Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नामपूर- उत्राणे (ता. बागलाण) येथील अविवाहित दिव्यांग तरुण शेतकरी प्रवीण कडू पगार (३५) यांनी कर्जासाठी बँक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे याबाबत थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. महसूल अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत विहिरीतील मृतदेह काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महसूल अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण...
  August 22, 11:08 AM
 • नाशिक- बंगळुरू, काेलकाता अाणि इंदूर या तीन शहरांना जाेडणाऱ्या हाेपिंग विमानसेवेने नाशिकला जाेडण्याबाबत गांभीर्याने पडताळणी केली जार्इल व त्यानंतर निर्णय घेतला जार्इल. याशिवाय नाशिकहून दिल्लीसाठी सुरू असलेल्या विमानसेवेला व कार्गाे सेवेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत अाहे. सध्या अाठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जात असली तरी उद्याेजक व इतर संघटनांच्या मागणीप्रमाणे ही सेवा रोज सकाळी नाशिक-दिल्ली तर सायंकाळी दिल्ली-नाशिक कशी देता येईल यादृष्टीने विचार केला जाईल, असे जेट एअरवेजचे...
  August 22, 11:03 AM
 • नाशिक- काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसाचा मुक्काम मंगळवारीही शहरात कायम राहिला. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्ह्यात २४७ मि.मी. तर शहरात १५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात गंगापूर धरणांच्या क्षेत्रात असलेल्या पर्जन्यमापक केंद्रात ५० मीमी पावसाची नोंद झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणातून सायंकाळी ६ वाजता ३ हजार ६४० क्युसेकने पाणी सोडावे लागले. त्यामुळे गोदावरीला दुसऱ्यांदा पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी...
  August 22, 10:57 AM
 • नाशिक/नगर- संगमनेर तालुक्यातील घारगावसह परिसरात मंगळवारी (दि. २१) भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ८.३३ वाजता भूकंपाचे सलग सहा सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल नाशिकच्या मेरी येथील भूकंप मापन केंद्रात नोंदवले गेल्याचे संस्थेचे भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पठार भागातील घारगाव, बोरबन, कुरकुंडी आणि आंबी खालसा या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातील भांडी...
  August 22, 08:36 AM
 • नाशिक- गंगापूर आणि दारणा धरणसमूह तसेच नांदूरमध्यमेश्वरमध्ये मिळणाऱ्या बहुतांश नद्यांवरील धरणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. पावसाचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे पुराचा तडाखा बसणाऱ्या निफाडमधील चांदोरी, सायखेडा आणि लगतच्या परिसरात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे (एनडीआरएफ) चार अधिकारी आणि २५ जवानांचा समावेश असलेले पथक जिल्ह्यात प्रथमच दाखल झाले आहे. हे पथक पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय कारावे याबाबत 21 ऑगस्टपासून मार्गदर्शन करणार आहे. इगतपुरीत एकाचा...
  August 21, 11:10 AM
 • नाशिक- पंतप्रधान माेदी म्हणतात त्यांचे सरकार २०२२ पर्यंत असेल. मात्र, वास्तव वेगळे अाहे. येेऊ घातलेल्या लाेकसभेच्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र माेदी अशी लढत रंगविली जाईल. मात्र, हे लक्षात घ्या अापण थेट पंतप्रधान निवडून देत नाही तर लाेकसभेचा सदस्य निवडून देताे. जाे राजकीय पक्ष जास्त जागा मिळविताे, त्याचे सदस्य पंतप्रधान निवडतात. त्यामुळे लढत थेट माेदी विरुद्ध राहुल गांधी अाहे, हे दाखवून तुमच्या मेंदूवर मनाेवैज्ञानिक प्रभाव पाडणाऱ्यांच्या जाळ्यात फसू नका. लाेकशाहीचे...
  August 21, 11:00 AM
 • नाशिकचे आल्हाददायक हवामान भल्याभल्यांना आकृष्ट करत असते. त्यामुळे जेव्हा केव्हा केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत सेवाभावी संस्थेकडून देशभरातील प्रमुख शहरांचे सर्वेक्षण केले जाते त्यामध्ये आवर्जून नाशिकचा समावेश असताे. आजवर झालेल्या असंख्य सर्वेक्षणांमध्ये नाशिकला तीर्थक्षेत्र म्हणून अथवा आरोग्यदायी वातावरणास अनुकूल शहर म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. हेल्थ डेस्टिनेशन म्हणून तर याच शहराला देशपातळीवर वरचा दर्जा दिला गेला. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेतही...
  August 21, 09:58 AM
 • नाशिक- मानसिक अपंग अर्थात विशेष व्यक्तींना ताेल सांभाळता येत नाही, त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही, सर्वसामान्यांप्रमाणे त्याला काेणतीही कला जाेपासता येत नाही, वगैरे वगैरे समज खाेडून काढत शाडू मातीच्या अतिशय सुबक गणेश मूर्ती घडविण्याचे काम घरकूल परिवारातील विशेष तरुणी अाणि महिला करीत अाहेत. एखाद्या नामांकित मूर्तिकाराला साजेशा या कलाकृती बघून थक्क व्हायला हाेते. प्राैढ विशेष महिला, विद्यार्थिनींसाठी घरकूल परिवाराची स्थापना बारा वर्षांपूर्वी पिंपळगाव बहुला येथे करण्यात...
  August 20, 10:41 AM
 • नाशिक- कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार ताजा असताना पादचारी महिलांना लक्ष्य करत दोन महिलांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र खेचण्यात आले. अवघ्या दोन तासात शिवाजीनगर आणि नारायण बापूनगर येथे या दोन घटना घडल्या. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि ज्योती मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी १२ वाजता घरातून पायी गॅस एजन्सी कार्यालयाकडे जात असतांना काळ्या दुचाकीवरील दोघांनी गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र खेचून...
  August 20, 10:38 AM
 • नाशिक- प्रकरण १- ती गराेदर अाहे, पण इलाजासाठी पुरेसे पैसे नसल्याने काही दिवसांपासून डाॅक्टरांकडेच गेलेली नाही ... प्रकरण २- मुलांची शाळेची फी भरली नाही, म्हणून शाळा व्यवस्थापनाकडून वारंवार विचारणा हाेतेय. त्यामुळे मुलाने काही दिवसांपासून शाळेत जाणेच बंद केले... प्रकरण ३- घराचा हफ्ता थकला... बंॅकेचे वसुली अधिकारी घरी चकरा मारताय...ही अवस्था अाहे वन विभागात कायम असलेले वनक्षेत्रपाल, वनपाल अाणि वनरक्षकांची. वन विभागातील कर्मचाऱ्यांना सामाजिक वनीकरण विभागात स्थलांतरीत केल्यानंतर दाेन्ही...
  August 20, 10:33 AM
 • नाशिक- जेट एअरवेजच्या नाशिक- दिल्ली सेवेला स्वातंत्र्यदिनी दाेन महिने पूर्ण झाले असून आत्तापर्यंत तब्बल ५९८६ प्रवाशांनी सेवेचा फायदा घेतला अाहे. नियमितपणे किमान दीड टन कार्गाेचीही वाहतूक झाली असून नाशिकची फळे, भाजीपाला विदेशातील बाजारपेठेत अवघ्या काही तासांत पोहोचू शकला. चेन्नई, कोलकाता, नागपूर, बंगळुरु सेवेबाबत उद्या चर्चा जेट एअरवेजने नाशिकमधील क्षमता अाेळखली असून येथून अाता चेन्नई, काेलकाता, नागपूर, बंगळुरू या शहरांना जाेडणारी विमानसेवा सुरू करता येऊ शकेल का या अनुषंगाने...
  August 20, 10:11 AM
 • नाशिक - जिल्ह्यातील गोविंदनगर परिसरात एका धावत्या कारने पेट घेतला. या कारमध्ये पती-पत्नी आपल्या एका चिमुकलीसह प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले आहेत. ट्विटरसह व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमण दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमध्ये असलेल्या फायर एक्सटिंगिशरने आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये गॅस किट लावण्यात आली होती. त्यामुळेच ही आग लागली आहे.
  August 19, 08:51 PM
 • नाशिक - महापालिका निवडणुकीच्या काळात विकास कामांचे डाेंगर उभे करण्याचे अाश्वासन देणारे नगरसेवक महापालिकेत नक्की किती काळ उपस्थित असतात याबाबतचा महत्वपूर्ण लेखाजाेखा माहितीच्या अधिकारातून पुढे अाला अाहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात झालेल्या २५ महासभांपैकी केवळ दाेनच महासभांना सर्व नगरसेवक उपस्थित हाेते. या सभांमध्ये एकूण अनुपस्थितांची संख्या ४३३ इतकी अाहे. विशेष म्हणजे यातील केवळ सहाच नगरसेवकांनी गैरहजर राहण्याचा अर्ज महापालिकेकडे सादर केला हाेता. महापालिकेची फेब्रुवारी...
  August 19, 11:18 AM
 • नाशिक - शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील बहुतांश भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. पावसाळी रोगट वातावरणातच गढूळ पाण्यामुळे रोगाचा प्रसार अधिक होत आहे. वडाळागाव, भारतनगर, मेहबूबनगर, सादिकनगर आदी भागात अस्वच्छतेसह काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार बहुतांश...
  August 19, 11:15 AM
 • नाशिक - पूर्व विभागात महापालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या १५ फेरीवाला क्षेत्रामधील दोन क्षेत्र हे जॉगिंग ट्रॅकवर तयार करण्यात आल्याने त्याचा त्रास जॉगर्सला होत आहे. साईनाथनगरच्या जॉगींग ट्रॅकनंतर उपनगर जॉगिंग ट्रॅकजवळील फेरीवाला क्षेत्र जॉगर्सना अडचणीचे ठरत आहे. या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जुन्या नाशकातील गुमशाह बाबा चौकात थेट शाळेला लागून तर डीजीपीनगर परिसरातील कॅनाॅललगत क्षेत्र...
  August 19, 11:13 AM
 • नाशिक - गणेशाेत्सव मंडळांसाठी महापालिकेने लादलेल्या जाचक अटी अाणि डीजेवरील निर्बंध न हटविल्यास शहरातील सर्व गणेश मंडळे रस्त्यावर उतरतील, वेळप्रसंगी रस्त्यावरच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा गणेशाेत्सव महामंडळाच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी महामंडळाच्या विविध समित्यांचे गठण करण्यात अले. चाेपडा बॅन्क्वेट हाॅलमध्ये झालेल्या या बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अापले गाऱ्हाणे मांडले. गणेश मंडळांमध्ये एकजूट सल्यामुळे त्याचा फायदा...
  August 19, 11:02 AM
 • नाशिक - प्रत्येक शासकीय योजना आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची जवळजवळ २ लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने तयार केलेल्या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०१५ पर्यंत राज्यात १.६५ लाख पदे रिक्त होती. गेल्या दोन वर्षांत ही आकडेवारी वाढून सध्या १ लाख ९० हजार पदे रिक्त असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व खात्यांमध्ये अ ते ड श्रेणीतील...
  August 19, 07:57 AM
 • नाशिक- निफाड साखर कारखान्याच्या जागेवर केंद्र शासनाकडून उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टला आता विक्रीकर विभागाकडून खोडा घातला जात आहे. कारखान्याची निम्मी जागा बँकेकडे तारण आहे. उर्वरित जागेवर कुठलेही कर्ज नाही. त्यामुळे ज्या गटावर बोजा आहे, त्याऐवजी प्रत्यक्षात कारखाना जेथे आहे, त्या जमिनीच्या गटांवर बोजा चढविल्यास दुसरा गट मोकळा होऊन तेथे ड्रायपोर्टची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रशासकीय, शासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू असतानाही विक्रीकर विभागाकडून मात्र त्यास प्रतिसाद...
  August 18, 11:23 AM
 • नाशिकरोड- एकेकाळचे शिवसेनेचे झुंजार जिल्हाप्रमुख, माजी खासदार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मानसपुत्र मानलेले राजाभाऊ परशराम गोडसे (वय ५६) यांचे किडनीच्या विकारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. संसरी येथील रहिवासी असलेल्या राजाभाऊंनी त्यांची राजकीय कारकीर्द ही सरपंचपदापासून सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी...
  August 18, 11:18 AM
 • नाशिक- जुलैत मुसळधार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यात बुधवारी पूर्व भागातील नांदगाव, सिन्नर, मालेगावला सुखावल्यानंतर वरुणराजा पश्चिम पट्ट्याकडे वळला. गुरुवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ६ वाजेदरम्यानच्या २४ तासांत जिल्ह्यात ८०० मिमी पावसाची तर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठाही वाढला...
  August 18, 11:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED