जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन कोणतीच धुसफूस नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदबद्दल भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझे बोलणे झाले आहे. त्यामुळे कोणालाही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिले. उद्धव ठाकरे सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये...
  June 22, 06:53 PM
 • नाशिक -संपत्तीच्या वादातून पोलिस कर्मचारी असलेल्या बापाने त्याच्या दोन सावत्र मुलांची हत्या केल्याची घटना नाशिक शहरातील अश्वमेधनगरात घडली. शुक्रवारी दाेन वाजेच्या सुमारास त्याने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हाॅल्व्हरमधून दोन्ही मुलांवर गोळीबार केला. एक मुलगा जीव वाचवण्यासाठी बाथरूमच्या दिशेने पळाला असताना त्याच्या पाठीत गोळी घातली. सुदैवाने, या घटनेत पत्नी, मुलगी आणि लहान मुलगा बचावले. तर, दोघांचा जीव घेणारा पोलिस कर्मचारी संजय भोये हा स्वत:हून पोलिसांना शरण आला. पोलिसांनी दिलेल्या...
  June 22, 11:31 AM
 • पिंपळनेर- माहेरी आलेल्या पत्नीचा पतीने डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपळनेर जवळील कोकणंगाव पोस्ट शेवगे येथे आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.सुकदेव गायकवाड यांची भाची भारतीबाई हिचा विवाह 2005 मध्ये गोरख एकनाथ चव्हाण(वय35 रा.कातरवेल ता.सटाणा जि.नाशिक) याच्याशी झाला होता. भारतीबाईचा पती गोरख हा गेल्या अनेक वर्षांपासून कामधंदा करत नव्हता त्यातच दारुचे व्यसन असल्याने दररोज दारू पिऊन घरात धिंगाणा घालत होता. अनेकदा दारु पिऊन पत्नी भारतीबाईच्या चारित्र्यावर संशय घेवून...
  June 21, 06:35 PM
 • नाशिक/सिडको -नाशकातील मध्यवस्तीत सिटी सेंटर माॅलनजीक उंटवाडी येथील मुथूट फायनान्समध्ये भरदिवसा मास्क घालूनआलेल्या चाैघांनी दरोडा टाकत केलेल्या गोळीबारात ऑडिटर मुरियायिकारा साजू सॅम्युअल यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने शहर हादरून गेले. घटनेनंतर उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, दरोडेखोर तोवर पळून गेले. फायनान्सचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे, कैलास जैन व अाणखी दोघे जखमी झाले आहेत. नागरिकांचा संताप, पाेलिस...
  June 15, 11:41 AM
 • सटाणा -जादूटोणा करून गावातील लोकांचे बळी घेतात, रोगराई पसरवतात या कारणावरून गमन लहानू अहिरे, पत्नी शांताबाई व चार मुलांना गावात बंदिस्त करून त्यांना विवस्त्र करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चांभारकुंडातील पाणी प्यायला लावले. जनावरांचे रक्त पाजले व संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले आहे. बागलाण तालुक्यातील मानूरच्या मोऱ्हाळापाडा येथे ही घडली आहे. यासंदर्भात संबंधित कुटुंबाने सटाणा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे १४ मे रोजी तक्रार केली असतानाही एक महिना उलटूनही पोलिसांनी...
  June 15, 10:14 AM
 • नाशिक - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा, तर त्यांचे पुतणे अजित पवार जेथे आपले उमेदवार निवडून आले तेथेही ईव्हीएमच असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना विधानसभेच्या कामाला लागण्याचा सल्ला देतात. यातून एकाच पक्षातील दोन बड्या नेत्यांमध्ये मतदान यंत्रांबाबत मतभिन्नता स्पष्ट होत आहे. काका-पुतण्याचे एखाद्या विषयावर तरी एकमत व्हावे, ते लोकशाहीवृद्धीसाठी महत्त्वाचे असल्याचा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. नाशिक येथे वन विभागाची आढावा बैठक झाली....
  June 11, 07:16 AM
 • नाशिक -छिन्नविच्छिन्न झालेले दुचाकीचे अवशेष, जखमी आणि मृतांच्या रक्ताचा चिखल, दोन मजले उडालेले छर्रे आणि स्फोटकांचे नमुने घेणारे न्यायवैद्यक अधिकारी.... १० वर्षांपूर्वीची ती थरारक दृश्ये मुंबईतील एनआयएच्या विशेष कोर्ट रूममध्ये पुन्हा दिसली. २००८ मध्ये मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच पोलिसांच्या व्हिडिओग्राफरने केलेले ते शूटिंग होते. हा व्हिडिओइन कॅमेरा पाहण्याची आरोपींची मागणी फेटाळून कोर्टाने तब्बल दीड तास कोर्ट रूममध्ये घटनास्थळाचे हे चित्रण...
  June 11, 06:58 AM
 • नाशिक- महाराष्ट्रात युती सरकारचे 41 खासदार आहेत, त्यामुळे राज्याचा भावी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे सूचक वक्तव्य वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचे आदेश दिले, असेही मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेच्या नाराजीवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेची कोणतीही नाराजी नाही. मिले सूर मेरा...
  June 10, 07:54 PM
 • नाशिक -नाशिक जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून एका महिलेसह २ मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला. दिंडोरी येथील कादवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तिचा मुलगा आणि एका अन्य मुलीसह प्राण गेला, तर पेठ तालुक्यातील अासरबारी येथील धरणात कपडे धुऊन झाल्यानंतर पाेहण्यास गेलेल्या पाच मुलींपैकी एक बुडून ठार झाली. अनिता यादव वाघमारे (२९), ओंकार यादव वाघमारे (१४, दोघेही रा. उमराळे), प्राजक्ता गांगोडे (१५, ओझे) ज्योती जाधव (१२, आसरबारी) अशी मृतांची नावे आहेत. दिंडोरी...
  June 10, 09:54 AM
 • सिन्नर -इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्राने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. ही योजना चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता १ ली ते १० वीत शिकणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळत होती. यासाठी संबंधीत विद्यार्थ्याच्या पालकांची कमाल उत्पन्न मर्यादा २ लाख ५०...
  June 10, 09:45 AM
 • नाशिक- कृतिपत्रिकांचा अवलंब करत प्रथमच झालेली परीक्षा आणि भाषा विषयांची अंतर्गत गुण पद्धती (इंटर्नल मार्क) बंद झाल्याने दहावीच्या निकालात मागील सहा वर्षांत होत गेलेला गुणांचा फुगवटा यंदा चांगलाच घसरला. महत्वाचे म्हणजे गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांची निकालाची टक्केवारी चांगली असून ज्या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आले आहे, त्या चारही विषयांच्या निकालाची टक्केवारी कमी झाली आहे. राज्याच्या एकूण निकालात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 11.24 टक्के घसरण झाली असून यावर्षी 77.10 टक्के...
  June 8, 03:58 PM
 • नाशिक -वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सुनावल्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित खासदार व मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी क्रमांक १ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अखेर शुक्रवारी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात हजर राहिल्या. या खटल्यात आजवर किती साक्षी झाल्या? असा प्रश्न कोर्टाने विचारल्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली. इतकेच नव्हे, तर सुनावणीचे कामकाज ऐकू येत नसल्याचे कारण देऊन आरोपींच्या बाकड्यावर बसण्यासही नकार दिला. प्रकृतीचे कारण देऊन प्रज्ञासिंह यांनी दरराेजच्या सुनावणीस...
  June 8, 10:04 AM
 • नाशिक -केरळमध्ये राहणाऱ्या मेडिकल अौषध पुरवठा करणाऱ्या युवकावर नाशिकमधील रिक्षाचालकासह नऊ आराेपींनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस अाला. नराधमांनी युवकाच्या गुप्तांगात बिअरची बाटली टाकून त्यास बेदम मारहाण केली. ३२ वर्षीय पीडित युवक दोन वर्षांपासून अंधेरीतील एका औषध कंपनीत नोकरीस आहे. काही वर्षांपासून ताे गंगापूर रोडवरील एका मेडिकल व हाॅस्पिटलला औषध पुरवठा करण्यासाठी नाशिकला येत होता. मंगळवारीही तो आला होता. रेल्वेस्थानकावर उतरून रात्री अकरा वाजता...
  June 6, 10:08 AM
 • नाशिक -तिसरीही मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेचे पोटच्या गोळ्याचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार वृंदावननगरात उघडकीस आला. पियू असे या दुर्दैवी मुलीचे आहे. पोलिसांनी तिची आई अनुजा काळेविरोधात खूनचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. तिचा पती बाबासाहेब काळे यांनीच पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ३१ मे रोजी अनुजाच्या मावसभावाच्या लग्नासाठी बाबासाहेबशिंगवे कोपर गाव येथे गेले होते. घरी अनुजासह मुलगी आराध्या व पियू होते. लग्न आटोपल्यानंतर घरी परत येतांना रस्त्यात मोबाइलवर...
  June 4, 07:44 AM
 • नाशिक -लहान मुलांमधील वाढता स्थूलपणा, मधुमेह या विकारांना कारणीभूत जंक फूडऐवजी शाळा आणि महाविद्यालयांच्या कँटीनमधून दूध, फळे, भाज्या, कडधान्य यांसारखे पोषक अन्नघटक असलेले पदार्थ देण्यात यावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २ हजार शाळांना ही पाठवण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये आरोग्य समित्या नियुक्त करण्यात येण्याच्या सूचना या विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पुढील ६ महिन्यांचे...
  June 1, 11:31 AM
 • नाशिक - लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि देशात सफाया झालेल्या काँग्रेस आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असली तरीही विलीनीकरण होवो अथवा ना होवो, पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ही राज्यात शक्तिहीनच आहे. शून्य अधिक शून्य कधीही एक होत नाही. हीच या पक्षांची गत आहे. त्याचा कुठलाही उपयोग होणार नसल्याची टीका राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन विभागाची आढावा बैठक मुनगंटीवार यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतली....
  June 1, 09:45 AM
 • नाशिक -ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या पालकांना घरी परतल्यावर आपली पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर असल्याचे कळते आणि याविरोधात न्याय मागण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले असता, जातपंचायतीच्या बहिष्काराचा सामना करावा लागतो या कात्रीत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धोंडगेपाडा येथील आदिवासी कुटुंब सापडले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब केल्याने या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय हेळसांड होत प्रसूती झाल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशात आणले. आता,...
  June 1, 09:06 AM
 • इगतपुरी- इगतपुरी तालुक्यातील घोटी- सिन्नर राज्यमार्गावर गुरुवारी १२ वाजेच्या सुमारास टँकर व दुचाकीत समोरासमोर अपघात होऊन दोन दुचाकीस्वार ठार झाले. घोटीहून सिन्नरकडे डांबर घेऊन टँकर जात होता. शेणीत शिवारातील कोथुळे पेट्रोल पंपाजवळ समोरून येणारी दुचाकी व टँकरची धडक झाली. यात दुचाकी १ किमी अंतर टँकरसोबतच घसरत गेली. यात रामनाथ अगिवले (३०), भाऊसाहेब अगिवले (३५, धामणी) हे जागीच ठार झाले, तर दुचाकीस्वार एक लहान मुलगा जखमी झाला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला...
  May 31, 08:28 AM
 • मुंबई -शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली, न्याय मिळवून दिला. मात्र, ज्यांच्याविरोधात आम्ही आंदोलन केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शेतकरी गप्प राहील का? शेतकऱ्यांच्या या सच्च्या कार्यकर्त्याचे सच्चे बिंग प्रचार सभांमधून आम्ही उघड केले आणि रयतेला हा खरा चेहरा समोर दिसल्याने त्यांचा पराभव झाला आणि आमचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्या पराभवावर खास दिव्य मराठीशी बोलताना...
  May 30, 09:29 AM
 • नाशिक -येत्या १ जून रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या संपास दोन वर्षे होत असूून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. परंतु, गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकारच्या विरोधात सर्वाधिक मोर्चे, आंदोलने झालेल्या जिल्ह्यातच भाजपच्या बाजूने मतदान झाल्याने शेतकरी नेते बुचकळ्यात पडले आहेत. महामुक्काम मोर्चा, कर्जमाफीचा मोर्चा, मुंबईतील पायी महामोर्चे अशी मोठी आंदोलने झालेल्या नाशिक-नगरच्या...
  May 30, 09:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात