Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • देवळा (जि. नाशिक)- देवळा शहरापासून ८ किमी अंतरावरील विंचूर - प्रकाशा राज्यमार्गावर भावडबारी घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी दुपारी बस आणि ट्रक यांच्यात समाेरासमोर झालेल्या अपघातात ४ प्रवासी जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. यापैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. नंदुरबार- नाशिक या बसच्या चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समोरून अन्य एक ट्रक आला व त्या ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. धडक इतकी भीषण होती की त्यात बसचा चालकाकडील भाग अक्षरश: कापला गेला. बसमध्ये १९ प्रवासी होते. राहुल...
  September 5, 07:42 AM
 • नाशिक- काेरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ राेजी उसळलेल्या जातीय दंगलीच्या घटनेनंतर तपासी ग्रामीण पाेलिस पथकाला घटनास्थळी हाती लागलेल्या कबीर खान नामक व्यक्तीच्या अाधारकार्डच्या दिशेने तपास केला. महिन्याभरात ७०० ते ८०० अशा वर्णनाच्या व्यक्तीचा शाेध घेतला. मात्र, अशी व्यक्ती अस्तित्वातच नसून केवळ तपासाची दिशा बदलण्यासाठी व नियाेजित दंगल पेटवण्यासाठी या नावाचा साेयीस्कर वापर दंगल घडवणाऱ्यांकडून केला गेल्याची शक्यता यंत्रणेने व्यक्त केली अाहे. या दंगलीच्या चाैकशीसाठी शासनाने...
  September 5, 07:15 AM
 • येवला- वीजचोरी पकडल्याचा राग आल्याने एका व्यावसायिकाने महावितरणच्या पथकातील अधिकाऱ्याला मारहाण करीत जाळण्याचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील देवरगाव येथे मंगळवारी हा प्रकार घडला. वीज चाेरांनी या अधिकाऱ्यासह भरारी पथकातील महिलांनाही मारहाण केली. दरम्यान, पथकाने पाेलिस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत आरोपींना अटक झाली नव्हती. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या देत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी महावितरणचे मनमाड येथील...
  September 5, 06:49 AM
 • ओझर - नाशिक ग्रामीण पोलीस दल व ओझर पोलीस स्टेशनच्या वतीने निफाड तालुका व ओझर मधील होतकरू विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात आले आहे. मंगळवार (दि. 4 सप्टेंबर)पासून गोखले एजुकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेज टाऊनशिप येथील पटांगणात या शिबीरास सुरूवात होत आहे. जास्तीत जास्त तरूण व तरूणींनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे. दररोज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण शिबीर सुरु असणार आहे. हे प्रशिक्षण मोफत...
  September 4, 06:35 PM
 • नाशिक- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेडने साेमवारी मराझ्झाे ही कार बाजारात अाणली अाहे. कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष अानंद महिंद्रा, व्यवस्थापकीय संचालक पवन गाेयंका अाणि अाॅटाेमाेटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वढेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर येथील महिंद्राच्या प्रकल्पात साेमवारी या कारचे सादरीकरण करण्यात अाले. नाशिकच्याच प्रकल्पात उत्पादित हाेत असलेल्या स्काॅर्पिअाेने इतिहास घडविला असून, मराझ्झाेदेखील याची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास अानंद महिंद्रा यांनी यावेळी व्यक्त...
  September 4, 10:25 AM
 • चांदवड- जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाने यशोशिखर गाठता येते. जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचवायचे असेल तर घाम गाळल्याशिवाय पर्याय नाही. तरुणांनी परिस्थितीवर मात करून उच्च ध्येय बाळगावे. गावाचा विचार न करता देशाचा विचार करावा. देशाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्यास गाव आपसूकच बदलेल, असे विचार सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ याने व्यक्त केले. नौकानयन क्रीडाप्रकारात जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दत्तू भोकनळने सुवर्णपदक पटकावले. यामुळे तळेगावरोही या जन्मगावी दत्तूचा संत...
  September 4, 10:16 AM
 • दिंडोरी- तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून परिसरात घबराट पसरली आहे. ज्ञानेश्वर दिघे यांच्या घरातील एक महिला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टोमॅटोच्या शेतात काम करत होती. त्यांच्याजवळ लहान मुलेही खेळत होती. यावेळी शेजारील उसाच्या शेतातून बिबट्याने येत सार्थक ज्ञानेश्वर दिघे (३) याच्यावर जोरदार हल्ला करत त्याच्या मानेचाच लचका पकडत उसाच्या शेतात ओढत नेले. घटना समजताच सार्थकच्या आई व आजीने आरडाओरड केली. आजूबाजूचे शेतकरी जमा झाल्यानंतर...
  September 4, 10:07 AM
 • नाशिक जिल्ह्यासाठी एकेकाळी उपयुक्त ठरलेला एकलहरा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प वयोमानानुसार मरणासन्न अवस्थेत जाऊन ठेपला आहे. साधारणपणे १९७० मध्ये या केंद्राची स्थापना झाली. वयाची जवळपास पन्नाशी गाठलेल्या या प्रकल्पाने जसे प्रारंभीच्या काळात वैभवाचे दिवस पाहिले तद्वतच उतारवयात हलाखीचे दिवसदेखील अनुभवले. दिल्लीकडून रेल्वेने अथवा मुंबई-आग्रा महामार्गावरून चारचाकी वाहनातून नाशिकच्या वेशीत प्रवेश करताना डाव्या बाजूला दूरवर या विद्युत निर्मिती केंद्राच्या पाच चिमण्यांमधून धूर...
  September 4, 08:20 AM
 • नाशिक- चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ करत बनावट फेसबुक अकाउंट बनवून पतीने त्यावरून बदनामी केल्याने पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे हा प्रकार उघडकीस आला. मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीनुसार पाेलिसांनी संशयित पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली अाहे. मनीषा कवडे असे मृताचे नाव आहे. तिला येत असलेले फोन आणि मेसेजवरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत पती प्रशांत आणि सासू भारती यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला....
  September 4, 07:40 AM
 • नाशिक- एकतर्फी प्रेमातून युवतीचा पाठलाग करत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला हटकणाऱ्या भावाला संशयिताने बेदम मारहाण केली. एक्स्लाे पॉइंट, अंबड येथे हा प्रकार घडला. संशयिताच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, एक्स्लाे पॉइंट येथे कंपनी सुटल्यानंतर घरी पायी जात असतांना संशयित सुशील भागवत प्रसाद यादव ( रा. पाथर्डी फाटा) याने दुचाकीवरून ( एमएच १५ एवाय १८८५) घरापर्यंत पाठलाग केला. तू मला बघत...
  September 3, 10:15 AM
 • दिंडोरी- तालुक्यातील रासेगाव येथे एक शेतात पुरातन तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली अाहे. रासेगाव ते देहरवाडी या रस्त्यावर विष्णू शिवराम पवार यांची जमीन आहे. ते दुपारी चारच्या सुमारास काम करत असताना जुन्या काळातील तोफगोळा मिळाला. याबाबत त्यांनी त्वरीत सरपंच बालाजी पवार, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाडवी यांना माहिती दिली. पाेलिस प्रशासनाने हा ताेफगाेळा ताब्यात घेतला.
  September 3, 10:07 AM
 • नाशिक- शिक्षकांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनडीएसटी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. वार्षिक अहवालात शिक्षक आमदारांऐवजी इतर नेत्यांचे फोटो छापल्याने सभासदांनी संचालक मंडळाच्या विरोधात घोषणा दिल्या. एवढेच नव्हे तर ९ टक्के लाभांश देण्याची मागणी करत घेराव घालून अध्यक्षांकडील माईकवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे गोंधळ सुरू असताना दुसरीकडे संचालकांनी सर्वच विषय मंजूर करून घेत वार्षिक सभेचे कामकाज गुंडाळले. प. सा. नाट्यगृहात रविवारी (दि. २) नाशिक...
  September 3, 09:58 AM
 • नाशिक- ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रणजीत पटेल याने १ तास ७ मिनिटे ४१ सेकंद अशी वेळ नोंदवत हाफ मॅरेथॉनचे तर मोनिका आथरे हिने महिलांच्या खुल्या गटातील १५ किलोमीटरच्या स्पर्धेत ५६ मिनिटे ५२ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावून नाशिकचे वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. भोसला सैनिकी महाविद्यालयात रणजित कला शाखेच्या अंतिम वर्षाला आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बनारस येथील असला तरी शिक्षणासाठी गेल्या पाच वर्षांपासून तो नाशिकमध्ये स्थायिक झाला आहे. अॅथलेटिक्समधील त्याचे कौशल्य व...
  September 3, 09:48 AM
 • नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेशासाठीच्या मुदतीत ८ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन शिक्षणक्रमांची माहिती घेऊन ८ सप्टेंबरपर्यंत अॉनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना तब्बल सहा लाखांहून अधिक विद्यार्थी...
  September 3, 07:25 AM
 • नाशिक - शहराचे सांस्कृतिक वैभव अाणि कलावंतांना प्राेत्साहन देणारी वास्तू म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरातील प्रयाेग करणे अाता पाचपट महागले असून, नऊ काेटी रुपये खर्च करून सुसज्ज झालेल्या या नाट्यगृहातून महापालिकेला माेठ्या प्रमाणात महसुलाची अास लागली अाहे. सद्यस्थितीत महापालिकेने तात्पुरते दर जाहीर केले असून, स्थायी समितीच्या मान्यतेनंतर सुधारित दरअाकारणी निश्चित हाेईल. सद्यस्थितीत कालिदास कलामंदिरातील प्रयाेग सुरू व्हावे या उद्देशातून दर जाहीर करून...
  September 2, 11:36 AM
 • नाशिक - अविश्वास ठरावाचा प्रयाेग फसल्यानंतर पालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी उत्पन्न वाढवण्यासाठी हल्लाबाेल केला असून पालिकेच्या ११०० गाळ्यांकडे तीन वर्षांपासून थकीत असलेली सुमारे ३१ काेटींची रक्कम वसूल करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम द्यावा व प्रतिसाद देणार नाहीत, त्यांचे गाळे महिनाभरात जप्त करावे, असे अादेश विविध कर विभागाला दिले. दुसरीकडे, गणेशमूर्ती विक्रीसाठी सहाही विभागांकरिता ४५८ स्टाॅलसाठी जाहीर लिलाव केले जाणार असून यापूर्वी दादागिरी करून जागा पदरात...
  September 2, 11:36 AM
 • नाशिक - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत १९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असले तरी अजूनही ८ हजार ५१९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच फेरपरीक्षेतही ३ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे असल्याने या दोन्ही शाखांच्या जागा वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत पाच हजार जागा रिक्त असल्या तरी शहरातील प्रमुख...
  September 2, 11:34 AM
 • नाशिक- अायुक्त तुकाराम मुंढे यांच्याविराेधात अविश्वास प्रस्ताव रद्द झाल्यानंतर भाजपवरच अविश्वास व्यक्त करताना विराेधी पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, मनसेने अाक्रमक पवित्रा घेत करवाढीवरून अांदाेलन उभारण्याचा इशारा दिला. उद्धव ठाकरेंकडे जाणार शिवसेना महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अाणि विराेधी पक्षनेते असलेल्या शिवसेनेने थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेण्याची तयारी केली अाहे. विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते म्हणाले की,...
  September 1, 10:42 AM
 • पांढुर्ली- सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणारी तवेरास अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे २० फूट खोल नाल्यात उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थिनींसह चालक जखमी झाला. जखमींवर धामणगावच्या एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पांढुर्ली येथील जनता महाविद्यालयाच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनी शुक्रवारी (दि. ३१) सकाळी आगासखिंड फाट्यावरून तवेरामध्ये (एम.एच. ०४ इअो ४७५५) बसून जात असताना कोळवाहळ नाल्यावरील पुलाजवळ अज्ञात वाहनाने हुलकावणी...
  September 1, 10:38 AM
 • नाशिक- करवाढीसह नानाविध मुद्यावरील अविश्वास ठराव पक्षश्रेष्टींनी फेटाळल्यानंतर सत्ताधारी भाजपमधील अस्वस्थता शिगेला गेल्याचेच चित्र हाेते. पाच दिवस वेगाने घडामाेडी करणारे शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप हे संपर्काबाहेर गेल्याचे चित्र हाेते तर सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी माेरूस्कर यांच्यासह अन्य नेत्यांनी रामायण या महापाैर निवासस्थानाकडे पाठ फिरवली. ठराव मागे घेतल्यानंतरही अद्यापही करवाढ बऱ्याचअंशी कायम असल्यामुळे अाता लाेकांसमाेर कसे जायचे असा प्रश्न भाजप...
  September 1, 10:37 AM
 
जाहिरात

RECOMMENDED