Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक - एकेकाळी गुलशनाबाद अशी ओळख असलेली नाशिक नगरी हरित करण्याबरोबरच सुदृढ युवा पिढीच्या दृष्टीने महापालिकेने तयार केलेल्या ४५१ उद्यानांची सध्या देखभाल-दुरुस्तीअभावी झालेली दुरवस्था लक्षात घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्धा किंवा एक एकरातील शंभरहून अधिक उद्यानांना ऑक्सिजन बूस्टर बनवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या अंतर्गत शहरातील मध्यवर्ती आणि दाट वस्तीमधील सध्या पडीक असलेल्या उद्यानांमध्ये दुर्मिळ अशा वनस्पतींची लागवड केली जाणार असून, जेणेकरून तेथील ऑक्सिजनची पातळी वाढेल...
  10:38 AM
 • नाशिक - मुले दत्तक घेणाऱ्या पालकांमधून लिंगश्रेष्ठत्वाच्या अवास्तव कल्पना हद्दपार होत असून मुलांपेक्षा मुली दत्तक घेण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात कमालीचे वाढले असल्याची सुखद बाब अाधाराश्रमातून मिळालेल्या अाकडेवारीतून पुढे अाली अाहे. काही पालकांना नकाेशा झालेल्या मुली अाता दत्तक चळवळीमुळे हव्याशा झाल्या असल्याचे निदर्शनास येत अाहे. दत्तक देण्याची प्रक्रिया अाॅनलाईन झाल्यापासून अाधाराश्रमात तीन वर्षांच्या काळात ९१ बालके दाखल झाली अाहेत. त्यात ३७ मुली अाणि २३ मुलांना दत्तक...
  10:36 AM
 • नाशिक - सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासह २०१८ व २०१९ या शैक्षणिक वर्षातील दाखल्यांची पडताळणी करण्यासाठी शनिवारी दि. १७ रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे रमाबाई आंबेडकर विद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिराकडे शहरातील महाविद्यालयातील प्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचमान्यतेसाठी आवश्यक असलेली कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही. कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक यंत्रणेवर...
  November 18, 11:10 AM
 • नाशिक -पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटी याेजनेतील कामे करताना सूचना तर साेडा मात्र, साधे लाेकार्पण करण्याची संधीही दिली जात नसल्यामुळे दुखावलेल्या गेलेल्या महापाैर रंजना भानसी यांनी प्राेजेक्ट गाेदा सादरीकरणाच्या निमित्ताने अायाेजित केलेल्या कार्यशाळेत स्मार्ट सिटी कंपनी ही आयुक्त तुकाराम मुंढे व सीईओ प्रकाश थविल या दाेघांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. लाेकांना विश्वासात न घेता कामे करणाऱ्या या दाेन अधिकाऱ्यांवरच भविष्यात शहराचे वाटाेळे...
  November 18, 11:05 AM
 • नाशिक - गेल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्र शासनाने शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर २४ शासन निर्णय जाहीर केले, मात्र पतीच्या आत्महत्येनंतर कोसळलेली शेती आणि फाटलेला संसार सावरण्यासाठी झगडणाऱ्या पीडित महिलांसाठी एकही शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. इतकेच नाही तर रोजच्या जगण्यासाठी आवश्यक आणि मूलभूत गरजांची पूर्तता करणाऱ्या सामाजिक सुरक्षेच्या योजनाही यांच्यापर्यंत पोहोचवण्यात शासनाला अपयश आल्याचे पुढे आले आहे. निमित्त आहे, महिला किसान अधिकार मंच अर्थात मकाम या राष्ट्रीय...
  November 18, 09:16 AM
 • नाशिक- टीव्हीवर यापुढे जेवढे चॅनल पाहायचे असतील, तितकेच पैसे ग्राहकांना महिन्याकाठी माेजावे लागणार अाहेत. १ जानेवारी २०१९ पासून ही याेजना ग्राहकांसाठी देशभरात उपलब्ध हाेणार अाहे. टेलिकाॅम रेग्युलेरिटी अॅथाॅरिटी अाॅफ इंडिया (ट्राय) कडून डायरेक्ट टू हाेम सेवा देणाऱ्या कंपन्या किंवा केबल नेटवर्कचालकांवर यासाठी नवे नियंत्रण अाणले अाहे. यामुळे अाता ग्राहकाला दरमहा १३० रुपये स्थिर अाकार माेजावा लागणार असून, त्यात माेफत असलेले शंभर चॅनल ग्राहकांना मिळतील. तर, प्रत्येक चॅनलला अापल्या...
  November 17, 12:55 PM
 • नाशिक-देशात मी टू चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता दीड महिना उलटला तरीही राज्य महिला आयोगासमोर उपस्थित झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तनाद्वारे लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तनुश्रीने ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर मांडली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनासोबतच तिने राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली. पण आयोगाने बाजू मांडण्यासाठी बोलावणे पाठवून दीड महिना झाला तरी तनुश्री हजर झालेली नाही. दरम्यान, नाना पाटेकरांच्या वकिलांनी...
  November 17, 07:59 AM
 • नाशिक - पुढील आठवड्यात मुंबईत होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकरी महिला रस्त्यावर उतरणार आहेत. महिला किसान आंदोलन मंचाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचे प्रश्न सुटावेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, या उद्देशाने समग्र धोरण वा स्वतंत्र कायदा असावा या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
  November 17, 07:26 AM
 • नाशिक-एकीकडे राज्यातील रहिवासी इमारत ते वाणिज्य वा व्यावसायिक इमारतींतील अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी राज्य शासनाने खास धाेरण अाणले असताना व या धाेरणानुसार प्रकरण दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१८ ही असताना तत्पूर्वी अर्थातच ३१ मे २०१८ राेजीच्या मुदतीत दाखल झालेल्या विखे पाटील फाउंडेशनच्या अंबड लिंकराेडवरील शाळेवर हाताेड्याची तयारी अायुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केल्यामुळे सारेच हादरून गेले अाहेत. सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेचेच एकमेव प्रकरण...
  November 16, 12:01 PM
 • शिर्डी - सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी गुरुवारी सहकुटुंब साईदर्शन घेतले. तसेच एक सुवर्णमुकुटही अर्पण केला.साईबाबांची मी निस्सीम भक्त असून बाबांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण झाल्या असून त्यांनी आयुष्यात सर्वकाही दिले अाहे, अशी प्रतिक्रिया तिने दर्शनानंतर दिली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांची धूपारती केली. साईदर्शनानंतर त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी सत्कार केला. या वेळी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप...
  November 16, 10:38 AM
 • नाशिक- गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर भागात बुधवारी (दि. १४) दुपारी अचानक एका घराला आग लागून मंगळवारी रात्रीच आत्याच्या घरी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या आगीत शेजारची आणखी तीन घरे जळाली आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. हॉटेल रॉयल हेरिटेजमागील परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास भागूबाई आव्हाड यांच्या घराला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घराकडे धाव घेतली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र अल्पावधीत आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांचे...
  November 15, 11:41 AM
 • पंचवटी- उत्तर भारतीयांच्या छटपूजेत शहर व परिसरातील हजारो भाविकांनी गोदाघाटावर विधिवत पूजा करून सूर्याला अर्घ्य दिले. सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देत पूजेला प्रारंभ झाला. सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देत पूजा संपन्न होणार आहे. गोदाघाटावर भाविकांसाठी खास भोजपुरी संगीत कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. कुटुंबियांच्या सुख शांतीसाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी महिला व पुरुष दोघेही सूर्य नारायणाचा उपवास आणि पूजाविधी करत असतात. उत्तर भारतीय बांधवांचा सर्वात मोठा...
  November 14, 10:41 AM
 • नाशिक- हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला चलो अयोध्याची हाक दिली असून त्यास प्रतिसाद देत नाशिकमधून २५०० शिवसैनिक अयाेध्येत जाण्याची तयारी करीत अाहेत. इतकेच नाही तर सेनेने नाशिकराेड रेल्वेस्थानकावरून २३ नाेव्हेंबरला रात्रीची संपूर्ण रेल्वेच बुक केली अाहे. त्यासाठी सुमारे ३० लाखांचा खर्च येणार असून ताे पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार अाहे. अयाेध्येत नाशिककरांना राहण्यासाठी पक्षाच्या वतीने २०० खाेल्यांची अागाऊ...
  November 14, 10:33 AM
 • जायखेडा -सटाणा तालुक्यातील मळगाव भामेरच्या पोहाणे शिवारात रात्री एक-दीडच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने काळवीटाची शिकार केल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले असून मृत काळवीटही मिळाले आहे. इतर सात ते आठ शिकारी दुचाकी सोडून अंधारात फरार झाले आहेत. मळगाव ते पोहाणे या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. या कामासाठी गुजरातमधील काही मजूर आलेले आहेत. ते मजूर अहवा (गुजरात राज्य) येथील सहकाऱ्यांना बोलावून परिसरात रात्री...
  November 12, 06:18 PM
 • नाशिक - एसटी महामंडळाच्या शिवशाही बस आणि अपघात यामध्ये पाठशिवणीचा खेळ सुरूच असून नाशिकहून इंदूरला जाणाऱ्या शिवशाही या स्लीपर कोच बसच्या इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली. रविवारी (दि. ११) रात्री आठला ओझर महामार्गावरील गरवारे पॉईंटवर हा अपघात घडला. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व बारा प्रवासी बचावले. चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करुन तत्काळ अग्निशामक दलास कळवले; मात्र बंब येईपर्यंत बस खाक झाली हाेती. पोलिसांनी दिलेल्या...
  November 12, 11:48 AM
 • सिन्नर-पाकिस्तान लष्कराकडून युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच अाहे. रविवारी दुपारी पाक लष्कराने केलेल्या गोळीबारात काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेला केशव सोमगीर गोसावी (२९) हे शहीद झाले. ते मुळ नाशिक जिल्ह्यातील श्रीरामपूर - शिंदेवाडी (ता. सिन्नर) येथील रहिवाशी हाेते. गाेसावी यांचे पार्थिव सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ओझरच्या विमानतळावर तर त्यानंतर ३ वाजेपर्यंत शिंदेवाडी येथे आणण्यात येईल. केशव हे मराठा बटालियनचे जवान हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, वडील, दोन...
  November 12, 07:37 AM
 • नाशिक-भारतीय लष्कराची क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या M777 A2 अल्ट्रा लाईट हॉविट्झर, K-9 वज्र स्वचलित बंदुका आणि 6X6 युद्धभूमीवरील दारुगोळा ट्रॅक्टर्स शुक्रवारी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी राष्ट्र सेवेत समर्पित केल्या. नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली येथे झालेल्या सोहळ्याला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करी तसेच संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, उत्पादन उद्योगांचे प्रतिनिधी तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरिया सरकारांचे...
  November 10, 07:30 AM
 • नाशिक-काबाडकष्ट करत पै-पै जमवून घेतलेले सोने.... सौभाग्याचं लेणं समजले जाणारे मंगळसूत्र किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर करत घेतलेली दुचाकी असो या वस्तू चोरी गेल्याने सर्वसामान्यांना त्या परत मिळण्याची आशादेखील नसते. मात्र, नाशिक पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि. ५) धनत्रयोदशीच्या मुहूर्त साधत फिर्यादींना तब्बल एक कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चोरी झालेली लक्ष्मी घरी परत येणार असल्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड...
  November 6, 08:26 AM
 • नाशिक विरुद्ध मराठवाडा, अहमदनगर अथवा जळगाव यांच्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरून भडकणारा वाद नवीन राहिलेला नाही. या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय धरणातून थेट जलवाहिनी टाकणे हाच आहे. मान्सूनच्या हंगामात पर्जन्यमानाचे चक्र थोडे जरी उलटसुलट फिरले तरी टंचाईची स्थिती निर्माण होऊन वितंडवाद सुरू होतो. त्याची दाहकता एवढी असते की पाणी वाचवण्यासाठी धरणांच्या प्रभावक्षेत्रातील दुखावलेली मंडळी मागचापुढचा विचार न करता तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतात. त्यातून मग कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न...
  November 6, 06:39 AM
 • नाशिक- महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी राज्यात अनुदान तत्वावर स्वयंसेवी संस्थांची हजारावर बालगृहे आहेत. मात्र चार वर्षापासून बाल कल्याण समित्यांनी प्रवेश प्रक्रीया खडतर केल्याने सुमारे साठ हजार मुलामुलींची दिवाळी सलग चौथ्या वर्षीही अंधारात जात अाहे. या बालकांचे संगोपन करणाऱ्या संस्थांचे अनुदान रखडल्याने ते कर्जबाजारी झाले असून त्यांचंही दिवाळं निघाल्याचे विदारक चित्र अाहे. सन २०१५-१६ पर्यंत राज्यातील बालगृहात सत्तर हजार...
  November 5, 11:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED