Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नवापूर (नंदुरबार)- तालुक्यातील घनराट येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत पाचवीत शिकणा-या विद्यार्थ्यावर 4 कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अनिकेत नाईक असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो भांगरपाडा येथील रहिवासी आहे. रविवारी संध्याकाळी अनिकेतवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. रविवारी संध्याकाळी आश्रम शाळेमागील उष्टे अन्न खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुत्रे जमा झाले होते. यादरम्यान येथे शौचालयासाठी गेलेल्या अनिकेतवर चार ते पाच कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर...
  August 13, 10:06 PM
 • अमरावती- एक महिन्यांपूर्वीच गुन्हे शाखेने किशोर वायाळ नामक एका अट्टल घरफोड्याला पकडून त्याच्याकडून तब्बल ९३१ ग्रॅम सोने जप्त केले होते. दरम्यान रेल्वे पोलिसांनी पकडलेल्या एका दुचाकी चोरट्याला चार दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. सुरूवातीला एकच दुचाकी चोरली, असे सांगणाऱ्या या चोरट्याकडून शहरातून चोरी गेलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी मेळघाटातून जप्त केल्या असून, अजूनही अनेक दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पिंट्या मुंगीलाल कास्देकर (२५, रा. देडपाणी, मेळघाट) असे...
  August 13, 12:32 PM
 • अमरावती- मेळघाटातील धारणी, चिखलदरा येथील ११६ पैकी ८६ ग्रामपंचायतींना आतापर्यंत भारत दूर संचार निगमद्वारे (बीएसएनएल) फायबर आॅप्टिक कनेक्टिव्हीटी देण्यात आल्याने या भागातील बहुतांश अडचणी संपुष्टात आल्या आहेत. विशेषत: येथे नरेगांतर्गत काम करणारे कामगार मोठ्या संख्येत आहेत. त्यांना मजुरी देण्यात इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसल्याने अडचणी यायच्या त्याही आता मोठ्या प्रमाणात दूर झाल्या आहेत. इंटरनेट, मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे आजवर मेळघाटात असलेल्या गावांचा मुख्यालय अमरावतीशी संपर्क...
  August 13, 12:30 PM
 • नागपूर- आजची पिढी सोशल मीडिया, त्यांचे छंद आणि आरामदायी आयुष्याला अधिक महत्त्व देते, अशी नेहमी चर्चा असते. मात्र, सामाजिक दायित्वापोटी पुढाकार घेणारी युवामंडळीही सध्या काम करत आहेत. याचा प्रत्यय नागपुरात ट्विंकल फाउंडेशनच्या माध्यमातून दिसून येतो. विविध ठिकाणी नोकरी करत असलेल्या युवा मंडळींनी सुमारे शेकडो मुलामुलींची भीक मागण्याच्या आणि देहविक्रयाच्या कामातून केवळ सुटका करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे ३० सदस्य या मुलांना शिकवतात, त्यांचे...
  August 13, 06:36 AM
 • नागपूर- राफेल विमान खरेदीत मोदी सरकारने १ लाख ३० हजार कोटींचा घोटाळा असून त्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नागपुरात केली. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास या कराराचा पुनर्विचार करण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. चतुर्वेदी म्हणाल्या, यूपीए सरकारच्या कार्यकाळात एका राफेल विमानासाठी ५२६ कोटी रुपयांच्या किमतीचा प्रस्ताव होता. मोदी सरकारच्या काळात तो १६७० कोटींवर कसा...
  August 13, 06:26 AM
 • अमरावती - बडनेरापासून जवळच असलेल्या उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी घोणस या विषारी सापाची तब्बल ३६ पिल्लं शुक्रवारी (दि. १०) आढळून आली. जहाल विषारी असलेल्या या पिल्लांना व मादी सापाला वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या वन विभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. पावसाळा हा काळ सापांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल असतो. त्यामुळेच जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान विविध जातीचे साप प्रजनन करून अंडी देतात तर काही साप थेट पिल्लांना जन्म घालतात. दरम्यान घोणस प्रजातीमधील...
  August 12, 01:09 PM
 • नागपूर - नागपूर कारागृहात कैदेत असलेला माओवादी नेता प्रा. साईबाबा याच्या सुटकेसाठी माओवाद्यांचे प्रयत्न सुरूच अाहेत. त्याला कसेही करून आंध्र प्रदेशातील कारागृहात स्थानांतरित करायचे व नंतर तेथून त्याची सुटका करायची, अशी माओवाद्यांची रणनीती असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. भीमा कोरेगावप्रकरणी नागपुरात अटक माओवादी नेता सुरेंद्र यांच्या पत्रातून ही बाब उघड झाली आहे. नागपूर खंडपीठात पोलिसांकडून सादर दस्तऐवजातून त्याची माहिती देण्यात आली आहे. देशद्रोहाच्या आरोपावरून गडचिरोली...
  August 12, 09:11 AM
 • वाशिम- मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी 10 ऑगस्ट रोजी 23 पैकी 20 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दोघांना निर्दोष ठरविण्यात आले तर एकाचा कारागृहातच नैसर्गिक मृत्यू झाला होता. 20 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची ही घटना बहुधा विदभार्तील पहिलीच असू शकते. सोमनाथ नगर (ता.मानोरा जि. वाशिम) येथील देविदास दुधराम चव्हाण यांनी 2012मध्ये सरपंच मिलिंद मधुकर चव्हाण व जनार्दन...
  August 11, 02:48 PM
 • अमरावती- अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमधून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या सात जागांकरिता ११ ऑगस्टला निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने अंतरित स्थगनादेश दिल्याने शनिवार, दि. ११ ऑगस्टला होणारी निवडणूक टळली आहे. चार अधिष्ठातांचा मतदार म्हणून समावेश केल्याने त्यावर आक्षेप तक्रारकर्त्याने घेतला आहे. यामध्ये डॉ. एफ. सी. रघुवंशी, डॉ. डी. डब्लू. निचित, डॉ. मनिषा काळे, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांचा समावेश आहे. अपात्र असताना मतदार यादीत या चार अधिष्ठातांचा...
  August 11, 01:20 PM
 • नागपूर- विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विदर्भासाठी ९५८ कोटी ७८ लाख रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर विभागासाठी ६४४ कोटी ९५ लाख आणि अमरावती विभागासाठी ३०२ कोटी ८३ लाख रुपये असल्याची माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा नागपूर विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह, मंडळाचे तज्ञ सदस्य डॉ. रविंद्र कोल्हे, डॉ. कपील...
  August 11, 01:14 PM
 • अमरावती- फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीचे शहरातीलच परिचित युवकाने वर्षभरापूर्वी अपहरण केले. त्यानंतर काही दिवस ते सोबत राहिले. या दरम्यान युवकाने अत्याचार केला तसेच गर्भपातही केला. इतकेच नाही तर त्याने मारहाण केल्याची तक्रार युवतीने बुधवारी (दि. ८) फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात केली. तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुध्द गंभीर गुन्हे दाखल केले आहे. विजयकुमार रमेश चंद्र चौधरी (२२, रा. फ्रेजरपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. फ्रेजरपुरा...
  August 10, 12:21 PM
 • उमरखेड (यवतमाळ) - मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरूवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. यानिमित्ताने राज्यभरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी चक्क जाम व ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे बंदची कल्पना नसलेल्या अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. तास-तासभर त्यांना रस्त्यावर अडकून रहावे लागले. मात्र उमरखेड तालुक्यात बंद कसा असावा याचे एक आगळेच उदाहरण मराठा आंदोलकांनी दाखवून दिले आहे. उमरखेड तालुक्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावर गुरूवारी सकाळी 7 वाजल्यापासून...
  August 10, 11:14 AM
 • नागपूर- सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आयोजित नागपूर बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. महाल, इतवारी, गांधीबागसह बहुतांश भागात व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाले. पण तुरळक प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. दरम्यान मानकापूर येथे काही आंदोलकांनी हाय स्पीड रेल्वेसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला. आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. साडेबारा ते पाऊण वाजताच्या सुमारास काही...
  August 10, 07:55 AM
 • नागपूर- सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आयोजित नागपूर बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. महाल, इतवारी, गांधीबागसह बहुतांश भागात व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाले. पण तुरळक प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. दरम्यान मानकापूर येथे काही आंदोलकांनी हाय स्पीड रेल्वेसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला. आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. साडेबारा ते पाऊण वाजताच्या सुमारास काही...
  August 10, 07:42 AM
 • अमरावती- गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीवर तिच्या सावत्र बापानेच वाईट नजर टाकली. दरम्यान बुधवारी (ता. 8) या सावत्र बापाने तरुणीचा विनयभंग करून तिच्या हातावर चाकूने वार केला. यात पीडिता जखमी झाली आहे. या प्रकरणी सावत्र बापाविरुद्ध विनयभंग तसेच चाकूने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी, तिची आई, सावत्र वडील तसेच तेरा वर्षाच्या सावत्र भावासोबत गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे. अठरा वर्षांपूर्वी पीडित मुलीचे वडील घर सोडून निघून...
  August 9, 08:09 PM
 • नवापूर (नंदुरबार) - जागतिक आदिवासी गौरव दिन नवापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने नवापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 25 हजारांहून अधिक आदिवासी बांधव आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. यावेळी आदिवासी तरुणींनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. पारंपरिक शस्त्र कुर्हाड, धनुष्यबाण, कोयता, तलवार, बंदूक असे अनेक प्रकारचे शस्त्र हाती घेऊन आदिवासी मिरवणूक नृत्य सादर करीत होते. पारंपरिक...
  August 9, 04:27 PM
 • अकोला- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही सकाळपासून कडकडीत बंद पाळला जात आहे. मात्र, अकोटमध्ये मराठा आंदोलनाचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके ऐकायला मिळाले. आंदोलक वधू-वरांना आंदोलनस्थळी एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. मिळालेली माहिती अशी की, अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडे हिचा विवाह आज गांधीग्रामच्या अभिमन्यू अढाव...
  August 9, 03:46 PM
 • नागपूर- आजघडीला राज्यातील बहुतांश पाणी पुरवठा योजना डबघाईला आलेल्या आहेत. लाभार्थ्यांनी पाणीपट्टी न भरणे हे यातील प्रमुख कारण आहे. थकीत पाणीपट्टीमुळे अनेक योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडतात. हे प्रकार टाळण्यासाठी यापुढे राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या लाभार्थ्यांना पाणीपट्टी भरण्याची वैयक्तिक हमी लिहून द्यावी लागेल. तसे परिपत्रकच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जारी केले आहे. यामुळे पाणीपट्टी वसुलीत हयगय करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे धाबे दणाणले आहे....
  August 9, 12:31 PM
 • नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. पण, आता त्यांची प्रेरणा घेत या भागातील अन्य मुलेही विविध क्षेत्रांत प्रगतीसाठी सज्ज झाली. आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांत प्रोत्साहन देण्याच्या मिशन शक्तीअंतर्गत ब्रह्मपुरीतील ऋषिकेश, विजयालक्ष्मी येरमे हे दोघे बहीण-भाऊ अथेन्स येथे आॅक्टोबरमध्ये अायाेजित आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागीसाठी जाणार आहेत. दोघांचा इथपर्यंतचा प्रवास रोमांचक आहे. वडील...
  August 9, 12:09 PM
 • नागपूर- आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे हे माहीत करून घ्यायचे असेल तर १५ आॅगस्टपासून नागपूर येथील रामन विज्ञान केंद्रात येऊन जाणून घ्या. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त तीनच टक्के शुद्ध पाणी पिण्यासाठी कसे काय उरलेय याची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असेल. नागपूरच्या रामन विज्ञान केंद्रात पाण्याची उत्पत्ती, उपयोग, पाणी प्रदूषण, पाण्यामुळे होणारे रोग, दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारे जमिनीतील पाणी...याविषयी सविस्तर माहिती देणारे एक प्रदर्शन कायमस्वरूपी साकारले आहे. येत्या १४...
  August 9, 07:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED