Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक - जिल्ह्यातील गोविंदनगर परिसरात एका धावत्या कारने पेट घेतला. या कारमध्ये पती-पत्नी आपल्या एका चिमुकलीसह प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले आहेत. ट्विटरसह व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमण दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमध्ये असलेल्या फायर एक्सटिंगिशरने आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये गॅस किट लावण्यात आली होती. त्यामुळेच ही आग लागली आहे.
  August 19, 08:51 PM
 • नाशिक - महापालिका निवडणुकीच्या काळात विकास कामांचे डाेंगर उभे करण्याचे अाश्वासन देणारे नगरसेवक महापालिकेत नक्की किती काळ उपस्थित असतात याबाबतचा महत्वपूर्ण लेखाजाेखा माहितीच्या अधिकारातून पुढे अाला अाहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात झालेल्या २५ महासभांपैकी केवळ दाेनच महासभांना सर्व नगरसेवक उपस्थित हाेते. या सभांमध्ये एकूण अनुपस्थितांची संख्या ४३३ इतकी अाहे. विशेष म्हणजे यातील केवळ सहाच नगरसेवकांनी गैरहजर राहण्याचा अर्ज महापालिकेकडे सादर केला हाेता. महापालिकेची फेब्रुवारी...
  August 19, 11:18 AM
 • नाशिक - शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील बहुतांश भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. पावसाळी रोगट वातावरणातच गढूळ पाण्यामुळे रोगाचा प्रसार अधिक होत आहे. वडाळागाव, भारतनगर, मेहबूबनगर, सादिकनगर आदी भागात अस्वच्छतेसह काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार बहुतांश...
  August 19, 11:15 AM
 • नाशिक - पूर्व विभागात महापालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या १५ फेरीवाला क्षेत्रामधील दोन क्षेत्र हे जॉगिंग ट्रॅकवर तयार करण्यात आल्याने त्याचा त्रास जॉगर्सला होत आहे. साईनाथनगरच्या जॉगींग ट्रॅकनंतर उपनगर जॉगिंग ट्रॅकजवळील फेरीवाला क्षेत्र जॉगर्सना अडचणीचे ठरत आहे. या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जुन्या नाशकातील गुमशाह बाबा चौकात थेट शाळेला लागून तर डीजीपीनगर परिसरातील कॅनाॅललगत क्षेत्र...
  August 19, 11:13 AM
 • नाशिक - गणेशाेत्सव मंडळांसाठी महापालिकेने लादलेल्या जाचक अटी अाणि डीजेवरील निर्बंध न हटविल्यास शहरातील सर्व गणेश मंडळे रस्त्यावर उतरतील, वेळप्रसंगी रस्त्यावरच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा गणेशाेत्सव महामंडळाच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी महामंडळाच्या विविध समित्यांचे गठण करण्यात अले. चाेपडा बॅन्क्वेट हाॅलमध्ये झालेल्या या बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अापले गाऱ्हाणे मांडले. गणेश मंडळांमध्ये एकजूट सल्यामुळे त्याचा फायदा...
  August 19, 11:02 AM
 • नाशिक - प्रत्येक शासकीय योजना आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची जवळजवळ २ लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने तयार केलेल्या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०१५ पर्यंत राज्यात १.६५ लाख पदे रिक्त होती. गेल्या दोन वर्षांत ही आकडेवारी वाढून सध्या १ लाख ९० हजार पदे रिक्त असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व खात्यांमध्ये अ ते ड श्रेणीतील...
  August 19, 07:57 AM
 • नाशिक- निफाड साखर कारखान्याच्या जागेवर केंद्र शासनाकडून उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टला आता विक्रीकर विभागाकडून खोडा घातला जात आहे. कारखान्याची निम्मी जागा बँकेकडे तारण आहे. उर्वरित जागेवर कुठलेही कर्ज नाही. त्यामुळे ज्या गटावर बोजा आहे, त्याऐवजी प्रत्यक्षात कारखाना जेथे आहे, त्या जमिनीच्या गटांवर बोजा चढविल्यास दुसरा गट मोकळा होऊन तेथे ड्रायपोर्टची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रशासकीय, शासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू असतानाही विक्रीकर विभागाकडून मात्र त्यास प्रतिसाद...
  August 18, 11:23 AM
 • नाशिकरोड- एकेकाळचे शिवसेनेचे झुंजार जिल्हाप्रमुख, माजी खासदार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मानसपुत्र मानलेले राजाभाऊ परशराम गोडसे (वय ५६) यांचे किडनीच्या विकारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. संसरी येथील रहिवासी असलेल्या राजाभाऊंनी त्यांची राजकीय कारकीर्द ही सरपंचपदापासून सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी...
  August 18, 11:18 AM
 • नाशिक- जुलैत मुसळधार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यात बुधवारी पूर्व भागातील नांदगाव, सिन्नर, मालेगावला सुखावल्यानंतर वरुणराजा पश्चिम पट्ट्याकडे वळला. गुरुवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ६ वाजेदरम्यानच्या २४ तासांत जिल्ह्यात ८०० मिमी पावसाची तर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठाही वाढला...
  August 18, 11:15 AM
 • नाशिक- नाशिककरांसाठी अाता अहमदाबादकरिताही विमानसेवा उपलब्ध हाेणार असून, याची अधिकृत घाेषणा एअर डेक्कन अाणि एअर अाेडिसाचे व्यवस्थापकीय संचालक शैशव शहा यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केली. येत्या दहा दिवसांत या सेवेची वेळ अाणि मार्ग जाहीर करणार असल्याचे सांगतानाच १८ अासनी विमानाद्वारे साेमवार वगळता अाठवड्यातून सहा दिवस ही सेवा नाशिककरांना मिळणार असून, प्रवासभाडे एका बाजूने ३००० ते ४५०० रुपयांदरम्यान असेल. एअर डेक्कनकडून २३ डिसेंबर २०१७ पासून नाशिक-मुंबई अाणि नाशिक-पुणे अशा दाेन...
  August 18, 10:43 AM
 • नगर - सकाळपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप.. दुपारी काही कालावधीसाठी कोसळणार्या मुसळधार पाऊसधारा.. अन् सायंकाळपर्यंत सुरु असलेली संततधार.. अशा दिवसभराच्या पावसाळी वातावरणात अनेकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. पण या भर पावसातही मोठ्या संख्येने निघालेला सकल मातंग समाज क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून धडकला. आपल्या २३ मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. समाजातील दुर्बल समुह व युवकांसमोर असलेल्या बेरोजगारी, शैक्षणिक प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली....
  August 17, 11:52 AM
 • नाशिक - शहरातील वडाळागावातील अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बाबींमुळे विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. वडाळागावात एेन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे या भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. गुरुवारी (दि. १६) या परिसरात दिवसभर टँकर न अाल्याने नागरिकांची धावपळ झाली. शहरात मोठ्या प्रमाणावर पाउस सुरू असताना ही तसेच धरणात पाणीसाठा वाढलेला असतानाही शहरातील डीजीपीनगर ते थेट वडाळागाव तसेच अण्णा भाऊ...
  August 17, 11:17 AM
 • नाशिक - रस्ता ओलांडणाऱ्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ही महिला जागीच ठार झाली. या महिलेच्या पोटावरून चाक गेल्याने अर्भक बाहेर आले. गुरुवारी (दि. १६) वडाळा गावात रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. पोलिसांनी हस्तक्षेप केला असताना पोलिस वाहनांवर दगडफेक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागावातील...
  August 17, 11:15 AM
 • नाशिक - खासगी वित्त संस्थेचे पाच कोटी २३ लाखांचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष देत १८ लाख ६० हजारांचा फसवणूक करणारा बालाजी फायनान्स कंपनीच्या तोतया एजंटला त्याच्या सहकाऱ्यासह अटक करण्यात आली आहे. या तोतया एजंटने कारवर चक्क आमदार असल्याच्या चिन्हाचा वापर केल्याचे उघडकीस आले. गंगापूर पोलिसांच्या पथकाने सातपूर एमआयडीसीत ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार धनंजय महाजन (रा. लोहाेणेर) यांना संशयित राकेश पानपाटील याने तुम्हाला बालाजी फायनान्स कंपनीचे कर्जप्रकरण मंजूर करून देतो असे...
  August 17, 11:11 AM
 • नाशिक - शाळांजवळ फेरीवाला क्षेत्र सुरू झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धाेका निर्माण हाेऊ शकताे ही बाब दिव्य मराठीने डाॅन बाॅस्काे अाणि किलबिल शाळेजवळील गैरप्रकारांसह प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील फेरीवाल्यांना मज्जाव केला अाहे. मात्र हे करतांना महापालिका प्रशासनाने सिल्व्हर अाेक शाळेजवळील जागा सुचविल्यामुळे प्रशासनाला नक्की साध्य काय करायचे अाहे, असा प्रश्न निर्माण हाेताे. काेणत्याही शाळेपासून १०० मीटरच्या अात फेरीवाले नसावे असा सर्वाेच्च अाणि...
  August 17, 11:08 AM
 • नाशिक- पोलिस दलात शौर्यपूर्ण, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह शहर पोलिस दलातील बाळू भवर (उपआयुक्त, परिमंडळ १), अरुण आहिरे (अंबड पोलिस ठाणे), अारिफखान पठाण (उपआयुक्त, परिमंडळ २) आणि सुभाष जाधव (नाशिकरोड पोलिस ठाणे) यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर...
  August 15, 11:06 AM
 • नाशिक- पुरेसा पाऊस न पडल्याने यंदा जिल्ह्यातील अाठ तालुके कोरडे असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही ७५ टक्केच पाणी आहे. कश्यपीतूनही पालिकेस पाणी नको आहे. त्यामुळे पुढील पाणी दुर्भिक्षाचा विचार करता नाशिक महापालिकेला ४ हजार ४०० दलघनफूट पाणी देणे शक्य नसून ३ हजार दलघनफूट इतकेच देता येईल. म्हणजे तब्बल ३३ टक्के पाण्यात कपात करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळ आढावा बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेलाही पाणी कपात करावी लागणार असून यामुळे नाशिककरांवर...
  August 15, 11:02 AM
 • नाशिक- कपाट व अन्य एफएसअायचे उल्लंघन असलेले क्षेत्र नियमित करण्यासाठी सहा व साडेसात मीटर रस्ते नऊ मीटर रुंदीकरण करण्याच्या निर्णयाचे अधिकार अायुक्तांना देण्यापासून तर या याेजनेत सहभागी हाेऊ इच्छिणाऱ्यांना एक वर्षासारखा कमी कालावधी न देता वाढवून देण्यापर्यंत भाजप शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांच्या मागणीला अखेर सत्ताधारी भाजपनेच ब्रेक लावला अाहे. स्थायी समितीने इतिवृत्तात सुधारणेसह मंजुरी दिली असली, तरी एक वर्षाचा कालावधी वाढवून देण्याबाबत त्यावेळच्या सभागृहाचा कल...
  August 15, 10:52 AM
 • इगतपुरी- तालुक्यातील धामणगाव येथे एका कुटुंबात एक नवा पाहुणा बालगोपाळांसोबत चक्क मच्छरदाणीत जाऊन झोपला. ह्या पाहुण्याला अचानक पाहताच मात्र सर्वांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. हा पाहुणा दुसरा-तिसरा कुणी नसून बिबट्याचे ३ महिन्यांचे पिल्लू होते. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले. धामणगाव येथे मनीषा बर्डे यांचे कुटुंब पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत...
  August 15, 10:43 AM
 • नाशिक- भिंतींवर रंगवलेला तिरंगा,भिंतींवर चितारलेले राष्ट्रगीत अन् प्रतिज्ञा... माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासह शहीद अाणि अाॅलिम्पिक विजेत्यांची लक्षवेधी चित्रे... भिंती-भिंतींवर लिहिलेले सुविचार, बालगीते, कविता अाणि गणितातील पाढे, सूत्र अन बाराखडी... हे चित्र आहे नाशिक जिल्ह्यातील गवळवाडी या अादिवासी पाड्यातले. विद्यार्थ्यांना रस्त्याने येता-जाता शिक्षण मिळावे अाणि त्यांच्यातील देशप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने काही तरुण अभियंत्यांनी एकत्र येऊन एज्युक्वाॅइन...
  August 15, 10:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED