Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या निवडणुकीत रविवारी (दि. २९) २९६५ पैकी ६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १७९२ मतदारांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केले. २००८ नंतर पहिल्यांदाच तीन पॅनलमध्ये झालेल्या हायटेक प्रचारामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली हाेती. निमाची सूत्रे मतदारांनी काेणाच्या हातात दिली, हे साेमवारी (दि. ३०) मतमाेजणीनंतर समाेर येणार अाहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासूनच तिन्ही पॅनलचे उमेदवार अाणि मतदारांमध्ये प्रचंड...
  July 30, 10:55 AM
 • नाशिकरोड- राज्यातील शहिद जवान, शहिद पोलिस यांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने १ कोटी रुपये सन्मान निधी द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने कारगिल दिनाचे औचित्य साधून केले. याबाबत आपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे निवेदन देऊन ही मागणी केली. दिल्ली सरकार शहिदांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये देऊन आर्थिक मदत करीत असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात जन्म घेतलेल्या आणि देशहितासाठी कोठेही कार्यरत असताना शहिद झाल्यास...
  July 30, 10:52 AM
 • नाशिक- सकल मराठा समाजाच्या वतीने ९ ऑगस्टला राज्यात मुलाबाळांसह व गुराढोरांसह रस्त्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. १ ऑगस्टपासून सरकार सोबत असहकार करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात अाला असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाज समन्वयकांनी पत्रकाद्वारे दिली. शासनावर हा दबाव धाक कायम ठेवण्यासाठी एक्य स्फुलिंग कायम ठेवण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
  July 30, 07:32 AM
 • नाशिक- भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. या माध्यमातून राज्यभरातील ओबीसी, आदिवासी, दलित आणि मुस्लिम समाज समूहांशी आणि संघटनांशी ते चर्चा करीत आहेत. येत्या काळात वंचितांची सत्ता या समान कार्यक्रमावर भाजपचा पराभव करण्यासाठी ते रणांगणात उतरले आहेत. आतापर्यंत अांबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर सुमारे १५ भव्य मेळावेही घेतले आहेत. या अाघाडीच्या राजकारणाची भविष्यातील दिशा अाणि मराठा आरक्षणाच्या सध्याच्या धगधगता प्रश्नावर...
  July 30, 06:54 AM
 • नाशिक - मराठा समाजाला आरक्षण देण्याआधी हा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या किती मागासलेला आहे हे न्यायालयापुढे मांडण्याचे आव्हान राज्य शासनापुढे आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या जनसुनावण्यांचे आणि सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या अनुषंगाने नुकतेच झालेले तीन अभ्यास आयोगापुढे मांडण्यात आले आहेत. यातील एक अभ्यास महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालयाने केलेला आहे तर दोन अभ्यास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने...
  July 29, 11:42 AM
 • नाशिकरोड - भाई होण्याचे भूत डोक्यात घुसल्याने त्यासाठी प्रसिद्धी मिळवावी लागेल, म्हणून दोन मित्रांच्या सहाय्याने गोळीबाराचा बनाव रचत स्वत: जखमी होऊन दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेल्या युवकाच्या सत्य परिस्थितीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यामुळे प्रसिद्धीसाठी केलेले कटकारस्थान त्याच्यासह त्याच्या मित्रांनादेखील भोगावे लागणार असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. एकलहरे काॅलनी येथे तीन दिवसांपूवी (दि. २५) रात्री ११ वाजेच्या...
  July 29, 11:40 AM
 • नाशिक - ४० टक्के हिशाेबबाह्य पाण्याचा महसूल मिळवण्यासाठी महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी ७० टक्के मीटर नसलेल्या नाशिककरांना एकतर दुरुस्ती किंवा नवीन मीटर बसवण्याची सक्ती केली असताना दुसरीकडे मात्र स्मार्ट सिटीतील स्काडा याेजनेवर खर्ची पडणाऱ्या २८० काेटी रुपयांतून स्मार्ट मीटर खरेदीचा घाट घातला जात अाहे. त्यामुळे एकाचवेळी एकाच पाणी मीटरवर दाेन-दाेन खर्च हाेणार असून, जर स्मार्ट सिटीमधून पाणी मीटर खरेदी हाेणार असेल तर मग नाशिककरांवर भुर्दंड का? किंबहुना अाता मीटर बदलण्याच्या...
  July 29, 11:39 AM
 • नाशिक- सिडकाेतील माेरवाडीत विनायक ट्रेडर्स येथे चाेरीच्या संशयावरून युवकास बेदम मारहाण केल्याने त्याच्या मृत्यूप्रकरणी अंबड पाेलिसांनी अटक केलेल्या दाेघा संशयितांना न्यायालयाने साेमवारपर्यंत (दि. ३०) पाेलिस काेठडी सुनावली. मात्र, घटनेस तीन दिवस उलटूनही पाेलिसांनी अद्याप दाेघांनाच अटक केल्याने उर्वरित संशयित माेकळे राहतात की काय, असा प्रश्न उपस्थित करीत पाेलिसांच्या तपासावर मृताच्या नातलगांनी संशय व्यक्त केला अाहे. राहुल जाधव या युवकास विनायक ट्रेडर्सचे संचालक गणेश राठी याने...
  July 28, 10:55 AM
 • नाशिक- महापालिका क्षेत्राला हाेणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यातील ४३ टक्के पाण्यापासून काेणताही महसूल मिळत नसल्यामुळे वसुलीसाठी पाणी मीटर बंद असेल तर नाेटीस देऊन महिनाभरात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार अाहे. त्यानंतरही मीटर बंद अाढळले तर मात्र वापरातील अतिरिक्त वाढ गृहित धरून दुप्पट पाणीपट्टीचा बाेजा चढवण्याचे सकारात्मक पाऊल अायुक्त तुकाराम मुंढे यांनी उचलले अाहे. पाणीपट्टीतील महसुलाची गळती थांबवण्यासाठी मध्यंतरी मुंढे यांनी जलकुंभांना भेटी दिल्या हाेत्या. अायुक्तपदी अभिषेक...
  July 28, 10:52 AM
 • नाशिक- मराठा समाजाला अारक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजातील महिलांनी शुक्रवारी रामकुंडात उतरून जलसमर्पण अांदाेलन केले. यावेळी पाेलिसांची एकच धावपळ उडाली. पाण्यात उतरलेल्या तिघा महिलांना ताब्यात घेऊन पाेलिसांनी अांदाेलनावर नियंत्रण अाणले. सकल मराठा समाजाच्या वतीने दरराेज वेगवेगळ्या प्रकारची अांदाेलने सुरू अाहेत. मंगळवारच्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद लाभल्यानंतर बुधवारी झालेल्या नाशिक बंदला माेठा प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्याच्या अाणि टायर...
  July 28, 10:49 AM
 • नाशिक- संसदेत सादर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी अाज (दि. २८) खासगी डाॅक्टर देशव्यापी संप करणार अाहेत. त्यात नाशिक शहरातील ४५० रुग्णालये सहभागी हाेत असून, या संपाला दाेन हजार डॉक्टर्सनी पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय सेवाही बंद राहतील. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आवश्यक व जीवरक्षक प्रणाली सेवा, तसेच सर्व शासकीय रुग्णालये मात्र नेहमीप्रमाणेच सुरू राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड व सचिव डॉ. नितिळ यांनी...
  July 28, 10:44 AM
 • नाशिक- महासभेने नवीन मिळकती व माेकळ्या भूखंडांवर प्रस्तावित केलेल्या जिझिया स्वरूपाच्या मालमत्ता करातील वाढ सरसकट रद्द केल्यानंतर त्यासंदर्भातील ठराव विखंडनासाठी नगरविकास खात्याकडे, अर्थात हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांच्याच काेर्टात पाठवून निर्णयाचा चेंडूही टाेलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त अाहे. महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेचा ठराव विखंडनासाठी पाठवणार की नाही याबाबत काेणतेही भाष्य न करता याेग्य निर्णय घेऊ इतकीच भूमिका...
  July 27, 10:28 AM
 • नाशिक- मराठा समाजाला अारक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात सकल मराठा समाजाच्या अांदाेलकांनी लाक्षणिक उपाेषण केले. या अांदाेलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी याेग्य जागा दिली नसल्याचे सांगत अाज अाम्हाला जागेचा शाेध घ्यावा लागला. शुक्रवारी (दि. २७) पाेलिस प्रशासनाला अामचा शाेध घ्यावा लागेल, असा अनाेखा इशारा अांदाेलकांनी दिला. शहरातील अज्ञात ठिकाणी, मग ते धाेकेदायक ठिकाणही असू शकते, अशा ठिकाणी शुक्रवारी उपाेषण केले...
  July 27, 10:19 AM
 • नाशिक- मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी सटाणा येथील अांदाेलकांनी गुरुवारी ठेंगाेडा (जि. नाशिक) येथील गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाेलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत अांदाेलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. अाैरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टाेका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर अशाच प्रकारची अांदाेलने राज्यातील इतर जिल्ह्यांत हाेत अाहेत. बुधवारी गंगापूर धरणातही असाच प्रकार झाला. गुरुवारी सटाणा...
  July 27, 07:23 AM
 • नाशिक- आरक्षणासाठी मराठा समाजाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा निकष महत्त्वाचा मानला जाताे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील मराठा समाजाचे शेतकरी सर्वाधिक वंचित आणि हतबल असल्याचा निष्कर्ष गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या एका अभ्यासातून पुढे आला आहे. या संस्थेने सन २०१४- १६ या दोन वर्षांत विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांतील ३ हजार ८८१ आत्महत्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला. यातून पुढे आलेली आकडेवारी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आर्थिक...
  July 27, 06:25 AM
 • सिडकाे- मुले पळविण्याच्या संशयावरून जमावाकडून हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच दुकानातून चाेरी केल्याच्या संशयावरून युवकास डांबून ठेवत केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील माेरवाडीत घडली. बुधवारी (दि. २५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना समाेर अाली असून, अंबड पाेलिसांनी दुकानमालक गणेश जगदीशप्रसाद राठी याच्यासह त्याच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली अाहे. माेरवाडीतील राहुल राजेंद्र जाधव (३२) याचा मारहाणीत मृत्यू झाला अाहे....
  July 26, 10:27 AM
 • नाशिक- अारक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे अाणि छत्रपती उदयनराजे यांच्याशी सरकारने चर्चा करावी, यातून हाेणारे निर्णय अाम्हाला मान्य असतील, असे मराठा क्रांती माेर्चाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याचबराेबर नाशिक जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुकारण्यात अालेला बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा करतानाच अाज, गुरुवारी सकाळपासून मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत उपाेषण अांदाेलन सुरू हाेणार असल्याचे...
  July 26, 10:21 AM
 • नाशिक- मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (दि. २५) पुकारण्यात आलेल्या नाशिक जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, रविवार कारंजा, शिवाजीरोड, मेनरोड, एमजीरोडसह जिल्ह्यातीलही मुख्य बाजारपेठांत कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, सिडकोसह उपनगरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळांमध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात रोडावली होती. सुरक्षितता म्हणून काही शाळांनी सुटी...
  July 26, 10:15 AM
 • नाशिक -मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ शालिमार, रविवार कारंजा, शिवाजी रोड, मेन रोड, एमजी रोड येथे कडकडीत बंद होता. नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, सिडकोत संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळांमध्येही अघोषित सुटी होती. शहरात शांततेत मोर्चा काढण्यात अाला तर दुसरीकडे मात्र टायर जाळून शासनाचा धिक्कार करण्यात आला. गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांच्या फोटोला प्रतीकात्मक जलसमाधी देण्याचा व सुमारे २०-२५ तरुणांनी गोदावरीत सामूहिक उड्या घेत आंदोलन करण्याचा...
  July 26, 07:43 AM
 • नाशिक- ओझर विमानतळावर एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ म्हणून नोकरीचे आमिष देत दीड लाखाच्या फसवणुकीचा प्रकार ताजा असताना आणखी एका बेरोजगार तरुणाला विमानतळावर नोकरीचे आमिष देत तब्बल १४ लाख ५३ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि स्वप्नील पंदीलवार (रा. वडाळारोड) या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत अनोळखी नंबरवरून फोन आला. ओझर विमानतळावर ग्राउंड स्टाफ पदासाठी नवीन जागा...
  July 25, 11:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED