Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- एकतर्फी प्रेमातून युवतीचा पाठलाग करत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला हटकणाऱ्या भावाला संशयिताने बेदम मारहाण केली. एक्स्लाे पॉइंट, अंबड येथे हा प्रकार घडला. संशयिताच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, एक्स्लाे पॉइंट येथे कंपनी सुटल्यानंतर घरी पायी जात असतांना संशयित सुशील भागवत प्रसाद यादव ( रा. पाथर्डी फाटा) याने दुचाकीवरून ( एमएच १५ एवाय १८८५) घरापर्यंत पाठलाग केला. तू मला बघत...
  September 3, 10:15 AM
 • दिंडोरी- तालुक्यातील रासेगाव येथे एक शेतात पुरातन तोफगोळा सापडल्याने खळबळ उडाली अाहे. रासेगाव ते देहरवाडी या रस्त्यावर विष्णू शिवराम पवार यांची जमीन आहे. ते दुपारी चारच्या सुमारास काम करत असताना जुन्या काळातील तोफगोळा मिळाला. याबाबत त्यांनी त्वरीत सरपंच बालाजी पवार, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाडवी यांना माहिती दिली. पाेलिस प्रशासनाने हा ताेफगाेळा ताब्यात घेतला.
  September 3, 10:07 AM
 • नाशिक- शिक्षकांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनडीएसटी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. वार्षिक अहवालात शिक्षक आमदारांऐवजी इतर नेत्यांचे फोटो छापल्याने सभासदांनी संचालक मंडळाच्या विरोधात घोषणा दिल्या. एवढेच नव्हे तर ९ टक्के लाभांश देण्याची मागणी करत घेराव घालून अध्यक्षांकडील माईकवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे गोंधळ सुरू असताना दुसरीकडे संचालकांनी सर्वच विषय मंजूर करून घेत वार्षिक सभेचे कामकाज गुंडाळले. प. सा. नाट्यगृहात रविवारी (दि. २) नाशिक...
  September 3, 09:58 AM
 • नाशिक- ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रणजीत पटेल याने १ तास ७ मिनिटे ४१ सेकंद अशी वेळ नोंदवत हाफ मॅरेथॉनचे तर मोनिका आथरे हिने महिलांच्या खुल्या गटातील १५ किलोमीटरच्या स्पर्धेत ५६ मिनिटे ५२ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावून नाशिकचे वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. भोसला सैनिकी महाविद्यालयात रणजित कला शाखेच्या अंतिम वर्षाला आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बनारस येथील असला तरी शिक्षणासाठी गेल्या पाच वर्षांपासून तो नाशिकमध्ये स्थायिक झाला आहे. अॅथलेटिक्समधील त्याचे कौशल्य व...
  September 3, 09:48 AM
 • नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेशासाठीच्या मुदतीत ८ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन शिक्षणक्रमांची माहिती घेऊन ८ सप्टेंबरपर्यंत अॉनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना तब्बल सहा लाखांहून अधिक विद्यार्थी...
  September 3, 07:25 AM
 • नाशिक - शहराचे सांस्कृतिक वैभव अाणि कलावंतांना प्राेत्साहन देणारी वास्तू म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरातील प्रयाेग करणे अाता पाचपट महागले असून, नऊ काेटी रुपये खर्च करून सुसज्ज झालेल्या या नाट्यगृहातून महापालिकेला माेठ्या प्रमाणात महसुलाची अास लागली अाहे. सद्यस्थितीत महापालिकेने तात्पुरते दर जाहीर केले असून, स्थायी समितीच्या मान्यतेनंतर सुधारित दरअाकारणी निश्चित हाेईल. सद्यस्थितीत कालिदास कलामंदिरातील प्रयाेग सुरू व्हावे या उद्देशातून दर जाहीर करून...
  September 2, 11:36 AM
 • नाशिक - अविश्वास ठरावाचा प्रयाेग फसल्यानंतर पालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी उत्पन्न वाढवण्यासाठी हल्लाबाेल केला असून पालिकेच्या ११०० गाळ्यांकडे तीन वर्षांपासून थकीत असलेली सुमारे ३१ काेटींची रक्कम वसूल करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम द्यावा व प्रतिसाद देणार नाहीत, त्यांचे गाळे महिनाभरात जप्त करावे, असे अादेश विविध कर विभागाला दिले. दुसरीकडे, गणेशमूर्ती विक्रीसाठी सहाही विभागांकरिता ४५८ स्टाॅलसाठी जाहीर लिलाव केले जाणार असून यापूर्वी दादागिरी करून जागा पदरात...
  September 2, 11:36 AM
 • नाशिक - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत १९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असले तरी अजूनही ८ हजार ५१९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच फेरपरीक्षेतही ३ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे असल्याने या दोन्ही शाखांच्या जागा वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत पाच हजार जागा रिक्त असल्या तरी शहरातील प्रमुख...
  September 2, 11:34 AM
 • नाशिक- अायुक्त तुकाराम मुंढे यांच्याविराेधात अविश्वास प्रस्ताव रद्द झाल्यानंतर भाजपवरच अविश्वास व्यक्त करताना विराेधी पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, मनसेने अाक्रमक पवित्रा घेत करवाढीवरून अांदाेलन उभारण्याचा इशारा दिला. उद्धव ठाकरेंकडे जाणार शिवसेना महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अाणि विराेधी पक्षनेते असलेल्या शिवसेनेने थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेण्याची तयारी केली अाहे. विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते म्हणाले की,...
  September 1, 10:42 AM
 • पांढुर्ली- सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणारी तवेरास अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे २० फूट खोल नाल्यात उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थिनींसह चालक जखमी झाला. जखमींवर धामणगावच्या एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पांढुर्ली येथील जनता महाविद्यालयाच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनी शुक्रवारी (दि. ३१) सकाळी आगासखिंड फाट्यावरून तवेरामध्ये (एम.एच. ०४ इअो ४७५५) बसून जात असताना कोळवाहळ नाल्यावरील पुलाजवळ अज्ञात वाहनाने हुलकावणी...
  September 1, 10:38 AM
 • नाशिक- करवाढीसह नानाविध मुद्यावरील अविश्वास ठराव पक्षश्रेष्टींनी फेटाळल्यानंतर सत्ताधारी भाजपमधील अस्वस्थता शिगेला गेल्याचेच चित्र हाेते. पाच दिवस वेगाने घडामाेडी करणारे शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप हे संपर्काबाहेर गेल्याचे चित्र हाेते तर सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी माेरूस्कर यांच्यासह अन्य नेत्यांनी रामायण या महापाैर निवासस्थानाकडे पाठ फिरवली. ठराव मागे घेतल्यानंतरही अद्यापही करवाढ बऱ्याचअंशी कायम असल्यामुळे अाता लाेकांसमाेर कसे जायचे असा प्रश्न भाजप...
  September 1, 10:37 AM
 • नाशिक- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदी प्रक्रियेची सिन्नर तालुक्यासाठीची मुदत मागील महिन्यात संपली हाेती. त्यानंतर पेसा क्षेत्राचा समावेश असलेल्या इगतपुरी तालुक्यासाठी देण्यात अालेली मुदतदेखील शुक्रवारी संपली. त्यामुळे अाज शनिवारपासून (दि. १) आता सक्तीने भूसंपादन केले जाणार असून त्यासाठी चारपटच मोबदला दिला जाणार आहे. इगतपुरीत अद्यापही अडीच ते तीन हेक्टर जमीन ताब्यात मिळणे बाकी असून, या बारा गटांतील शेतकऱ्यांसाठी प्रशासनाच्या वतीने अहवाल शासनास पाठविला जाईपर्यंत...
  September 1, 10:15 AM
 • नाशिक- राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणात जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीशी संबंधित फिर्यादीची मूळ तक्रारच गायब झाल्याने न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले अाहेत. न्यायालयाच्या अादेशानुसार गुन्हा दाखल हाेवून दीड महिना उलटला अाणि सहायक पाेलिस अायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास साेपवूनही मूळ तक्रार गायब करणाऱ्याचा छडा लागत नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. ठेकेदाराकडून...
  September 1, 09:55 AM
 • नाशिक- अन्यायकारक करवाढ कमी करण्याच्या मुद्यावर नाशिक मनपा अायुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल मागे घेतल्यामुळे शुक्रवारी सकाळी थेट मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींच्याच अादेशावरून सत्ताधारी भाजपने अविश्वास ठराव मागे घेण्याची भूमिका घेतली. महापाैर रंजना भानसी यांनी ही भूमिका जाहीर केल्यामुळे सत्ताधारी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक चांगलेच ताेंडघशी पडले. दरम्यान, शनिवारी १ सप्टेंबर राेजी अायाेजित विशेष महासभा महापाैरांनी रद्द केली. १ एप्रिल २०१८ पासून अस्तित्वात येणाऱ्या...
  September 1, 08:17 AM
 • नाशिक- माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा, असे नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले आहेत. शिवाय वारंवार बदली केली जाते याचे नक्कीच वाईट वाटते, पण निर्णय शासनाचा असतो, अशी खंतही मुंडे यांनी व्यक्त केली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवलेले तुकाराम मुंडे हे गरीब व सामान्यांसाठी काम करतात. भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांना गेल्यावर्षी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मुंडे...
  August 31, 12:29 PM
 • नाशिक- नाशिकसह पुणे व अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रात आगामी पाच वर्षांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ५८ नवीन कॉलेजेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ८८२ महाविद्यालयांपैकी १९० महाविद्यालयांचे नॅक मूल्यमापन झाले असून, येत्या पाच वर्षांत ४९० महाविद्यालयांचे नॅक मूल्यमापन केले जाणार आहे. याच कालावधीत २०० महाविद्यालयांसाठी ए दर्जा मिळवण्याचे उद्दिष्टही विद्यापीठाने बृहत अाराखड्याद्वारे ठेवले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९-२० ते २०२३-२४ या...
  August 31, 10:32 AM
 • नाशिक- महाराष्ट्र अाैद्याेगिक विकास महामंडळाने महामंडळाच्या अाैद्याेगिक क्षेत्रातील भूखंडांचे अाणि अाैद्याेगिक क्षेत्राबाहेरील महामंडळाच्या मालकीच्या एकाकी भूखंडांच्या तसेच माहिती तंत्रज्ञान उद्यानातील भूखंड वाटपाच्या प्रीमियम दरात सुधारणा करण्याचे अादेश काढले अाहेत. २७ अाॅगस्टला हे परिपत्रक काढण्यात अाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित अतिरिक्त दिंडाेरी अाैद्याेगिक वसाहतीतील अाैद्याेगिक भूखंडांचे दर प्रति चाैरस मीटरसाठी तीन हजार रुपये तर व्यावसायिक...
  August 31, 10:21 AM
 • सटाणा- आरम नदीपात्रालगत बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या आराई येथील १२ वर्षीय मुलाचा बकरीला बुडण्यापासून वाचवताना पाय घसरून बुडून मृत्यू झाला. जितेंद्र पिंटू अाहिरे (१२) असे या मुलाचे नाव असून, गुरुवारी तो बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. अारम नदीपात्रात बकरी बुडतेय हे पाहून तिला वाचवण्यासाठी त्याने प्रयत्न केला. परंतु, पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. पोहता येत नसल्याने तो बुडत असल्याचे पाहून बाजूला असणाऱ्या मुलांनी व नागरिकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र पाण्यात...
  August 31, 09:46 AM
 • नाशिक- १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना मार्च २०१९ पर्यंत शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण व्हावेच लागणार अाहे. अन्यथा नाेकरी गमवावी लागेल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला अाहे. २०१९ पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण न हाेणाऱ्या सर्व शिक्षकांची सेवा थांबवण्याचा अादेश अप्पर सचिव सं. द. माने यांनी काढला अाहे. शासनाने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना तीन प्रयत्नांत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. परंतु, केंद्र शासनाने अगोदरच २०१५ साली टीईटी...
  August 31, 07:23 AM
 • नाशिक- शहरातील इंचन्इंच जमिनीसह रहिवाशी क्षेत्रापासून तर व्यावसायिक, शाळा, उद्याेग, हाॅस्पिटल अादींच्या करवाढीबाबतची मती गुंग करणारी सत्यता व अाकडे बघून शेतकरी, उद्याेजक, बिल्डर, अार्किटेक्ट, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक अाणि विविध समाजसेवी संघटनांनी अायुक्त तुकाराम मुंढे यांच्याविराेधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी महापाैर रंजना भानसी यांना बुधवारी (दि. २९) लेखी समर्थनपत्र दिले. त्यामुळे सत्ताधारी भाजपने मी नाशिककर या झेंड्याखाली सुरू केलेल्या सर्वपक्षीय माेहिमेला...
  August 30, 09:17 AM
 
जाहिरात

RECOMMENDED