जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक- महिंद्रा इंजिनो प्रकल्पास जकात करात माफी आणि सवलत देण्याचा प्रस्ताव सोमवारी महापालिकेच्या सभेने फेटाळून लावला. तसेच या कंपनीला यापूर्वी देण्यात आलेल्या बेकायदा सवलतीविषयी माहिती सादर करण्याचे आदेश महापौर नयना घोलप-वालझाडे यांनी प्रशासनाला दिले.महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या महिंद्रा इंजिनो प्रकल्पाबाबतच्या प्रस्तावात 2006 पासूनची जकात माफ करावी, तसेच पुढील पाच वर्षे जकात करात सवलत द्यावी, असे म्हटले आहे. त्यास नगरसेवक गुरुमितसिंग बग्गा यांनी सोमवारच्या सभेत आक्षेप घेतला....
  June 21, 01:32 AM
 • नव्याने या पदावर विराजमान होणा-या टिळे यांना सुद्धा आता गटबाजीचा सामना अपरिहार्यपणे करावा लागणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. वास्तविक पाहता, अन्य प्रतिस्पर्धी महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस लागले असताना सत्ताधारी शिवसेना मात्र अजून चाचपडतच असल्याचे हे निदर्शक म्हणावे लागेल. मनसेमुळे शिवसेनेची नाशिकमध्ये मोठी पिछेहाट सुरु आहे. शहरातली एक नव्हे तर तीन आमदारपदे पटकावून मनसेने त्याची चुणूकही दाखविली आहे. अशास्थितीत महानगरप्रमुखपदाचा खांदेपालट करुन शिवसेना...
  June 20, 03:38 AM
 • अकोला: पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने अकोला महापालिकेतील कर्मचा-यांनी गेल्या नऊ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे शहराला अक्षरश: गटाराचे स्वरूप आले आहे. शहराला निर्जळीलाही तोंड द्यावे लागत आहे. कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. १ आॅक्टोबर २००१ रोजी...
  June 20, 01:48 AM
 • नाशिक: मुलीच्या सासरच्या मंडळीला धडा शिकविण्यासाठी आईने पोलिस ठाण्याच्या आवारात पेटवून दिलेल्या कविता टाकचा रविवारी अखेर मृत्यू झाला. या प्रकरणी कविताच्या आई संगीता चावरिया हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कविताचे (वय २२) दुपारी उपचारादरम्यानच निधन झाले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास कविताने पतीसोबत भांडण झाल्याचा राग आल्याने स्वत:च्या अंगावर घासलेट ओतून घेतले. औरंगाबादहून आलेली तिची आई सौ. चावरिया या वेळी कविताच्या घरीच होत्या. त्यांनी...
  June 20, 01:29 AM
 • नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गंत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यासाठी ७ लाख ३० हजार ७६९ कि. तर इयत्ता ६ वी ते ८ वी ६ लाख १७ हजार ६१३ कि. तांदळाचा पुरवठा करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय अन्नधान्य उपभोक्ता विभागाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  June 19, 04:14 PM
 • नाशिक - जुलै महिन्यापासून जिल्हा पुरवठा विभागाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यासाठी शासनाचा एक रुपयाही न घेता जिल्हा पुरवठा विभागाने सॉफ्टवेअर तयार करून स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू झाले असून पुढच्या महिन्यात पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
  June 19, 04:12 PM
 • नाशिक - देशाबाहेरील काही बौद्ध धर्मगुरू धम्मप्रसाराऐवजी विनाकारण राजकारण करीत असून, ते बौद्ध धम्मापेक्षा स्वत:चाच अधिक विचार करतात. उच्चनीचतेच्या माध्यमातून ते धम्मात फूट पाडत आहेत, असा आरोप बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय मुख्य महासचिव भदन्त प्रज्ञाशील यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत केला.दादासाहेब गायकवाड सभागृहातील या परिषदेला महापौर नयना घोलप, भदन्त आनंद बोधी, विश्वास देवकर, माजी न्यायाधीश एन. जी. घोटेकर, स्थायी समितीचे माजी सभापती...
  June 19, 05:43 AM
 • नाशिक: सासरच्या छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून घेत पोलिस ठाणे गाठणा-या विवाहितेस सासरच्या लोकांनी नव्हे, तर आईनेच पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघडकीस आला. कविताला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 70 टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे.या प्रकरणी पोलिसांनी औरंगाबादच्या संगीता चावरियाला ताब्यात घेतले आहे.जुन्या नाशकातील महालक्ष्मी चाळीत राहणाया सौ. कविता सिद्धराम टाक या विवाहितेने पतीकडून वारंवार छळ होत असल्याचे सांगत आई सौ. संगीता चावरिया यांना औरंगाबादहून...
  June 19, 05:37 AM
 • नाशिक: पंचवटीतील सप्तशृंगी अपार्टमेंटची इमारत गेल्या आठवड्यात फटाक्यांच्या शक्तिशाली स्फोटाने खिळखिळी झाली. त्यामुळे या इमारतीतील १२ रहिवाशांची तात्पुरती निवासव्यवस्था मेरीच्या सदनिकांमध्ये करण्यात आली आहे. मात्र, तेथील प्रशासनानेही या रहिवाशांना २४ जूनपर्यंत जागा रिकामी करण्याचे आदेश बजावले आहेत. अशा परिस्थितीत रहिवाशांनी थेट जिल्हाधिकायांना साकडे घालून आमच्या निवासाचा प्रश्न काही काळापुरता तरी सोडवावा, अशी मागणी केली. या प्रकरणात लक्ष घालून अखेर जिल्हाधिकायांनी आणखी चार...
  June 19, 02:09 AM
 • नाशिक - ही धक्कादायक घटना घडली आहे नाशिकच्या भद्रकाली पोलिस स्टेशन परिसरात. भद्रकाली पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महालक्ष्मी चाळ परिसरात राहणाऱया कविता टाक (२२) या विवाहितेला तिची आई संगिता चावरिया (रा.औरंगाबाद) हिने पेटवून दिले. यात कविता भाजली असून, तिला उपचारांसाठी शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कविताला तिच्या सासरचे लोक त्रास देताहेत. ते तिचा छळ करतात असे भासविण्यासाठी कविताने शनिवारी अंगावर रॉकेल ओतून पोलिस स्टेशनात धाव घेतली. त्याचवेळी तिच्या आईने तिच्या...
  June 18, 04:50 PM
 • नाशिक: महापालिका आयुक्तपदाच्या नाट्यावर अद्यापही पडदा पडलेला नसल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी होत आहे. कॅटने बी. डी. सानप यांच्या बदलीला स्थगिती दिली, तरीही जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी शुक्रवारी पालिकेचे उपायुक्त आणि आरोग्य अधिकायांना फर्मान धाडून बैठकीला बोलावून घेतले. त्यामुळे ऐकावे कोणाचे? असा पेच कर्मचारी-अधिकायांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा फैसला आता २० जूनला होणार असल्याचे कॅटने जाहीर केले आहे. महापालिकेचे आयुक्त बी. डी. सानप यांची शासनाने बदली केल्यानंतर...
  June 18, 01:41 AM
 • नाशिक: क्षयरोग (टीबी) असलेल्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी आहे. या आजारावर आणखी प्रभावी उपचार करणारी डॉट प्लस उपचार पद्धती विकसित झाली असून, राज्यात नागपूर, औरंगाबाद, पुणे, अमरावती व मुंबई या विभागात ही उपचार पद्धती कार्यान्वित करण्यात आली आहेसध्या नाशिक जिल्हय़ात क्षयरोगाचे 1680 रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हय़ात सूक्ष्मदर्शक केंद्रे आहेत, तर अकरा ठिकाणी क्षयरोग उपचार पथके कार्यान्वित आहेत. यापूर्वी या आजाराचे निदान एक्स-रे काढून केले जायचे, परंतु त्यात शंभर टक्के योग्य...
  June 17, 05:37 AM
 • नाशिक: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून आज पंढरपूर येथे जाण्यासाठी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे वाजतगाजत प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यात मानाच्या 30 दिंड्यांमधील दहा हजार वारकरी सहभागी झाले आहेत.सदगुरू निवृत्ती महाराज संस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील आणि विश्वस्त डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या हस्ते पादुकांची महापूजा झाली. मानाच्या दिंड्यांना नारळ प्रसादाचे वाटप करून पालखी सोहळा कुशावर्त येथे जाऊन तेथे भाविकांनी स्नान केले. यानंतर सजविलेल्या रथामधून...
  June 17, 05:21 AM
 • नाशिक: महापालिकेच्या आयुक्तपदावरून सध्या सुरू असलेल्या वादामुळे प्रशासकीय आणि नागरी विकास कामांचाही खोळंबा होत आहे. आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार हाती घेतलेले जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्यामुळेच महापालिकेत वाद सुरू असल्याचा आरोप करत बुधवारी सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ अधिकायांच्या बदल्यांमध्ये नाशिक महापालिकेचे आयुक्त बी. डी. सानप यांचीही बदली झाली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून आपली बदली...
  June 16, 03:08 AM
 • नाशिक - अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत प्रीतेश विनोद छाजेड याने 200 पैकी 199 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. माता-पिता, शिक्षकांचे प्रोत्साहन व नियमित अभ्यासामुळेच हे यश आपण मिळवू शकल्याचे तो सांगतो.प्रीतेश हा नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. इयत्ता 12 वीमध्ये त्याने 92.05 टक्के गुण मिळविले होते. त्याला अभियांत्रिकी क्षेत्राची आवड आहे. महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या सीईटीत त्याला 200 पैकी 199 गुण मिळाले आहेत. भौतिकशास्त्र...
  June 15, 06:32 PM
 • नाशिक - वारंवार पाठपुरावा करूनही प्रलंबित मागण्यांची महापालिका प्रशासन व शिक्षण मंडळ कोणतीही दखल घेत नसल्याने त्रस्त झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी २६ जून रोजी शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाद्यपूजा करून माल्यार्पण करण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन करण्यामागे शिक्षण मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृद्धमंडळींचे प्रश्न सोडविण्याची सुबुद्धी मिळो, असे साकडे घातले जाणार आहे.
  June 15, 05:44 PM
 • नाशिक - जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप राठोड यांनी अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर नियुक्त्या केल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला.छत्तीस अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यातील 14 अस्थायी आणि चार स्थायी अधिकाऱ्यांना परस्पर नियुक्त करण्यात आले कसे, असा प्रश्न उपस्थित करत पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग आणि डॉ. राठोड यांना सभेच्या...
  June 15, 05:38 PM
 • नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइं आणि कम्युनिस्ट पक्षाने आपापल्या कुवतीनुसार तयारी सुरू केली आहे. कधीकाळी बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे वा कालौघात नेस्तनाबूत झालेले हेच बालेकिल्ले पुन्हा एकवार सर करण्याच्या उद्देशाने विशेषत: सत्तारूढ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी इरेला पेटली आहेत. शेतकरी मेळावे, जिल्हा वा विभागीय स्तरावर भरविले जाणारे कार्यकर्त्यांचे मेळावे असो, की घटनास्थळांना...
  June 13, 03:39 AM
 • नाशिक: जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे रविवारी नाशिकमध्ये रोजगार मेळावा घेण्यांत आला. त्यात सुमारे चार हजार युवकांनी हजेरी लावली. या मेळाव्यात चाळीस कंपन्यांनी मुलाखती घेऊन काही युवकांची निवडही केली.भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे खजिनदार आमदार हेमंत टकले होते. राष्ट्रवादी पक्षाच्या मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मेळाव्यात सुमारे...
  June 13, 02:09 AM
 • नाशिक - राष्ट्रवादी कॉग्रेंसतर्फे बेरोजगार युवक- युवतींसाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यासाठी सुमारे चार हजार युवकांनी हजेरी लावली. या मेळाव्यात राज्यातील चाळीस कंपन्यांनी मुलाखती घेऊन युवकांची निवड देखील केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉग्रेंसचे खजिनदार आमदार हेमंत टकले अध्यक्षस्थानी होते.येथील भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात राष्ट्रवादी पक्षाच्या मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या...
  June 12, 07:51 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात