Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • अमरावती- गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीवर तिच्या सावत्र बापानेच वाईट नजर टाकली. दरम्यान बुधवारी (ता. 8) या सावत्र बापाने तरुणीचा विनयभंग करून तिच्या हातावर चाकूने वार केला. यात पीडिता जखमी झाली आहे. या प्रकरणी सावत्र बापाविरुद्ध विनयभंग तसेच चाकूने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी, तिची आई, सावत्र वडील तसेच तेरा वर्षाच्या सावत्र भावासोबत गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे. अठरा वर्षांपूर्वी पीडित मुलीचे वडील घर सोडून निघून...
  August 9, 08:09 PM
 • नवापूर (नंदुरबार) - जागतिक आदिवासी गौरव दिन नवापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने नवापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 25 हजारांहून अधिक आदिवासी बांधव आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. यावेळी आदिवासी तरुणींनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. पारंपरिक शस्त्र कुर्हाड, धनुष्यबाण, कोयता, तलवार, बंदूक असे अनेक प्रकारचे शस्त्र हाती घेऊन आदिवासी मिरवणूक नृत्य सादर करीत होते. पारंपरिक...
  August 9, 04:27 PM
 • अकोला- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही सकाळपासून कडकडीत बंद पाळला जात आहे. मात्र, अकोटमध्ये मराठा आंदोलनाचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके ऐकायला मिळाले. आंदोलक वधू-वरांना आंदोलनस्थळी एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. मिळालेली माहिती अशी की, अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडे हिचा विवाह आज गांधीग्रामच्या अभिमन्यू अढाव...
  August 9, 03:46 PM
 • नागपूर- आजघडीला राज्यातील बहुतांश पाणी पुरवठा योजना डबघाईला आलेल्या आहेत. लाभार्थ्यांनी पाणीपट्टी न भरणे हे यातील प्रमुख कारण आहे. थकीत पाणीपट्टीमुळे अनेक योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडतात. हे प्रकार टाळण्यासाठी यापुढे राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या लाभार्थ्यांना पाणीपट्टी भरण्याची वैयक्तिक हमी लिहून द्यावी लागेल. तसे परिपत्रकच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जारी केले आहे. यामुळे पाणीपट्टी वसुलीत हयगय करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे धाबे दणाणले आहे....
  August 9, 12:31 PM
 • नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. पण, आता त्यांची प्रेरणा घेत या भागातील अन्य मुलेही विविध क्षेत्रांत प्रगतीसाठी सज्ज झाली. आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांत प्रोत्साहन देण्याच्या मिशन शक्तीअंतर्गत ब्रह्मपुरीतील ऋषिकेश, विजयालक्ष्मी येरमे हे दोघे बहीण-भाऊ अथेन्स येथे आॅक्टोबरमध्ये अायाेजित आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागीसाठी जाणार आहेत. दोघांचा इथपर्यंतचा प्रवास रोमांचक आहे. वडील...
  August 9, 12:09 PM
 • नागपूर- आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे हे माहीत करून घ्यायचे असेल तर १५ आॅगस्टपासून नागपूर येथील रामन विज्ञान केंद्रात येऊन जाणून घ्या. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त तीनच टक्के शुद्ध पाणी पिण्यासाठी कसे काय उरलेय याची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असेल. नागपूरच्या रामन विज्ञान केंद्रात पाण्याची उत्पत्ती, उपयोग, पाणी प्रदूषण, पाण्यामुळे होणारे रोग, दिवसेंदिवस कमी कमी होत जाणारे जमिनीतील पाणी...याविषयी सविस्तर माहिती देणारे एक प्रदर्शन कायमस्वरूपी साकारले आहे. येत्या १४...
  August 9, 07:06 AM
 • अमरावती- आपल्या विरुद्ध खा. आनंदराव अडसूळ यांनी दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी ७ ऑगस्टला सकाळी ९ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयापुढील बीएसएनएल टॉवरवर चढलेला नीलेश भेंडे हा तरुण एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांची यशस्वी मध्यस्थी खा. आनंदराव अडसूळ यांनी नीलेशवरील गुन्हा परत घेत असल्याचे पत्र पाठवल्यानंतर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास खाली उतरला. त्यामुळे ७ तास रंगलेल्या या नाट्यावरील पडदा पडला. सोमवारी आ. राणा व खा. अडसूळ यांच्यात...
  August 8, 12:22 PM
 • नागपूर- जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या अजिंठ्यातील लेण्या, शिल्प व चित्रांवर काळानुरूप झालेला प्रदूषणाचा थर काढून टाकण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंचा वापर केला जाणार आहे. जिवाणूंचा वापर करून होणाऱ्या बायो क्लिनिंगमुळे प्राचीन शिल्पांना धोका न पोहोचवता या कलाकृतींचे गतवैभव बऱ्याच प्रमाणात प्राप्त करता येईल, असा विश्वास नागपुरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वैज्ञानिकांना वाटत आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व महत्त्वाच्या...
  August 8, 12:15 PM
 • नागपूर- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजकडून ९ ऑगस्टला क्रांतीदिनी नागपूर बंदचे आवाहन केले आहे. बंद शांततेत पार पडेल, अशी ग्वाही सकल मराठा समाजतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ९ ऑगस्टला बंदची माहिती देताना सकल मराठा समाजच्या प्रतिनिधींनी सांगितले की, राज्य शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. आरक्षण देण्याची प्रक्रिया धिमी आहे. त्यामुळे सकल मराठा समाजने जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर महाराष्ट्र बंद ची हाक दिली . त्याअंतर्गत नागपुरात ९ ऑगस्टला बंद चे आवाहन केले....
  August 8, 12:03 PM
 • महागाव- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी महागाव तालुक्यातील करंजखेड येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन केले. विशेष म्हणे दरम्यान, कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला आहे. या मागणीकरिता सद्यःस्थितीत राज्यातील सकल मराठा समाजाच्या ७ तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे....
  August 7, 12:50 PM
 • अमरावती- सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती दिनी गुरुवार ९ ऑगस्टला गनिमी काव्याने बंद पाळत ठोक आंदोलन केले जाणार अाहे. अत्यावश्यक सेवेसह अन्य बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने पत्रपरिषदेतून आज (६ ऑगस्ट) आवाहन केले. मराठा समाजाला आरक्षण व विविध ज्वलंत मागण्या सरकारने विनाविलंब त्वरित देण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने या ज्वलंत विषयांवर दिरंगाईचे धाेरण घेऊन तारखा वर तारखा देऊन समाजाची दिशाभूल केल्याचे सकल मराठा समाजाचे म्हणणे आहे. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र...
  August 7, 12:44 PM
 • अमरावती-शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणांविरोधातएका आठवड्यात दुसर्यांदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. खासदार अडसूड यांनी आमदार राणा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याचा आरोप केला आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला आहे. खासदार अडसूळ हे मुंबईतील सिटी बँकेचे अध्यक्ष आहेत. अडसूळ आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी पदाचा गैरवापर करून सीटी बँकेत सुमारे 900 कोटींचा...
  August 7, 12:27 PM
 • नागपूर- मध्य प्रदेश सरकारची लाडली लक्ष्मी, महाराष्ट्र सरकारची सुकन्या समृद्धी योजनेसह राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना मुलींसाठी आहेत. पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सुरू केलेली चंदनकन्या योजना ही एकमेव आहे. महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाने यासाठी पुढाकार घेतला असून सुरुवातीला केवळ सभासदांसाठी असलेली ही योजना आता सभासद नसलेल्या राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांसाठी सुरू केल्याची माहिती संघाचे समन्वयक संचालक अमोल रोंघे यांनी दिव्य मराठीला दिली. महाराष्ट्र चंदन उत्पादक...
  August 7, 09:19 AM
 • नागपूर- महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन व्यापक प्रमाणात तपासणीचा राज्यातील पहिलाच प्रयोग नागपुरात केला जाणार आहे. त्यासाठी तपासणीची उपकरणे असलेल्या ८ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यात महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी राज्य सरकारने सामाजिक पातळीवर व्यापक जनजागृती सुरु केली आहे. तपासणीची मोहिम व्यापक प्रमाणात हाती घेण्याची...
  August 6, 12:45 PM
 • नागपूर- शासनाच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६३ हजार ६९२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, या शेतकऱ्यांंचा सात बारा कोरा झाला आहे. जिल्ह्याच्या विकासाची जिल्हा नियोजन समिती राज्य सरकारने ६५० कोटींची करून या जिल्ह्याच्या विकासाला कायम एवढी रक्कम उपलब्ध करून दिली. गेल्या वर्षी नियोजन समितीला प्राप्त ५९५.८८ कोटींपैकी मार्च २०१८ अखेर ५९४ कोटी खर्च करून विकासाची ९९ रक्कम टक्के खर्च करणारी नागपूर ही दुसऱ्या क्रमांकाची नियोजन समिती ठरली...
  August 6, 12:41 PM
 • नागपूर- देशातील प्रमुख शहरांमधील वायुप्रदूषणाचा आढावा घेण्यात आल्यावर राजधानी दिल्लीसह पाटणा, रायपूर आणि महाराष्ट्रातील नाशिक या चार शहरांमध्ये वातावरणातील वायुप्रदूषण शोषून घेणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. ही यंत्रणा उभारल्यामुळे या शहरांमध्ये वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी होण्याची अथवा ते नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वतीने देशभरातील प्रमुख शहरांमध्ये वायूप्रदूषण नियंत्रणाचा प्रकल्प हाती...
  August 6, 11:05 AM
 • नागपूर- अागामी ९२ वे साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार हे आता स्पष्ट झाले आहे. संमेलनासाठी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याची निवड केली होती. मात्र वर्धेने ऐनवेळी माघार घेतली. रविवारी स्थळ निवड समितीने यवतमाळ येथील काही जागांची पाहणी केली. संमेलनासाठी िवदर्भ साहित्य संघा अनेक संस्थांनी निमंत्रणे दिली होती. त्यातील तीन संस्थांनी माघार घेतल्यामुळे उर्वरित सहामधून वर्धा आणि यवतमाळ निवडण्यात आले होते. राजकीय आणि आर्थिक पाठबळाअभावी विदर्भ साहित्य संघाच्या...
  August 6, 06:04 AM
 • अमरावती - खासदार अानंदराव अडसूळांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणाला रामराम ठोकत घरी बसेल, असे आमदार रवी राणा पत्रपरिषदेत शनिवार ,दि. ४ ऑगस्टला म्हणाले. पत्नी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरुन सुरू असलेल्या राजकीय द्वंदाबाबत राणा यांनी पत्रपरिषदेत खासदार अडसूळांवर पलटवार करीत खंडणी, धमकी तसेच १२३ वेळा केलेले कॉल डिटेल्स पोलिस आणि तपास यंत्रणांना देणार असल्याचे राणा यांनी सांगितले. खासदार अडसूळ यांच्या सांगण्यावरून जयंत वंजारी, सुनील भालेराव, कार्तिक शाह यांच्याकडून खंडणी...
  August 5, 01:07 PM
 • चांदूर रेल्वे - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा व्यापक रुप धारण करत आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वत्र मराठा बांधव रस्त्यावर उतरु लागला आहे. अमरावती जिल्ह्यातही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटू लागले आहेत. धामणगाव पाठोपाठ शनिवारी (दि. ४) शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान काही मोर्चेकऱ्यांनी गाडगे बाबा मार्केटमधील दूध डेअरीची तोडफोड केली. पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. संपूर्ण शहर १०० टक्के बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे...
  August 5, 01:05 PM
 • अमरावती - पावसाळाच्याचे प्रमुख दोन महिने उलटल्यानंतरही जिल्ह्यातील प्रमुख पाच धरणे निम्मेही न भरल्याने सध्या चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वर्धा, शहानूर, चंद्रभागा, पुर्णा व सापन प्रकल्पामध्ये सरासरी एकूण केवळ ४१.७० टक्केच जलसाठा निर्माण होऊ शकला आहे. उर्वरित ऑगस्ट व संप्टेबर मध्ये सातपुड्याच्या रांगामध्ये पाऊस न बरल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात वर्धा सर्वात मोठा प्रकल्प असून यातून अमरावती...
  August 5, 01:03 PM
 
जाहिरात

RECOMMENDED