Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक - दैनिक दिव्य मराठीने नाशिकशी असलेले आपुलकीचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी आणि आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नाशिक शहरामध्ये 71 हजार रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. आज सोमवारी (ता. 11) दुपारी 12 वाजता दैनिक दिव्य मराठीच्या चांडक सर्कल येथील कार्यालयात महापौर नयना घोलप यांच्या हस्ते या उपक्रमास सुरुवात होईल.या उपक्रमांतर्गत नाशिक शहरामध्ये दैनिक दिव्य मराठीची टीम शाळा, महाविद्यालये, कॉलनी, सोसायटी तसेच शहरातील विविध भागात जाऊन वृक्षारोपण करणार आहे. ज्या परिसरात वृक्षारोपण केले...
  July 11, 03:36 AM
 • नाशिकरोड - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एम.डी. होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रमास केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. ही मान्यता राजपत्राच्या खंड 2 व 3 उपखंड (2) अन्वये दिली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी दिली. आरोग्य विद्यापीठाशी संलग्नित दहा होमिओपॅथीक महाविद्यालयात एम.डी. पदव्युत्तराचा अभ्यासक्रम शिकविला जातो. विद्यापीठाच्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अरुण भस्मे यांनी पर्शिम घेतले. या मान्यतेने आता या विद्यापीठातून पास होणारे...
  July 11, 03:29 AM
 • नाशिक। उच्च शिक्षणासाठी पालकांनी आपल्या पाल्याशी योग्य सुसंवाद साधून त्याच्या आवडीच्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेण्याची सक्ती करू नये, तर त्याचा कल व आवड पाहूनच क्षेत्र निवडावे. यातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडेल, असे प्रतिपादन नाशिक पश्चिमचे आमदार नितीन भोसले यांनी केले.वॉर्ड क्र. 78 मधील मनसेचे नेते सचिन रोजेकर यांच्या पाटीलनगर विकास मंडळाच्या वतीने आयोजित दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार भोसले बोलत होते. या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व...
  July 11, 03:28 AM
 • नाशिकरोड - तोट्यात असलेल्या कंपन्या सध्या प्रगती करीत आहेत. उल्लेखनीय काम केल्यास महापारेषण, महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांची प्रगती होऊ झाल्यास कर्मचार्यांचीसुध्दा प्रगती होईल, असे प्रतिपादन प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीचे संचालक ओमप्रकाश एम्पाल यांनी रविवारी येथे केले.गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्र्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वीज कामगारांचा मेळावा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कामगार संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार अरुण भालेराव,...
  July 11, 03:26 AM
 • नाशिकरोड - माणसाची परीक्षा त्यांच्या बाह्यतेवरून नव्हे तर त्याच्या अंतरंगी असलेल्या हृदयाच्या भावनेवरून होते, असे प्रतिपादन वाणीभूषण, संस्कारभारती प.पू. साध्वी प्रीतीसुधाजींनी केले. र्शी जैन स्थानकवासी र्शावक संघातर्फे चातुर्मास मंडप प्रवेशानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.साध्वी प्रीतीसुधाजी म्हणाल्या की, मनुष्याचे मन शुद्ध करण्यासाठी तसेच विचारांची पातळी उंचविण्यासाठी चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले. मधुस्मिताजी म्हणाल्या, पाश्चात्त्य संस्कृतीचा तरुणींवर मोठा...
  July 11, 03:25 AM
 • नाशिक - प्रवासी वाहतूक करणार्या मॅक्सीकॅब व वडाप (अँपेरिक्षा) यांची वाहतूक वैध करण्याबाबत शासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून याविरोधात एसटी कामगार व शासन यांच्यात संर्घष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उद्यापासूनच संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. येत्या बुधवारी होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मॅक्सीकॅब व वडापच्या प्रवासी वाहतुकीस मंजूरी देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे.बसेसद्वारे प्रवासी वाहतुक सुरळीतपणे सुरू आहे. तरीदेखील...
  July 11, 03:20 AM
 • नाशिकरोड - नाशिकरोड महापालिकेची भाजीमंडई असून भाजीविक्रेते रस्त्यावर विक्री करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातही घडत आहे. मात्र तरीही अतिक्रमण विभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. नाशिकरोड भागातील भाजी विक्रेत्यांना महापालिकेतर्फे बिटको रुग्णालयाशेजारी भाजीमंडईची सुविधा करून दिली आहे. मंडईमध्ये दुकाने मिळविण्यासाठी भाजीविक्रेत्यामध्ये भांडणे झाली. सुरुवातीला मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांनी दुकाने लावली; परंतु काही भाजीविक्रेते रस्त्यावर...
  July 11, 03:06 AM
 • नाशिक - राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगार क्रमांक एकमध्ये कार्यरत चालक-वाहकांना रात्री खासगी ठेकेदाराच्या सफाई कामगारांनी किरकोळ कारणावरून आगारातच बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध नोंदवित सर्व एसटी कामगार संघटनांनी संबंधित ठेकेदाराचे स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. एन. डी. पटेल रस्त्यावरील मुख्य कार्यालयाशेजारी आगार क्रमांक एकचे कार्यालय आहे.शनिवारी रात्री 9 वाजता औरंगाबाद येथून परतलेले चालक ए. जे. गवई व वाहक आर. जे. भंडारी हे दोघेही...
  July 11, 02:59 AM
 • पंचवटी - पंचवटीतील तपोवनात असलेल्या श्री लक्ष्मणजी मंदिर ट्रस्टच्या शूर्पणखा मंदिराला आता नवी झळाळी प्राप्त होणार असून, सहा महिन्यांच्या आत डायरोमा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. नाशिकचे मूर्तिकार नीलेश ढेरे यांच्या स्टुडिओत शूर्पणखा व लक्ष्मण यांच्या मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे.रामायणात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणार्या तपोवनात गोदावरी-कपिला संगमावर लक्ष्मणाने शेष अवतारात 12 वर्षे तपश्चर्या केली होती. रावणपुत्र मेघनाथला मारण्यासाठी ही तपश्चर्या केली होती. ही तपश्चर्या भंग...
  July 11, 02:57 AM
 • पावसाव्व्याची सुरुवात होत आहे. सुंदर व बहरणारी फुलझाडे आपल्याही घरी असावीत असे सर्वांनाच वाटते; पण घराप्रमाणेच आपल्या शहरातसुद्धा यावर्षी आपण प्रत्येकी एक झाड लावू व याची सुरुवात आजपासूनच करू या..भरपूर मोकळी जागा असल्यास विविध प्रकारची झाडे लावता येतात. मात्र, जेव्हा जागा कमी असते तेव्हा विचारपूर्वकच झाडांची निवड करायला हवी. आपल्याकडे जागा किती आहे, सूर्यप्रकाश किती वेळ असतो, आपण झाडाकडे कितपत लक्ष देऊ शकतो याचा विचार करायलाच हवा. पाम प्रकारातील झाडांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही....
  July 11, 02:54 AM
 • नाशिक - साधेपणाचे प्रतीक असलेल्या खादीलादेखील जमाने के साथ चलोच्या तालावर मार्केटिंग फंडा आपलासा करावा लागत आहे. त्यामुळेच की काय, येथील जिल्हा सहकारी खादी व ग्रामोद्योग संघाचे विक्री केंद्र आपला अँटिक लुक सोडून चक्क ए.सी. शोरूमचा नवा अवतार धारण करण्याच्या तयारीत आहे.नाशिक जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाने आपल्या कामगिरीच्या बळावर राज्यात एक उत्कृष्ट संघ म्हणून नाव कमावले आहे. नाशिक केंद्राची कामगिरी बघता या केंद्राला खादी व ग्रामोद्योग आयोगाने साडेचार लाखाचे विनापरतावा अनुदान देऊ...
  July 11, 02:48 AM
 • नाशिक - तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठलच्या गजरापासून टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगपर्यंतच्या अजरामर रचनांना आणि अभंगांना सुरेश वाडकर, कलापिनी कोमकली, जयतीर्थ मेवुंडी आणि राहुल देशपांडे यांनी अशा तल्लीनतेने सादर केले की नाशिककर रसिकांची जणू ब्रम्हनंदी टाळी लागली .पंडित भीमसेन जोशी यांना र्शद्धांजली म्हणून आयोजित करण्यात आलेल्या बोलावा विठ्ठल.. या कार्यक्रमातील सादर झालेल्या रचनांनी उपस्थित रसिकांना साक्षात विठ्ठलाच्या अनुभूतीचा आनंद दिला.पंचम-निषाद व इंगा फाउण्डेशन आयोजित बोलावा...
  July 11, 02:43 AM
 • नाशिक - गर्भलिंग निदान तपासणीसंदर्भात कडक कायदे असूनही जिल्ह्यात मुलींचा दर हजार मुलांमागे 882 इतका खाली आला आहे. शरीर स्वास्थ्यासाठी वरदान ठरणारे सोनोग्राफीसारखे तंत्रज्ञान गर्भलिंग निदानासाठी शाप ठरू लागले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायलेंट ऑब्झर्व्हर हा पर्याय असला तरी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे कोल्हापूर सोडल्यास इतरत्र कुठेही वापरण्यात आलेले नाही.नाशिक शहरामध्येच मुलींचा जननदर 920 वर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात 342 सोनोग्राफी केंद्रांपैकी 15 केंद्रांवर...
  July 11, 02:40 AM
 • नाशिक - शिवसेना-भाजप युती यापुढेही कायम राहणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीमध्ये योग्य चर्चा होऊनच निर्णय घेतले जातील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यान आणि अभ्यासिकेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने युतीमध्ये सुरू असलेल्या काही प्रमाणातील...
  July 11, 02:37 AM
 • नाशिक । पक्ष नविन असतांनाच नाशिकमध्ये तीन आमदार निवडून येतात, यातून माणसांची पारख व कार्यकर्त्यांची ताकद दिसते. शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आतापर्यंत केलेले कार्य निश्चितच नागरिकांना आवडले आहे आणि महापालिकेच्या येत्या निवडणुकांमध्ये मनसेला घवघवीत यश निश्चितच आहे, असे सुतोवाच आमदार नितीन भोसले यांनी केले.वॉर्ड क्र 78 मध्ये पाटील मैदानाजवळ, त्रिमुर्ती चौकात मनसेचे सचिन रोजेकर यांच्या संपर्क कार्यालय व तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन शनिवारी आमदार नितीन भोसले यांच्या...
  July 11, 02:30 AM
 • नाशिकरोड - वडनेर गावातील सरकारमान्य रेशन दुकानात (क्र. 32) ग्रामीण पुरवठा निरीक्षकांनी टाकलेल्या छाप्यात 32 क्विंटल 75 किलोऐवजी निम्माच 16 किलो तांदूळ मिळून आला.उपनिरीक्षक गणेश गिरी यांनी सांगितले की, गामीण विभागाचे पुरवठा निरीक्षक वसंत पाटील यांनी रविवारी दुपारी दुकानाची तपासणी केली. त्यात अपेक्षित 57.45 क्विंटल गहू मिळून आला. मात्र तांदळात गफला दिसला. कमी तांदूळ दुकानाबाहेर उभ्या असलेल्या गाडीत (क्रमांक एमएच 12 एक्यू-4108) सापडला. पाटील यांच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात दुकान संचालक...
  July 11, 02:28 AM
 • नाशिक - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेच्या 16 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त आहे.मनपा शाळेचे यावर्षी शहर गुणवत्ता यादीत रहान चाऊस (सातपूर), संघमित्रा अहिरे (म्हसरुळ), ऋतूजा पवार (सिडको), चंद्रशेखर सासले (सिडको), रसिका खैरनार (सिडको), कोमल गवळी (पाथर्डी), अश्विनी सावंत (पाथर्डी), किरण जाधव, ऋषीकेश भगत, शिलत पवार, ओंकार अहिरे, अंकित जाधव, गणेश...
  July 11, 02:26 AM
 • नाशिकची गणना राज्यातल्या विकासाच्या बेटांमध्ये होत असली, तरी मुंबई-पुण्याची मोजपट्टी लावायचे झाल्यास नाशिकमध्ये अनेक मूलभूत बाबींचीच कमतरता असल्याचे जाणवते. त्या दृष्टीने जोपर्यंत जाणीवपूर्वक पावले टाकली जात नाहीत, तोपर्यंत शहराच्या विकासाची प्रक्रिया वेग घेणार नाही. सध्या नाशिक वाढते आहे, विस्तारते आहे हे नक्की; पण ते विकसित होत आहे का, या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच यावे, अशी स्थिती आहे. नाशिक-मुंबई विमान सेवेचा पाचव्यांदा फसलेला प्रयोग हे त्याचेच एक निदर्शक ठरावे....
  July 11, 02:05 AM
 • नाशिक: एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी प्रवास महागल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. इंधन दरवाढीमुळे गेल्या आठवड्यात एसटीने 10.34 टक्के इतकी भाडेवाढ केली होती. आता त्यापाठोपाठ परिवहन मंडळाने शहर बसच्या भाड्यात 1 रुपयांने वाढ केली आहे. ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे. एसटी महामंडळाने केलेली भाडेवाढ असमर्थनीय असून ती त्वरीत मागे घ्यावी. तसेच एसटीकडून वसूल केला जाणारा प्रवासी कर सरकारने रद्द करावी, अशी मागणीही...
  July 10, 05:53 PM
 • नाशिक-जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणून आपापसातील मनांचे पूल बांधण्याचे कार्य सॅटर्डे क्लब करीत आहे. या मंचाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या आणि उद्योजकाच्या मनात जग जिंकण्याची ऊर्मी निर्माण होईल, असा विश्वास सॅटर्डे क्लबचे संस्थापक अध्यक्ष माधवराव भिडे यांनी व्यक्त केला. येथील केतकीज थाटबाट रेस्टॉरंटमध्ये आयोजित सॅटर्डे क्लबच्या विभागीय उद्योजक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, अजित मराठे, नितीन...
  July 10, 07:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED