जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक. कॉलेजरोडवरील मॉडेल कॉलनी भागात गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या बंगल्यांच्या आवारातील चंदनाच्या सहा वृक्षांचे खोड तोडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच चंदनचोरीचे प्रकार वाढत असल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवाश्यांनी व्यक्त केली. बंगला क्रमांक १२ मध्ये राहणा-या किशोर वसंतगडकर यांच्या घरासमोरील ४० वर्षे जुने चंदनाचे झाड सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कापून नेले. २०-२५ फूट उंचीच्या वृक्षाच्या फांद्या...
  July 22, 06:46 AM
 • नाशिक. सिडकोसारख्या दाट वस्तीस काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून आठवडाभरापासून तर पाणी अधिकच रंग बदलू लागले आहे. साथीच्या रोगांपासून खबरदारी घेण्याच्या दिवसांना सुरुवात होत असतानाच सिडकोवासीयांना येणा-या या अनुभवाने तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने हा विषय गांभीर्याने हाताळावा, अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली. सिडकोतल्या गणेश चौक परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणाचा अनुभव गुरुवारी घेतला....
  July 22, 06:43 AM
 • नाशिक. नाशिकमधील निसर्गप्रेमींनी आता फेसबुकवर आपला कट्टा सुरू केला असून नाशिक नेचर फोरम या फेसबुकवरील ओपन ग्रुपवर नाशिक व परिसरातील झाडे, निसर्गरम्य ठिकाणे या विषयीच्या गप्पा रंगायला लागल्या आहेत. केवळ पाचच दिवसांत शंभराहून अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदविला आहे, यावरून हा फोरम अल्पावधीतच लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. या ग्रुपवर पहिली थीम मान्सून मॅजिक अशी देण्यात आली असून सध्या पावसाळ्यात येणा-या वनस्पती, फुले व खास पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी...
  July 22, 06:39 AM
 • नाशिक. भगवान महावीर आणि गौतम बुद्धांनी पाली आणि ब्राह्मी भाषेत जगाला तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. पाश्चिमात्त्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आणि उच्च शिक्षणाच्या नावाखाली याच पाली भाषेकडे महाराष्ट्रातील नवीन पिढीचे मात्र सध्या दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे या भाषेचे ज्ञान देण्यासाठी प्राध्यापकांची कमतरता भासत आहे. पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असले तरी यात पाली भाषा शिकविण्यासाठी केवळ तीन पूर्णवेळ प्राध्यापक आहेत. मागील वर्षातील आकडेवारीनुसार...
  July 22, 06:37 AM
 • नाशिक. सिन्नर येथे साकारण्यात येणा-या इंडिया बुल्सच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भूसंपादनास तीव्र विरोध करूनही जागा संपादित करण्यासाठी शासनातर्फे नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. यास मोठ्या संख्येने शेतक-यांचा विरोध असतानाही हे भूसंपादन सुरू आहे. ही कार्यवाही रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सेझसाठी नाशिक ते गुळवंच परिसरादरम्यान २८ किलोमीटरचा...
  July 22, 06:33 AM
 • नाशिक. कॉलेजरोडवर ट्रॅफिक पोलिसांनी अचानक केलेल्या वाहन व संबंधित कागदपत्र तपासणीने कॉलेज सुरू होण्याच्या आनंदात असलेल्या तरुणांनी आता आपण कायदा पाळणारे सुजाण नागरिक बनले पाहिजे हा धडा कॉलेजच्या दुस-या दिवशीच गिरविला. कॉलेज असो वा नसो कॉलेजरोडवर वेगाने सुसाट बाईक हाकणा-या तरुण मंडळींचा उपद्रव तेथील रहिवाशांना नित्याचाच. त्यात हा तर कॉलेजचा पहिला आठवडा. नव्याची नवलाई वाटणा-या या युवकांना अशा वेळी, खास कॉलेजमधे येण्या-जाण्याकरिता आपल्या नव्याने खरेदी केलेल्या...
  July 22, 06:32 AM
 • नाशिक. नैसर्गिक आपत्तीतील अनुदान वाटपाचा भ्रष्टाचार शोधून चौकशी करा, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजतर्फे द्वारका येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार डॉ. राजश्री गांगुर्डे व जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी राठी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. द्वारका चौफुलीवर आज कृषक समाजाच्या पदाधिका-यांनी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. उपस्थित कृषक समाजाच्या पदाधिका-यांनी यावेळी चौफुलीवर जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या....
  July 22, 06:29 AM
 • माझे वडील बाबुलाल वंजी सोनवणे. आम्ही चार भावंडे. संजय, अशोक, दिलीप व शेखर. आमचे मूळ गाव मालेगाव. तेथेच आमचे वास्तव्य होते. घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. एक वेळ जेवण मिळणे कठीण होते. सन २००० मध्ये मालेगाव येथे जातीय दंगल उसळली. त्यात आमचे घर जातीयवाद्यांनी पेटवून दिले. आम्ही नाशिक येथे आमचे मामेभाऊ संजय बोरसे यांना कळवले की, आमचे खूप वाईट झाले. त्याने सांगितले, की लगेच नाशिकला निघून या. आम्ही त्याप्रमाणे केले. तातडीने नाशिकला येणारी गाडी पकडली. आठवडाभर मामेभावाकडे राहिलो....
  July 22, 06:26 AM
 • नाशिकरोड. जेलरोड परिसरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, अनेक समस्या आहेत. नांदूर गावातील ओहळावर पूल बांधण्यात आला आहे. त्या ठिकाणी खडीकरण केलेले नाही आणि मुरूमही टाकलेला नसल्याने नागरिकांना चिखलातून ये-जा करावी लागते. दसक गाव ते सायखेडा मार्गावरील रस्त्यातच चेंबर न बुजवल्याने अपघात होत आहेत. अशाही परिस्थितीत सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक चौकाच्या कोप-यावर...
  July 22, 06:23 AM
 • सर्वसामान्य नागरिकांवर वारंवार कराचे ओझे टाकणारी महापालिका उतराई म्हणून नाशिककरांच्या पदरात काय टाकते, याचा आढावा घेण्यासाठी डी.बी. स्टारची टीम राजीव गांधी भवनच्या मुख्यालयात धडकली. विशेष म्हणजे, आजचा दिवस महापालिकेच्या बाजाराचा होता. बाजार या अर्थी किमान आज गुरुवारी महापालिकेची महासभा असल्यामुळे शहरातील नगरपित्यांपासून तर अधिका-यांपर्यंत तसेच एरवी खासगी कामाच्या नावाखाली महापालिकेबाहेर चकाट्या पिटत फिरणारेही आम्हाला जागेवर सापडतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात...
  July 22, 06:20 AM
 • टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीच्या चंद्राची गरज प्रत्येकालाच असते. काही जण तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मतात, हा भाग वेगळा. पण काहींच्या वाट्याला उन्हाचे चटके अन् पावसाचा मार येतो. तरीही परिस्थितीशी झुंजत ते पुढे जातात. हेच चित्र आपल्याला पाहायला मिळते शहरातील सिग्नलवर. शहराची लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या स्पर्धेत प्रत्येकालाच आपला शिक्षणाच्या दर्जानुसार रोजगार, नोकरी उपलब्ध होईलच याची शाश्वती सध्यातरी कुणी देऊ शकत नाही. मात्र तरीही प्रत्येकाला...
  July 22, 06:17 AM
 • नाशिक. शहरात निराधार लोकांसाठी नाईट शेल्टर (निवारागृह) उभारण्याबाबत शासनाकडून आलेल्या प्रस्तावाला सर्वच नगरसेवकांनी विरोध करीत हा विषय फेटाळून लावला. राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे अशा स्वरूपाचे पत्र पाठवून महापालिकेला वेठीस धरीत असल्याने शासनाने त्यांना लगाम घालावा, अशी संतप्त प्रतिक्रिया सभागृहनेते सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली. शहरातील निराधार लोकांना रात्रीच्या वेळी हक्काचा निवारा मिळावा, यासाठी दाखल झालेल्या एका याचिकेवरून शासनाने पाच लाख...
  July 22, 06:14 AM
 • नाशिक. आरोग्यसंपन्न अन्न ग्रहण करण्याचा संदेश घरोघरी पोचावा, या उद्देशाने घरगुती उपकरणे बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियातर्फे आयोजित मल्लिका-ए-किचन कुकिंग स्पर्धा देशातील शंभर शहरांमध्ये तीन जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदादेखील या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेमुळे महिलांना आपल्या पाककृती राष्ट्रीय स्तरावर प्रस्तुत...
  July 22, 06:12 AM
 • नाशिक. येथील हार्मर्नी आर्ट गॅलरीमध्ये आजपासून स्नेहल एकबोटे यांनी काढलेल्या चित्रांचे रंग बरसे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रंगांचा मुबलक प्रमाणात केलेला वापर हे वैशिष्ट्य असलेल्या काँटेंपररी आर्ट या आधुनिक प्रकारातील ही चित्रे असून आपल्या आगळ्या शैलीने ही चित्र कलाप्रेमींच्या मनास भुरळ घालतात.दिनांक २१ ते २४ जुलै या कालावधीत भरविण्यात आलेल्या या चित्र प्रदशर्नाचे एसएमआरके महाविद्यालयातील चित्रकला विभागाच्या विभागप्रमुख संध्या केळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले....
  July 22, 06:10 AM
 • नाशिकरोड. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करूनही जेलरोडवरून वाहतूक पोलिसांच्या समक्ष खुलेआम सुरू असलेल्या वाहतुकीमुळे विद्यार्थी व कामगारांचा जीव धोक्यात सापडत आहे. नियमबाह्य होणा-या वाहतुकीमुळे कुटुंबीयांना बाहेर पडणा-या सदस्यांची घरी परत येईपर्यंत काळजी लागून राहत आहे.जेलरोड परिसराची लोकसंख्या व नागरी वसाहतीत झपाट्याने वाढ होत आहे. कामगार वर्गाची संख्या मोठी असल्याने जेलरोडवरून वाहनांची मोठी वर्दळ असते. माजी महापौर दशरथ पाटील यांच्या प्रयत्नाने नागपूर पॅटर्नच्या धर्र्तीवर रस्ता...
  July 22, 06:07 AM
 • नाशिक. सुरगाणा आणि कळवण येथे झालेल्या चांगल्या पावसामुळे चणकापूर धरण २७.८६ टक्के भरले आहे; मात्र मालेगाव, सटाणा या क्षेत्रांची पाण्याची मागणी लक्षात घेता चणकापूर धरणातून ३०० क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम व पश्चिमोत्तर भागात चांगला पावसामुळे पाण्याची स्थिती सुधारली आहे. धरणांच्या साठ्यातही चांगला बदल नोंदला आहे; पण उत्तर व पूर्व भागांमध्ये पावसाचे प्रमाण नगण्य असल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्षच आहे. अशातच मालेगाव, सटाणा,...
  July 21, 05:53 AM
 • नाशिक. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क न घेण्याचा शासनाचा अध्यादेश असतानाही काही महाविद्यालये लाभार्थी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्काची वसुली करतात, असा आरोप करीत रिपब्लिकन पॅँथर संघटनेने विशेष समाजकल्याण अधिकारी जे. आर. वळवी यांना घेराव घातला. याप्रश्नी योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी वळवी यांनी दिले. लाभार्थी विद्यार्थ्यांना या शुल्काअभावी परीक्षा अर्ज भरू न देणे, शिष्यवृत्तीची रक्कम अडवून धरणे...
  July 21, 05:25 AM
 • नाशिक. शहरात भुयारी आणि पावसाळी गटार योजनेच्या कामांची दुरवस्था होऊन ऐन पावसाळ्यात चांगले रस्ते उखडले, रस्तोरस्ती चिखल झाला. वाहनचालक आणि सामान्य नागरिकांच्या त्रासाला सीमा उरली नाही. त्या कामास दिरंगाई होत असल्याच्या वस्तुस्थितीवर दिव्य मराठीने मंगळवारी (१९ जुलै) प्रकाशझोत टाकला होता. याची दखल घेत गुरुवारी सकाळपासून कासवगतीच्या या कामांनी चांगलाच वेग पकडला. याबाबत नागरिकांनी दिव्य मराठीस धन्यवाद दिले. तुंबलेल्या गटारांची समस्या...
  July 21, 05:23 AM
 • नाशिक. बांधकामे होताना नैसर्गिक नाले बुजविले जात असूनही त्याकडे नगररचना विभाग कानाडोळा करीत बांधकाम व्यावसायिक व ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याच्या तक्रारी नगरसेविकांनी महासभेत केल्या. त्यावर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त बी. डी. सानप यांनी दिले. सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड यासह विविध ठिकाणच्या नैसर्गिक नाल्यांवर बांधकामे उभी राहत असून, नाल्यांना संरक्षक भिंती उभारत नसल्याची बाब शीला भागवत यांनी निदर्शनास आणून दिली. बांधकामांना...
  July 21, 05:19 AM
 • गुडघ्याची शस्त्रक्रिया देशात अनेक दिवसांपासून होत आहे; पण आतापर्यंत यामध्ये हवे तसे यश मिळाले नव्हते. एवढेच नाही, तर या शस्त्रक्रियेत यशाची शंभर टक्के खात्रीही मिळत नव्हती; पण आता ही शस्त्रक्रिया आपल्या देशातच एक रोबो करणार आहे, तेही न चुकता. या शस्त्रक्रियेत रुग्णाला थोडाही त्रास होणार नाही आणि याचा खर्चही सामान्य माणसाला परवडेल असा राहील. अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयाने कोरियाकडून १० कोटी रुपयांत एक रोबो (रोबोडॉक सिस्टिम) विकत घेतला आहे. अमेरिकेसारख्या...
  July 21, 05:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात