June 8, 04:08 AM
 • नागपूर: 2009मध्ये सराफी व्यापार्याला लटून मध्य प्रदेशातून फरार झालेल्या तीन दरोडेखोरांना अटक करण्यात गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. नासिर खान रहमान खान(22), अजीम खान ऊर्फ अज्जू सलीम खान(27) व साहेल खान जलील खान (22) असे या आरोपींची नावे आहेत. 2009मध्ये यांनी मध्य प्रदेशातील शहापूरा गावात सराफी व्यापार्याला मारहाण करून त्याच्याकडील 22 किलो चांदी, 200 ग्रॅम सोने आणि 75 हजार रोख लांबविले होते. तिघांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
  June 7, 11:40 PM
 • चंद्रपूर/ यवतमाळ: विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला तर चार जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील चिकणा येथील शीतल पुडके (16) व वणी तालुक्यातील शेलू नांदेपुरा येथील वामन माधव आवारी (36) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. हे दोघे ही शेतात काम करीत होते. भद्रावती तालुक्यातील सागरा गावालगतच्या शेतात वीज पडून सुखदेव बांदूरकर (40) हे जागीच ठार झाले. तर दुसर्या घटनेत काटवल येथील राजेंद्र काशिनाथ पिंगे (55) हे शेताकडून घरी परतत असताना...
  June 7, 11:27 PM
 • नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर विमानतळाला सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. विमानतळाच्या भिंतीबाहेरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मांस विक्रीची दुकाने उभी आहेत. मांस विक्री करणारी दुकाने विकण्यालायक नसलेले मांसाचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात फेकून देतात. ते तुकडे खाण्यासाठी आकाशामध्ये पक्ष्यांची एकच गर्दी होते. त्यामुळे उड्डाण घेणा-या व उतरणा-या विमानांना अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र सध्या नागपूर आंतरराष्टङ्खीय विमानतळावर दिसत आहे. गतवर्षात...
  June 6, 08:56 PM
 • नागपूर: मेळघाट आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील वाघ हे शिका-यांच्या निशाण्यावर असल्याचे गुप्तहेर संस्थेने सांगितले आहे. याबाबत गुप्तहेर संस्थेने व्याघ्रप्रकल्पाच्या अधिका-यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वन विभाग मान्सूनमध्ये प्रकल्पामधील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. ताडोबा-मेळघाट प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघ आहेत. काही दिवसांपूर्वी व्याघ्रप्रकल्पाजवळ काही शिकारी आढळून आले होते. त्यानंतर गुप्तहेर संस्थांनी याबाबत व्याघ्रप्रकल्पाच्या...
  June 6, 01:51 AM
 • दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरुन वाद वाढतच आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे. नागपुरात पत्रकारांसोबत बोलतांना ते म्हणाले, राज ठाकरे यांनी माझ्या वांद्रे येथील निवासस्थानाला नामांतराच्या वादात ओढले आहे. त्यांना तसे करण्याची गरज नव्हती. पण, त्यांच्या मालमत्तेचे काय? मुंबईतल्या कोहिनूर मिलची जागा आणि राज...
  June 3, 08:40 AM
 • नागपूर: राज्यातील बालमृत्युच्या प्रमाणात चार टक्क्यांनी घट आली असल्याचे एका अभ्यासात दिसून आले . सध्या महाराष्ट्रात बालमृत्युचे प्रमाण 32 टक्के इतके आहे. राज्यात बालमृत्युच्या प्रमाणात घट दिसत असली तरी ते सार्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनपेक्षाही अधिक आहे, असे मत नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वरीष्ठ चिकित्सक डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले आहे.पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात नवजात शिशु मृत्युदर आणि बालमृत्यु दर जास्त आहे. आपल्या देशात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव...
  June 2, 04:42 PM
 • नागपूर: राज्यातील बालमृत्युच्या प्रमाणात चार टक्क्यांनी घट आली असल्याचे एका अभ्यासात दिसून आले . सध्या महाराष्ट्रात बालमृत्युचे प्रमाण 32 टक्के इतके आहे. राज्यात बालमृत्युच्या प्रमाणात घट दिसत असली तरी ते सार्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनपेक्षाही अधिक आहे, असे मत नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वरीष्ठ चिकित्सक डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले आहे.पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात नवजात शिशु मृत्युदर आणि बालमृत्यु दर जास्त आहे. आपल्या देशात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव...
  June 2, 04:41 PM
 • नागपूर - यवतमाळमध्ये नुकत्याच झालेल्या पाणी परिषदेत विदर्भांवर लादल्या जाणार्या वीज प्रकल्पांबाबत नवा वाद सुरू झाला, मुख्यमंत्र्यांनीही या प्रकल्पांबाबत आश्चर्य व्यक्त केले. विदर्भात एकूण 89 वीज प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली असली, तरी वीज उत्पादनांसाठी या भागात ना मुबलक पाणी आहे ना कोळशांसारखी साधने. मग अशा स्थितीत विदर्भात 55 हजार मेगावॅट वीज उत्पादन करणे कसे शक्य आहे? इतकेच नव्हे, तर हे प्रकल्प विदर्भांसाठी वरदान नव्हे तर संकटच निर्माण करतील, अशीही स्थानिक लोकांमध्ये...
  June 2, 03:20 AM
 • नागपूर - दोन आठवड्यांपूर्वी तुफानी वादळ आणि पावसाचा तडाखा बसल्यानंतर नागपूरकरांना आता कडाक्याच्या उन्हाची झळ बसत आहे. सोमवारी शहराचे तापमान 44.8 एवढे नोंदवण्यात आले असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणात मोठय़ा प्रमाणावर आर्द्रता निर्माण झाल्यामुळे अचानक तापमान कमी होऊन ढगाळ वातावरणाचा अनुभवदेखील नागपूरकरांना येत आहे. पुढील दोन दिवस 44 च्या जवळपास तापमान राहणार असून ऊन-सावलीचा खेळदेखील सुरू राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मृग नक्षत्राला अवघ्या आठ दिवसांचा...
  June 1, 04:06 AM
 • नागपूर - दोन आठवड्यांपूर्वी तुफानी वादळ आणि पावसाचा तडाखा बसल्यानंतर नागपूरकरांना आता कडाक्याच्या उन्हाची झळ बसत आहे. सोमवारी शहराचे तापमान 44.8 एवढे नोंदवण्यात आले असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणात मोठय़ा प्रमाणावर आर्द्रता निर्माण झाल्यामुळे अचानक तापमान कमी होऊन ढगाळ वातावरणाचा अनुभवदेखील नागपूरकरांना येत आहे. पुढील दोन दिवस 44 च्या जवळपास तापमान राहणार असून ऊन-सावलीचा खेळदेखील सुरू राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मृग नक्षत्राला अवघ्या आठ दिवसांचा...
  June 1, 04:05 AM
 • नागपूर - सध्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून या महागाईच्या काळात एक आनंदाची बातमी आहे. महावितरणने शून्य भारनियमनासाठी लावण्यात येणार्या अतिरिक्त शुल्कात जुलै महिन्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महागाईच्या चक्रव्यूहात भरडत जाणार्या वीज ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल.राज्यातील महावितरणच्या सर्व मुख्यालयांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे शून्य भारनियमन काळात लावण्यात येणारे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. या...
  June 1, 03:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात