Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी सटाणा येथील अांदाेलकांनी गुरुवारी ठेंगाेडा (जि. नाशिक) येथील गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाेलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत अांदाेलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. अाैरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टाेका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर अशाच प्रकारची अांदाेलने राज्यातील इतर जिल्ह्यांत हाेत अाहेत. बुधवारी गंगापूर धरणातही असाच प्रकार झाला. गुरुवारी सटाणा...
  July 27, 07:23 AM
 • नाशिक- आरक्षणासाठी मराठा समाजाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा निकष महत्त्वाचा मानला जाताे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील मराठा समाजाचे शेतकरी सर्वाधिक वंचित आणि हतबल असल्याचा निष्कर्ष गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या एका अभ्यासातून पुढे आला आहे. या संस्थेने सन २०१४- १६ या दोन वर्षांत विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांतील ३ हजार ८८१ आत्महत्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला. यातून पुढे आलेली आकडेवारी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आर्थिक...
  July 27, 06:25 AM
 • सिडकाे- मुले पळविण्याच्या संशयावरून जमावाकडून हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच दुकानातून चाेरी केल्याच्या संशयावरून युवकास डांबून ठेवत केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील माेरवाडीत घडली. बुधवारी (दि. २५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना समाेर अाली असून, अंबड पाेलिसांनी दुकानमालक गणेश जगदीशप्रसाद राठी याच्यासह त्याच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली अाहे. माेरवाडीतील राहुल राजेंद्र जाधव (३२) याचा मारहाणीत मृत्यू झाला अाहे....
  July 26, 10:27 AM
 • नाशिक- अारक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे अाणि छत्रपती उदयनराजे यांच्याशी सरकारने चर्चा करावी, यातून हाेणारे निर्णय अाम्हाला मान्य असतील, असे मराठा क्रांती माेर्चाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याचबराेबर नाशिक जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुकारण्यात अालेला बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा करतानाच अाज, गुरुवारी सकाळपासून मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत उपाेषण अांदाेलन सुरू हाेणार असल्याचे...
  July 26, 10:21 AM
 • नाशिक- मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (दि. २५) पुकारण्यात आलेल्या नाशिक जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, रविवार कारंजा, शिवाजीरोड, मेनरोड, एमजीरोडसह जिल्ह्यातीलही मुख्य बाजारपेठांत कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, सिडकोसह उपनगरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळांमध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात रोडावली होती. सुरक्षितता म्हणून काही शाळांनी सुटी...
  July 26, 10:15 AM
 • नाशिक -मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ शालिमार, रविवार कारंजा, शिवाजी रोड, मेन रोड, एमजी रोड येथे कडकडीत बंद होता. नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, सिडकोत संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळांमध्येही अघोषित सुटी होती. शहरात शांततेत मोर्चा काढण्यात अाला तर दुसरीकडे मात्र टायर जाळून शासनाचा धिक्कार करण्यात आला. गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांच्या फोटोला प्रतीकात्मक जलसमाधी देण्याचा व सुमारे २०-२५ तरुणांनी गोदावरीत सामूहिक उड्या घेत आंदोलन करण्याचा...
  July 26, 07:43 AM
 • नाशिक- ओझर विमानतळावर एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ म्हणून नोकरीचे आमिष देत दीड लाखाच्या फसवणुकीचा प्रकार ताजा असताना आणखी एका बेरोजगार तरुणाला विमानतळावर नोकरीचे आमिष देत तब्बल १४ लाख ५३ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि स्वप्नील पंदीलवार (रा. वडाळारोड) या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत अनोळखी नंबरवरून फोन आला. ओझर विमानतळावर ग्राउंड स्टाफ पदासाठी नवीन जागा...
  July 25, 11:27 AM
 • नाशिक- शहरातील इंच न् इंच जमिनीला लावलेला जिझिया स्वरूपाचा कर अखेर रद्द करण्यासाठी बुधवारी (दि. २५) पालकमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात जाणार असून एक तर बुधवारी किंवा फारतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडूनच नाशिककरांना दिलासा मिळेल, अशी माहिती स्वतः पालकमंत्री महाजन यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. महापालिका क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांना एकरी १ लाख ३७ हजार रुपये इतकी तर एक एप्रिल २०१८ पासून अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकतींच्या कर योग्य...
  July 25, 11:22 AM
 • नाशिक- मराठा अारक्षणाच्या मुद्यावरून पुकारण्यात अालेल्या राज्यव्यापी बंदला मंगळवारी (दि. २४) जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. मुंबई-अाग्रा महामार्गावरील जत्रा हाॅटेलजवळ संतप्त जमावाने सुमारे दीड तास रास्ता राेकाे अांदाेलन केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करीत समाजबांधवांनी शासनाचा निषेध केला. शहरासह विभागातील आठ बसेसवर दगडफेक करीत त्यांचे नुकसान करण्यात अाले. गंभीर बाब म्हणजे दसक परिसरातील नदीपात्रात एका युवकाने जलसमर्पणाचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पाेलिस यंत्रणेला या...
  July 25, 11:11 AM
 • नाशिक- माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यामुळे मुले होतात असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रे अधिनियमाचा भंग झाल्याचा ठपका ठेवत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात नाशिक महापालिकेतील प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम (पीसीपीएनडीटी) समितीने नाशिकच्या प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात फिर्याद दाखल केली आहे. पुढील कारवाईसाठी न्यायालयाकडून समन्स पाठविला जाणार असून, त्यानंतर भिडे यांच्यावरील आरोपासंदर्भात खटला...
  July 25, 10:56 AM
 • नाशिक- शहराला इंच न् इंच जमिनीवर जिझिया स्वरूपाच्या करवाढीच्या खाईत लाेटण्यापासून तर महापाैर, नगरसेवकांच्या अधिकारावर अालेली गदा व अन्य अनेक प्रकरणासंदर्भात अाठ दिवसांत दिलासादायी निर्णय देण्याची घाेषणा करणारे पालकमंत्री गिरीश महाजन हे तब्बल दहा दिवसांनंतरही नाशिकच्या प्रश्नांबाबत माैन बाळगून असल्यामुळे सत्ताधारी भाजपची अस्वस्थता वाढली अाहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असून महासभेने करवाढ रद्द केल्यानंतर अायुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेचा निर्णय बेकायदेशीर...
  July 24, 11:36 AM
 • नाशिक- एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नाशिक जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील विशेषत: गंगापूर, दारणा, आळंदी आणि कडवा या धरणांतून विसर्ग सतत कमी-अधिक केला जात आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने ९.८ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या साठाही ५१ टक्क्यांवर गेला आहे. पण हा गतवर्षीच्या याच वेळच्या ५४ टक्क्यांपेक्षा ३ टक्क्यांने कमीच असल्याने अपेक्षानुसार...
  July 24, 11:30 AM
 • सध्या नाशिक महानगरातील वातावरण अवाजवी करवाढीच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. नाशिककरांना जन्मोजन्मीची अद्दल घडावी म्हणून म्हणा की आवाक्याबाहेर गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पालिकेतील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह आमदारांनाही जरब बसावी म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून उत्तम शासक नियुक्त केला गेला होता. औपचारिकदृष्ट्या नाशिकचे पालकमंत्री असले तरी त्या भूमिकेहून अधिक स्पष्टरीत्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रमुखाच्या भूमिकेत वावरणारे गिरीशभाऊ...
  July 24, 08:46 AM
 • नाशिक (सातपूर) - झोळीत झोपलेल्या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा झोळीचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. २३) दुपारी १२ वाजता शिवाजीनगर येथे एेन आषाढी एकादशीच्या दिवशीच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन दिवसांपूर्वी हे कुटुंब येथे राहण्यास आले होते. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथे राहणारे योगेश खाडपे यांची नऊ महिन्यांची मुलगी आराध्या झोळीत झोपलेली होती. दुपारी बाराला आराध्याची आई मनीषा या नवीन घरात संसार थाटत असताना...
  July 24, 05:45 AM
 • नाशिक- नाशिक जिल्ह्यातील उद्याेजकांची प्रतिष्ठित संघटना मानल्या जाणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) च्या निवडणुकीत अाता अधिकाधिक रंग भरले जाणार असे चित्र दिसत अाहे. सत्ताधारी एकता पॅनलमध्येच दुफळी झाल्याने रविवारी (दि. २२) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत सत्ताधारी एकता, त्यात फुट पडून एकता-१ अाणि विराेधात ठाकलेल्या उद्याेग विकास अशा तिन पॅनलमध्ये लढत रंगणार अशी स्थिती निर्माण झाली अाहे. मात्र कटुता अाणणारी निवडणूक तिन्ही पॅनलच्या...
  July 23, 09:37 AM
 • नाशिक- अाॅनलाईन बदली प्रकरणात बहुतांश शिक्षकांनी संवर्ग १ अाणि संवर्ग २ मध्ये चुकीची व खाेटी माहिती दिल्याचे पडताळणीत निदर्शनास अाल्याने शिक्षकांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांचे अंतराबाबतचे दाखले मंगळवारपर्यंत (दि. २४) सादर करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठविले अाहे. ग्रामविकास मंत्रालयातर्फे राज्यात प्रथमच अाॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात अाली....
  July 23, 09:34 AM
 • नाशिक- परीक्षेदरम्यान हाेणारे गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षांना वेळेच्या दीड तास अाधी परीक्षार्थींना केंद्रावर उपस्थित राहावे लागणार अाहे. परीक्षा कक्षात अर्धा तास अाधी न येणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश नाकारला जाणार असून याची अंमलबजावणी १ अाॅगस्टपासून केली जाणार अाहे. या संदर्भात एमपीएससीने सूचना प्रसिद्ध केली अाहे. गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने उपाय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. आयोगाद्वारे यापुढील...
  July 23, 09:28 AM
 • सटाणा- तळवाडे भामेर (ता. बागलाण) येथे दोन बिबट्यांच्या झटापटीत एक बिबट्या गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. एका बिबट्याच्या परिसरात दुसऱ्याने प्रवेश केल्याने वर्चस्ववादातून ही लढाई झाली असल्याचे जानकारांनी म्हटले आहे. येथील काटवन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांची दहशत असून आजही परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन बिबट्यांच्या डरकाळ्या परिसरात कानावर येत होत्या. परंतु, त्या अचानक बंद झाल्या होत्या. शेवटी दोन दिवसांपूर्वी...
  July 23, 09:19 AM
 • नाशिक - शहरातील ९०० पैकी ७२९ समाजमंदिरांचे करार नसणे, महापालिकेच्या १७३१ गाळ्यांचे कंत्राटे नसणे अाणि ९० टक्के गाळे महसुलाविना सुरू राहणे ही बाब नाशिकच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय घातक अाहे. सध्याची कररचना कमी करून अन्य महसुलांमध्ये वाढ केल्यास शहराचा निश्चितच विकास हाेईल, असा सल्ला न्यूज १८- लोकमतचे संपादक डाॅ. उदय निरगुडकर यांनी नाशिक सिटिझन फोरमच्या कार्यक्रमात दिला. विकास अाराखडा अाणि विकास नियंत्रण नियमावली यांची पालिकेच्या अर्थसंकल्पाशी सांगड घातली जाणार नाही...
  July 22, 11:51 AM
 • नाशिकरोड - प्रतिदिन १४ ते १६ हजार प्रवाशांचा राबता असलेल्या नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सरकते जिने (एस्केलेटर) शनिवार (दि. २१) पासून खुले करण्यात आले. सरकत्या जिन्यामुळे महिला, अपंग आणि वृद्धांना फलाट क्रमांक एकवरून फलाट क्रमांक दोन आणि तीनवर जाणे सुलभ होणार आहे. या जिन्यांचे खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भुसावळ विभागात रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नाशिकरोड रेल्वेस्थानकामध्ये गत पाच वर्षांपासून एस्केलेटर...
  July 22, 11:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED