Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • ताहाराबाद- येथील इंडियन ऑइल पेट्रोलपंपांजवळ एसटीला डंपरनेे हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर ताहाराबाद येथे प्राथमिक उपचार चालू आहेत. नंदुरबार येथून नाशिककडे जाणाऱ्या नंदुरबार आगाराची बस (एम.एच. २० बीएल २३१०) कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डंपरने हुलकावणी दिल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत उतरल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात...
  July 14, 11:00 AM
 • नाशिक/ मालेगाव- सिडको (अाैरंगाबाद) परिसरात चोरी केलेली ट्रॅव्हल बस महामार्गावर पाठलाग करून पकडण्यात आली. गुरुवारी धुळे मार्गावरील चिखलओहळ परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. चालकास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अधीक्षक संजय दराडे यांनी सीमावर्ती भागात चेकपोस्ट उभारले आहेत. परजिल्ह्यांतील गुन्हेगार जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने नाकेबंदी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एलसीबीचे पथक...
  July 14, 10:57 AM
 • नाशिक- दुषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक होऊन चार जणांचा मृत्यू झालेल्या सुरगाणा तालुक्यातील राहुडे ग्रामपंचायतीस शुक्रवारी (दि. १३) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी भेट देऊन माहिती घेतली. संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याचे व जिल्ह्यातील सर्व पाणीस्त्रोतांच्या तपासणीचे आदेश दिले. सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत नाल्यातील पाणी गेल्यामुळे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांना...
  July 14, 10:52 AM
 • नाशिक- अांबे खाल्ल्याने मुले हाेतात अाणि संत ज्ञानेश्वर, तुकारामांपेक्षाही मनू श्रेष्ठ ही वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संभाजी भिडेंविराेधात मुंबई उच्च न्यायालयात अॅड. नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली असून, त्यात भिडेंना भाषणे करण्यावर घटनात्मक प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात अाली अाहे. भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य हे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील तरतुदींचा भंग करत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले अाहे. वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अांब्याचे फळ...
  July 14, 07:57 AM
 • मालेगाव -एकाच समाजाचे असतानाही प्रेमविवाह करणे वैदू समाजाच्या दांपत्यासाठी गुन्हा ठरले अाहे. हिंदू रितीरिवाजाने लग्न झाले असले तरी ताे प्रेमविवाहच अाहे, असे म्हणत जातीच्या ठेकेदारांनी या दांपत्यास समाजातून बहिष्कृत करण्याचा अखिलित फतवा जारी केला अाहे. सात महिन्यापासून एकाकी जीवन जगणाऱ्या मळगाव (ता. सटाणा) येथील दांपत्याने समाज मान्यतेसाठी पाेलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली अाहे. दिनेश व सुनंदाने २ जानेवारी २०१८ ला प्रेमविवाह केला. मात्र, विवाह मान्य नसल्याने दाेघांना...
  July 13, 10:34 PM
 • नाशिक- महापालिकेत सुरू असलेल्या खासगीकरणाच्या वाऱ्यांचा वेग अाता चांगलाच वाढला असून, १९ जुलै राेजी हाेणाऱ्या महासभेत अाता पाणीपुरवठा वितरणव्यवस्थेत धरणातून उचललेल्या कच्च्या पाण्यापासून तर नागरिकांच्या घरापर्यंतच्या जलवाहिन्यांची देखभाल करण्याचे काम खासगीकरणातून ठेकेदारावर साेपवण्याचा प्रस्ताव अाला अाहे. एवढेच नव्हे तर, पाण्याबराेबरच सांडपाणी व्यवस्थेशी संबधित यंत्रणेचीही खासगी ठेकेदारामार्फत देखभाल करण्यासाठी प्रस्ताव असून, एकापाठाेपाठ एक सेवा ठेकेदाराच्या हातात जात...
  July 13, 10:14 AM
 • नाशिक- जिल्ह्यातील उद्याेजकांची संघटना नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) ची द्वैवार्षिक निवडणूक सध्या उद्याेग वर्तुळात चर्चेचा विषय ठरत अाहे. या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल विराेधात उद्याेग विकास पॅनलने दंड थाेपटले अाहेत. गुरुवारी (दि. १२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ४१ जागांसाठी दाेन्ही पॅनलकडून तब्बल १३१ उमेदवारी अर्ज दाखल केले गेले अाहेत. दाेन्ही पॅनलने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांवर नजर टाकली असता माेठ्या उद्याेग गटातून मानद...
  July 13, 10:11 AM
 • नाशिक- राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग खात्यातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणात फिर्यादीची मूळ तक्रारच गायब झाल्याप्रकरणी अखेर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा सरकारी वकील अजय मिसर खटल्याच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिल्हा सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीकर यांना २२ हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. हा खटला जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडे यांच्या न्यायालयात सुरू...
  July 13, 09:48 AM
 • नाशिक- राज्यभर गाजलेल्या नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील अत्याचार व हत्याकांड प्रकरणास १३ जुलै राेजी दोन वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेले तीनही आरोपी गेल्या २४ महिन्यांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अहमदनगर सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेस अाव्हान देण्याची मुदत उलटून गेली अाहे. यापैकी एका आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विलंबाबद्दलचा माफीचा अर्ज दाखल केला आहे. यावर येत्या १६ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता...
  July 13, 07:45 AM
 • नाशिक- खुनाच्या गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या तरुणाचा चार-पाच संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री रामवाडी येथे उघडकीस आला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून अल्पवयीन मित्राने मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रात्रीच एका संशयिताला अटक केली. अल्पवयीनासह एक संशयित फरार आहे. वादाने घेतला बळी मृत किशोर नागरेवर यापूर्वी भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. २०१६...
  July 12, 12:07 PM
 • नाशिक- दोन दिवसांपासून जिल्ह्यातील त्र्यंबक, इगतपुरी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जाेर धरल्यामुळे आता चार दिवसांतच गंगापूर धरणातील ३६ टक्के असलेल्या पाणीसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ होत ताे ४२ टक्के झाला आहे. गंगापूर धरणसमूहाचाही पाणीसाठा २५ टक्क्यांवरून ३१ टक्के झाल्याने पाणीसाठा सातत्याने वाढत अाहे. त्यामुळे नाशिककरांना माेठा दिलासा मिळत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील पूर्व भागात हजेरी लावलेल्या पावसाने त्यानंतर ओढ देत पुन्हा जुलैमध्ये आगमन केले. गेल्या...
  July 12, 12:03 PM
 • नाशिक- कळवणमधील महिलेचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्यानंतर आता सुरगाण्याच्या राहुडेतील आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. राहुडेत नामदेव गांगुर्डे यांचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी बशिरा लिलके आणि सीताराम पिठे या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या साथीने चार जणांचा बळी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही राहुडेला भेट देऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेस तत्काळ अहवाल सादरीकरणाचा आदेश दिला आहे. सविस्तर अहवाल देण्याचा आदेश...
  July 12, 11:58 AM
 • नाशिक- राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणात जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीशी संबंधित दाेषाराेपपत्रातील फिर्यादीची मूळ तक्रारच संशयास्पदरित्या गायब झाली अाहे. एवढेच नव्हे तर काेणतीही स्वाक्षरी नसलेली बनावट तक्रार कागदपत्रांमध्ये दाखल झाल्याचे लक्षात अाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले अाहेत. विशेष म्हणजे, संबंधित सत्र न्यायालयाकडून...
  July 12, 11:06 AM
 • नाशिक- शहरात पुन्हा टोळी युद्ध भडकले आहे. पंचवटीतील रामवाडी आदर्श नगर परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. किशोर रमेश नागरे (वय-26) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर नागरे हा गुणाजी जाधव खून खटल्यात मुख्य साक्षीदार होता. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
  July 11, 02:33 PM
 • नाशिक- एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला, अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे प्रकार ताजे असताना एका महाविद्यालयाच्या उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेल्या मुलीचे तोंड दाबून कारमध्ये नेऊन तिचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ९) दुपारी २ वाजता मोटवानीरोडवरील एका महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये उघडकीस आला. कारचालकानेच मित्राला विरोध केल्याने मुलीचा जीव वाचला. उपनगर पोलिसांनी या सडकसख्याहरीला अटक केली आहे. या घटनेमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एेरणीवर अाला असून...
  July 11, 10:36 AM
 • नाशिक- विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघांची अाचारसंहिता संपल्यानंतर झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सेस व जिल्हा नियाेजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून कराेडाे रुपयांच्या विकासकामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात अाली. यात २९ नियमित तर ३२ एेनवेळी अालेल्या विषयांचा समावेश अाहे. एन. एम. अाव्हाड यांच्या निधनामुळे प्रश्नाेत्तरांचा विषय स्थगित ठेवून कामकाज चालविण्यात अाले. रावसाहेब थाेरात सभागृहात अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात...
  July 11, 10:19 AM
 • नाशिकरोड- जुलैतील पहिला आठवडा सरला तरी नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढू लागली आहे. धरणसाठ्याबरोबरच खरीप पेरण्यांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी जिल्ह्यात १८ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये इगतपुरीत ९, पेठला ६, सुरगाण्यात ३ मिलिमीटर पाऊस झाला तर उर्वरित १२ तालुके कोरडे होते. दोन दिवसांपासून हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, नाशिक विभागात फक्त नाशिक आणि जळगावलाच चांगला पाऊस झाला. तर, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे जिल्हे कोरडेच...
  July 11, 10:03 AM
 • नाशिक- स्थावर मिळकतीच्या गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याच्या अधिकार अभिलेखात कुठल्या नोंदी घ्यायच्या याची १९६६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात स्पष्ट नोंद आहे. त्यात लिज पेंडन्सीचा उल्लेख नाही. त्यामुळे ज्या जमिनीवर यापूर्वीच इतर अधिकार अभिलेखात लिज पेंडन्सीच्या नोंदी घेतलेल्या आहेत, अशा नोंदी ३० दिवसांत रद्द कराव्यात. त्याचा अहवाल आठ दिवसांच्या आत तहसीलदारांमार्फत सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात केवळ...
  July 11, 09:58 AM
 • नाशिक- पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव परिसरात मंगळवारी सकाळी ७ वाजून ४३ मिनिटे ११ सेकंदांनी २.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. या धक्क्याने काहीकाळ घरातील भांडी वाजत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. याबाबतची माहिती सरपंच शेवंताबाई भोंडवे यांच्याकडून मिळाल्याचे तहसीलदार हरिष भामरे यांनी सांगितले. मागील काही वर्षांपासून गोंदे-भायगाव परिसराला भूकंपाचे धक्के बसत अाहेत. काही वर्षांपूर्वी गोंदे गावाजवळील दमणगंगा नदीतील...
  July 11, 06:46 AM
 • नाशिक- पेठ तालुक्यातील गोंदे व भायगांव परिसराला आज मंगळवारी सकाळी 7 वाजुन 43 मिनिटांदरम्यान भुकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भुकंपाची तीव्रता 2.7 एवढी नोंदवण्यात आली आहे. धक्क्यामुळे काही काळ घरातील भांडी वाजत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने भुकंपाचे धक्के सौम्य असल्याने कुठलीही वित्त व जिवित हानी झाली नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (MERI) केंद्रात या भुकंपाची नोंद करण्यात आली आहे. नाशिककपासुन 32 कि.मी....
  July 10, 03:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED