Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव येथील १९ वर्षीय तरुणीच्या तोंडावर बैलगाडीच्या जोखडाने प्रहार करून अज्ञातांनी तिची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. रंजना महाले असे मृत तरुणीचे नाव असून ती आई व मोठ्या बहिणीसोबत गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर शेतात राहत होती. शुक्रवारी रंजनाला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. त्यामुळे गावातील भाऊबंधांना याचे आमंत्रण...
  12:12 AM
 • इगतपूरी (नाशिक)- वाडीव-हे जवळील गड़गड़सांगवी (ता.इगतपुरी) येथील आमळी डोंगरावरगिर्यारोहणासाठी आलेल्या बोरिवली येथील गिर्यारोहकाचा पाय घसरल्याने जवळपास चारशे ते पाचशे फुटावरुन कोसळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे पासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या आमळी पर्वत देवीचे जागृत स्थान म्हणूनही परिचित आहे. बोरिवली पूर्व, मुंबई येथील चक्रम हायकर्स संस्थेचे महेंद्र सुरेश अधटराव (वय-26) हा तरुण आपल्या 14 गिर्यारोहक मित्रासोबत आमळी पर्वतावर...
  March 24, 07:09 PM
 • नाशिक - नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि. २३)गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे वसतिगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरी एकनाथ जाधव (२१, रा. आैरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान, गौरीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाजवळ मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात गौरी जाधव ही विद्यार्थिनी...
  March 24, 09:36 AM
 • नाशिक- तंबाखूजन्य पदार्थांच्या खुलेअाम विक्रीवर शासनाने काेटपा कायद्यान्वये बंदी घातलेली अाहे. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाेलिस यंत्रणा उदासीन अाहे. त्यामुळे सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटख्याची बाजारात खुलेआम जाहिरात आणि विक्री केली जात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा असताना त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. परिणामी प्राैढांसाेबतच युवा पिढीही अमली पदार्थांच्या अाहारी जात अाहे. अाजमितीस राज्यातील २.५ काेटी लाेक विविध प्रकारांत तंबाखूचे सेवन...
  March 24, 09:34 AM
 • नाशिक- नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी(दि.२३)गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे वसतिगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरी एकनाथ जाधव(२१, रा. आैरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान, गौरीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाजवळ मुलींचे वसतिगृह आहे. या वस्ततिगृहात गौरी जाधव ही विद्यार्थिनी...
  March 23, 11:32 PM
 • नाशिकरोड - मुंबईहुन सिन्नरकडे साडेसतरा टन गॅस घेऊन निघालेला टँकर गुरुवारी (दि. २२) पहाटे पाचच्या सुमारास नाशिकरोड येथील गुरुद्वारासमोर उलटला. सुदैवाने टँकरमधून गॅसगळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा एक किलोमीटरच्या परिघात त्याचा दुष्परिणाम झाला असता. हिंदुस्थान पेट्रोलियम (एच. पी.) कंपनीचा टँकर (एन.एल. ०१ एए ४०४८) गुरुवारी साडेसतरा टन वजनाचा स्वयंपाकासाठी लागणारा गॅस घेऊन मुंबई येथून सिन्नर येथील केंद्राकडे निघाला हाेता. मात्र नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड येथील...
  March 23, 08:51 AM
 • नाशिक- नाशिक जिल्ह्यातील वासाळी वासाळी शिवारातील नासर्डी नदी पात्रात २१२ जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. एके ४७ रायफलसाठी लागणारी ही काडतुसे एका प्लस्टिकच्या गोणीत होती. वासाळी शिवारात नासर्डी नदीच्या वरील पुलाखाली रायफलचे गंजलेले राऊंड पडल्याचे निदर्शनास येताच येथील पोलिस पाटलांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना नदीच्या पुलाखाली ११३ जिवंत काडतुसे व ४१ पुगळ्या सापडल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून बीडीडीएस, दहशतवादी विरोधी पथकाच्या पथकाने रात्रीच नदीपात्रात शोधमोहिम...
  March 23, 12:11 AM
 • नाशिक- बिटको कॉलेजसमोर गुरुवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर उलटला. टँकर मुंबईहुन सिन्नरच्या दिशेने निघाला होता. टँकरमध्ये साडे सतरा टन गॅस होता. गॅस गळतीची भीती व्यक्त केली जात होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेनच्या मदतीने रस्त्यावर आडवा झालेला टॅंकर हटविण्यात आला आहे. चालक जखमी या अपघातात टँकरचा चालक जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बिटको...
  March 22, 10:50 AM
 • नाशिक - मुंबईत जाऊन मॉडेलिंग करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीने दूरचित्रवाणीवरील एका गाजलेल्या गुन्हेगारी मालिकेतून कल्पना घेत मित्रांसमवेत स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि त्यांच्याकरवी अापल्याच कुटुंबीयांकडे चोरीच्या मोबाइलवरून संपर्क साधून सात लाख रुपयांची खंडणी मागितली. भेदरलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी सातपूर पाेलिस ठाण्यात धाव घेऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली. पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुटुंबीयांनी दिलेल्या तोकड्या माहितीच्या आधारे सुमारे नऊ...
  March 22, 09:20 AM
 • मालेगाव- चंदनपुरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या जितेंद्र संजय शेलार या आरोपीला अपर सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. अाॅक्टाेबर २०१७ मध्ये जितेंद्रने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी किल्ला पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश अली यांच्यासमाेर झाली. सहा साक्षीदारांच्या साक्षीवरून अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने शेलारला पाच वर्षे सश्रम कारावास व हजार रुपये दंड ठाेठावण्यात अाला. दंड न...
  March 22, 08:53 AM
 • नाशिक- एसटी कामगारांचा गेल्या २४ महिन्यांपासून नवीन करार रखडला आहे. वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत कमी वेतनात काम करावे लागत असल्याने दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. वेतन कराराबाबतकोणताही ठोस निर्णय होत नसल्याने नाशिक विभागातील पंचवटी डेपोच्या १२३ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छामरणाची मागणी केली आहे. याबाबतचेनिवेदन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. तुटपुंज्या वेतनावर काम करणे व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे अार्थिक व...
  March 22, 05:31 AM
 • नाशिक - स्पष्ट बहुमताने सत्तेत अालेल्या भाजपवर कुरघाेडी करण्यासाठी अंदाजपत्रकाच्या निमित्ताने अायुक्त तुकाराम मुंढे यांना बळ देण्यासाठी महासभेत त्यांच्या समर्थनार्थ भाषण करण्यापासून तर त्यांना चेतवण्यासाठी मुंढे अागे बढाेच्या घाेषणा देण्याची विराेधकांची खेळी मंगळवारी निष्प्रभ ठरली. अायुक्त मुंढे यांनी विराेधकांच्या समर्थनाला धुडकावून लावत शहरहितासाठी स्थायी समितीवर अर्थसंकल्प पाठवून प्रशासकीय चुणूकही दाखवून दिली. परिणामी मुंढे हे तर जाळ्यात फसले नाहीच, मात्र उद्या...
  March 21, 05:25 AM
 • नाशिक - गेल्या वीस दिवसांपासून भाजप व पालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर स्थायी समितीवर पाठवण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर प्रश्न उपस्थित करून व विराेधकांच्या अकारण गाेंधळाला न जुमानता घेऊन माेठा दणका दिला. त्यानंतर मुंढे यांनी उगाच शहर हितासाठी संघर्ष करणे याेग्य नसल्याचे मत व्यक्त करीत नरमाईची भूमिका घेत स्थायी समितीवर अंदाजपत्रक पाठवण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचा सन २०१७-१८ या अार्थिक वर्षाचा सुधारित व...
  March 21, 05:23 AM
 • मालेगाव - अपर जिल्हाधिकाऱ्यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त केले हाेते. ट्रकमालकांना नाेटिसा बजावून दंड भरण्याच्या सूचना करण्यात अाल्या हाेत्या. मात्र, निर्ढावलेल्या व मुजाेर वाळूमाफियांनी दंडाची रक्कम न भरता मंगळवारी पहाटे थेट तहसीलच्या अावारात उभे असलेले दहा ट्रक पळवून नेले. या प्रकरणी महसूल विभागाने ट्रकमालक व चालकांविराेधात छावणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे. जळगाव, अमळनेर, धुळे, नंदुरबार भागातून मनमाड, अहमदनगरकडे शासनाचा महसूल बुडवून माेठ्या...
  March 21, 01:04 AM
 • नाशिक - शालेय बसमधील मुलींना चॉकलेटचे आमिष देत त्यांच्या सोबत अश्लील वर्तन करणाऱ्या बसचालक आरोपी स्वप्नील किशोर जुन्नरे यास जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सोमवारी (दि. १९) जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी ही शिक्षा सुनावली. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यात ही पहिलीच शिक्षा असल्याने पालकांकडून या निकालाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०१५ रोजी कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथे सकाळी ११ वाजता पीडित...
  March 20, 10:43 AM
 • लोकसहभाग, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने आत्महत्याप्रवण जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास जैन संघटनेने घेतला आहे. सिंचन प्रकल्प, नद्या, नाले यातील साचलेला गाळ उपसून परिसरातील शेतजमीन गाळयुक्त करण्याची ही महत्त्वाकांक्षी मोहीम वर्षभर राबवली जाणार आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा प्रारूप आराखडा बुलडाणा जिल्ह्यात आकाराला येत आहे. भारतीय जैन संघटना, टाटा ट्रस्ट, समृद्ध भारत, अपनाओ भारत या समाजसेवी संघटनांसोबत प्रशासकीय यंत्रणा आणि...
  March 20, 04:27 AM
 • सरकार कोणतीही सेवा पुरवत असते ती लोकांच्या सुविधेसाठीच. पण, सरकारी अथवा सार्वजनिक सेवेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सर्वांची सोय याऐवजी मनमानी पद्धतीने तिचा उपयोग करून घेण्याचा प्रत्येकाला मिळालेला जणू परवाना असा बनला आहे. त्याची परिणती या सेवा कार्यक्षमतेने चालण्याऐवजी त्यांना खीळ बसण्यातच होत असल्याची उदाहरणे जागोजागी दिसतात. रेल्वे प्रशासनाला अलीकडेच घ्यावा लागलेला मनोरंजनाच्या साधनांबाबतचा निर्णयदेखील उपद्रवी प्रवाशांच्या अशाच मानसिकतेचा परिपाक आहे. प्रचंड क्षेत्रफळ...
  March 20, 04:23 AM
 • इगतपुरी- पर्यटनस्थळ म्हणून विकसित हाेत असलेल्या इगतपुरीजवळील तळेगाव शिवार अश्लील पार्ट्यांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले असून मिस्टिक व्हॅली रिसॉर्टमध्ये बंगला क्र. ९ च्या परिसरात रविवारी (दि. १८) मध्यरात्री अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या सहा तरुणींसह १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, नाशकातील कथित पत्रकार संघाच्या अध्यक्षाचा वाढदिवसानिमित्त हे अश्लील नृत्य सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. मिस्टिक व्हॅली रिसॉर्ट परिसरात मद्याच्या नशेत तरुणी आणि तरुण घुंगरू...
  March 20, 02:00 AM
 • मालेगाव - धर्मांविषयी पसरवले जाणारे गैरसमज जातीय तणावास प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. गैरसमज संपले तर तणावही संपुष्टात येईल. इस्लाम धर्माबद्दलचे गैरसमज दूर व्हावे या हेतूने जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेने हिंदू बांधवांना मशिदीत अामंत्रित करून मशिद परिचयाच्या माध्यमातून इस्लाम धर्माचे अाचरण, शिकवण याची माहिती दिली. गणेशाेत्सव काळात गणपतीची अारती केली म्हणून काही मुस्लिम तरुणांना इस्लाममधून बहिष्कृत केल्याचे फतवे जारी झाले हाेते. मात्र, मशिदीत एक येत फक्त मानवतेला प्राधान्य...
  March 19, 09:47 AM
 • मालेगाव- धर्मांविषयी पसरवले जाणारे गैरसमज जातीय तणावास प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. गैरसमज संपले तर तणावही संपुष्टात येईल. परंतु, यासाठी प्रत्येक धर्म समजून घेणे गरजेचे अाहे. इस्लाम धर्माबद्दलचे गैरसमज दूर व्हावे या हेतूने जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेने काही हिंदू बांधवांना मशिदीत अामंत्रित करून इस्लाम धर्माचे अाचरण, शिकवण याबाबत माहिती दिली. मालेगाव शहर जातीय दंगलींच्या इतिहासाने परिचित अाहे. धर्म-जातीविषयी अपप्रचार, गैरसमज निर्माण करून दरी निर्माण केली जाते. ही बाब अाेळखून...
  March 19, 02:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED