जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- वातावरण बदलतेयच, बघता ना, पेपरमधील फाेटाे बघितले का, सत्तेत असलेल्यांची जाण्याची वेळ आली. भविष्यकाळ आपलाच आहे. आता तयारीसाठी लागा व पक्षहितासाठी थेट माझ्यापर्यंत काेणतीही सूचना व तक्रार करण्यासाठी दरवाजे खुले आहे, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची उमेद जागवली. राज म्हणाले, आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात देखील मी सुरू केली आहेत. महानगरपालिका, विधानसभेपासून ते लोकसभा...
  December 22, 08:24 AM
 • नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्याचा चौथा दिवस आहे. आज त्यांनी वणी गडावर जाऊन आपला मुलगा अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका सप्तशृंगी देवीच्या चरणी ठेवली. पत्रिकेनुसार अमित यांचे लग्न पुढील वर्षी 27 जानेवारीला मुंबईत होणार आहे. अमित यांचा विवाह प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडेशी होणार आहे. गेल्या वर्षी 2017 मध्ये या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. कन्या उवर्शी आणि मिताली एकमेकींच्या खास मैत्रिणी राज ठाकरे...
  December 21, 03:36 PM
 • सिडको- मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून महिला व ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. येथील अनेक आरोग्य तपासणी करण्याच्या यंत्रणा बंद आहेत तर काही उपलब्धच नाहीत. बुधवारी प्रसूती वेदनाकाळात एका महिलेची सोनोग्राफीसाठी प्रचंड हेळसांड झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मोरवाडी स्वामी समर्थ रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी आहे. मात्र, कमी असल्याचे कारण देत नियोजन वाऱ्यावर वरात असल्याचे दिसते. सिडकोतील एक महिला...
  December 21, 10:22 AM
 • नाशिक :दोन कारच्या धडकेत तीन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या स्कोडा कारचालक मुलाला तीन वर्ष सक्तमजुरी, तर पित्याला तीन महिने सक्तमजुरी शिक्षा अाणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. बुधवारी (दि. १९) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जी. के. आर. टंडन यांनी हा निकाल दिला. अभियोग कक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०१७ रोजी आरोपी शेख फैज फारुख (२०, रा. आयेशानगर) याने स्कोडा सुपर्ब कार भरधाव चालवून हर्षद श्यामकुमार पाटील यांच्या स्विफ्ट डिझायर कारला जोराची...
  December 20, 01:59 PM
 • नाशिक/ अाैरंगाबाद | काश्मीरमधील हिमवर्षाव, दक्षिणेत आलेले चक्रीवादळ व उत्तरेकडून वाढलेला वाऱ्याचा वेग यामुळे महाराष्ट्रात दाेन- तीन दिवसांपासून पारा घसरला. बुधवारी उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट हाेती. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व धुळे येथे ६.० अंश सेल्सियस असे नीचांकी तापमान नोंदले गेले. निफाड येथे ६.६, तर नाशकात ७.९ सेल्सियसची नोंद झाली. मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भातही पारा ८ अंशांवर घसरला हाेता. उत्तर महाराष्ट्रात बुधवारी किमान व कमाल तापमानात कमालीची घट झाल्याने थंडीचा कडाका...
  December 20, 09:04 AM
 • नाशिक - शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून स्वतःचे नुकसान करण्यापेक्षा राज्यकर्त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत कांदे मारा. तोच कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावा. तेव्हाच बेशुद्ध झालेल्या सरकारला शुद्ध येईल, असा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भाजप सरकारकडून होणारी अवहेलना लक्षात घेता राज यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करायला नाशिकमधून सुरुवात केली आहे. बुधवारी कळवण दौऱ्यादरम्यान राज यांनी शेतकऱ्यांना...
  December 20, 08:42 AM
 • नाशिक - शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिक शहर व जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीतर्फे आयोजित आणि फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी प्रस्तुत नाशिक पोलिस पुरस्कार २०१८ सन्मान सोहळा गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजता हाॅटेल एक्स्प्रेस इनमध्ये हाेणार आहे. या कार्यक्रमात शहर व ग्रामीण पाेलिस दलातील वेगवेगळ्या १६ गटांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण ३२ पाेलिसांचा व महाराष्ट्र पाेलिस प्रबाेधनीतील उत्कृष्ट...
  December 20, 08:32 AM
 • कळवण : शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून स्वतःचे नुकसान करण्यापेक्षा राज्यकर्त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत कांदे मारा आणि तोच कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावा. तेव्हाच बेशुद्ध झालेल्या सरकारला शुद्ध येईल असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले. कळवण तालुका दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांशी चर्चा करत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भाजपा सरकारकडून होणारी अवहेलना लक्षात घेत राज ठाकरे यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. या...
  December 19, 07:50 PM
 • नाशिक- गडगडणाऱ्या कांद्याच्या भावामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये धुमसत असलेला असंतोष आणि कांदा विकून आलेली तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याने थेट पंतप्रधानांना मनीऑर्डर केल्याने सुरू झालेल्या राष्ट्रीय चर्चा या पार्श्वभूमीवर नाशिकमधील स्थानिक राजकीय नेत्यांसोबत आता राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनीही नाशिककडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चाचे संयोजक, स्वराज इंडियाचे संस्थापक आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे सदस्य योगेंद्र यादव...
  December 19, 08:37 AM
 • इगतपुरी- रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना नोकरी प्राधान्य मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर २००८ मध्ये मनसेने केलेल्या आंदोलन प्रकरणात राज ठाकरे यांना इगतपुरीच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इगतपुरीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने राज यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला. इगतपुरीत एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला...
  December 19, 07:55 AM
 • नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2008 मध्ये परप्रांतीयांविरोधातील केलेल्या आंदोलन प्रकरणी राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला. यावेळी कोर्ट परिसरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे भरती परीक्षेदरम्यान 21 ऑक्टोबर 2008 रोजी मनसेने आंदोलन केले होते. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील साईप्लाझा या हॉटेलवर दगडफेक केली होती. राज ठाकरे यांनी चिथावणी दिल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण आल्याचा आरोप होता. या प्रकरणी राज...
  December 18, 04:49 PM
 • नाशिक- पेट्रोल संपल्याने एका तरुणाची सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर पाेटात चाकू भाेसकून त्याच्याच तीन मित्रांनी हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. अमोल बागले असे मृतााचे नाव असून याप्रकरणी पाेलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून हा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी सचिन बागले याने तक्रार दिली आहे. अमोल याच्यासाेबत जात असताना रात्री त्याच्या गाडीतील पेट्राेल संपले. अमोलने त्याचा मित्र लोकेश थोरात यास फोन करून पेट्रोल आणण्यास...
  December 18, 11:19 AM
 • नाशिकरोड - शहरात दोन आठवड्यापासून किमान तपमान १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने रात्री व सकाळी वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. रविवारी सायंकाळपासून वातावरणात थंडीचा कडाका वाढल्याने सोमवारी सकाळी किमान तपमान हे ८.२ अंशांची नोंद करण्यात आली होती. कमाल तपमान २५.४ अंश सेल्सिअसवर असल्याने दिवसाही गारवा जाणवत असल्याने शहरवासीय ऊबदार कपडे परिधान करण्यासह गरमागरम पदार्थांवर ताव मारताना दिसत होते. उत्तर भारताकडून गार वारे वाहत असले तरी सध्या आकाश हे निरभ्र असल्याने थंडीचा कडाका...
  December 18, 10:42 AM
 • नाशिक - तारवालानगर चाैकाप्रमाणे शहरातील अन्य १२ अपघातप्रवण क्षेत्रे जाहीर करीत या ठिकाणी तातडीने झेब्रा क्राॅसिंग पट्टे, गती राेखण्यासाठी रम्बलर लावण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या माेबिलिटी सेल बैठकीत घेण्यात अाला. विशेष म्हणजे, शहरातील अनेक रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर्सची मागणीही धुडकावून लावत तातडीने रम्बलर लावण्याचे अादेश देण्यात अाले. महापालिका अायुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली माेबिलिटी सेलची बैठक झाली. या बैठकीला पाेलिस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग,...
  December 18, 10:40 AM
 • सातपूर - सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर एका युवकाची पाेटात चाकू भाेसकून त्याच्याच तीन मित्रांनी हत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १७) सकाळी उघडकीस आली. खुनाची ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यातील मृताचे नाव अमोल बागले असे असून याप्रकरणी पाेलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून हा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि सचिन बागले याने दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल अशोक बागले (२५, रा. साईबाबा गार्डन,...
  December 18, 10:30 AM
 • औरंगाबाद, नाशिक, पुणे- उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि महाराष्ट्रात वाढलेले हवेचे दाब यामुळे राज्य गारठले आहे. पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठवडाभर थंडीचा मुक्काम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापुरात रस्त्यावर झोपलेल्या दोन व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला आहे. सोमवारी...
  December 18, 07:54 AM
 • delete
  December 17, 11:30 AM
 • नाशिक- गहाण घर सोडवण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत चक्क ७९० ग्रॅम सोन्याचा नकली हार गहाण ठेवत लष्करातील जवानाला चार लाखांना गंडा घातल्याचा प्रकार देवळाली कॅम्प मध्ये उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि लष्करी जवान संतोषकुमार यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबरमध्ये संशयित विजय दशरथ चौधरी आणि एक महिला देवळाली येथील रेणुका देवी मंदिर येथे भेटले. गहाण ठेवलेले घर सोडवण्यासाठी आणि...
  December 17, 10:58 AM
 • नाशिक- टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) लागू केलेल्या केबलच्या नव्या नियमानुसार आता नाशिक जिल्ह्यात केबल आणि डिशचे दर दरमहा तब्बल १५० ते ३०० रुपयांनी महागणार आहे. म्हणजे दरमहा नियमित चॅनल्ससाठी ३५० ते ६०० रुपये मोजावे लागतील. २९ डिसेंबरपासून सध्या सुरू असलेले चॅनल्सचे पॅकेज बंद होत नव्या नियमांच्या आधारे नवे पॅकेज सुरू होतील. यात शहर-ग्रामीण असा कुठलाही फरक न ठेवता सर्वांना सरसकट हे दर लागू करण्यात आले असून त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मंजुरी दिल्याने या वाढलेल्या...
  December 16, 10:16 AM
 • नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास गेलेल्या नाशिकच्या शिष्टमंडळाकडून शुक्रवारी त्यांनी कांद्याच्या घसरत्या किमतीबाबत माहिती जाणून घेतली. कधी ग्राहकांना तर कधी शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या भावात एवढे चढउतार का होतात, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच याबाबत माहिती घेऊन, आठ-दहा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद असलेल्या नाशिकच्या कांदाप्रश्नाकडे माेदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या लाेकप्रतिनिधींचे...
  December 15, 11:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात