Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत मुख्याध्यापकापासून तर शिक्षणाधिकारी पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे, मूळचे कळवण तालुक्यातील मानूर येथील रहिवासी मात्र सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले नारायणराव (दादा) कृष्णाजी पवार (८९) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम रुजविणारे प्रख्यात गायनाॅकाॅलाॅजिस्ट डाॅ. प्रदीप पवार यांचे ते वडील हाेत. मूळचे मानूरचे...
  August 10, 11:12 AM
 • नाशिक- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांत त्याचा तीव्र परिणाम दिसून आला. कुठलेही कामकाज झालेच नसल्याने जनतेची गैरसोय झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लागलीच घरी गेल्याने दिवसभर सर्वच कार्यालयांना कुलूप लावलेले असल्याचे चित्र दिसून आले. सातवा वेतन आयोग लागू करावा, फरक त्वरित द्यावा, जुनी पेन्शन योजना सुरू करावी या...
  August 9, 09:52 AM
 • नाशिक- केवळ तीन फूट ६ इंच उंची असलेल्या महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसुूती नाशिकमध्ये यशस्वी करण्यात अाली अाहे. देशातील ही एका हाताच्या बाेटावर माेजता येणारे तर महाराष्ट्रातील या प्रकारचे हे पहिलेच सिझेरियन असून अतिदुर्मिळ प्रकारात त्याचा समावेश हाेताे. विशेष म्हणजे, ही महिला अाणि तिचे बाळ दाेघेही सुखरूप असून अार्इ बनणे अशक्य असल्याने सराेगसी मदरचा पर्याय तिला काही डाॅक्टरांनी सुचविला हाेता. मात्र, नाशिकच्या डाॅ. हिमांगिनी चाैधरी यांचा अात्मविश्वास अाणि यशस्वी उपचारांमुळेच या...
  August 9, 09:45 AM
 • नाशिक- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा अारक्षणाच्या मागणीकरिता गुरुवारी (दि. ९) ऑगस्ट क्रांतिदिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शांततामय मार्गाने ठिय्या अांदाेलन करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. कुठलाही बंद किंवा चक्का जाम अांदाेलन केले जाणार नसून नाशिक शहरात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना तर ग्रामीण भागात तहसील कार्यालयांसमाेर ठिय्या अांदाेलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार अाहे. गावपातळीवर ग्रामपंचायत...
  August 9, 09:01 AM
 • नाशिक- नाशिक महानगरपालिकेच्या अायुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून गेले सहा महिने शहरात करवाढीसह अनेक मुद्द्यांवरून प्रशासकीय दहशतवाद सुरू अाहे. कामकाजाच्या तणावाखाली कर्मचाऱ्यांचा जीव जात असून सहायक अधीक्षकांच्या अात्महत्येचीही त्यांनी थट्टा केली अाहे. अाता तरी मुंढे यांनी त्यांच्या कामकाजात पंधरा दिवसांत सुधारणा करावी, अन्यथा कर्मचारी बेमुदत काम बंद अांदाेलन करतील. मुंढेंना महापालिकेत प्रवेशबंदी केली जाईल, शहरातील अत्यावश्यक सेवाही बंद पाडल्या जातील, असा...
  August 9, 05:58 AM
 • नाशिक- अनैतिक संबंधांतून रॉकेल ओतल्याने गंभीर भाजलेली कथित प्रेयसी संगीता देवरेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, प्रेयसीची मुलगी प्रीती शेंडगेची प्रकृती गंभीर असून संशयित जलालुद्दीन खान यास अलीगढ येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता देवरे या महिलेचे संशयित जलालुद्दीन खानशी कथित प्रेमससंबध होते. सोमवारी सायंकाळी कालिकानगर फुलेनगर येथे संगीताने १ तारखेला भाडे करारावर खोली घेतली होती. आईला भेटण्यास...
  August 8, 10:37 AM
 • नाशिक- महावितरणकडून वीज नियामक अायाेगाकडे ३० हजार ८०० काेटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात अाला अाहे. १३ अाॅगस्टला यावर नाशिकमध्ये जनसुनवाई हाेत अाहे. जर ही दरवाढ झाली तर मात्र अाैद्याेगिक ग्राहकांसाेबतच घरगुती वीज ग्राहकांना वाढणाऱ्या वीजबिलांचा शाॅक सहन करावा लागणार अाहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांचा वीज वापर महिन्याला केवळ ५० युनिट अाहे, त्यांना तब्बल १.५८ रुपये प्रत्येक युनिटकरिता जास्त माेजावे लागणार अाहेत. यामुळे येत्या काळात सामान्यांचा असंताेष उफाळून येण्याची...
  August 8, 10:35 AM
 • नाशिकरोड- शासकीय कार्यालयातील वर्ग क आणि वर्ग डमधील कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य करण्यासाठी शासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केला अाहे. यासाठी ७ ते ९ आॅगस्टपर्यंत संप पुकारला आहे. नाशिक विभागातील महसूलच्या ८७ टक्के कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याने कार्यालय सुनेसुने हाेते. त्यामुळे आलेल्या नागरिकांना काम न होताच रिकाम्या हाती माघारी परतावे लागत होते. नाशिकरोड येथे असलेल्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयामध्ये फक्त अधिकारीच उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील महसूल...
  August 8, 10:31 AM
 • नाशिक- मराठा आरक्षणासाठी आवश्यक ठरलेल्या समाजाच्या मागासलेपणाची स्थिती सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगापुढे काही निकष महत्त्वाचे ठरणार आहेत. यात समाजाचा सामाजिक स्तर, त्यांच्या व्यवसायाबद्दलचा दृष्टिकोन, मराठा समाजातील स्त्री-पुरुषांचे शारीरिक श्रम, शिक्षणाचे प्रमाण, घरांची स्थिती, प्रकार, जमिनीची मालकी आणि संसाधनांचा तपशील हे २५ निकष निर्णायक ठरणार आहेत. घटनेच्या अनुच्छेद १५ (४) व ३४० (१) नुसार समूहातील सामाजिक - शैक्षणिक मागासलेले वर्ग कोणास म्हणावे याबाबतचे स्पष्ट...
  August 7, 09:44 AM
 • नाशिक- राजकारण व नाेकरशाहीतील अभद्र युतीने भ्रष्टाचाराला बळकटी मिळत असून या व्यवस्थेत तत्वनिष्ठतेने काम करणारा प्रशासकवर्ग दुर्दैवाने दुर्मिळ हाेत चालला अाहे. अशा साहसी, हिंमतवान अाणि जिगरबाज अधिकाऱ्यांना प्राेत्साहन देणारी अाणि भारतीय प्रशासन व्यवस्थेवर अचूक भाष्य करणारी प्रभावी कादंबरी म्हणून अभिजीत कुलकर्णी लिखित रेड टेपकडे बघायला हवे, असे गाैरवाेद्गार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले. गंगापूर राेडवरील...
  August 7, 09:24 AM
 • जळगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्यानंतर आनंदाच्या भरात पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये एकमेकांना जोरदार चिमटे काढण्याची जुगलबंदी सुरू झाली आहे. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये विजयोत्सव साजरा केला जातो त्यामागची भूमिका ही निरलस म्हणा वा स्वच्छ असते. कारण, ज्या पक्षासाठी अन्् त्याच्या विचाराच्या प्रचार व प्रसारासाठी संबंध हयात घालवलेली असते, विरोधक म्हणून अनेक टप्पे-टोमणे सहन केलेली असतात. सत्ताधाऱ्यांच्या...
  August 7, 08:52 AM
 • सिन्नर- सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात पेट्रोल पंपाजवळील वळणावर गॅस टँकर आणि कंटेनरमध्ये भीषण धडक झाली. अपघातात टँकरमधील गॅस गळती झाल्याने आग भडकली. ही घटना सोमवारी सव्वा अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस व अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. टँकरने पेट घेतल्याने आगीचे मोठे लोळ दिसत आहेत. त्यात एक दुचाकी जळल्याचे समजले. या आगीत अन्य वाहने पेटल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सिन्नर- घोटी महामार्गावर वाहतुक...
  August 6, 02:23 PM
 • नाशिक- जुन्या नाशकातील जुन्या तांबट लेनमधील एक वाडा कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले. रविवारी (दि. ५) दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, रुग्णवाहिका अादी यंत्रणा तातडीने बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. वाड्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या तिघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करण घोडके व समर्थ काळे या दाेघांचा ढिगाऱ्याखाली पाच...
  August 6, 11:16 AM
 • नाशिक- आदिवासी विभागात घोटाळे उघडकीस येण्याचे प्रकार सुरुच असून आदिवासी शेतकऱ्यांना डिझेल इंजिन वाटपात तब्बल ४ कोटीचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. शासनाने गायकवाड समितीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशी अहवालात खरेदी बिलात अनियमितता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अहवालानुसार विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांनी दिलेल्या...
  August 6, 11:06 AM
 • नागपूर- देशातील प्रमुख शहरांमधील वायुप्रदूषणाचा आढावा घेण्यात आल्यावर राजधानी दिल्लीसह पाटणा, रायपूर आणि महाराष्ट्रातील नाशिक या चार शहरांमध्ये वातावरणातील वायुप्रदूषण शोषून घेणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. ही यंत्रणा उभारल्यामुळे या शहरांमध्ये वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी होण्याची अथवा ते नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वतीने देशभरातील प्रमुख शहरांमध्ये वायूप्रदूषण नियंत्रणाचा प्रकल्प हाती...
  August 6, 11:05 AM
 • नाशिक- माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय तर पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. पण पक्षाला वाटणे महत्त्वाचे आहे. कारण भाजपमध्ये कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो, अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. आज पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असूनही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याचे सांगून मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच कायम राहतील, असे महाजन म्हणाले....
  August 6, 10:31 AM
 • सायखेडा - गोदाकाठ परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना सायखेडा (निफाड) रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गायीच्या वासरूवर हल्ला केला. या हल्ल्यात वासरूचा जागीच मृत्यू झाला. दशरथ गणपत कुटे यांच्या गट क्रमांक 406 मधील शेती क्षेत्रात रात्री गाय व तिचा वासरू बांधला होता. याच ठिकाणी रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत तीन वर्षांच्या वासरूला ठार मारले. बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केल्यानंतर तो 500 फुटापर्यंत फरपटत नेला. मांजरगाव येथे बिबट्याला पकडल्याची घटना तसेच...
  August 5, 07:21 PM
 • नाशिक - दोन अल्पवयीन मैत्रिणींना रस्त्यात अडवत पाच टवाळखोरांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अशोकनगर बस स्टॉपवर घडला. परिसरातील नागरिकांनी भेदरलेल्या मुलींना सुरक्षित घरी पाठवून दाेन टवाळखाेरांना चांगलाच प्रसाद दिला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तीन टवाळखाेर फरार असून पाच संशयितांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकाराने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत...
  August 5, 12:19 PM
 • नाशिक - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या साथराेगांनी ताेंड वर काढल्याचे बघून अायुक्त तुकाराम मुंढे यांनी अाराेग्य विभागाची चांगलीच झाडाझडती घेत, १५ अाॅगस्टपर्यंत अर्थातच दहा दिवसांत कचऱ्याचे १५७ ब्लॅक स्पाॅट निर्मूलनाचे अादेश स्वच्छता निरीक्षकांना दिले अाहेत. त्यामुळे अाराेग्य विभागाची चांगलीच धावपळ उडाली असून, सायंकाळपर्यंत अाराेग्यधिकारी डाॅ. सचिन हिरे यांच्याकडे मॅरेथान बैठका सुरू हाेत्या. महापालिका क्षेत्रात डेंग्यूने धुमाकूळ घातला असून,...
  August 5, 12:10 PM
 • नाशिक - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाजाच्या सामाजिक-शैक्षणिक स्थितीबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण सुरू झाले असून यासाठी समाजशास्त्रज्ञ म्हणून माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, सांख्यिकी तज्ज्ञ ओमप्रकाश जाधव आणि अंबादास मोहिते यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समाजाच्या स्थितीबद्दल संकलित माहितीच्या पृथक्करणासाठी आयोगासाठी ५० संगणक आणि ५० ऑपरेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या सामाजिक-शैक्षणिक स्थितीची...
  August 5, 10:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED