Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अमरावती- शेतकऱ्यांना गाठून त्यांना कर्जावर ट्रॅक्टर विकत घेवून द्यायचा त्यानंतर परस्परच ट्रॅक्टर विक्री करून अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणारा ठकबाज प्रमोद गोवर्धन सरदार (३७, रा. व्यंकटेश कॉलनी, अमरावती) याला लोणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अमरावती जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील यवतमाळ व इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गंडा घातल्याची माहीती लोणी पोलिसांपुढे आली आहे. प्रमोद सरदार हा शेतकऱ्यांना गाठून त्यांना शेतीसोबतच जोड व्यवसाय करण्याचा सल्ला देतो. तसेच जोडव्यवसाय म्हणून तुम्ही...
  August 25, 11:45 AM
 • वर्धा- स्थानिक आनंद नगर येथील ४५ वर्षीय गांजा विक्रेता असलेल्या इसामाची धारधार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना २४ अाॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. प्राप्त माहिती नुसार मिलिंद सुभाष मेश्राम वय ४५ वर्ष रा आनंद नगर हा गांजाची विक्री करीत होता. मुलगी झोपेमधून पहाटेच्या सुमारास उठली असता, तिला तिचे वडील दिसेनासे झाल्यामुळे तिने घराच्या बाहेर पाहणी केली असता,तिला रक्ताचे डाग दिसून आले. मृतक मिलिंद मेश्राम यांचा मृतदेह घराजवळ असलेल्या शौचालय करिता बांधण्यात आलेल्या...
  August 25, 11:38 AM
 • नागपूर- एकेकाळी संपूर्ण ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दहशत असणारा देखणा, रूबाबदार आणि ऐटबाज साहेबराव हा आशियातील सर्वात मोठा वाघ आज गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये केविलवाणा होऊन दिवस काढतोय. या साहेबरावला शहरातील विख्यात अस्थिव्यंग तज्ज्ञ डाॅ. सुश्रुत बाभूळकर यांनी दत्तक घेतले आहे. तेच त्याला कृत्रिम पंजा लावणार आहे. त्यासाठी त्याची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. डाॅ. गौतम भोजने यांनी साहेबरावला बेशुद्ध केले. तर डाॅ. विनोद धूत आणि डाॅ. शिरीष उपाध्ये तपासण्या दरम्यान वाघाच्या प्रकृतीवर लक्ष...
  August 25, 11:22 AM
 • नागपूर- नागपूरचे माजी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने झुडपी जंगल प्रकरणी सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला असून या संबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत अंतरिम अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या महसूल आणि वनखात्याने विभागीय आयुक्तांना या संबंधी आवश्यक पावले उचलण्यासाठी सांगितले आहे. समितीने महसूल आणि वनखात्याला झुडपी जंगलाची जमीन विविध विकासकामांकरीता वळती करण्यासाठी सुलभ प्रक्रिया असलेला सुधारित मसुदा...
  August 25, 11:12 AM
 • नंदुरबार - नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. पुरग्रस्तांकडे पालकमंत्री रावल यांनी पाठ फिरवल्याचे वृत्त दिव्य मराठीत झळकल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे जणू खुलासाच करण्यात आला आहे. नुकताच रंगावली नदीला महापूर आला होता. या महापूरात विसरवाडीजवळील पाच नागरीकांचा मृत्यू झाला होता. तसेच 495 घरांसह शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान...
  August 24, 08:05 PM
 • नागपूर- पिस्तूल, चाकू अशा शस्त्रांसह बँक लुटण्यासाठी आलेल्या लुटारूंची चांगलीच फजिती झाल्याची घटना नागपुरात घडली. बँकेत छदामही न सापडल्यामुळे कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत लुटारू निघाले. मात्र, या फजितीचा वचपा म्हणून त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना आत कोंडून बाहेरून शटर लावून कोंडून टाकले. ही घटना नागपूर सहकारी बँकेच्या छोटा ताजबाग शाखेत गुरुवारी दुपारी घडली. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छोटा ताजबाग परिसरात असलेल्या या बँक शाखेत फारशी वर्दळ नसते....
  August 24, 08:35 AM
 • नागपूर- विदर्भातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्वच आरोपपत्रांची सुनावणी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विशेष न्यायालयास दिले आहेत. त्याचप्रमाणे नव्याने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आले. विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामातील घोटाळ्यावर दाखल याचिकांवर सुनावणी करताना न्या. भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठाने...
  August 24, 08:30 AM
 • नागपूर- महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदियासह छत्तीसगड सीमेवरील भागात अनेक वर्षे हिंसक कारवायांनी दहशत निर्माण करणारा कुख्यात नक्षलवादी पहाडसिंह याने नुकतेच छत्तीसगड पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. त्याच्यावर गडचिरोली पोलिसांकडून १६ लाखांचे, तर छत्तीसगड पोलिसांकडून २५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. मागील पाच वर्षांपासून त्याला शरण आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाल्याने नक्षली चळवळीला माेठा हादरा बसला अाहे. पहाडसिंह याने गेल्याच आठवड्यात छत्तीसगडच्या...
  August 24, 07:14 AM
 • नागपूर- कुख्यात नक्षलवादी पहाडसिंग याने छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले होते. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये त्याने अनेक नक्षली कारवाया केल्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमा भागात तो सक्रीय होता. पहाडसिंग हा महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगडनक्षल संघटनेचा विशेष विभागीय सदस्य होता. या तीन राज्यांसह ओदिशातील अनेक नक्षली कार्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. पहाडसिंगवर महाराष्ट्र...
  August 23, 03:15 PM
 • अमरावती - धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून भिंतींना तडे गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गावात प्रशासनाकडून आपातकालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने बचाव पथक तेथे पाठविले आहे. धारणीनजीक साद्राबाडी गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तात्काळ व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उपविभाग प्रशासनाकडून गावात महसूल व...
  August 23, 05:31 AM
 • अमरावती- अकरा वर्षीय बालिकेला आमिष दाखवून घरात बोलावून अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय चव्हाण (वय २५) या युवकाविरुद्ध तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिवसा पोलिस ठाण्या अंतर्गंत येत असलेल्या खेड्यात अक्षयने सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बालिकेला घरात टिव्ही पाहण्याच्या आमिषाने बोलाविले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला व घटनेचा वाच्यता केल्यास जीवाने मारून टाकण्याची धमकीही अक्षयने बालिकेला दिली होती. दरम्यान पीडितेने घटनेची माहिती पालकांना दिल्यानंतर...
  August 23, 05:31 AM
 • अमरावती - महात्मा गांधी आणि भगतसिंग, गांधी आणि सुभाषचंद्र बोस व गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात खोट्या इतिहासाच्या आधारावर मत बनवून गांधींजीना बदनाम करण्याचेच कारस्थान आजवर करण्यात आले अाहे. नव्या पिढीसमोर आजही चुकीचा इतिहास मांडल्या जात आहे. जातीजातीत व धर्माधर्मात फुट पडण्याचे कारस्थान रचले जात आहे.आपण जितके शिकलो तितक्या जातीच्या भिंती वाढत चालल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वल्लभभाई पटेल नसते तर गांधींजीच्या मारेकऱ्याला कधीच...
  August 23, 05:09 AM
 • नागपूर - या देशात सतत कोणत्या ना कोणत्या संत, महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी खासगी तसेच स्वयंसेवी संस्था आणि सरकारी पातळीवरही साजरी करण्यात येते. त्यासाठी प्रसंगी निधीची तरतूदही केली जाते. पण, शेतकऱ्यांसाठी असलेला शेतकरी दिन साजरा करण्यासाठी मात्र राज्य सरकारजवळ पैसा नाही. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने २१ आॅगस्ट रोजी काढलेल्या शासन निर्णयातील निर्देशांवरून ही बाब उघड झाली आहे. पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कामांचे...
  August 23, 01:34 AM
 • नागपूर - राज्यातील २७ पालिकांच्या क्षेत्रांमध्ये ध्वनी प्रदूषणाचा आढावा घेणारा अहवाल नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व पालिकांना देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नीरीने यापेक्षाही व्यापक संशोधन हाती घ्यावे, अशीही सूचना न्यायालयाने केली आहे....
  August 23, 01:26 AM
 • अमरावती- शहरातील एका २६ वर्षीय डॉक्टर युवतीचा डॉक्टरच असलेल्या युवकासोबत तीन महीन्यांपुर्वी साखरपुडा झाला. दरम्यान युवतीला चिखलदऱ्याला फिरण्यासाठी त्या डॉक्टर युवकाने तगादा लावल्यामुळे युवती त्याच्यासोबत चिखलदऱ्याला गेली. दरम्यान त्याठिकाणी त्याने युवतीसोबत असभ्य वर्तन केले. तसेच पाच लाख रुपये आणखी हुंडा दिला तरच लग्न करणार अशी धमकी दिली होती. त्यामुळे डॉक्टर युवतीने त्याच्याविरुध्द मंगळवारी (दि. २१) फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या डॉक्टर...
  August 22, 12:57 PM
 • अमरावती- जिल्ह्यातील २ हजार लोकसंख्येचे गाव साद्रावाडी येथे आज (दि. २१ आॅगस्ट) पहाटे ४ आणि स. ११.१५ च्या सुमारास पुन्हा भुकंपाचे सौम्य धक्के बसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. याआधी १७ आॅगस्ट रोजी दु. २.३० च्या सुमारास भूकंपाचे काही क्षण पाच सौम्य धक्के बसल्याने गावातील आदिवासींमध्ये दहशत निर्माण झाली होती. पाच दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा भुकंपाचे धक्के बसल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून गावकऱ्यांना धीर देण्यासोबतच भुकंप आल्यास बचाव कसा करायचा याच्याही उपाययोजनांची...
  August 22, 12:53 PM
 • अमरावती- जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथील मिलमीली नदीच्या काठावर बेंबळा प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या २०१५ व २०१६ च्या शासन निर्णयानुसार ३७० घरांचा मोबदला अद्याप मिळाला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त असून मोबदल्याच्या मागणीसाठी ५ सप्टे. रोजी मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी िनवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. १९५९, १९८२, १९८८, २००५ आणि ११ जुलै २०१८ रोजी ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी संपूर्ण गावालाच पाण्याचा वेढा होता....
  August 22, 12:49 PM
 • नागपूर- महिनाभराच्या विश्रांती नंतर पावसाने सोमवारपासून संपूर्ण विदर्भात दमदार हजेरी लावली. नागपूर शहर आणि जिल्ह्यासह संपूर्ण पूर्व विदर्भात मुसळधार पावसामुळे नद्या, नाले दुधडी भरून वाहायला लागले. तर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. भंडारा जिल्ह्यात पावसाने कहर केला. जिल्ह्यातील राजे दहेगाव येथे घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच घरातील तीघे ठार झाले. तर तिराेडा तालुक्यातील मुरमाडी गावात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. नागपूर शहर तसेच जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार लागली...
  August 22, 12:39 PM
 • अमरावती- शहरातील एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा डॉक्टर असलेल्या तरुणासोबत तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. तरुणीला चिखलदऱ्याला फिरण्यासाठी त्या डॉक्टर तरुणाने तगादा लावल्यामुळे तरुणी त्याच्यासोबत गेली. दरम्यान त्याठिकाणी त्याने तरुणीसोबत असभ्य वर्तन केले. तसेच पाच लाख रुपये आणखी हुंडा दिला तरच लग्न करेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे डॉक्टर तरुणीने त्याच्याविरुद्ध मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या डॉक्टर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....
  August 21, 10:35 PM
 • नागपूर- हैद्राबाद-सिरोंचा-गडचिरोली या हिरकणी बस आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगाव जवळील नाल्यावरील पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही बस हैदराबादहून गडचिरोलीकडे जात होती. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 20 प्रवाशी होती. गावकर्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांसह चालक-वाहकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता घडली. सोमवारी सकाळी ही परत येत असताना आलापल्लीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या नंदीगावजवळील नाल्यावरील पुराच्या पाण्यात अडकली....
  August 21, 04:29 PM
 
जाहिरात

RECOMMENDED