Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • त्र्यंबकेश्वर- तिसऱ्या श्रावणी सोमवारची पर्वणी साधत २ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी २० किलोमीटरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा भक्तिभावाने साजरी केली. या प्रदक्षिणेसाठी भाविक रविवार सायंकाळपासून येत होते. रात्रभर भाविकांचा ओघ सुरू होता. येथे येताच कुशावर्त तीर्थावर स्नानास भाविकांची गर्दी करत होते. त्यानंतर बमभोलेचा गजर करत पेगलवाडीकडून प्रदक्षिणेचा मार्ग पकडत होते. यात काही बसने पेगलवाडी फाट्यावर उतरून प्रदक्षिणेस जात होते. या वेळी भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती....
  August 28, 08:49 AM
 • नाशिक- नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी युरोप खंडात नावाजलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत ५० वर्षे वयोगटात अव्वल स्थान मिळवत आयर्नमॅनचा किताब मिळवला. रविवारी फ्रान्समध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत जगभरातील सुमारे दीड हजार अॅथलिट्स व खेळाडू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत सिंगल यांची कन्या आणि भारताची आयर्न गर्ल रविजा सिंगलनेही भाग घेतला होता. मात्र, अवघ्या पाच मिनिटांनी ती स्पर्धेबाहेर गेली. १८० किमी सायकलिंग, तीन किमी जलतरण आणि त्यानंतर लगेच ४२ किमी धावणे अशी...
  August 28, 08:42 AM
 • शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाहनाचे दोन टायर पंक्चर झाले अन्् ते संभाव्य अपघातातून बालंबाल बचावल्याची बातमी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिली जात आहे. तशी चर्चा होणे स्वाभाविकदेखील आहे. कारण, ज्या दिवसापासून राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या मदतीने सत्तारूढ झाला त्या घडीला आता जवळपास चार वर्षे सरत आली आहेत. सुरुवातीचे मधुचंद्राचे दिवस संपले अन्् घरातच कुरबुरी सुरू झाल्या. कजाग सासू-सुनेगत भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांमध्ये जोराची जुंपली गेली. एकही दिवस वा एकही...
  August 28, 07:18 AM
 • नाशिक- मराठा समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी नशिक जिल्हा मुस्लिम विकास आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (दि.२७)शहरातील द्वारका चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. आरक्षणासाठी राज्यातील ६० मुस्लीम संघटनांनी एकत्र येत फोरम तयार केला. सकल मराठा कृती समितीच्या धर्तीवर आता मुस्लीम आरक्षण संयुक्त कृती समितीची...
  August 27, 07:10 PM
 • नाशिक- खेळाचे साहित्य सोडा, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत.. दिवसभर काम केले तरच सायंकाळी पोटाची खळगी भरणार अशी स्थिती असलेल्या ठाणापाडा (ता. त्र्यंबकेश्वर) परिसरातील हिवाळी पाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी गिव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशनने पुढाकार घेत आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दोन गणवेश, क्रीडा गणवेश, मुलींना सायकली, वृद्धांना स्वेटर, गावकऱ्यांना रेनकोट दिले आहेत. केवळ भौतिक सोयीसुविधाच नव्हे तर गावात एकोपा, संघभावना निर्मितीसाठी मोलमजुरी करून घरी आल्यावर गावकऱ्यांना...
  August 27, 11:16 AM
 • नाशिक- बांधकाम व्यावसायिकांकडे ऑफिस बॉय, ड्रायव्हरची नोकरी करून त्या कार्यालयातून धनादेश चोरत बंॅकांतून परस्पर पैसे काढणाऱ्या भामट्यास नौपाडा येथे अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत संशयिताने शहरात दहा आणि ठाणे येथे दोन-तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश विश्राम कर्डक बोगस नावाने ऑफिस बॉय, चालक अशा नोकऱ्या मिळवत होता. मालकाची नजर चुकवून धनादेश चोरून त्यावर बोगस सह्यांद्वारे रकमा काढत होता. अशा प्रकारे संशयिताने कुलकर्णी गार्डन येथील संजीव नवाल...
  August 27, 10:05 AM
 • मालेगाव- तालुक्यातील अाघार येथे कमानीवर ध्वज लावण्यावरून रविवारी (दि. २६) दाेन गटात वाद झाला. दाेन्ही गट समाेरासमाेर अाल्याने तणाव निर्माण झाला हाेता. पाेलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाेहाेचून मध्यस्थी करत कमानीवरील ध्वज काढून घेतले. पाेलिसांनी पाच जणांना अटक करत तणावाची परिस्थिती लक्षात घेता जमावबंदी अादेश लागू केला अाहे. अाघार खुर्द व धवळेश्वर या गावांना जाेडणाऱ्या रस्त्यावर लाेकवर्गणीतून कमानी उभारण्यात अाल्या अाहे. ढवळेश्वर ग्रामपंचायतीने चार दिवसांपूर्वी...
  August 27, 09:59 AM
 • मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर अारक्षणाचा मुद्दा निकाली काढू, असे अाश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गेल्या चार वर्षांत हा प्रश्न अजून साेडवता अालेला नाही. एकीकडे मराठा अारक्षणाचा विषय पेटलेला असताना अाता धनगर समाजातील अांदाेलकांनीही सरकारला काेंडीत पकडत पुन्हा तीव्र अांदाेलनाचा इशारा दिला अाहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी टीसच्या अहवालाची पुढे केलेली ढालही अाता बचावास अपुरी पडू लागली. या काेंडीतून मार्ग काढण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व...
  August 27, 06:33 AM
 • नाशिक - एकतर्फी प्रेम करणाऱ्या सडकसख्याहरीने युवतीच्या भावासह तिच्या भावी पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काझी गढी परिसरात उघडकीस आला आहे. युवतीच्या आईच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि मंदा सोनवणे (रा. काझी गढी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार परिसरात राहणारा संशयित योगेश उदावंत याचे अपेक्षा सोनवणे (२५) या मुलीवर...
  August 26, 11:41 AM
 • नाशिकरोड - नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून राज्यात भविष्यात हे बालेकिल्ले वाढत जाणार अाहेत. शिवसेना सत्तेत असो वा नसो, तिला समाजकारण महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यात भगवी युवा सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. शनिवारी (दि. २५) भगूर येथे आमदार योगेश घोलप यांच्या निधीतून बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यात ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यातील तरुण, तरुणी, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळाला आहे....
  August 26, 11:39 AM
 • नामपूर- मालेगाव तालुक्यातील कोठरे खुर्द व बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना अंबासन येथील विद्यालयात ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अनेकवेळा निवेदने देऊनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी व पालकांनी बस सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची जायखेड्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय थांबविण्यासाठी प्रयत्न करत सटाणा आगारप्रमुख उमेश बिरारी यांच्याशी चर्चा करून बस सुरू केली. अंबासन विद्यालयात कोठरे...
  August 25, 09:48 AM
 • नाशिक- महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा फटका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनाही बसला असून नाशिक दौऱ्यासाठी गुरुवारी (दि. २३) मध्यरात्री येत असताना घोटीदरम्यान खड्ड्यात कार आदळल्याने दोन चाके फुटली. यात आदित्य ठाकरे हे बालंबाल बचावले. मात्र, त्यांची कार टो करून नाशिकमध्ये आणावी लागली. दरम्यान, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे. आदित्य हे नाशिक जिल्ह्याच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आले आहेत. घोटीजवळील मुंडेगाव परिसरातील महामार्गावर...
  August 25, 09:33 AM
 • नाशिक- दूरसंचार क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या जिअाे कंपनीने अाता घरातील केबलसेवा पुरवण्याची तयारी सुरू केल्यामुळे मुंबईपाठाेपाठ नाशिकमधील केबल अाॅपटेरर्सही स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्षाच्या पवित्र्यात उभे ठाकले अाहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अाक्रमक पवित्र्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. २५) मुंबईत रंगशारदा सभागृहात याप्रश्नी ताेडग्यासाठी मेळाव्याचे अायाेजन केले असून त्यास नाशिकमधून माेठ्या संख्येने केबलचालक जाणार अाहेत. जिअाेची थेट...
  August 25, 09:14 AM
 • नाशिक- अमर रहे अमर रहे, अटलजी अमर रहे, भारत माता की जय, असा जयघाेष करीत शहरातून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची यात्रा शुक्रवारी (दि. २४) काढण्यात अाली. एनडी पटेलराेड येथून निघालेल्या या कलशयात्रेचा गाेदापात्राजवळ समाराेप झाला. रामकुंडात मंत्रघाेषात अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात अाले. कलशयात्रेत पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर उपस्थित हाेते. गेल्या दाेन दिवसांपासून अटलजींच्या अस्थी भाजपचे कार्यालय वसंतस्मृती...
  August 25, 09:06 AM
 • नाशिक- शहराला इंचन्इंच करवाढ लागू करण्यासह लाेकप्रतिनिधींचा अवमान, अडवणूक, मनमानी वर्तणूक, नागरिकांनाही चुकीचा प्रतिसाद यासारखे नानाविध ठपके ठेवत सत्ताधारी भाजपने अाता अायुक्त तुकाराम मुंढे यांच्याविराेधात अविश्वास ठराव अाणण्यासाठी स्वाक्षरी माेहीम सुरू केली अाहे. सभागृहनेता दिनकर पाटील यांच्या पत्रावर शुक्रवारी (दि. २४) रात्री उशिरा स्वाक्षरी माेहीम सुरू झाली असून जवळपास २५ पदाधिकारी व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या झाल्याचे वृत्त अाहे. मुंढे यांच्याविराेधात अविश्वास ठराव...
  August 25, 08:56 AM
 • जकार्ता- कबड्डीमध्ये पुरुष संघाच्या पराभवानंतर शुक्रवारी भारतीय महिला संघालाही इराणकडून २४-२७ ने पराभव पत्करावा लागला. आशियाई स्पर्धेत पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इराणच्या विजयाचे श्रेय जाते नाशिकच्या शैलजा जैन यांना. १८ महिन्यांपूर्वी त्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक होत्या. शैलजा म्हणाल्या, कबड्डी फेडरेशनने प्रशिक्षकपद नाकारले तेव्हा मी इराणला गेले. तेथील भाषा व अन्न यामुळे अडचण झाली. कारण मी शाकाहारी आहे. मी खेळाडूंच्या दिनचर्येत योग,...
  August 25, 06:21 AM
 • ओझर - भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विमाननिर्मिती कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) मधील कामगार संघटनेने शुक्रवारी संप पुकारला. वेतन करार पाच वर्षांचा झाला पाहिजे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी शुक्रवारी सकाळीच संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कामगार कंपनीतील सर्व प्रवेशद्वारांसमोर जमा झाले होते. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. 20 महिन्यांपासून प्रलंबित वेतनकरारसाठी आणि व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध करत...
  August 24, 06:40 PM
 • नाशिक- सर्व पक्षभेद विसरून शहरातील मान्यवरांनी अटलजींच्या अस्थींचे मनाेभावे दर्शन घेत त्यांच्याविषयीची अास्था व्यक्त केली. ज्यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही अशा असंख्य नागरिकांनीदेखील अटलजींवरील प्रेमापाेटी अस्थींच्या दर्शनासाठी अावर्जून उपस्थित दर्शविली. दिवसभरात सुमारे तीन हजार नागरिकांनी अस्थींचे दर्शन घेतल्याची माहिती शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप यांनी दिली. शुक्रवारी (दि. २४) अस्थिकलश यात्रा काढून रामकुंडात विधिवत विसर्जन केले जाणार आहे. माजी पंतप्रधान...
  August 24, 11:42 AM
 • नाशिक- पंचवीस लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत वृद्धेला तब्बल २७ लाखांना ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार देवळाली कॅम्प येथे उघडकीस आला. सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तक्रार दाखल झाल्यानंतरही महिलेला पैसे भरण्यासाठी फोन सुरूच आहे. पोलिसांनी दिलेली माहिती व मोना इराणी (रा. संसरीनाका, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०१३ मध्ये १२ आकडी मोबाइल क्रमांकावरून एक फोन आला. अभिनंदन! आपल्याला २५ लाखांची लॉटरी लागली आहे. लवकरच...
  August 24, 11:38 AM
 • नाशिक- नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई या शहरांकरिताच्या विमानसेवेला नऊ महिने तर दिल्ली-नाशिक-दिल्ली विमानसेवेला सव्वादाेन महिने पूर्ण झाले अाहेत. अतिशय चांगला प्रतिसाद या सेवांना मिळत असून अागामी दीड महिन्यात हैदराबाद, गाेवा, अहमदाबाद या शहरांना जाेडणारी सेवादेखील नाशिक विमानतळावरून सुरू हाेणार असली तरी मुंबई-अाग्रा महामार्गापासून विमानतळापर्यंत पाेहाेचण्यासाठीचा खडतर प्रवास कायम अाहे. विमानतळावर साधा कॅफेटेरियाही अद्याप सुरू हाेऊ शकलेला नाही. प्रवाशांकरिता पुरेशा लगेज ट्राॅलीज...
  August 24, 11:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED