जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • पुणे / नाशिक -राज्याच्या विविध भागांत दमदार पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत असून पश्चिम महाराष्ट्र, नाशिक परिसरात अनेक धरणे ओसंडली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. किनारी प्रदेशात सोसाट्याचे वारे वाहतील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक व नगर जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील...
  August 4, 08:07 AM
 • नाशिक - नाशिक शहरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. गंगापूर धरणातून 11358 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे गोदावरीला महापूर आला आहे. यामुळे नदीकाठावरील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीपाण्याखाली गेलाआहे. तर रामकुंडाबाहेरीलरस्त्यावर गुघडभरपाणी आले आहे.गोदावरीला आलेले पाणी पाहण्यसाठी लोकांनी नदीवरील पुलावर थांबत आहे.धरणातून पाणी सोडल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात आज सरासरी 45.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी 9 वाजता गंगापूर...
  August 3, 03:25 PM
 • नाशिक - नाशिक शहरात आज (3 ऑगस्ट) सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वरुणराजाने यावर्षी नाशिकवर आपली बरीच कृपादृष्टी दाखवल्याचे दिसत आहे. या पावसामुळे गोदावरीला पूर आला असून नदीकाठची मंदिर पाण्याखाली गेली. गेल्या आठवडाभरापासून नाशिकमध्ये संततधार सुरु आहे. गंगापूर धरणातून 11358 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीला पूर आला आहे. रामकुंड, लक्ष्मणकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती, राम सेतू पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच येथील नदीकाठील दुकाने बंद करण्यात आली आहे....
  August 3, 01:14 PM
 • नाशिक -सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला चक्क व्हाॅट्सअॅपवर तलाक देणाऱ्या पतीच्या विरोधात मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा कलम-२०१९ अंतर्गत देशातील पहिला गुन्हा ठाणे पोलिस आयुक्तालयातील मुंब्रा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गर्भवती पत्नीच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. ३० जुलै रोजी तीन तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. कौस मुंब्रा परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेचा विवाह इम्तियाज गुलाम हुसेन पटेल...
  August 3, 07:27 AM
 • नाशिक-मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी कायद्यानुसार खुल्या विक्रीला बंदी असलेले गर्भपाताचे औषध अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळाने नाशकात घरपोच पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला. डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्सशिवाय अशा प्रकारची औषध विक्री करता येत नसतानाही अशी अनेक औषधे थेट घरपाेच मिळू लागल्याने समाजाचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबद्दल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असाेसिएशनने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांना नाशिक जिल्हा...
  August 2, 08:11 AM
 • नाशिक - लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने बुधवारी (दि. ३१) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यात नाशकातील ३५०० डॉक्टर्स सहभागी होणार आहे. २४ तासांसाठी हा संप असणार असून या रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) जागी नवीन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करणारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक सोमवारी लोकसभेत संमत करण्यात आले. या विधेयकाला विरोध करत आयएमएने संपाची हाक दिली...
  July 31, 10:58 AM
 • नाशिक-गंगापूर धरणाच्या पाणलाेट क्षेत्रासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून ८४ टक्के भरलेल्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग १ हजाराने वाढवून ८ हजार ८३३ क्युसेक करण्यात आला आहे. ८७ टक्के भरलेल्या दारणा धरणातून १३ हजार ५८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे मराठवाड्यात जायकवाडी धरणातील जलसाठ्यात चांगली वाढ हाेणार आहे. तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील आठ तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे मराठवाड्याला पाणी देणारी महत्त्वाची असलेली या भागातील...
  July 31, 07:44 AM
 • नाशिक -तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा ही दोन्ही महत्त्वाची धरणे अनुक्रमे ८० आणि ८७ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि. २९) पाणी विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ४ हजार १६१ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दारणा धरणातून शनिवारच्या ३ हजार १४९ पाणी विसर्गात वाढ करत तो १३ हजार ५८ क्युसेक अन् नंतर १६ हजार ६८८ क्युसेक करण्यात आली. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातूनही ४५ हजार २३४ क्युसेकने पाणी गोदावरीमार्गे...
  July 30, 12:27 PM
 • सिन्नर - वाॅटर कपमध्ये सहभागी गावात जाऊन राेज सकाळी श्रमदान करण्याचे कार्य सिन्नरमधले व्यापारी तरुण गेल्या वर्षापासून करत हाेते. पाणीटंचाई भेडसावणाऱ्या सिन्नर शहरातील बंद पडलेले पाण्याचे स्रोत जिवंत केले तर टंचाई कमी हाेईल, असा विचार अनुलाेम या एनजीओचे प्रतिनिधी सत्यजित कळवणकर यांनी मांडला. सर्वांनीच ताे उचलून धरला. चालुक्यकाळापासूनचा इतिहास असलेल्या सिन्नरमध्ये १२०० वर्षांपूर्वीच्या यादवकालीन पाण्याच्या १२ बारवा (पायऱ्या असलेल्या दगडाने बांधलेल्या विहिरी) पिण्याच्या...
  July 29, 09:09 AM
 • नाशिक -पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊनही, विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार घेऊन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथील शेतकरी बाबूराव सुर्वे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दार ठोठावले. पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ दखल घेऊन ही तक्रार केंद्रीय कृषी खात्याकडे ती वर्ग केली. केंद्रीय कृषी खात्यानेही ती कंपनीकडे पाठवण्याचे कागदी घोडे नाचवले. मात्र, या तक्रारीला आठ महिने उलटून गेल्यावरही विमा कंपनीने त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान,...
  July 26, 07:40 AM
 • नाशिक- महाराष्ट्राच्या धरतीवर पडणारा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असे उदगार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी काढले.देवसाने- मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाचा उद्देश यशस्वी होताना पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे स्पष्ट केले. गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकते याचे उदाहरण म्हणजेच देवसाने-मांजरपाडा...
  July 25, 07:58 PM
 • नाशिक -अश्लील हावभाव करणाऱ्या रिक्षाचालकाला एका उच्चशिक्षित महिलेने चांगलाच धडा शिकवला. या महिलेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी रिक्षाचालकाला अटक करून त्याचा परवाना रद्द केला. इतकेच नव्हे तर त्याची रिक्षाही स्क्रॅप करण्याची शिफारस आरटीआेकडे केली आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नाशिकहून सातपूरकडे येणाऱ्या रिक्षात (एमएच १५ झेड १६९२) दाेन उच्चशिक्षित नाेकरदार महिला बसल्या हाेत्या. त्यापैकी एक महिला एबीबी सर्कलवर उतरली. दुसरी महिला रिक्षात एकटीच असल्याची संधी साधत चालकाने...
  July 25, 09:17 AM
 • नाशिक - एकीकडे शहरात निर्भया पथकाकडून टवाळखोरांवर धडक कारवाई सुरू असताना काॅलेजरोड, गंगापूररोडवर मात्र टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. छेडछाडीचे प्रकार घडत असतानाच टवाळखोरांनी युवतींच्या दुचाकीचा पाठलाग करत कारने कट मारल्याची घटना घडली. युवतींच्या मदतीसाठी आलेल्या मित्रांनाही या टवाळखोरांनी बेदम मारहाण केली. हॉलमार्क चौकात हा धक्कादायक प्रकार घडला. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि एका पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी साडेसात...
  July 23, 11:09 AM
 • नाशिक - नाशिक येथील आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कमेवर हात साफ केला. दरम्यान याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बिलाल खान आणि विठ्ठल जाधव अशी दोघांची नावे आहेत. मेळाव्यात चोर आपल्या खिशातील पैसे चोरत असल्याचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या लक्षात आले. त्यांनी चोराला रंगेहात पकडले आणि अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले.सदरील...
  July 22, 01:01 PM
 • नाशिक राेड - हे ब्रीदवाक्य घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांचा सन्मान करीत आहे. त्यामुळे चांदा त बांदा असा सर्वदूर बेटी बचाव चा नारा बुलंद झाला असताना पाठ्यपुस्तकांची मागणी केली म्हणून चक्क वडिलांनी मुलीच्या तोंडात कोंबली किटकनाशकाची बाटली टाकून तीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शिंदे गावात काळजाचा ठाेका चुकविणाऱ्या या घटनेने बापाच्या नात्याला काळीमा फासलाय. तर मुलगी असेल तर काय झाले तीने शिकू नये काय? असा समाज चिंतनीय प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झालाय. याबाबत नाशिकरोड पोलिस...
  July 22, 10:38 AM
 • सिन्नर - पोलिस स्टेशनच्या आवारातील ५० फूट उंचीच्या वायरलेस टॉवरवर अडकलेल्या करकोचाला पक्षीमित्रांनी जीवदान देण्याची घटना रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. हवालदार विनोद टिळे, संजय गंगावणे, विकी वरंदळ यांच्या प्रयत्नानंतर या पक्ष्याची मरणाच्या दारातून सुटका झाली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिन्नर पोलिस स्टेशनच्या आवारातील वायरलेस टॉवरवर अडकलेल्या करकोचाला कावळे आणि इतर पक्षी कालवा करत वाचवण्याची धडपड करत होते. हवालदार विनोद टिळे यांच्या ही बाब लक्षात येताच...
  July 22, 10:28 AM
 • नाशिक-शिवाजी महाराजांची मूर्ती आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रतिमा स्टेजवर आहेत. त्यांच्या रांगेत आम्ही नाही बसू शकत, म्हणून स्टेजच्या खालून मी तुमच्याशी बोलणार आहे, असे आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वरमधील विजय संकल्प मेळाव्यात म्हणाले आणि नाशिकमधील मेळाव्यात एकच गडबड सुरू झाली. नाशिकमधील मेळाव्यातील व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या प्रतिमा शेवटच्या क्षणी व्यासपीठावर ठेवण्यात आल्या, पण या वेळी आदित्य ठाकरे आवाज घुमत असल्याचे कारण देत लोकांमध्ये शिरले. व्यासपीठावरून भाषण...
  July 21, 08:35 AM
 • नाशिक -खासगी विमा कंपन्यांना ठाकरी इशारा देत राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा कळवळा दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मोर्चा आग सोमेश्वरी अन् बंब रामेश्वरी ठरला आहे. मातोश्रीपासून सोयीच्या अंतरावर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर बुधवारी ठाकरेंनी मोर्चा काढून १५ दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास पेकाटात लाथ घालण्याचा इशारा दिला आहे. परंंतु पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई...
  July 19, 10:35 AM
 • ठाणगाव - ठाणगाव-सिन्नर मार्गावर ठाणगाव घाटातील देवीच्या खिंडीतील वळणावर ट्रॅक्टर उलटून त्याखाली दाबला गेल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १८) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात किरण नामदेव बिन्नर (१९, रा. हिवरे) हा जागीच ठार झाला. तर अन्य ४ जण किरकोळ जखमी झाले. सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील किरण बिन्नर, दीपक मेंगाळ, पीयूष बिन्नर, तेजस सहाणे, विकास सहाणे हे विशीतले ५ मित्र गुरुवारी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून बोरखिंड येथे वनविभागाच्या...
  July 19, 09:25 AM
 • नांदगाव (जिल्हा नाशिक) - सलग दोन वेळा निवडून न येण्याची नांदगाव मतदारसंघांची परंपरा माेडून माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ मागील दहा वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर भुजबळांची घट्ट पकड होती. केंद्रात आणि राज्यात बदलेले सरकार, भुजबळ त्रिकुटाच्या मागे लागलेले ईडीचे शुक्लकाष्ठ यामुळे मधल्या काळात आमदार पंकज भुजबळ यांचा जनसंपर्क तुटला. त्याचाच फायदा घेत शिवसेनेचे सुहास कांदे यांनी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा...
  July 19, 07:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात