जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • नाशिक: जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे रविवारी नाशिकमध्ये रोजगार मेळावा घेण्यांत आला. त्यात सुमारे चार हजार युवकांनी हजेरी लावली. या मेळाव्यात चाळीस कंपन्यांनी मुलाखती घेऊन काही युवकांची निवडही केली.भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे खजिनदार आमदार हेमंत टकले होते. राष्ट्रवादी पक्षाच्या मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या मेळाव्यात सुमारे...
  June 13, 02:09 AM
 • नाशिक - राष्ट्रवादी कॉग्रेंसतर्फे बेरोजगार युवक- युवतींसाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यासाठी सुमारे चार हजार युवकांनी हजेरी लावली. या मेळाव्यात राज्यातील चाळीस कंपन्यांनी मुलाखती घेऊन युवकांची निवड देखील केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉग्रेंसचे खजिनदार आमदार हेमंत टकले अध्यक्षस्थानी होते.येथील भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात राष्ट्रवादी पक्षाच्या मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे या...
  June 12, 07:51 PM
 • नाशिक महापालिकेला जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी ३ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी केंद्र शासनाने पाठविला आहे.याबाबतची माहिती केंद्रीय शहरी विकासमंत्री कमलनाथ यांनी पत्राद्वारे दिली असल्याचे खा. समीर भुजबळ यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून नाशिक शहरात पाणीपुरवठा, भूमिगत सांडपाणी योजना दोन टप्प्यांत, घनकचरा व्यवस्थापन, पावसाळी पाण्याचा निचरा, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि...
  June 12, 04:45 PM
 • नाशिक- कैद्यांचे आयुष्य म्हणजे भिंतींमागचा बंदिस्त संसार. तिथे मनोरंजन, पुस्तके, साहित्य आदी गोष्टींना थारा नसतो, ना सुख - दु:खाच्या चार गोष्टी करण्याची परवानगी असते. परंतु तिथेही आता सुधारणांचे वारे वाहू लागले आहे. नाशिकच्या कारागृहात श्यामची आई पुस्तकाची पंचाहत्तरी साजरी झाली अन् यानिमित्ताने कैद्यांना अनुभव कथन, कविता वाचन, नृत्य, अभिनयाची संधी मिळाली. साने गुरूजी यांनी लिहिलेल्या पुस्तकाला ७५ वर्षे झाली. याचे औचित्य साधून नाशिकच्या कारागृहात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रमुख...
  June 12, 04:11 AM
 • नाशिक- तारवालानगर येथील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात स्फोटके आणि फटाके उत्पादन करणा-यांचे परवाने तपासण्यात येतील. तसेच बेकायदा फटाके तयार करणा-यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त विनोद लोखंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. लोखंडे म्हणाले की, तारवालानगरात झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी पोटॅशिअम नायट्रेड, नायट्राईड, सल्फर यासारखे स्फोटके आढळल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे. त्यामुळे हा स्फोट घातपात नसून अपघात असल्याचे स्पष्ट...
  June 11, 03:12 AM
 • नाशिक- सरकारी काम अन् सहा महिने थांब या उक्तीलाही लाजवेल, असा कारभार नाशिक जिल्हा परिषदेने अपहाराची चौकशी व वसुलीबाबत केल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेने वितरित केलेल्या सुमारे चार कोटींचा निधी जिल्ह्यातील 425 ग्रामपंचायतींनी गेल्या 45 वर्षांत हडप केल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्यापही त्याची ना गांभीर्याने चौकशी होते ना वसुली. पंचायत राज व्यवस्थेअंतर्गत शासनाकडून थेट निधी ग्रामपंचायतींना वितरित केला जातो. मात्र, वितरित झालेला निधी शेवटच्या घटकांपर्यंत न पोहोचता शासकीय अधिकारी,...
  June 11, 02:29 AM
 • नाशिक- पंचवटी भागातील तारवालानगरमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्फोट झालेल्या दुकानात अनधिकृत फटाके तयार केले जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, या स्फोटात दोन आरोपींचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी संबंधितांच्या रासेगाव (ता. दिंडोरी) येथील फटाक्याच्या कारखान्यावर धाड टाकून फटाके जप्त केले.तारवालनगर येथील सप्तशृंगी सोसायटीमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या शक्तिशाली स्फोटाने तीन...
  June 10, 02:10 AM
 • नाशिक: शहरातील तारवालानगरातील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये झालेला स्फोट हा घातपात नसून तो अपघात असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पोलिसांना तपासादरम्यान कोणतेही पुरावे आढळून आले नाही. असेही भुजबळ यांनी आज (गुरूवारी) सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अजून यायचा आहे. त्यानंतरच याबाबात अधिकृतपणे सांगता येईल, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान, पंचवटी भागातील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्फोट...
  June 9, 03:14 PM
 • नाशिक: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंचवटीतील तारानगर येथील स्फोटातील मृतांच्या वारसांना एक लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची तातडीने मदत जाहीर केली. घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी या मदतीची घोषणा केली. दोन एटीएस पथक, फॉरेंसिक लॅब आणि पोलिसांकडून तपास सुरु आहे. फॉरेंसिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच निष्कर्षापर्यंत पोहचू असेही मुख्यमंत्री म्हणाले.पालकमंत्र्यांकडून जखमींची चौकशीनाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तारानगर येथील स्फोटातील जखमींची चौकशी केली. श्री. भुजबळ यांना...
  June 8, 07:32 PM
 • मुंबई: पंचवटी भागातील तारानगर येथील सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये आज (बुधवारी) दुपारी साडे तीनच्या सुमारात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने सतर्कतेचे आदेश दिले आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील हे नाशिकला रवाना झाले आहे. घटनास्थळी एटीएस पथक, फॉरेंसिक लॅब, बॉम्ब शोध पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे. स्फोट कशामुळे झाला हे तपासानंतर निष्कर्ष काढला जाईल, असे आर. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, स्फोटात चार ठार झाले असून सात जण गंभीर जखमी झाले आहे. मृतामध्ये...
  June 8, 06:24 PM
 • नाशिक - नाशिकमध्ये काल झालेल्या स्फोटाची तपासणी करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पुणे आणि मुंबई येथून दोन पथके नाशिकला रवाना झाली होती. पंचवटी भागातील सप्तशृंगी अपार्टमेंटमध्ये बुधवारी फटाक्यांच्या दारुच्या शक्तिशाली स्फोटात तीन जण ठार तर चार जण जखमी झाले. हा स्फोट इतका भयानक होता की त्यात इमारतीचा समोरील अर्धा भाग कोसळला तसेच पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी व चारचाकीचेही नुकसान झाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना...
  June 8, 03:55 PM
 • नाशिक: जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गरीब रुग्णांना स्वस्त उपचाराचे आमिष दाखवून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करणारी टोळी कार्यरत असल्याने खळबळ उडाली आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेला चक्क बालरोग तज्ज्ञांकडे दाखल केल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही रुग्णांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. परंतु जिल्हा रुग्णालयातील रुग्ण खासगी रुग्णालयात कसे पळवून नेले जातात, या संदर्भात पदाधिका-यांनी कानावर हात ठेवले...
  June 8, 01:24 PM
 • नाशिक- संपूर्ण साक्षरता अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या निरंतर शिक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडेच धूळखात पडून असल्याची ओरड प्रौढ शिक्षण विभागाकडून होत आहे. मात्र, प्रत्यक्षात आता ही योजना शासनाने बंद करून साक्षर भारत या नव्या उपक्रमाद्वारे प्रौढ शिक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, याची खबरबातही राज्यातील संबंधित विभागांना नाही. राज्यातील ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व कळावे, त्या माध्यमातून त्यांचे जीवनमाच उंचावे या...
  June 8, 03:59 AM
 • धुळे - शहर व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात चो-यांचे सत्र सुरू आहे. रविवारी (ता.५) रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी साक्री रस्त्या परिसरातील गुरूनानक सोसायटीतून ६५ तोळे सोने व दीड लाख रुपयांच्या इतर वस्तू असा तब्बल २० लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकाराने केवळ साक्री रोड परिसरच नव्हे, तर संपूर्ण धुळे शहर हादरून गेले आहे. गुरूनानक सोसायटीतील प्लॉट ४२ मध्ये आनंद प्रकाश प्रभुदयाळ राहतात. रविवारी रात्री ते पुढच्या खोलीत झोपले होते. चोरट्यांनी मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान मागच्या...
  June 6, 07:07 PM
 • नाशिक: योगगुरू बाबा रामदेव यांनी सुरू केलेले आंदोलन हे चुकीच्या पद्धतीने असून, त्यांनी प्रथम न्यायप्रक्रिया समजून घ्यायला हवी होती. विरोधक सत्तेसाठी हपापले आहेत, त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन ते समाजसेवक अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांचा वापर करून सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला.महाराष्ट प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या राजस्तरीय जनसेवक प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते...
  June 6, 01:39 AM
 • सूरत येथील साईभक्त संदीप नाईक यांनी १४ लाख ३८ हजार किमतीचा ६९५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट शिर्डी येथे साईबाबांना अर्पण केला.
  June 5, 09:43 PM
 • सूरत येथील साईभक्त संदीप नाईक यांनी १४ लाख ३८ हजार किमतीचा ६९५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट शिर्डी येथे साईबाबांना अर्पण केला.
  June 4, 05:35 PM
 • नाशिक - सिडकोतील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून, आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांनी एक अंत्ययात्रा काही दिवसांपूर्वीच महापालिकेसमोर आणली होती. त्याची पुनरावृत्ती गुरुवारी (दि. २) झाली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सिडकोत दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सिडको मशीद ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. तरीही प्रश्र मार्गी लागत नसल्याने...
  June 3, 01:46 AM
 • नाशिक - सिडकोतील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून, आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांनी एक अंत्ययात्रा काही दिवसांपूर्वीच महापालिकेसमोर आणली होती. त्याची पुनरावृत्ती गुरुवारी (दि. २) झाली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सिडकोत दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सिडको मशीद ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. तरीही प्रश्र मार्गी लागत नसल्याने...
  June 3, 01:45 AM
 • मनमाड - राज्यात सध्या घोटाळेबाजांचे सरकार असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अलिबाबा आहेत, तर त्यांचे मंत्रिमंडळ हे चाळीस चोरांची टोळी आहे. राज्यात युतीची सत्ता आल्यास सहा महिन्यांसाठी का होईना, आपण गृहमंत्री होऊन या टोळीला तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मंगळवारी (दि. 31) येथे केले. नांदगाव, येवला व चांदवड या तीन तालुक्यांतील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, शासनकर्ते घोटाळे करण्यातच...
  June 2, 04:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात