जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर -पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली. ऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या...
  April 3, 08:58 AM
 • चंद्रपूर - येथील बल्लारपूर परिसरात एका शिक्षकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलींना फासावर लटकवून मारले. यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. बल्लारपूर येथे आपल्या पत्नी आणि 2 मुलींसह सुखात राहणारा शिक्षक असे करेल याचा विचारही कुणी केला नव्हता. परंतु, पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा या सुखी संसाराचे दुसरेच सत्य समोर आले. हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची पत्नी काही दिवसांपूर्वीच एका ड्रायव्हरसोबत घर सोडून पसार झाली होती. त्याच गोष्टीच्या रागात...
  April 2, 02:41 PM
 • नागपूर -भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणूक प्रचारात वर्धा येथून रालोआच्या प्रचाराचा श्रीगणेशा करताना यूपीए सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा समाचार घेतला हाेता. पाच वर्षांनंतर याच ठिकाणाहूून प्रचाराचा नारळ फोडताना पंतप्रधानपदी असलेल्या मोदी यांचे बहुतांशी भाषण सरकारच्या उपलब्धींचा पाढा वाचण्याऐवजी राजकीय टीका- टिप्पणींवरच अधिक भर देणारे ठरले. काँग्रेस व राष्ट्रवादीमुळेच राज्यात विशेषत: विदर्भात दुष्काळाचे संकट ओढावल्याचा आराेप त्यांनी...
  April 2, 10:42 AM
 • अमरावती - भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच परिवारातील आहेत. लहानपणी ते हरवलेले भाऊ होते आणि आता एकमेकांना भेटले आहेत. प्रत्येक ठिकाणी क्लब करून ते निवडणुका लढवत असून, यांच्या क्लबचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत, अशी घणाघाती टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी (दि. १) अमरावतीत केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. अमरावतीच्या निवडणुकीत आमची लढत अपक्ष उमेदवारासोबत आहे, असेही ते म्हणाले. अकॅडिमक हायस्कूलच्या...
  April 2, 09:59 AM
 • नागपूर-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभाग तसेच अन्य तपास यंत्रणांकडूनक रण्यात आलेल्या कारवाईमध्ये आतापर्यत िवदर्भात २ कोटी ५४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती या रकमेविषयी नीट माहिती न देऊ शकल्यामुळे तसेच कोणतीही कागदपत्रे सादर न करू शकल्यामुळे ही रोकड आयकर खात्याकडे सोपविण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विदर्भात सर्वप्रथम कारवाई सावनेर तालुक्यात करण्यात आली. २८ मार्च रोजी सावनेर येथे ८० लाख रुपयांची रोकड यंत्रणेने जप्त...
  April 2, 09:17 AM
 • वर्धा -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कधीकाळी आपले राजकीय गुरू म्हणून आदराने उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी साेमवारी वर्धा येथील महायुतीच्या जाहीर सभेत केवळ राष्ट्रवादीतील गृहकलह व शरद पवारांच्या कुुटुंबातील वादावर भाष्य केले. शरद पवार यांची आता पक्षावरील पकड निसटत चालली असून, पुतण्या अजित पवार यांनी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी पवारांचीच हिट विकेट घेतली, अशी टीका माेदींनी केली. भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ माेदी यांची महाराष्ट्रातील पहिलीच सभा...
  April 2, 08:12 AM
 • वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील प्रचार सभेत काँग्रेससह राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी सांगितले, की दोन्ही पक्षांमध्ये व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे. आणि असे करताना ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. काँग्रेसने देशातील कोट्यवधी लोकांवर हिंदू दहशतवादाचा डाग लावण्याचा प्रयत्न केला. हिंदू कधी दहशतवाद करू शकतो? इतिहासात अशी एकही घटना घडली आहे का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर अनेक मान्यवर सहभागी होते....
  April 1, 01:23 PM
 • नागपूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमचा केवळ वापर करून घेतला. परिवारात मुस्लिम लोकांना केवळ शोपीस म्हणून स्थान असल्याचा आरोप करीत संघ परिवारातील मुस्लिम संघटना असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या नागपुरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुस्लिम समाजात काम वाढवण्यासाठी संघाने काही वर्षांपूर्वी देशपातळीवर मुस्लिम राष्ट्रीय मंच स्थापन केला. या मंचाचे नेतृत्व संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत मंचाने भाजपसाठी काम हाती...
  April 1, 11:57 AM
 • नागपूर - महाराष्ट्रातील विदर्भात पाेहोचलाे तेव्हा दुष्काळाची चाहूल लागली हाेती. शेतकरी आत्महत्येमुळे हा भाग कुप्रसिद्ध आहे. तीन वर्षांपासून या भागात दुष्काळ आहे. येथील फक्त जमीनच काेरडी झाली नाही तर शेतकऱ्यांची स्वप्नेही पापडी बनवून उखडू लागली आहेत. नागपुरात राहणारे शाहदेव रागात म्हणतात, सरकार तर आम्हाला मृतप्राय समजत आहे. आम्हाला विचारताे तरी काेण? म्हणण्यास दाेन हेक्टरची जमीन आहे. डाळिंबाची शेती करताे. परंतु मिळते काय? शाहदेव यांना जेव्हा शेतकरी सन्मान याेजनेसंदर्भात विचारले...
  March 26, 09:47 AM
 • नागपूर -मी जनतेचा उमेदवार असून जनताच मला निवडून आणेन, असा विश्वास भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मला जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले. अर्ज भरतानाच इतकी मोठी उपस्थिती पाहून मी भारावून गेलो आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद, प्रेम, सदिच्छा व शुभेच्छा हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे, असे गडकरी म्हणाले. नितीन गडकरी राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गडकरी राज्यात न भूतो न...
  March 26, 08:48 AM
 • नागपूर -सांप्रदायिकता, जातीयता आणि परिवारवाद (घराणेशाही) ही सध्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. सध्या महाराष्ट्र किंवा देशाच्या पातळीवरही जी घराणेशाही सुरू आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. अनेक नेत्यांची मुले राजकारणात येत आहेत. तुम्ही कुणाचा मुलगा असणे हा गुन्हा नाही, हे मला मान्य. पण, निवडणुकीतील उमेदवारीची मागणी जनतेतून आली पाहिजे. ती आई-वडिलांच्या पुण्याईवर नको. याचा साऱ्याच राजकीय पक्षांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. अगदी भाजपनेही.. असे परखड मतकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
  March 23, 10:07 AM
 • नागपूर- निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोच. चार्टर्ड विमान अथवा हेलिकॉप्टरने रोख रक्कम वा मौल्यवान वस्तुंच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयकर विभागाने सर्वच विमानतळांवर एअर इंटेलिजन्स युनिट तैनात केले आहेत. आयकर विभागाच्या नागपूर प्रदेश कार्यालयाने ही माहिती दिली. निवडणुकीतील काळ्या पैशावर नियंत्रणासाठी आयकर विभागाने चोवीस बाय सेव्हन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात सर्वसामान्यांकडून तक्रारी स्वीकारल्या जाणार असून त्यासाठीचे हेल्पलाईन...
  March 20, 11:11 AM
 • नागपूर- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या खासदारांपैकी संपत्तीत सर्वाधिक वाढ जाहीर करणार्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या तिसर्या तर सातार्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे पाचव्या क्रमांकावर आहेत. सुप्रिया सुळे यांची संपत्ती ५१ कोटींवरून (२००९) २०१४ मध्ये ११३ कोटींवर पोहोचली असून संपत्तीतील ही वाढ १२१ टक्के आहे. तर उदयनराजेंच्या संपत्तीत ११ कोटींवरून (२००९) ६० कोटींची (२०१४) म्हणजेच ४१७ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. नॅशनल...
  March 19, 05:05 PM
 • अमरावती- अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष आघाडीच्या गोट्यात गेला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात लोकसेभच्या रिंगणात उतरवले आहे. मागील लोकसभा निवडणूकीत नवनीत राणा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून लढल्या होत्या, पण त्यांच्या शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पराभव केला होता. तरिदेखील नवनीत राणा यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आणि पाच वर्षांपासून अमरावती जिल्हा पिंजून काढत आहेत. मागील पाच...
  March 17, 06:16 PM
 • नागपूर- काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारास केवळ तीनच महिने आमदारकी मिळणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीचा खटाटोप कशाला करावा, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे काटोलची पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी करावी अथवा कुणीही उमेदवारी अर्जच दाखल करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने अर्ज दाखल करावा, त्याला...
  March 17, 12:43 PM
 • नागपूर /अमरावती - आमच्याकडे डोळा मारणारे कोणी नाही. आम्ही डोळा मारून नाही, तर डोळ्याला डोळे भिडवून काम करतो, असे सांगतानाच महाराष्ट्रात संपूर्ण ४८ जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. शुक्रवारी नागपूर व अमरावती येथे भाजप-सेना पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलन मेळाव्यात ते बोलत होते. नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
  March 16, 11:30 AM
 • नागपूर - आज जागतिक निद्रा दिवस आहे. लवकर येणारे म्हातारपण व अपुरी झोप एकमेकांशी निगडित असल्याचे नव्याने झालेल्या संशोधनात समोर आल्याची माहिती डिपार्टमेंट आॅफ रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिनचे िवभागप्रमुख व निद्रातज्ज्ञ डाॅ. सुशांत मेश्राम यांनी दिली. ते म्हणाले, अपुऱ्या झोपेचा परिणाम लवकर वयस्कर दिसण्यात होतो. टेलोमिअर हा वयाशी संबंधित घटक पदार्थ मानवी डीएनएच्या दोन्ही टोकाला असतो. डीएनएची साखळी टेलोमिअरच्या दोन्ही टोकांशी जोडलेली असते. अपुऱ्या व खंडित झोपेमुळे या टेलोमिअरची...
  March 15, 09:48 AM
 • नागपूर - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी आघाडीचे सर्व पर्याय संपल्याचे जाहीर केले आहे. आताची काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष राहिली नसून त्यांनी साॅफ्ट हिंदुत्व स्वीकारलेले असल्याने त्यांच्याशी साेबत नकाेच, असे सांगताना संघाला घटनेच्या चाैकटीत आणण्याची काँग्रेसची इच्छाच नव्हती, आम्हाला मसुदा तयार करण्यास सांगितल्याचे नाटक केलेे, असा आराेपही आंबेडकर यांनी केला. त्यांच्याशी झालेला संवाद.... प्रश्न : संघाला संिवधानाच्या चौकटीत आणण्याच्या तुमच्या मागणीवर...
  March 14, 12:13 PM
 • नागपूर - सीसीटीव्ही सर्व्हिलन्स हे राज्यातील पोलिस दलासाठी फोर्स मल्टिप्लायर ठरत असून प्रत्येक जिल्ह्यात सीसीटीव्ही प्रकल्पासह कमांड आणि कंट्रोल रूमची व्यवस्था असावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे देणार असल्याची माहिती राज्याचे नवे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी नागपुरात मंगळवारी दिली. सध्या मुंबईसह निवडकच शहरांतच सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्यवस्था कार्यरत आहे. मुंबईत अनेक संवेदनशील गुन्हे उघडकीस होण्यास या यंत्रणेची मदत होत आहे. एक प्रकारे ही व्यवस्था राज्य पोलिस दलासाठी...
  March 13, 10:41 AM
 • अमरावती - दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने पुण्यात शिकत असलेल्या मुलाला पैसे पाठवू शकत नसल्याच्या विवंचनेतून अमरावतीमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षकाने (एएसआय) गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिस आयुक्त व उपायुक्तांची नावे लिहून ठेवली आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. रामसिंग गुलाबसिंग चौहान (५६) असे आत्महत्या करणाऱ्या एएसआयचे नाव असून ते कोतवाली ठाण्यात कार्यरत होते. ३२ वर्षांपासून ते पोलिस...
  March 12, 02:02 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात