जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक -राज्यात पडलेल्या तीव्र दुष्काळात तत्काळ पाणीपुरवठा व्हावा, त्यासाठी अावश्यक बाबींची तत्काळ उपलब्धता करता यावी यासाठी राज्य शासनाने अाता अामदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यात २५ लाखांपर्यंतची कामे करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यंदाच्या तीव्र दुष्काळात पिण्याच्या पाण्याची मागणी होताच तत्काळ पुरवठा करण्याचे आदेश पूर्वीच शासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत. परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळवण्यात...
  May 28, 09:16 AM
 • नाशिक -लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा निकाल मात्र लवकरच लागणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जागी दुसरा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा दुसरा चेहरा राहुल ब्रिगेडचे राजीव सातव, गडकरींसारख्या बलाढ्य नेत्याविरोधात झुंज देणारे नाना पटोले किंवा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यापैकी कुणाचा असेल याचाही निकाल लवकरच लागणार आहे. ही निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारासोबतच पक्षाचे नेतृत्व करणाऱ्यांचीही...
  May 23, 09:15 AM
 • वणी -सप्तशृंग गडावरून नवस फेडून नाशिककडे जाणारा भाविकांचा टेम्पो कृष्णगाव येथील गतिरोधकावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. त्याला नाशिककडे जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या ट्रकने पाठीमागून जोडदार धडक दिली. त्यात आयशरमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. आशिष माणिकसिंग ठाकूर (२७, रा. त्र्यंबकेश्वर), सागर अशोक ठाकूर ( २२, रा. नाशिक), कुणाल कैलास ठाकूर(१९ नाशिक) आणि गणेश भगवती प्रसाद ठाकूर (३८, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. आयशरमधील भाविक हे...
  May 21, 10:15 AM
 • नाशिक - नातेवाइकांकडे आलेल्या शिर्डी येथील तरुणीला लग्नाचे आमिष देत मुंबई येथे नेऊन एका घरात डांबून ठेवत प्रियकर आणि त्याच्या मित्राने पंधरा दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित प्रियकर अविनाश धनराज माकुणे (रा.श्रीरामपूर) यास अटक करण्यात आली आहे. मित्र संतोष खरात फरार आहे. पीडितेने सुटका केल्यानंतर नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. संशयितांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने...
  May 21, 09:40 AM
 • नाशिक - खासगी विमा कंपनीच्या पाॅलिसीवर तब्बल ११० टक्के व्याज देत भरलेल्या रकमेवर बोनस आणि रक्कम परत देण्याचे आमिष देत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल ७८ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात रिलायन्स विमा कंपनीच्या चार ते पाच एजंटच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि सेवा निवृत्त बँक अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त...
  May 20, 11:42 AM
 • मनमाड -नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड शहराचं वैशिष्ट्य आहे तिथलं हवामान. जास्त तापमान नाही व जास्त थंडीही नाही. आर्द्रताही बेताचीच. हेच कारण होते की ज्यामुळे ब्रिटिशांनी या भागात सैन्याची छावणी उभारली. इथे लोखंडाला लवकर गंज लागत नाही म्हणून रेल्वेने इथे ब्रिज वर्कशाॅप सुरू केले. धान्याला कीड लागत नाही म्हणून फूड काॅर्पोरेशन आॅफ इंडियाने आपले देशातले सर्वात मोठे गोदाम इथेच उभारले. हेच कारण आहे ज्यामुळे भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने इथे इंधनाचा डेपो उभारला. या...
  May 19, 10:54 AM
 • नाशिक - आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा आॅलिम्पिक राेंइंगपटू दत्तू भाेकनळच्या विरोधात पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत वैदिक पद्धतीने लग्न करत जाहीर लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी आडगाव पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेन वर्षांपूर्वी वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर आता मात्र दाेन वेळा ठरवूनही लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्याने करत आपला शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. आगामी आॅलिम्पिक...
  May 18, 09:50 AM
 • मालेगाव - राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या विशेष कोर्टाने 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना दणका दिला आहे. यातील आरोपींना आठवड्यातून एकदा कोर्टात हजेरी लावावीच लागेल. या आरोपींमध्ये भाजपकडून खासदारकी लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतरांचा समावेश आहे. सुनावणीच्या वेळी आरोपी कोर्टात हजर झाले नाही, त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मे रोजी घेतली जाणार आहे. वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत साध्वी प्रज्ञा...
  May 17, 02:59 PM
 • नाशिक - एकतर्फी प्रेमातून कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक प्रकार नाशकातील आडगाव परिसरात उघडकीस आला. प्रेयसीच्या भावी पतीच्या घरावर दगड फेकत दुचाकी पेटवून देण्यात आली. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पाच महिन्यांपूर्वी मुलाचे सिडको परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत लग्न ठरले आहे. मेअखेर मुलाचे लग्न होणार आहे. मात्र, जेव्हापासून लग्न ठरले तेव्हापासून घराच्या समोर अनोळखी व्यक्ती पाकिटमध्ये...
  May 17, 09:59 AM
 • नाशिक - विविध कंपनीचे ऑनलाइन प्राॅडक्टची ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरी दिल्याचे भासवत तेच प्राॅडक्ट परस्पर ग्राहकांना विक्री करत लाॅजेस्टिक कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी कुरिअर कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित निखील राजाराम आहिरे, विशाल रामदास माळेकर, अक्षय राजाराम आहिरे या तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पेखम सिस्टिम लाॅजिस्टिक प्रा.लि. गुडगाव...
  May 17, 09:43 AM
 • नाशिक - राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणे याला गुंडांनी अडवून बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री नाशिक शहरातील चाेपडा लाॅन्स परिसरात घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, हाताला दुखापत झाल्याने निखिलला पुण्यात हाेणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत मुकावे लागणार असल्याने त्याच्या दाेन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. राेइंगच्या अनेक स्पर्धांमध्ये पदक मिळवणारा निखिल पुणे येथे हाेणाऱ्या राज्यस्तरीय...
  May 16, 09:36 AM
 • नाशिक - दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रोजगार हमीअंतर्गत तातडीने जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या २८ कामांना मान्यता दिल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सरपंचांशी संवाद साधत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अस्वली गावातील मजूर त्यांचे कोरे जॉबकार्ड दाखवत होते. या गावातून १०० जणांनी गेल्या सहा महिन्यांपासून कामाची मागणी नोंदवूूनही गावात रोजगार हमीची कामे सुरू झाली नसल्याच्या तक्रारी सांगत होते. विशेष म्हणजे, २४ जानेवारीच्या बैठकीत रोहयो...
  May 15, 10:36 AM
 • सिन्नर - केवळ शाळेतील विद्यार्थ्यांना भूतदयेचे धडे न देता स्वत:ही पशु-पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय करण्यासाठी सिन्नर येथील वाजे विद्यालयातील क्रीडा शिक्षक तथा शेतकरी ज्ञानदेव नवले यांनी पुढाकार घेतला आहे. शेतातील कणीस भरलेली हिरवीगार १५ गुंठे ज्वारी त्यांनी पाखरांसाठी खुली केली आहे. विशेष म्हणजे शेतातील विहिरीजवळील दगडी कुंडात पाखरांसाठी पाण्याचीही व्यवस्था केली आहे. हजारो रुपये किमतीच्या चाऱ्यावर पाणी सोडत त्यांनी समाजापुढे आदर्श उभा केला आहे. दाणा-पाण्याअभावी पक्ष्यांचे...
  May 15, 10:30 AM
 • नाशिक - अमेरिकेतील नॅशनल एराेनाॅटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राेव्हर चॅलेंज या जागतिक स्पर्धेत मुंबईतील मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नाॅलाॅजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. स्पर्धेच्या निमित्ताने नासाकडून प्रथमच महाराष्ट्राला फ्रॅन्क जाे सेक्टन मेमाेरियल पीट क्रू या टेक्निकल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाेबतच सिस्टिम सेफ्टी चॅलेंज पुरस्कारही देण्यात आला. स्पर्धेत जगातील ११७ महाविद्यालयांच्या...
  May 13, 10:15 AM
 • मुंबई -मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागात कार्यरत प्रीती दुर्वे या आजारी असतानाही त्यांना निवडणूक ड्यूटी दिल्याने त्यांचा आजार बळावला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या आरोपाचे खंडन करत दुर्वे यांनी आजारपणाबाबत कळवले नव्हते, असे म्हटले आहे. प्रीती दुर्वे शिवडी विधानसभा मतदारसंघात मतदान अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. निवडणुकीच्या ड्यूटीवर असताना त्यांची तब्येत खालावली होती. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कावीळ झाल्याचे...
  May 12, 09:19 AM
 • नाशिक -दुष्काळाच्या निवारणासाठी पालकमंत्र्यांना दाैरे करण्याचे आदेश देणारे, सुमारे २ हजार काेटींची मदत करणाऱ्या एनडीअारएफचे आभार मानणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाच्या मुद्द्यावर त्यांच्याच अध्यक्षतेखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (एसडीअारएफ) बैठक घेण्याबाबत मात्र गंभीर नसल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात त्यांनी या विषयावर प्राधिकरणाची एकही बैठक घेतली नसल्याची धक्कादायक माहिती दिव्य मराठीच्या हाती लागली आहे. तसेच केंद्रीय कायद्याला १२ वर्षे उलटून...
  May 9, 08:45 AM
 • नाशिक - अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिला मैत्री करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी (दि.४) रात्री आठ वाजता गंगावाडी रविवार कारंजा येथे उघडकीस आला. पीडीत मुलीची आई रात्री कामावरून घरी आल्यानंतर मुलीची सुटका केली. अवधू्त सुनील जाधव (१९) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सरकारवाडा पोलिसांनी संशयिताला अटक केली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सतरा वर्षाची...
  May 7, 09:32 AM
 • नाशिक- डोंगराच्या माथ्यावर घनदाट जंगलात ७० ते ७५ चुलींचे गाव... पावसाळ्यात चारही महिने संततधार.. तांदूळ, वरई व नागली हे प्रमुख पीक... एकदा पावसाळा संपला की शेतीसाठी सोडाच, पण दिवाळीपासून ते जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत... हे दरवर्षीचेच चित्र पण यंदाची दाहकता अतिभीषणच. थेंबभर पाण्यासाठी येथील महिलांना रात्रभर जागे राहावे लागते. सकाळी ९ ते १० वाजता नंबर लावला की थेट मध्यरात्रीच पाणी मिळते. पेन्सिलीऐवजी लहान मुलं हातात टेंभा धरतात अन् त्या उजेडात आई-वडील पाणी भरतात. साधा हंडा भरायला...
  May 5, 10:24 AM
 • नाशिक- शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर घनदाट जंगलातील म्हैसमाळ गावात ८० आदिवासी कुटुंबे राहतात. गावात पाण्याचे स्रोत नाहीत. एक किलोमीटर अंतरावर एक विहीर आहे. ती आता कोरडी पडली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी ही विहीर आणखी ६ फूट खोदली आहे. तेथील झऱ्यातून हळूहळू पाणी येते. एक घागर भरण्यासाठी एक तास लागतो. त्यामुळे येथे ग्रामस्थांना नंबर लावावा लागतो. ज्याचा नंबर येतो त्याला दोन घागरी पाणी मिळते. दिवस-रात्र पाणी भरण्याचे काम चालते. येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या निर्मला यांनी सांगितले,...
  May 5, 08:30 AM
 • चांदवड - तालुक्यातील मत्तेवाडी शिवारातील वन विभागाच्या हद्दीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर सुमारे १०० ते १५० आदिवासींच्या जमावाने गोफण, गलोलचा वापर करत व दगडफेक करून केलेल्या हल्ल्यात ११ ग्रामस्थ जखमी झाले. या वेळी आदिवासींच्या जमावाने सात दुचाकी पेटवून दिल्या. दोन दुचाकी व पोकलेनची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. आदिवासींच्या ताब्यातील वन जमिनीत पाणी फाउंडेशनचे हे काम सुरू हाेते. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव...
  May 4, 08:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात