जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

Nashik News

 • सूरत येथील साईभक्त संदीप नाईक यांनी १४ लाख ३८ हजार किमतीचा ६९५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट शिर्डी येथे साईबाबांना अर्पण केला.
  June 4, 05:35 PM
 • नाशिक - सिडकोतील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून, आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांनी एक अंत्ययात्रा काही दिवसांपूर्वीच महापालिकेसमोर आणली होती. त्याची पुनरावृत्ती गुरुवारी (दि. २) झाली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सिडकोत दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सिडको मशीद ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. तरीही प्रश्र मार्गी लागत नसल्याने...
  June 3, 01:46 AM
 • नाशिक - सिडकोतील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून, आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांनी एक अंत्ययात्रा काही दिवसांपूर्वीच महापालिकेसमोर आणली होती. त्याची पुनरावृत्ती गुरुवारी (दि. २) झाली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सिडकोत दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सिडको मशीद ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. तरीही प्रश्र मार्गी लागत नसल्याने...
  June 3, 01:45 AM
 • मनमाड - राज्यात सध्या घोटाळेबाजांचे सरकार असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अलिबाबा आहेत, तर त्यांचे मंत्रिमंडळ हे चाळीस चोरांची टोळी आहे. राज्यात युतीची सत्ता आल्यास सहा महिन्यांसाठी का होईना, आपण गृहमंत्री होऊन या टोळीला तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मंगळवारी (दि. 31) येथे केले. नांदगाव, येवला व चांदवड या तीन तालुक्यांतील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, शासनकर्ते घोटाळे करण्यातच...
  June 2, 04:06 AM
 • नाशिक - कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने दलित जनतेचा वापर केवळ मतदानासाठीच करून घेतला, हे उशिरा का होईना लक्षात आले. आता दलित आदिवासी जनतेला सोबत घेऊन शिवसेना-भाजपशी युती करून सत्ताधार्यांशी लढणार आहोत. या लढय़ात संपूर्ण दलित जनता आपल्या पाठीशी राहील, असा विश्वास रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी बुधवारी (ता. 1) व्यक्त केला.शिवशक्ती - भीमशक्तीचा मेळावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात झाला, या वेळी ते बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, रामदास कदम, उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते...
  June 2, 03:41 AM
 • नाशिक । मुंबई- आग्रा महामार्गावरील गोंदे औद्योगिक वसाहत परिसरात मालट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले, तर एक जण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 31) सकाळी झाला. इगतपुरी तालुक्यातील मोंढेगाव येथील धोंडीराम पांडुरंग कातोरे, संदीप नाना पाळदे आणि जगन पांडुरंग पाळदे हे तिघे दुचाकीवरून विल्होळी (ता. नाशिक) येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून परतत असताना मुंबईकडून नाशिकडे जाणार्या ट्रकने गोंदे शिवारात त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात धोंडीराम...
  June 1, 04:07 AM
 • नाशिक - नाशिक तीर्थक्षेत्री 2003 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळय़ाची आठवण झाली की आजही नाशिककरांच्या अंगावर शहारे उभे राहतात. या सोहळय़ात शाहीस्नानाच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत 37 भाविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती 2015च्या सोहळय़ात टाळण्यासाठी रमणी आयोगाने शाहीमार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि याच मुद्द्यावरून आता लोकप्रतिनिधी व प्रशासनात वाद निर्माण झाला आहे.उज्जैन, अलाहाबाद, हरिद्वार आणि नाशिक या देशातील चार तीर्थक्षेत्री कुंभमेळा साजरा होतो. नाशिक...
  June 1, 04:00 AM
 • नाशिक - शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने शहरातील नासर्डी नदीलगत नऊ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या सामाजिक न्याय भवनच्या चार इमारतींचे बांधकाम वादाच्या भोव:यात सापडले आहे. महापालिकेची परवानगी न घेता पूररेषेच्या आत बांधण्यात आलेल्या या इमारतीला आता पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नाशिक- पुणे महामार्गावर द्वारका भागातील नासर्डी नदीलगत विशेष समाजकल्याण विभागाचे कार्यालय आहे. तेथील मोकळ्या भूखंडावर सामाजिक न्याय विभागाने विशेष घटक योजने अंतर्गत...
  May 31, 05:19 AM
 • नाशिक - शहराच्या मध्यवस्तीतील सीबीएस परिसरात असलेल्या जिल्हा न्यायालयात बॉम्बशोधक पथक आणि जलद प्रतिसाद पथकाचा ताफा अचानकपणे आल्याने वर्दळीचे ठिकाण असलेल्या या भागातील पादचा-यांची एकच धावपळ उडाली. न्यायालयात बॉम्ब आढळल्याच्या अफवेने क्षणात हा भाग निर्मनुष्य झाला. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर ही कार्यवाही म्हणजे पोलिस दलाचे प्रात्यक्षिक असल्याचे कळाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कालच गृहमंत्री आर. आर. पाटील नाशिकला येऊन गेल्याच्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडल्याने...
  May 31, 05:14 AM
 • नाशिक - अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पोलिसांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यावर यापुढील काळात भर देण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी येथे केले.येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या 1985-1986 च्या बॅचच्या रजत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी...
  May 30, 05:06 AM
 • नाशिक - मंगळसूत्र चोरट्यांच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यातील महानगरांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी (दि. 29) नाशिक येथे दिली.पोलिस अधिकार्यांच्या 1985- 86 च्या बॅचच्या रजत महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आर.आर. पाटील म्हणाले की, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे....
  May 30, 04:58 AM
 • नाशिक - "पूररेषेतील बांधकामांबाबत सरकार गंभीर असून, पूररेषेतील बांधकाम पक्के असो की कच्चे, शासन नोटीस देणार आहे. मात्र, त्याच वेळी चिपळूणप्रमाणे नाशिकमध्येही पूररेषेत प्रचंड बांधकामे झालेली असल्याने त्याबाबत सरकार पातळीवर फेरविचार करण्यात येईल. तसेच वृक्षारोपणाबाबत भविष्यात गांभीर्याने "ट्री ऑडिटिंग' होईल,'' अशी माहिती वन व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी आज दिली. नाशिक विभागीय महसूल कार्यालयात कदम यांनी पुनर्वसन बैठक घेतली. विभागीय महसूल आयुक्त जयंत गायकवाड, जिल्हाधिकारी पी....
  May 27, 11:10 PM
 • मनमाड - शिवशक्ती-भीमशक्ती-भाजप यांचा विधान सभेवरील मोर्चा, आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यर्कत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचा नांदगाव, चांदवड आणि येवला तालुक्याचा मेळावा २९ मे रोजी मनमाडमध्ये होणार आहे. नेहरू भवनात होणाऱ्या या मेळाव्याला माजी विरोधी पक्षनेते आ. रामदास कदम, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अरविंद सावंत आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांनी दिली. या मेळाव्याची रूपरेषा...
  May 27, 10:46 PM
 • नाशिक - येवला येथे येवला-कोपरगाव रस्त्यावरील कैलास हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचून दोन लाख रुपये किमतीचे दोन किलो ५० ग्रॅम चरस हस्तगत केले. या प्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणात इरफान शेख सुलतान, मो. शफीक मो. रफीक, सादीक अख्तर अन्सारी या येवल्यातील तीन तरुणांना अटक करण्यात आली.
  May 27, 09:45 PM
 • नाशिक - राज्यात खळबळ उडवून देणार्या मनमाड पानेवाडी येथील मालेगांवचे अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे जळीतकांडातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या सात आरोपींचा मोक्का न्यायालयाचे विशेष न्या. श्रीमती एम.एस. जवळकर यांनी प्रत्येकी पंचवीस हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. प्रारंभी सीबीआयच्या वतीने न्यायालयात दाखल झालेला आरोपींना बंदिस्त ठेवण्याबाबतचा अर्ज या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. २५ जानेवारीला दुपारी मनमाडजवळील पानेवाडी शिवारात सागर ढाब्याजवळ देशाला...
  May 27, 09:26 PM
 • नाशिक - मुंबईनाका ते फाळके स्मारक समांतर रस्त्यावरुन रिक्षाचालक वाहतूक पोलिसांना न जुमानता सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतुक करुन नागरिकांच्या जिवीताशी खेळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरात तीन चाकी रिक्षांना प्रवासी वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे; मात्र अलीकडच्या काळात ऍपे आणि सहा आसनी अशा दोन्ही पद्धतीच्या रिक्षाही शहरातून प्रवासी वाहतूक करतात. प्रत्यक्षात दोन्ही रिक्षांना शहरातून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी नाही. तरीही त्यांच्यावर आरटीओकडून काहीच कारवाई केली...
  May 27, 04:49 PM
 • नाशिक - नाशिक परिसरात अद्याप कोणतेही पावसाळीपूर्व काम सुरु झाले नसून नाशकातील नालेसफाईबरोबरच रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी महानगरपालिकने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेने मागच्या वर्षी पावसाळी गटार योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला होता, त्यामुळे शहर अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते.
  May 27, 04:40 PM
 • मनमाड - येवला येथे कोपरगाव रस्त्यावर कैलास हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचून दोन लाख रुपये किमतीचे दोन किलो ५ ग्रॅम चरस जप्त केले. या प्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सुनील कु:हाडे यांच्यासह पथकाने मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात केली. या प्रकरणात इरफान शेख सुलतान, मो. शफीक, सादिक अख्तर या येवल्यातील तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
  May 27, 03:45 PM
 • नाशिक - बंधा-यातील पाण्यामुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई द्यावी व इतर मागण्यासांठी चेहडी गावच्या शेतक:यांनी गुरूवारी (ता. 26) चेहडीच्या बंधा-यावर चढून आंदोलन केले. अधिका-यांनी मिनतवारे करून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. चेहडी शिवारात चेहडी बंधार बांधण्यात आला आहे.पालिकेने उपायोजना न केल्याने गतवर्षी पुरामुळे बंधार्यांचा काही भाग फुटला. त्यात चेहडी येथील आठ ते दहा शेतकर्यांच्या ६ गुंठे शेती उद्धवस्त झाली होती. तसेच एका शेतकर्याच्या घराचे आणि दोन...
  May 27, 03:39 PM
 • नाशिक - राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बढतीवर बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले. यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक उध्दव कांबळे, नाशिकचे पोलीस आयुक्त व्ही. डी. मिश्रा आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मिलिंद भारंबे अशा तीन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या एकाच वेळेस बदल्या झाल्या आहेत.
  May 24, 05:07 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात