जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक-शहरासह अहमदनगर, धुळे जिल्ह्यातील म्हाडाच्या घरांच्या किमती तब्बल २० ते ४७ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यातून ६० कोटी रुपयांचा तोटा सहन करून नाशिककरांना नवीन वर्षात त्यांच्या बजेटमधील, परवडतील अशा किमतीत या घरांची भेट दिली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिली. म्हाडाच्या वतीने नाशिक मंडळात ११९३ घरांची उभारणी केली आहे. परंतु वारंवार जाहिराती काढूनही त्यांना ग्राहकांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने आता म्हाडाने...
  December 14, 08:55 AM
 • मालेगाव - बहिणीने केलेला प्रेमविवाह मान्य नसल्याने भावाने अापल्या सख्ख्या बहिणीचा गळा अावळून खून केला. देवळा तालुक्यातील दहिवड येथे ७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा तपासात उलगडा झाल्याने पाेलिसांनी संशयित भावास बुधवारी अटक केली. प्रियंका निंबा साेनवणे असे खून झालेल्या तरुणीचे नाव अाहे. मृत प्रियंकाचे अातेभाऊ अमाेल ऊर्फ गणेश रमेश अाहेर (रा. कळवण) याच्याशी प्रेमसंबंध हाेते. दाेघांनी कुटुबीयांना माहिती न देता सहा महिन्यांपूर्वी नाशिकला वैदिक पद्धतीने लग्न केले हाेते. बहिणीच्या...
  December 14, 08:44 AM
 • नाशिक- माजी अायुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केलेले प्रस्ताव व योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या अाहेत. महासभेने अर्थसंकल्पात सुचवलेली कामे नंतर थांबविण्यात अाली. ही कामे तातडीने करावी, शेतीवरील कर रद्द करावा, नवीन मिळकतींची पुनर्तपासणी करावी यासह विविध विकासांच्या मुद्याबाबत बुधवारी (दि. १२) महापौर, सभागृहनेता व गटनेत्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन कामे मार्गी लावण्याचा रेटा लावला. स्थायी समिती सभापती हिमगाैरी अाडके यांनीही अायुक्तांची...
  December 13, 09:22 AM
 • नाशिक - काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून राहुल गांधी यांना मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. युवक काँग्रेसच्या संघटनेतून आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या राहुल यांच्या या यशात युवक काँग्रेसचाही महत्त्वाचा वाटा अाहे. या पाचही राज्यांतील बेरोजगार युवकांशी काँग्रेसने साधलेला थेट संपर्क, नवमतदारांशी आकांक्षा समजून घेण्याचा कल, जुने जाणते आणि नवे उमदे यांच्यात समन्वय घडवून आणण्यात राहुल गांधींना आलेले यश आणि भाजपच्या तोडीस तोड उत्तरे देणारी पक्षाच्या सोशल मीडियाची आघाडी ही...
  December 13, 08:29 AM
 • सटाणा - तब्बल २४ ते ३० हजार रुपये खर्च करून व काबाडकष्ट करून पिकवलेल्या ३० क्विंटल कांद्याला विक्रीतून ४५०० रुपयेच मिळत असल्याने संतापलेल्या नाशिकच्या २ शेतकऱ्यांनी तब्बल दोन ट्रॉली कांदा राष्ट्रीय महामार्गावरच फेकून दिला. त्यांच्या या संतापात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन तास महामार्ग रोखून धरला. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका कांदा उत्पादनात जिल्ह्यात आघाडीवर आहे. यंदा दुष्काळात नवीन कांद्याची आवक सुरू झाली अाहे. सद्य:स्थितीत भाव नसल्याने उत्पादन...
  December 13, 08:11 AM
 • नाशिक- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरिता मंडळाकडून दर तीन वर्षांतून एकदा पाच हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा काही भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे. शहरातील वडाळागाव, भारतनगर परिसरासह सिडको, सातपूर भागात योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चक्क बोगस लाभार्थी तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे....
  December 12, 09:05 AM
 • चांदवड- कांद्याचे निर्यातमूल्य शून्य असतानाही कांद्यास कवडीमोल भाव मिळत असल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला व शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ वाजता येथील मुंबई-आग्रा महामार्गावर अर्धा तास आंदोलन करण्यात आले. तर कार्यकर्त्यांनी महामार्गावर कांदे ओतून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे नाशिक, मालेगाव व मनमाड बाजूकडील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा...
  December 12, 09:00 AM
 • नाशिक- स्मार्ट सिटीत समाविष्ट नाशिकची हरित अशी हरपलेली अाेळख, वाहनांच्या गराड्यात वाढलेले प्रदूषण, थंड हवेचे शहर अशी अाेळख नष्ट हाेण्याची भीती लक्षात घेत लायन्स क्लब अाॅफ नाशिक काॅर्पाेरेटने स्वखर्चातून शहरातील २० प्रमुख चाैकात प्रदूषित हवा शुद्ध करून बाहेर साेडणारी यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी महापालिकेकडून जागा व विद्युत यंत्रणा अपेक्षित असून, महापालिकेने या प्रकल्पासाठी तयारी दाखवल्यामुळे मंगळवारी दिंडाेरीराेडवरील रिलायन्स पेट्राेलपंपावर महापाैर रंजना...
  December 12, 08:48 AM
 • नाशिक- गेल्या नऊ महिन्यांत महापालिका अंदाजपत्रकातील तरतुदीच्या ३४ टक्केच रक्कम विविध विकासकामांवर खर्च झाल्यामुळे तत्कालीन अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या गतिमान प्रशासनाचे बिंग अखेर नवीन अायुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अाढाव्यात फुटल्याचे चित्र अाहे. एवढेच नव्हे तर भाजप विरुद्ध अायुक्त या संघर्षात अनेक विकासकामे अडकून पडल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान, अंदाजपत्रकात इतकी माेठी रक्कम शिल्लक असल्यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक कशी म्हणता येईल? असा सवाल करत त्यांनी चांगलीच...
  December 12, 08:24 AM
 • नाशिक- दुकानाच्या काउंंटरखाली जीवघेणा मांजा लपवून ठेवत त्याची छुप्या पध्दतीने शहरात विक्री सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. काही विक्रेते नायलाॅनची मागणी येताच आपल्या गाेदामातून माल उपलब्ध करून देत असल्याचीही माहिती मिळते. सर्वात गंभीर बाब म्हणजे नायलाॅनचा मांजा काेणत्या दुकानात मिळताे याची माहिती लहान मुलांनादेखील आहे. पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवघेणा नायलॉन किंवा काची मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यापुढे अशा मांजाची साठवणूक, विक्री आणि वापर...
  December 11, 10:15 AM
 • नाशिक- विनाहेल्मेट बेफाम वेगात दुचाकी चालवत मृत्यूला आमंत्रण दिल्याने ११५ दुचाकी अपघातात ११२ दुचाकीचालकांचा महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवर बळी गेला. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये १८ ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. दोन दिवसांपूर्वी एका अतिवेगवान दुचाकीवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी उभ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने दाेन तरुणांचा बळी गेला. महागड्या दुचाकी बाळगणे ही शहरातील तरुणांमध्ये फॅशन झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शरणपुररोडवर सहा लाख...
  December 11, 10:11 AM
 • सिडको- उत्तमनगर येथील वावरे महाविद्यालयातील एसवायबीकॉमचा विद्यार्थी विक्रांत काळे याने एका प्राध्यापिकेने नापास केल्याचे चिठ्ठीत लिहून आत्महत्या केल्याच्या प्रकारानंतर संबंधित प्राध्यापिकेला त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी या विद्यार्थ्याचे नातेवाइक आणि विद्यार्थ्यांनी साेमवारी (दि. १०) महाविद्यालयावर माेर्चा काढला. तसेच प्रवेशद्वारावर ठिय्या आंदाेलन केले. दरम्यान, महाविद्यालयाने संबंधित प्राध्यापिकेला तत्काळ निलंबित केले असून, याप्रकरणी चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत....
  December 11, 10:03 AM
 • नाशिक- तुकाराम मुंढे आयुक्त असताना काही स्पेशालिस्ट डाॅक्टरांनी कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर अर्थातच सीएमओची आठ तासांच्या सेवेतून सुटका करून घेण्यासाठी आपल्याशी संबंधित विशिष्ट आजारावरच उपचार करण्यासाठी साेयीने पदस्थापना मिळवली खरी मात्र, नियमित चार तासांची ड्यूटी साेडून ते रात्री-अपरात्री प्रसूती असाे, अपघाताशी संबंधित रुग्णांवर उपचारासाठी फाेन करूनही ते फिरकत नसल्याची व्यथा महापालिकेतील एमबीबीएस या अर्हतेच्या डाॅक्टरांनी महापाैर रंजना भानसी यांच्याकडे साेमवारी मांडली....
  December 11, 09:28 AM
 • सिडको- सिडकोच्या वावरे महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थी विक्रांत चंद्रभान काळे (१९, रा. उत्तमनगर) याने एका विषयात नापास झाल्याने शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अात्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्याने ही बाब नमूद केली असून संबंधित विषयात नापास करणाऱ्या प्राध्यापिकेचे नावही लिहिल्याचे समजते. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रविवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी...
  December 10, 10:13 AM
 • सातपूर- त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या बेळगांव ढगा शिवारात रविवारी (दि. ९) दुपारी एका १७ वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला अाहे. या प्रकरणी सातपूर पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशीसाठी काही संशयितांना ताब्यात घेतले अाहे. पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, संताेष शामराव अाघाम (१७) हा सातपूर- त्र्यंबक रस्त्यावरील समृध्दनगर चौकातील हॉटेल अमृत गार्डन परिसरात कुटुंबियांसमवेत वास्तव्यास होता. तो शनिवारपासून बेपत्ता हाेता....
  December 10, 09:47 AM
 • नाशिक- राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचे २८ कोटी ३० लाख ५६ हजार ५६८ रुपये लाटणाऱ्या राज्यभरातील ७० शैक्षणिक संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस विशेष चौकशी पथकाने केली आहे. त्यावर शासनस्तरावरून अद्याप कारवाई न झाल्याने अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये शासनाविषयी आक्रोश निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे, शैक्षणिक संस्थांमध्ये नामांकित शिक्षणसम्राटांचा, विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने याकडे दुर्लक्ष केले...
  December 9, 08:16 AM
 • जायखेडा- तीव्र दुष्काळ, घटत चाललेले उत्पन्न, शेत मालाचे कोसळले बाजार भाव व कर्जाचा वाढता डोंगर या आपत्तींनी त्रस्त झालेल्या बागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. बागलाण तालुक्यातीलभडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय-44) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तरसारदे (ता.बागलाण) येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे (वय- 33)यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाचे शेतीविषयी असलेले...
  December 8, 06:22 PM
 • नाशिक- शहरातील बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम सुरू असतानाच रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर बेफाम वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. विशेषत:, रात्री बारा ते पहाटे तीन या वेळेत झालेल्या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला. वर्षभरात शहरामध्ये ५२९ अपघातात १८४ नागरिकांनी प्राण गमावले, तर २६८ चालक कायमचे जायबंदी झाले. शहरातील रस्त्यावरील वाहतूक आणि त्यातील असुरक्षितता हा मुद्दा पुन्हा एकदा वाढत्या अपघातांच्या आकडेवारीतून अधोरेखित झाला आहे....
  December 8, 08:57 AM
 • नाशिक- वडाळागाव येथील सादिकनगर भागात असलेल्या प्लास्टिक भंगार मालाच्या गाेदामाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. ७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी दाट लोकवस्ती असल्याने आगीवर नियंत्रणात मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वडाळागावातील अतिक नबी शेख यांच्या मालकीच्या प्लास्टिक भंगार मालाच्या गाेदामाला आग लागल्याचे...
  December 8, 08:54 AM
 • नाशिक- माझ्यावर आंबा प्रकरणात आरोप म्हणजे अंधार असलेल्या खोलीत काळी मांजर शोधण्याचा प्रयत्न असल्याचे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माझ्या शेतातील आंबे खाल्ले तर पुत्रप्राप्ती होते, असे वादग्रस्त विधानप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. शुक्रवारी दुपारी भिडे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले. दुपारी काळाराम मंदिरात दर्शन...
  December 8, 08:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात