जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक - शहरात सलग दुसऱ्या दिवशी एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. येथील मखमलाबाद चौकातून चोरट्यांनी एटीएम फोडून तब्बल 31 लाख रुपयांची लूट केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, 48 तासांतील ही सलग दुसरी घटना आहे. यापूर्वी बुधवारी चोरट्यांनी शहरातील दुसऱ्या एका ठिकाणी एटीएम फोडून 13 लाख रुपये लुटले. त्यामुळे, शहरात एटीएम फोडणाऱ्यांची टोळीच फिरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बुधवारीच चोरले 13 लाख तत्पूर्वी बुधवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मिलिंद काशीनाथ नेहे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात...
  August 22, 01:29 PM
 • नाशिक : सोनसाखळी चोरीप्रमाणे रस्त्याने पायी जाणाऱ्याचे मोबाईल चोरी करणारी टोळी उघडकीस आणण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे. पथकाने दोन संशयितांना अटक केली. अशाच प्रकारे पंचवटीमध्ये या संशयितांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून मोबाईल लुटमार करणारी टोळी जेरबंद करण्यास यश आले आहे. संशयिताकडून चोरीचे सुमारे २ लाखांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अक्षय एकनाथ आहिरे, कैलास नाना गांगुर्डे (दोघे रा. म्हसरूळ) या दोघांना ठक्कर बाजार...
  August 22, 10:57 AM
 • नाशिक : औरंगाबाद येथील कंपनीमध्ये भागीदार करण्याचे आमिष देत दरमहा दीड लाखांचे मानधन मिळवून देण्याचे सांगत शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल २ कोटी ७१ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल आहे. संशयित स्पर्म प्रोसेसर कंपनीचे प्रोप्रायटर प्रमोद बजाज यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अतुल जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये आठवले चेंबर टिळक पथ येथे संशयित स्पर्म प्रोसेसर कंपनीचे संचालक प्रमोद बजाज, मिना बजाज यांनी गारखेडा...
  August 22, 10:47 AM
 • नाशिक -नाशिकच्या जेलरोडवर शिवाजीनगर परिसरातील व्यापारी बँकेसमोर असलेल्या स्टेट बँक आँफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून मशीनमधील १३ लाख ३० हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी अवघ्या सात मिनिटांमध्ये लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे तीन वाजता घडली. बँकाचे एटीएमच्या सुरक्षेकडे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात मिलिंद काशीनाथ नेहे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात संशयिताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे. जेलरोड...
  August 22, 09:36 AM
 • नाशिक : सिंहस्थादरम्यान शहरात येणाऱ्या भाविकांच्या साेयीच्या दृष्टीने तसेच मनाेरंजनासाठी प्रशासनाच्या वतीने लाखाे रुपये खर्चून रामसृष्टी उद्यान साकारण्यात अालेले अाहे. मात्र, या उद्यानाच्या देखभालीकडे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात अाहे. लाखाे रुपये खर्च करून बांधलेल्या उद्यानाला टवाळखाेरांचा अड्डा असे स्वरूप प्राप्त झाले अाहे. याबाबत तक्रारी वाढत असतानाही दुरुस्तीला मुहूर्त लागत नाही. या विषयावर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझाेत... देशातील १००...
  August 20, 11:26 AM
 • नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीवर परखडपणे टीका केल्यामुळे चर्चेत आलेले अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत २२ ऑगस्ट रोजी नाशिक महापालिकेने आयोजित केलेला बेल महोत्सव तडकाफडकी लांबणीवर टाकला असून राज्य शासनाच्या नाराजीच्या भीतीने कार्यक्रम लांबणीवर टाकला, की शिंदे यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला यावर जोरदार चर्चा रंगली आहे. सह्याद्री देवराईचे जनक असलेले सयाजी शिंदे महापालिकेच्या उद्यान विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. गेल्यावेळी ३४ ठिकाणी देवराई प्रकल्पाचा...
  August 20, 11:19 AM
 • नाशिक -सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशासाठी ७ जून रोजी सुरू करण्यात आलेले सार पोर्टल अवघ्या २० दिवसांत बंद पडले. त्यानंतर सीईटी सेलद्वारे प्रवेशप्रक्रियेला पुन्हा नव्याने सुरुवात झाली. सीईटी सेलमध्येही कधी सर्व्हर डाउनचा फटका तर वारंवार नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. व्यावसायिकच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा अभूतपूर्व गोंधळ झाला असताना दुसरीकडे एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेला थेट न्यायालयातच आव्हान दिले गेले....
  August 20, 07:50 AM
 • नाशिक : गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेली नंदिनी (नासर्डी) नदी महापुरामुळे बेफाम खळखळून वाहिली. नदी किनाऱ्यावर अतिक्रमण करत नदीचे पात्र छोटे करणाऱ्यांना या नदीने स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले. महापुरामुळे नदीतील अनेक धार्मिक स्थळांचे नुकसान झाले. मूर्ती वाहून गेल्या. या सर्वांचे धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी, तसेच किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी नवीन नाशिकमधील नाशिकची आई, गोदामाई या सामाजिक संस्थेने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. नाशिकमध्ये गोदावरीच्या अरुणा, वरुणा, वाघाडी, वालदेवी व...
  August 19, 11:15 AM
 • नाशिक : घरातील टेबल फॅनची पिन काढताना विजेचा धक्का लागून १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपाली मोहन पवार (वय १२ रा. खेरवाडी ) असे या मुलीचे नाव अाहे. दीपाली राहत्या घरात टेबल फॅन बंद करण्यासाठी गेली. पिन काढत असताना तिला विजेचा तिव्र धक्का बसला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सिव्हीलमध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी तिला उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत घोषित केले. सायखेडा...
  August 19, 11:04 AM
 • प्रतिनिधी | नाशिक : बॅग व मोबाइल लुटणाऱ्या धुळे येथील सराईत गुन्हेगाराच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली. गुरुवारी (दि. १५) जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पथकाने ही कारवाई करण्यात अाली. संशयिताकडून लुटमारीचे रोकड, मोबाइल अाणि चोरीच्या चार दुचाकी असा सुमारे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात अाला. संशयित सराईत गुन्हेगार असून धुळ्यात गंभीर गुन्हे दाखल अाहेत.याबाबत पोलिस अायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गुन्हे शाखेचे स्वप्नील जुंद्रे...
  August 18, 11:38 AM
 • प्रतिनिधी | नाशिक : शहराचे एकेकाळाचे भूषण असलेला व अातापर्यंत काेट्यवधी रुपये खर्च करण्यात अालेला गाेदापार्क अंतिम घटका माेजत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली अाहे. तुंबलेल्या ड्रेनेजमधून वाहणारे सांडपाणी, महापुरामुळे उन्मळून पडलेले वृक्ष, पुरामध्ये पेव्हर ब्लाॅकही वाहून गेल्यामुळे पडलेले भगदाड अशी गाेदापार्कही स्थिती झाली अाहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणारे पालिकेचे अधिकारी वा लोकप्रतिनिधी अद्यापपर्यंत या ठिकाणी पाहणीसाठीही न फिरकल्याने नागरिकांकडून...
  August 18, 11:32 AM
 • नाशिक -काेणत्याही स्त्रीच्या जीवनातील सर्वात आनंदाचा तसेच जीवनाला कलाटणी देणारा क्षण म्हणजे मातृत्व प्राप्त हाेणे. हाताच्या फाेडाप्रमाणे गर्भात नऊ महिने सांभाळ केल्यानंतर मातृत्वाचा हाच आनंद अनुभवला ताे २ फूट ८ इंच उंची असलेल्या लक्ष्मी नावाच्या मातेेनेे. नाशकातील गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयात शुक्रवारी वैद्यकीय परिभाषेत अत्यंत दुर्मिळ समजली जाणारी या मातेची सुखरूप प्रसूती झाली. आईसह डाॅक्टरांच्या डाेळ्यातूनही आनंदाश्रू वाहू लागले. गणेशवाडी परिसरातील रहिवासी लक्ष्मी ही...
  August 18, 10:57 AM
 • नाशिक - संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ संस्कृती भारती हा जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटरनेट- रेडिओ जागतिक संस्कृतदिनी अॉनलाइन प्रसारित करण्यात आला. भाषा शब्दकोषांचे संशोधक नाशिकचे भूमिपुत्र सुनील खांडबहाले यांच्या खांडबहाले डॉटकॉमने त्याची निर्मिती केली आहे. हा कम्युनिटी रेडिओ असल्याने आगामी काळात तज्ञांच्या सहाय्याने त्यावर संवादात्मक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे. श्रवण हे भाषा शिकण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा...
  August 17, 10:15 AM
 • नाशिक -रविवार सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणक्षेत्र अन् पाणलोटामधून पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे गंगापूर धरणांतून जायकवाडीला १५ दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग साेमवारी सायंकाळी थांबवण्यात आला. असे असले तरीही यापूर्वीच नाशिकमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग झाल्याने जायकवाडी धरण ९० टक्के भरले आहे. ६६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाल्याने नाशिक-नगरसह मराठवाडावासीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. इगतपुरी,...
  August 13, 08:42 AM
 • नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्याचे अामिष भाेंदूबाबाने देत महिलेला पूजा करण्यास लावत तिच्यासाेबत देवाने लग्न लावून दिल्याचा बनाव करत या महिलेवर अत्याचार केला. यातून पीडित महिला गर्भार राहिल्याने भाेंदूबाबाने तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर परिसरात उघडकीस अाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात भोंदूबाबासह पाच संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश अाहे. पोलिसांनी दिलेली माहिती अाणि...
  August 11, 11:11 AM
 • नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा अायोगातर्फे २०१९ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांना जुलै महिन्यापासून सुरुवात झाली अाहे. राज्य सेवा परीक्षा २०१९ ही मुख्य परीक्षा १३, १४ व १५ जुलै रोजी झाली. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेत पीएसअाय, एसटीओ, एएसओ यासाठी दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (संयुक्त पेपर एक) २८ जुलै रोजी परीक्षा झाली. पोलिस उपनिरीक्षक पेपर क्र. दोन २४ अाॅगस्ट रोजी होईल. राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पेपर क्र. दोन रविवारी (दि. ११) होणार होती. परंतु, राज्यभरात पूरस्थितीमुळे ही परीक्षा पुढे...
  August 10, 09:09 AM
 • नाशिक - सिंहस्थातील पर्वणीत देश- विदेशातून येणाऱ्या भाविकांना पवित्र स्नानासाठी गाेदावरी नदीच्या काठ परिसरात ४० काेटी रुपये खर्च करून घाट व रस्ते विकसित करण्यात आले हाेते. मात्र रविवारी महापुरामुळे येथील रस्ते व घाट अवघ्या ३ वर्षांतच उखडून गेले असून रेलिंग, पथदीप वाहून गेले आहे. सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान शहरात लाखांेच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या साेईच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने कन्नमवार पूल ते तपाेवनातील पुलापर्यंत स्नान घाट विकसित केले आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्य...
  August 7, 11:34 AM
 • गंगापूर -गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे पाणी मंगळवारी तिसऱ्या दिवशीही वाढतच असल्याने गंगापूर तालुक्यातील गोदाकाठावर राहणाऱ्या नागरिकांचा धोका कायम आहे. कायगाव अमळनेर व लखमापूर भागात पाणी पात्र सोडून दीड ते दोन किलोमीटर पसरल्याने पुरामुळे स्थलांतरित कुटुंबीयांना अन्न पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातून सोडलेले पाणी गोदावरी व प्रवरा नदीतून अधिक वेगाने आज दिवसभर दाखल होत असल्याने जायकवाडी बॅकवाटर क्षेत्रात...
  August 7, 07:47 AM
 • नाशिक- आपल्या आगळ्या वेगळ्या नृत्य शैलीमुळे नेहमी चर्चेत असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले. केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा संकल्प जाहीर केला होता. याबाबत अध्यादेश जारी करुन कलम 370 ला निष्प्रभावी करण्यात आले आहे. आता जम्मू-काश्मीर आणि लद्दाख दोन्हीही केंद्रशासित प्रदेश असतील. म्हणजे येथे राज्य सरकार निवडूण येईल पण यासोबतच केंद्रसरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती उपराज्यपालाची नियुक्ती करेल. मोदी सरकारच्या या निर्णयाचे...
  August 5, 03:51 PM
 • नाशिक - शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाबराेबरच गंगापूर धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे आलेल्या महापुरामुळे गाेदावरीने राैद्ररूप धारण केले. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पाणी थेट भांडी बाजारापर्यंत पाेहाेचले आहे. या परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी गेल्याने साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी दुकानदारांना माेठी तारांबळ उडाली आहे. याबराेबरच दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान नाशिकमधील सद्यस्थिती पाहता प्रशासनाने सोमवारी सर्व शाळांना सुटी...
  August 4, 01:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात